कालसर्प योग दोष आहे का?

कालसर्प योग दोष आहे का❓️👉
 सर्वांना विनंती आहे की आपल्याला जे काही या योगा बद्दल मत व्यक्त कराचे असेल ते शुद्ध आणि सात्विक भाषेत आणि ग्रुपची मर्यादा सांभागळून करावी, त्या अगोदर व्यवस्थित लेख वाचून घ्यावा.

 पाहुयात खलील महत्वाच्या मुद्दयातून हा योग. 
      
1) काल सर्प योग ग्रह योगात कसा बनतो? 
2) काल सर्प योग हे नाव तरी कसे निर्माण झाले? 
3) काल सर्प योग मानावा की नाही? कारण ज्योतिषीय पौराणिक ग्रंथात यांचा उल्लेख सापडत नाही.  
4) कालसर्प योग आहे की दोष आहे? 
5) असेल तर किती प्रकारचा असतो?
6) अब्राहन लिंकन, सचिन तेंडुलकर, जवहारलाल नेहरू, धिरूभाई अंबानी यांच्या कुंडलीत पण हा योग आहे मग हे तर लोक आभाळ ऊंची गाठलेले लोक आहेत. 
7) कुठल्या ग्रहस्थितीत हा योग भंग होतो? 
8) केव्हा हा योग त्रास दायक ठरतो? 
9) या योगा पासून त्रास होत असेल तर काय उपाय करावेत?  

#कालसर्प योग केव्हा होतो? 
जेव्हा कुंडलीत राहू आणि केतू या दोन्ही पापग्रहांच्या मध्ये बाकी सर्व 7 ग्रह येतील त्या वेळी कालसर्प योग बनतो. राहु-केतू दोन्ही Extrinsic दाखवतात एक जमीन आहे तर दूसरा आकाश आहे, हे दोन्ही एक मेका पासून सर्वात दूर म्हणजे 180 अंशावर राहतात, एक मेका पासून सातव्या भावात स्थित असतात. महर्षि पारशार सांगतात राहू चोर आहे, हा अधोमुखी आहे, त्याची दृष्टी जमिनीकडे असते, तर दुसरीकडे केतू हा योगी आहे याची दृष्टी वरच्या बाजूस असते, योगी नेहमी वर पाहतो, राहू जमीन आहे तर केतू आकाश आहे, म्हणजे एवढे विपरीत आणि विरोधाभासी हे ग्रह बनतात. म्हणून म्हटले आहे राहू त्रीष्णा आहे, भोग, माया आहे जो संसारीक तहान बनून ठेवतो, आणि पूंनर्जन्म चे कारण निर्माण करतो तर केतू त्याग आहे, वैराग्य आहे आणि मोक्षाचा आधार बनवतो, म्हणून जोतिषात राहू ला माया आणि केतुला मोक्ष संगितले आहे. 
मग अशा प्रभावशाली ग्रहांच्या मध्ये जेव्हा सर्व ग्रह येतात मग का नाही समस्या निर्माण होऊ शकत, पहा माया आपल्याला संसारातून बाहेर पडायला देत नाही आणि मोक्ष सहसा मिळत नाही. म्हणून राहू-केतू च्या मध्ये स्थित ग्रह समस्या निर्माण करतात. 

2) अशा स्थितीत प्रश्न निर्माण होतो की हा योग खरोखरच आहे की मनाचा भ्रम आहे, कारण पौराणिक ज्योतिष शास्त्रमध्ये तर याचा काही उल्लेख सापडत नाही. पहा शास्त्रामध्ये एका योगाची चर्चा नक्कीच केली आहे आणि तो आहे पाप कर्तरी योग, म्हणजे दोन पाप ग्रहांच्या मध्ये जर कुठला ग्रह असेल तर तो संकटात सापडतो आणि वाईट परिणाम देतो, कर्तरी शब्दा पासून हा पाप्कर्तरी बनला आहे, कर्तरी कात्रीला म्हटले जाते, समजा कात्रीच्या मध्ये जर कुठली वस्तु ठेवाल तर कात्री तिला कापू शकते, आशा प्रकारे संगीता ग्रंथ सांगतो की राहू आणि केतू च्या मध्ये जर बाकी ग्रह येतील तर संसार उत्पात स्थिति निर्माण होते, आणि समस्या वाढतात, जर जगात ही गोष्ट निर्माण होऊ शकते तर एका व्यक्तीवर ही गोष्ट का लागू शकत नाही. 

#तर हा काल सर्प नक्की आहे तरी काय? शेवटी हे नाव तरी कसे पडले? 
या साठी काही कारणे सांगता येतील. राहू चे जन्म नक्षत्र जे आहे ते भरणी नक्षत्र आहे, आणि या नक्षत्राची देवता काल आहेत यमराज, आणि केतूचे जन्म नक्षत्र आश्लेषा आहे त्याची देवता सर्प आहे, तर राहू आणि केतू काल आणि सर्प प्रदर्शित करतात, म्हणूनच या योगास साधारण भाषेत काल सर्प योग म्हटले गेले आणि तेव्हा पासून ह्याला काल सर्प योग नावाने प्रसिद्ध झाला आहे. म्हणजे राहू आणि केतूच्या मध्ये जेव्हा सर्व ग्रह येतील तेव्हा कालसर्प प्रमाणे प्रभाव मिळेल. राहू आणि केतू आसमंजस चे ग्रह आहेत सूर्या पासून शनि पर्यन्त सात ग्रह पूर्ण होतात, पण राहू आणि केतू अपूर्ण ग्रह आहेत म्हणजेच छाया ग्रह आहेत, सात ग्रहांना सात दिवस दिले आहेत राहू आणि केतुस कुठलाही दिवस दिला नाही आहे, राहूचा वेळ संध्याकाळ आहे तर केतूचा सकाळचा ब्रम्हमुहूर्त आहे. 

 तसे पहाल तर राहू आणि केतू यांची स्वराशी, उच्च राशी, मित्र राशी, नीच राशी ह्या सामान्य विषयावर पण पौराणिक प्राचीन महर्षींन मध्ये ही काही एक मत सापडत नाही तर ह्या ग्रहान पासून बनणार्‍या ग्रह योगावर आपण एक मत कसे होऊ शकतो. जर पुराण आणि प्राचीन एवढे महान तपस्वी राहू–केतुत बनणार्‍या योगात एकमत नसतील तर तुम्ही आम्ही एक मत कसे होऊ शकतो? प्रत्तेक ज्ञानाचे स्रोत वेद आहेत पण पुराणांची कथा वेदा मध्ये नाही आहे, मग काय पुराणात सत्यता नाही का? 
पाच प्रकारे आपणास ज्ञान प्राप्त होते श्रुति, स्मृति, निगम, आगम आणि लोकाचार. श्रुति आणि निगम ला आपण वेद म्हणतो, स्मृति जे प्राचीन काळा पासून परंपरागत चाललेले, एकून परंपरागत ज्ञान ऋषि महर्षि नि आपल्या शिक्षांना देत आले, निगम म्हणजे तंत्र आणि लोकचार म्हणजे लोकल ट्रेडिशन, जसा विवाह कार्य असेल तर विवाह वैदिक परंपरा आणि स्थानीय परंपरा मिळून केला जातो, कल्पना करा आपल्या कडे एक प्रकारे विवाह होतो तर आपल्या विरूद दिशेस म्हणजे बंगाल मध्ये वेगळ्या स्थानिक परंपरागत होतो परंतु दोन्हीकडे गणेशांचे आवाहन करूनच विवाह केला जातो. आणि विवाह मंत्र सारखेच असतात, म्हणजे काही स्थानीय परंपरा पण त्यात महत्वपूर्ण असतात. तसेच खूप असे ज्योतिष मध्ये ही योग आलेत जे आपल्या ज्योतिषीय पुराणिक ग्रंथात नाहीत परंतु अनुभवात लोकांनी पाहिले की ह्याचा परिणाम येतो, आणि त्यांनाही यात समाविष्ट केले गेले. 

हा काल सर्प योग पण अनुभव वाली परंपरेत येते. जर एखाद्या शिक्षाला त्याच्या गुरुने जर हे संगितले की काल सर्पयोग हा दोष खरा आहे तर त्याच्या साठी गुरु आज्ञा समान आहे, त्याच प्रमाणे हर्षल, नेपचून, फ्लूटो सारखे ग्रह पण आपल्या वैदिक ज्योतिष परंपरेत सापडत नाही परंतु त्यांचे स्थानीय परिणाम पहाल तर नक्कीच आपल कारक तत्व देताना दिसतात. त्याच प्रकारे काल सर्प योग पण आपला प्रभाव देतो हा विषय पण असंख्य कुंडल्या पाहिल्यावर लक्षात येते. 

आता जर कालसर्प योगाचा प्रभाव असतो हे जर निच्छित असेल तर काल सर्प योग किती प्रकारचे प्रामुख्याने असावेत? जर राहू केतू जर 12 ही भावात येत असतील तर निच्छितच 12 प्रकारचे काल सर्प योग बनतील. 
1) अनंत 2) कुलीक 3) वासुकी 4) शंखपाल 5) पद्म 6) महापद्म 7) तक्षक 8) करकोटक 9) शंखचुर 10) घातक 11) विष्टर 12) शेष हे 12 प्रकारचे काल सर्प योग बनतात. जर राहू प्रथमात असेल तर वर दिल्या प्रमाणे अनंत पासून पुढे नंबर प्रमाणे. मग या प्रत्तेक योगांचा प्रभाव पण अलग अलग राहील, प्राप्त स्थान नुसार ते परिणाम देतील. हे मी येथे संक्षिप्त स्वरुपात संगितले कारण विस्तार केला तर ही पोस्ट अजूनही खूपच लांब होईल. 

#हा योग आहे की हा दोष आहे?
 पहा ही एक मोठी असमंजस निर्माण करणारी स्थिति आहे, राहू आणि केतुला सर्प संगितले आहे, राहू सर्पाचे डोके तर केतू सर्पाची शेपूट. सापा बद्दल सामाज्यात गैर समज आहेत सापाची पुजा करावी की सर्प पाहून पळून जावे, नाग पंचमीला तर आपण नागाचे पूजन करतो, महादेवांच्या अंगावर सर्प लपेटलेला असतोच, नारायण तर सर्पावर शयनास्थ आहेत. पहा शास्त्रामध्ये सर्पाला देव योनि सांगितली आहे.

ज्या ज्या जातकाच्या कुंडलीत काल सर्प योग असतो, ते सर्वसाधारण सुरवात करून उच्च स्थानी पोचतात, म्हणजे असाधारण स्थिति पर्यन्त पोचतात, अब्राहन लिंकन, सचिन तेंडुलकर, जवहारलाल नेहरू, धिरूभाई अंबानी, हर्षल मेहता या सर्वांच्या कुंडलीत कालसर्प योग होता, जीवनात हे लोक खूप उंच नाव कामाऊन आहेत, परंतु कालसर्प योगात जातक जमिनीवरून आकाशात झेप घेऊ शकतो आणि आकाशातून खाली पढू ही शकतो नेहरूंना काही वेळा जेलची पण हवा खावी लागली, अब्राहमलिंकन यांची गोळी मारून हत्या झाली जे अमेरिकेचे 16 वे राष्ट्रपति होते, धिरूभाई अंबानी खूप खडतर परिस्थिति नंतर आपल्या बिझनेस मध्ये यश मिळवू शकले, हर्षल मेहता शेअर घोटाला प्रकरणात त्यांची इज्जत आणि जीवनात समस्या आल्याच, म्हणजेच ज्यांच्या कुंडलीत कालसर्प योग असतो त्यांच्या जीवनात सरल-सरल यश प्राप्ती नाही, सफलता मिळते पण अति संघर्ष्या नंतर, चालले तर खूप चांगले आणि वाईट वेळ आली तर खूपच वाईट अशी स्थिति बनते.

 राहू केतू हे समुद्र मंथनच्या वेळी निर्माण झाले, अमृत प्राशन केल्याने भगवान विष्णुंनी, स्वरभानू नावाच्या राक्षसाचा चिरछेद केला. तर येथे पहिले विष आले समुद्रमंथनातून, नंतर अमृत, म्हणून कालसर्प योग वाले जातक सुरूवातीला अतिशय वाईट स्थितीतून जातात नंतर उत्तम यशस्वी होतात. 
वासुकी नागाची रस्सी बनवली होती मंद्राचल पर्वतला गुंडाळण्या साठी, राहू केतू सर्प दर्शवतात वासुकी नागाच्या मुखचा भाग होतो तो राक्षसानी पकडला होता आणि शेपूट देवतांनी, म्हणून राहू हा तोंडाचा भाग आणि शेपूट केतू, केतू मध्ये देवतांचे गुण असतात.

महर्षि पाराशार सांगतात जे राहू केतू ने प्रभावित असतात त्यांच्या जीवनात काय- काय समस्या निर्माण होतात? उंचावरून पडणे, सर्प दंश, चौपाई जनावरां पासून दुखापत, महामारी अश्या समस्या निर्माण होतात, आता हे पूर्वीच्या काळात होते, अगोदर अशी जनावरे लोकांचे घात करत होती, सर्पदंश व्हायचे आजकाल असे काही फार दिसत नाही, पण आता ही लक्षणे कशी दिसतील तर मेडिसीन चे ओवर रिअकशन यालाच आपण सर्प दंश समजू शकतो, ज्यामुळे व्यक्तीच्या सर्व शरीरात विष जाणे, चौपाय जानवर पासून हत्या म्हणजे कार अपघात . तर ही मोर्डन लक्षणे आपण समजू शकता, म्हणजे पुराणातील योग आपणास मोर्डन प्रकारे समजता आले पाहिजे.   
            
#मग काय हा योग फक्त त्रासच देतो का? काही फायदा नाही ? 
अब्राहन लिंकन, सचिन तेंडुलकर, जवहारलाल नेहरू, धिरूभाई अंबानी ही काही लहान नावे नाहीत, किंवा अस म्हणता येईल की हेलोक कालसर्प योग असून पण जीवनात काही मागे पडले नाहीत. तर ह्या योगा पासून आपण लाभाचे विषय बोलतो. पहा हा योग जेव्हा तिसर्‍या, सहाव्या, दहाव्या आणि अकराव्या भावातून सुरू होतो. म्हणजे जर राहू तिसर्‍या, सहाव्या, दहाव्या आणि अकराव्या स्थानात स्थित असेल आणि राहू बली असेल, त्याच बरोबर कुंडलीपण बलवान असेल, म्हणजे बाकी ग्रह पण बलवान असतील तर असा जातक खूप ऊंची गाटतो, म्हणजे अशा स्थितीत हे लक्षात घावे लागेल की काल सर्पयोग केवळ वाईटच फळ देत नाही तर खूप चांगले फळ पण देतो, त्या साठी मात्र कुंडलीचे सखोल परीक्षण झाले पाहिजे. 

#कालसर्प योगाचा भंग केव्हा होतो?
जेव्हा राहू केतूच्या बरोबर जर कुठचाही ग्रह असेल तर हा योग बर्‍याच पैकी भंग होतो, जर सूर्य, चंद्र, मंगळ असतील तर हा योग तर भंग होतो पण त्याच बरोबर ग्रहण दोष आणि अंगारक दोष निर्माण होईल, जे काल सर्प योगा पेक्षाही प्रभावित करतील. या व्यतिरिक्त केंद्र त्रिकोण जर कुंडलीत बली असेल तरही ह्या योगाचा प्रभाव कमी होतो, जर इतर योगात आपली कुंडली बलवान असेल तरीही ह्या योगाचा प्रभाव कमी होतो, जर कुंडलीत गुरु आणि शुक्र बलवान असतील तरीही काल सर्प योगाचा प्रभाव कमी होतो. कुंडलीत केंद्र स्थानात गुरु मजबूत असेल तरी ही या योगाचा प्रभाव कमी होतो.  

काल सर्प योगाचा प्रभाव केव्हा जास्त होतो? 
1) जर आपल्या कुंडलीत प्रबळ कालसर्प योग असेल आणि जर गोचर मध्ये ही काल सर्प योग बनत असेल तर ह्या योगाचा त्रास जास्त होतो. 
2) ज्या लोकांचा जन्म रात्रीचा आहे त्यांच्या साठी हा योग प्रभावित करतो.
3) ज्यांची कुंडली इतर ग्रहयोगात कमजोर आहे, आणि त्यांच्या कुंडलीत काल सर्प योग असेल तर त्यांना ह्या योगाचा त्रास जास्त होईल. 
4) काल सर्प योगाचा जास्त त्रास वयाच्या 42 व्या 48 व्या वर्षी जास्त प्रभावित करतो. 

उपाय काय करावे ? 
महर्षि पारशर अशुभ जन्म अध्याय मध्ये सांगतात- 
जो जन्म ग्रहण काळात, अमावास्या, संधिकाल, गंडांत नक्षत्र मध्ये, प्राकृतिक आपदा, युद्ध आणि उल्का पात वेळेत होतात अशा जातकाना खास करून विशेष उपाय केले पाहिजेत, आणि त्यावर पूर्ण चाप्टर बनवला आहे, ह्याने हे स्पष्ट होते की राहू केतू ने प्रभावित लोक जीवनात अस्तिरता घेऊन असत्तात, त्यांनी उपाय आवश्य केले पाहिजे, संगीताव्रत ग्रंथ सांगतो की राहू केतूच्या मध्ये जर सर्व ग्रह येतील तर सर्व विश्वा मध्ये अशांती निर्माण होते, अशा स्थितीत राज्याला मोठे-मोठे यज्ञ केले पाहिजेत जनतेच्या भल्या साठी, व्यक्तींनी पुजा पाठ करावी कारण त्यांच्या जीवनात आणि विश्वात शांती राहील, म्हणजे हे लक्षात येते की जे ग्रह सर्व विश्वाला समस्या निर्माण करू शकतात ते व्यक्तीगत का करणार नाही. 

#उपाय दोन प्रकारचे असतात. एक व्यक्तीगत उपाय आणि दूसरा ग्रह संबंधित उपाय काय केले पाहिजे? 
व्यक्तीगत उपाय- पहा राहू केतू भ्रमाचे कारक ग्रह आहेत, छाया ग्रह आहेत, आपल्याला भ्रमात टाकतात आणि अज्ञानी बनवतात, अज्ञान नेहमी ज्ञानांनीच दूर होऊ शकते, ज्ञानाचे दोन ग्रह आहेत सूर्य आणि गुरु, सूर्य आणि गुरु ह्या दोन्ही ग्रहांना मजबूत बनवा, ज्ञान वाढेल अज्ञानाचा नाश होईल, त्याच बरोबर आपल्यात जे कन्फुज करणारे विचार आहेत, भ्रम आहेत त्या पासून बचाव करा, राहू केतू ने प्रभावित व्यक्ति आपल्या समस्या स्वताच वाढून घेतात जेथे समस्याच नसते, तेथे समस्या उत्पन्न करतात. तर ह्या पासून स्वतचा बचाव करा. ही झाली व्यक्तीगत रेमिडीस. 
प्लानेट्री उपाय काय कराल? 

#संदर्भ भविष्य पुराण-
1) राहू केतू प्रभावित व्यक्तींनी घरात मोठ्या खडे मिठाचा वापर करून घर क्लीन ठेवावे, 
2) नियमित धूप, दीप, पुजा झालीच पाहिजे,
3) मंदिरात श्रमदान करावे. मंदिरात साफ-सफाई करावी, सेवा करावी याने ही राहू केतू चा प्रभाव दूर होतो,
4) लाल आणि काळे तीळ शनिवारी दान करावे.  
5) तिन्ही संधि काळात गायत्री मंत्र जप करावा.
6) बुद्धि आणि विवेक शुद्ध ठेवण्या साठी गणेश, सरस्वती आणि शिवाची उपासना ठेवली पाहिजे. घरात वृद्राअभिषेक करावे. 
7) कोणत्याही कुंडलीत काल सर्प दोष होत असेल तर नवनाग स्त्रोत्र पाठ आवश करावे. या नवनागांची स्तुति केल्याने ही काल सर्प योगाचा प्रभाव कमी होत जातो. 

धन्यवाद.🙏⚘️

अधिक अभ्यासपूर्ण लेख प्राप्त करण्यासाठी Follow 
करा 👇
गजानन परब गुरूजी 
           🍂
जन्म पत्रिका मार्गदर्शन साठी संपर्क Whtsp-9403435853.

Post a Comment

0 Comments