सुदामा होणं इतक सोपी नाही

सुदामा होणं इतक सोपी नाही
सुदामा कृष्ण मैत्री बहुतेक सर्वांनाच माहीत आहे. सुदाम्याच्या बायकोने सुदाम्याला तीन मुठी पोहे दिले होते. ते घेऊन सुदामा द्वार केला श्रीकृष्णाला भेटायला आला होता. ते पोहे श्रीकृष्ण मोठ्या आवडीने व चविणे खात होते. दोन मुठी पोहे तर त्यांनी खाल्ले, पण ज्या वेळी तिसरी मूठ पोहे खाणार तितक्यात रुखमिनीने ताबडतोब त्यांचा हात पकडला. रुखमिनी म्हणाल्या आर वा सुदाम्याच्या बायकोने दिलेले पोहे तुम्ही एकटेच खाणार. मला पण एक मूठ खाऊ द्याव. असे म्हणताच श्रीकृष्णाने ती तिसरी मूठ सोडून पोहे पोटलीत टाकले. तोच रुखमिनी म्हणाली या स्वादिष्ट पोह्याचा आस्वाद तुम्ही एकटेच घेणार होते. हा आप्पल पोटे पणा,स्वार्थ बरा नव्हे. आम्हाला पण त्याचा स्वाद घेऊ द्या. श्रीकृष्ण गालातल्या गालात हसले, व ती पोटली रुखमिनीच्या हातात दिली, व ते तिथून निघून गेले.

सुदामा जवळ आल्यावर जुन्या गप्पा गोष्टी मारीत होते. गप्पा गोष्टी रंगात आल्या असतं सुदाम्याला

केव्हा झोप लागली हे लक्षात पण आले नाही. श्रीकृष्ण हळू हळू सुदाम्याचे पाय चेपत होते. पाय चेपता चेपता त्यांना जुन्या गोष्टी आठवत होत्या. श्रीकृष्ण सुदाम्याचे पाय चेपण्यात एवढे दंग झाले होते की, मनातल्या मनात जुन्या गोष्टी आठवून मंद स्मित करीत होते. हे लपून रुखमिनी पहाट होती. ती जवळ गेली व श्रीकृष्णाच्या जवळ जाऊन त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. श्रीकृष्ण दचकले पहिले रुखमीनिकडे नंतर सुदामा कडे पाहू लागले. तो तर निद्रिस्त झाला होता. रुखमीनिचा आशय लक्षात आल्यावर श्रीकृष्ण उठले व आपल्या कक्षात निघून गेले. पाठोपाठ

श्रीकृष्णाची ही मग्न अवस्था बघून रुखमिनीने विचारले स्वामी आजचे आपले वागणे फार विचित्र वाटते. तुम्ही या विश्वाचे स्वामी. मोठे मोठे राजे, सम्राट तुम्हाला भेटायला आल्यानंतर तुम्ही भेटायला आल्या नंतर तुम्ही त्यांचे कडे आकर्षित होत नाही. किंबहुना प्रभावित पण होत नाही. सुदाम्याचे आगमन झाल्यावर सूचना मिळाल्या मिळाल्या,पायताने न घालता एवढे भाव विवश झालात की समोरचे जेवणाचे ताट बाजूला सारून धावत धावत भेटायला निघून गेलात. एवढे त्यांचे विषयीचे प्रेम आश्चर्यच वाटते आहे. तुम्ही ज्यांना कधी कुणी दुख कष्ट आणि आव्हान देऊन रडवू शकले नाही. ते श्रीकृष्ण ज्यांनी गोकुळ सोडते वेळी नंद आणि यशोदा यांचे डोळ्यात आलेली पानी पाहून पण रडायला आले नाही, ते श्रीकृष्ण आपल्या मित्रांचे म्हणजे सुदाम्याचे कृश शरीर पाहून इतके भाऊक झालेत की डोळ्यात अश्रु आलेत,व त्या अश्रुनी सुदाम्याचे म्हणजे मित्रांचे पाय धुवलेत.

कुट नीति, राज‍नीति ज्ञानाने संपन्न असलेला शिखर पुरुष श्रीकृष्ण. आपल्या मित्राला पाहिल्यावर इतके मग्न झालात की आजूबाजूला कोण आहे यांचे भान पण राहले नाही. काहीही कशाचाही विचार न करता त्या सुदामाला संपूर्ण तिन्ही लोकांची समृद्धी व संपदा द्यायला तयार झाले. कृष्ण त्याच अवस्थेत रुखमिनीला म्हणाले तो माझा बालपंनचा मित्र आहे. त्याच वेळी सत्य भामा म्हणाली हाच तमचं मित्र आहे. ज्यांनी गुरु मातांनी दिलेले चणे तुमच्या हिषशाचे तुम्हाला न देता स्वताच खाऊन टाकले होते. गुरू मातांनी सांगीतले होते की प्रत्येकाच्या हिस्याचे चणे प्रत्येकांनी खायचे हे सांगितल्या वरही त्यांनी तुमच्या हिसायचे चने खाल्ले. यावर श्रीकृष्णाच्या अभिप्रायांची वाट पहाट होती.

श्रीकृष्ण हसले आणि म्हणाले बरोबर आहे तुमचे म्हणणे. सुदाम्यानि मा‍झ्या हिस्याचे चणे खाल्लेत हे सर्व बरोबर आहे. सत्यभामे त्या त्याच्या कृत्याविषयी समस्त सृष्टीने सुदाम्याचे आभारच माना वयास पाहिजे. ते चणे त्यांनी त्याला भूक लागली म्हणून खाल्ले नाहीत. सुदाम्याला असे कधीही वाटले नाही की त्याचा मित्र म्हणजे मी श्रीकृष्ण हा दरिद्रेत जावू नये. तो दरिद्री होऊ नये म्हणून खाल्ले. कारण त्याला माहीत होते की ते चणे आश्रमात एका चोरानी आणून ठेवले होते. त्याला हे पण माहीत होते की चोरांनी ते चणे एका ब्राह्मणाच्या घरातून चोरून आणले होते. त्या ब्राम्हणीने शाप दिला होता की जो कुणी हे चणे खाईल, तो बारा विश्व दरिद्री होईल. सुदाम्यानि ते चणे याकरिता लपून खाल्ले कारण मी दरिद्री होऊ नये सुखी राहवे. सुदामा मला ईश्वराचा अंश समजत होता. सुदाम्यानि हे चणे याकरिता खाल्ले की हे चणे खाऊन ईश्वर जर दरिद्री झाला तर या सृष्टीचे काय होईल. संपूर्ण सृष्टि दरिद्री होईल. सुदाम्याने संपूर्ण सृष्टीच्या कल्याणाकरिता ते चणे खाल्ले.

सृष्टीच्या कल्याणाकरिता सुदामाने स्वता दरिद्री होणे स्वीकारले. इतका मोठा त्याग? हे शब्द रुखमिनीच्या तोंडातून बाहेर पडले. तुला माहीत आहे रुखमिनी कुटुंब सोडून बाकी कुणीच कृष्णाचे इतके चांगले होवो हा विचार केला नाही. इतका चांगला विचार मा‍झ्या करिता सुदामाणी केला. लोक माझ्याकडून त्यांचे भले व्हावे या भावनेने येतात. मनात हीच ईछा ठेवतात की आमचे चांगले व्हावे. सुदामा आपल्या मित्रांचे चांगले व्हावे म्हणून स्वेच्छेने दळिद्रात आणि कष्ट ओढवून घेतले. असे मित्र फार दुर्लभ असतात. माहीत नाही किती जन्माचे पुण्य केल्या नंतर असे मित्र मिळतात.

आता मला संग रुखमिनी आणि सत्य भामा. अश्या मित्राला मी जरी तिन्ही लोकांची संपदा दिली तरीही ती कमीच वाटणार. हे बो लतांनी श्रीकृष्ण फार भाऊक झाले. त्यांच्या डोळ्यात अश्रु तरळत होते, तर

सुदामाच्या डोळ्यातून गंगा यमुनेचा पुर येत होता. ही खरी मैत्री व मैत्रीचा स्वीकार.

या कलियुगात मित्र मिळणेच दुरापास्त झाले आहेत.

        जय श्रीकृष्ण जय मुरारी.

Post a Comment

0 Comments