ज्यावेळी अध्यात्मिकता सोबत रहस्य जोडलं जात त्यावेळी काहीतरी अद्भुत आस घडत आसत. आणि हीच अद्भुत दुनिया आहे नागा साधुंची.!
ज्या ज्या वेळी सनातन धर्मावर संकट येतात आणि सर्व अपेक्षा संपतात त्यावेळी धर्म रक्षणाच अंतिम युद्ध लढणारा योद्धा म्हणजे नागा साधू..!
जिथे सनातन धर्मातील संता महंतांची अध्यात्मिकतेची व्याख्या संपते तिथून सुरु होते नागा साधुंची अध्यात्मिकता..!
गुरुदक्षिणा घेतल्यावर आपल्या परिवाराचा शेवट, आपल्या नातेवाईकांचा शेवट, आणि स्वतःचा शेवट आणि इथूनच सुरु होतो नागा साधूंच्या अध्यायाचा श्री गणेशा.!
होय जिवंतपणीच स्वतःच पिंडदान आणि त्यासोबत मागच्या चौदा पिढ्याचं पिंडदान करून दुनियेतील मागचा पुढचा सगळा हिशोब चुकता केला जातो.! आणि मग इथूनच सुरु होतो नागा साधूंचा प्रवास.. पिंडदान झाल्यावर संगम स्नान करून पहिली भिक्षा ही स्वतःचा घरून आपली ओळख न दाखवता मागितली जाते! त्यानंतर तब्बल 12 वर्षांची तपश्चर्या पूर्ण केली जाते.! ह्यामध्ये अध्यात्मिकते सोबत कलरी विद्या अर्थात शस्त्र विद्या सुद्धा येते त्यानंतरच " नागा" ही पदवी गुरूंकडून दिली जाते.. त्यानंतर ध्येय आणि उद्दिष्ट एकचं ते म्हणजे धर्म रक्षण.. नागा साधुंमध्ये दोन प्रकार येतात एक म्हणजे दिगंबर नागा साधू आणि दुसरा श्री दिगंबर नागा साधू.!
आदी गुरू शंकराचार्यांनी सनातन धर्माच्या रक्षणाचा भव्य दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून चार मठांची स्थापना केली.! धर्म रक्षणासाठी फक्त शास्त्र उपयोगी नसून त्यासोबत वेळ पडली तर शस्त्र सुद्धा उपयोगी आहे हे जाणून शंकराचार्यांनी आखाडा परंपरा सुरु केली! आणि ह्यातूनच धर्म रक्षणासाठी स्वतःच आयुष्य समर्पित केलेले संन्यासी प्रशिक्षण घेऊन बाहेर पडू लागले… ह्याच आखड्यातून धर्म रक्षणाच प्रशिक्षण घेऊन बाहेर पडणारे सनातन धर्म रक्षक योद्धे म्हणजे नागा साधू.!
इतिहासाची पान पलटल्यावर लक्षात येत 18 व्या शताब्दी मध्ये ज्यावेळी अफगाण लुटेरी अहमद शहा अब्दाली ज्यावेळी हिंदुस्थानच्या भूमीवर चालून आला होता त्यावेळी त्याने गोकुळ आणि वृंदावन सारख्या अध्यात्मिक नगरांमध्ये थैमान माजवले होते.! त्यावेळी राजांकडे अब्दालीच्या सैन्याचा मुकाबला करण्याची ताकद नव्हती.! त्यावेळी हिमालयाच्या पहाडी मधून आलेल्या नागा साधूंच्या आर्मीने अब्दालीच्या सैन्याचा धुरळा उडवून सनातन धर्म रक्षकांची ताकद संपूर्ण हिंदुस्थानला दाखवून दिली होती.!
1751 मध्ये अहमद खां बंगस ने कुंभ मेळ्याचा कालावधीत इलाहाबाद किल्ल्यावर चढाई केली होती त्यावेळी नागा साधू प्रयागराज मध्ये स्नान करत होते त्यांनी आधी सर्व धार्मिक संस्कार उरकून हातामध्ये शस्त्र धारण केलं आणि त्यावेळी बंगसच्या सेनेला करारी धूळ चारून पळवून लावले होते… हे युद्ध जवळपास 3 महिने सुरु होते.!
नागा ह्या शब्दाचा पर्यायी अर्थ होतो निर्वस्त्र.! तर गुजरात मधील पहाडी भागात नागा ह्या शब्दाचा अर्थ योद्धा असा होतो.! प्रत्येक निर्वस्त्र साधू नागा नसतो किंवा प्रत्येक नागा साधू हा निर्वस्त्र नसतो.! दिगंबर आखड्याचे साधू लंगोट धारण करतात तर श्री दिगंबर आखड्याचे साधू निर्वस्त्र असतात.!
तसेच ज्या नागा साधुंनी स्वतःच्या हाताने स्वतःच पिंडदान केलेलं आसत त्या नागा साधूंच्या मृत्यूनंतर त्यांच्या शरीराच काय केलं जात हे सुद्धा एक मोठं रहस्य आहे.! नागा साधूवर कुठलेही अंत्यसंस्कार केले जात नाहीत किंवा त्यांच्या चित्तेला अग्नी सुद्धा दिला जात नाही.! त्याच कारण मुळातच नागा साधुचं जीवन हे त्यांनी स्वतःच्या हाताने केलेल्या स्वतःचा अंतिम संस्कार पासूनच सुरु झालेलं असत.! त्यामुळे मृत्यूनंतर नागा साधुंची स्थळ समाधी किंवा जल समाधी लागते.!
नागा सांधू हे फक्त ज्यावेळी कुंभ मेळा सुरु होतो त्याचवेळी दिसतात पण ते कुंभाच्या अगोदर आणि कुंभमेळ्यानंतर कुठे अदृश्य होतात हे सुद्धा एक मोठं रहस्य आहे.! कुंभ काळाला शास्त्रीय आणि अध्यात्मिक दृष्टिकोनातून सर्वश्रेष्ठ काळ मानलं जात… ह्या वेळी ग्रहांची स्थिती सर्वोत्तम असते. आणि ह्याचवेळी हिमालयाच्या जंगलातून आणि गुंफांमधून नागा साधू स्नान करण्यासाठी कुंभावर दाखल होतात!
कुंभमेळ्यात त्यांचा मान सर्वश्रेष्ठ असतो. त्यांचे स्नान झाले शिवाय इतर लोक कुंभात स्नानासाठी उतरत नाहीत.! कुंभ स्नान झाल्यावर नागा साधू पवित्र भभूत संपूर्ण शरीरावर लावून काही काही जण एकांत वासात जंगलात निघून जातात.तर काही जण हिमालयाच्या पहाडी मध्ये तर काही जण गुफांमध्ये आणि आपल्या आखड्यातील आश्रमांत निघून जातात. एकांतवास हेच नागसाधूंचे निवासस्थान..!
ह्यापेक्षा सुद्धा नागा साधुचं अद्भुत अविश्वासनीय रहस्य म्हणजे ज्यावेळी कुंभमेळ्याच्या वेळी नागा साधूंचा ताफा कुंभावर दाखल होतो… त्यावेळी स्नान करण्यासाठी कुंभात जाताना मोजलेत तर 100 साधू असतील तर कुंभातून परत फक्त 50 ते 60 नागा साधू बाहेर येतात एवढी ही अद्भुत शक्ती आहे.! विश्वास बसत नसेल तर ज्यावेळी कुंभमेळा सुरु होतो त्यावेळी तिथे जाऊन स्वतः प्रत्यक्षात बघा. माझ्या आयुष्यात प्रयागराज कुंभमेळ्याच्या वेळी हे भाग्य मी स्वतः अनुभवलेलं आहे.!
तसेच हिमालाय मधील जंगल पहाड आणि गुफांमध्ये परतल्यावर ह्याचा आहार म्हणजे फक्त कंदमुळे आणि फळ. पुढच्या कुंभापर्यंत नागा साधू आपल्या ध्यान तपश्चर्या आणि अध्यात्मिकता मध्ये लिन होऊन जातात.! त्यांच्या अध्यात्मिकतेची ताकद एवढी जबरदस्त असते की हिमालयातील मायनस मध्ये असलेलं तापमान सुद्धा त्यांच्या समोर हार मानत.! मुळातच जमीन हेच अंथरूण..आकाश हीच चादर.. आणि अंगावर लावलेली भभूत हेच शरीराच कवच.!
आजच्या युगात जरी नागा साधूंना धर्म रक्षणासाठी युद्ध करावं लागत नसलं तरी ज्यावेळी ते कुंभावर स्नानासाठी दाखल होतात त्यावेळी ते अनेक युद्धकलेची प्रात्यक्षिके सादर करतात.! जसे की वाघ म्हातारा झाला तरी शिकार करायला विसरत नाही तसेच नागा साधूना जरी आता युद्ध करावे लागत नसले तरी ते युद्ध कला विसरलेले नाहीत.!
म्हणूनच ज्यावेळी कुंभमेळा सुरु होतो त्यावेळी करोडो हिंदू बांधव नागा साधूंच्या चरणांची धूळ आपल्या मस्तकी लावतात… हे भाग्य फक्त कुंभमेळ्यातच मिळत ! नागा साधू मागत तर काहीच नाहीत पण देतात ते मात्र सनातन वैदिक हिंदू धर्म रक्षणाचे वचन.!
0 Comments