युनिव्हर्सिटीचे

ॲडमिशन घेतांना युनिव्हर्सिटीचे महत्व 🏫
१. युनिव्हर्सिटी म्हणजे काय..?
२. युनिव्हर्सिटीची निवड महत्त्वाची का..? 
३. युनिव्हर्सिटी साठी कोणत्या मान्यता आवश्यक आहे..? 
४. युनिव्हर्सिटी चे प्रकार कोणते.?

*युनिव्हर्सिटी म्हणजे काय..?*

१) विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनविण्यासाठी आवश्यक शिक्षण जिथे मिळते अशी उच्च शिक्षण देणारी संस्था आणि जिथे संशोधनही केले जाते,म्हणजेच युनिव्हर्सिटी (विद्यापीठ) होय.

२) विद्यार्थ्यांना डिप्लोमा/ डिग्री/ पोस्ट ग्रॅज्युएशन / रिसर्च हे शिक्षण प्रदान करणाऱ्या संस्थांचा ग्रुप म्हणजेच युनिव्हर्सिटी (विद्यापीठ)होय.

३) प्रत्येक युनिव्हर्सिटीचा अभ्यासक्रम, परीक्षा पद्धती, प्रवेश प्रक्रिया व रिझल्ट हा स्वतंत्र पद्धतीने राबविला जातो.

आज आपण, ओपन युनिव्हर्सिटी व डिस्टन्स युनिव्हर्सिटी सोडून *रेगुलर युनिव्हर्सिटी* विषयी माहिती समजून घेऊया..!!

रेगुलर युनिव्हर्सिटीचे खालील ४ प्रकार आहेत.
A) सेंट्रल युनिव्हर्सिटी
B) स्टेट युनिव्हर्सिटी
C) प्रायव्हेट युनिव्हर्सिटी
D) डीम्ड युनिव्हर्सिटी

A) सेंट्रल युनिव्हर्सिटी :

१. पार्लमेंट ॲक्ट अंतर्गत केंद्र सरकार तर्फे या विद्यापीठास मान्यता मिळते.
२. केंद्र सरकार तर्फे निधी पुरवठा केला जातो.
३. येथील विद्यार्थ्यांना सर्व शासकीय स्कॉलरशिप उपलब्ध आहेत.
४. उदाहरणार्थ : 
जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालय, हिंदु विश्वविद्यालय,इंदिरा गांधी नॅशनल युनिव्हर्सिटी,दिल्ली युनिव्हर्सिटी, CBSE बोर्ड ई.

B) स्टेट युनिव्हर्सिटी :

१. राज्य सरकार तर्फे नियंत्रित व मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटी.
२. राज्यपाल हेच या युनिव्हर्सिटीचे चांसलर म्हणून काम पाहतात.
३. येथील विद्यार्थ्यांना कास्ट कॅटेगरी नुसार सर्व शासकीय स्कॉलरशिप उपलब्ध आहेत.
४. उदाहरणार्थ : 
सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी, मुंबई युनिव्हर्सिटी, नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी,छत्रपति शिवाजी युनिव्हर्सिटी, महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठ आदी.

C) प्रायव्हेट युनिव्हर्सिटी :

१. प्रायव्हेट ऑर्गनायझेशन किंवा प्रायव्हेट ट्रस्टतर्फे चालविण्यात येणारी स्वायत्त संस्था / विद्यापीठ.
२. प्रायव्हेट युनिव्हर्सिटी निर्माण करण्यासाठी शासनातर्फे कुठलाही निधी पुरवठा (फंडिंग) होत नाही.
३. येथील विद्यार्थ्यांना शासनातर्फे कुठलाही स्कॉलरशिप उपलब्ध होत नाहीत, त्यामुळे सर्व कास्ट कॅटेगिरी साठी फी स्ट्रक्चर समान असते.
४. प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमधील अभ्यासक्रम,प्रवेश प्रक्रिया,परीक्षा पद्धती हे त्यांच्या एक्सपर्ट तर्फे डिझाईन केलेली असते.
५. उदाहरणार्थ : लवली प्रोफेशनल यूनिवर्सिटी पंजाब, सिंबायोसिस यूनिवर्सिटी, पारुल युनिव्हर्सिटी, MIT WPU युनिव्हर्सिटी, कोथरूड,विजयभूमि युनिव्हर्सिटी, पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटी इ.

D) डीम्ड युनिव्हर्सिटी :

१. काही नामांकित, दर्जात्मक व मोठ्या संस्थांना UGC च्या शिफारशीवरून केंद्र सरकार तर्फे डीम्ड यूनिवर्सिटी (ऑटोनोमी) चा दर्जा दिला जातो.
२. UGC व MHRD तर्फे देखरेख केली जाते.
३. डीम्ड युनिव्हर्सिटीचा अभ्यासक्रम, प्रवेश प्रक्रिया, रिझल्ट हे स्वतंत्र पद्धतीने राबविले जातात.
४. युनिव्हर्सिटीतर्फे दर्जा व गुणवत्ता कायम न ठेवल्यास त्यांची मान्यता कधीही रद्द करू शकतात.
५. उदाहरणार्थ :
भारती विद्यापीठ पुणे, NMIMS युनिव्हर्सिटी.ई.

*युनिव्हर्सिटी निवडताना कोणत्या मान्यता आवश्यक आहे :* 

१. UGC (युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन) तर्फे मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटी हवी.
२. AICTE तर्फे मान्यताप्राप्त कोर्स असणे आवश्यक.
३. त्या युनिव्हर्सिटी मधील कोर्स हे प्रोफेशनल बॉडी (मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया, बार कौन्सिल ऑफ इंडिया, फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया) तर्फे मान्यताप्राप्त असणे आवश्यक आहे.

तुलनात्मक कोणत्या युनिव्हर्सिटीला अधिक महत्त्व आहे..?

१. सहाजिकच, गव्हर्मेंट (सेंट्रल /स्टेट ) यूनिव्हर्सिटी ला अधिक महत्त्व आहे, कारण त्याचे ॲडमिशन प्रोसेस हे एंट्रन्स एक्झामच्या मार्फत मेरीट नुसार केले जातात.
२. प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये कधी डायरेक्ट ऍडमिशन ही दिले जातात.
३. क्वलिटी एज्युकेशन बद्दल बोलायचे झाल्यास, प्रत्येक युनिव्हर्सिटी बद्दल वेग-वेगळा मतप्रवाह असू शकतो.

सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी चे कार्यक्षेत्र :

१. पुणे,नाशिक व अहमदनगर जिल्हा हे पुणे युनिव्हर्सिटी च्या कार्य क्षेत्रामध्ये येतात.
२. या तीनही जिल्ह्यांमधील इंजिनीअरिंग, फार्मसी, बी.एस.सी., बी.सी.ए ,बी.बी.ए , बी.ए, बी.कॉम, एम.ए, एम.कॉम आदी अनेक महाविद्यालये पुणे विद्यापीठा अंतर्गत येतात. 
३. या तीन जिल्ह्यांमध्ये इतर यूनिवर्सिटी (डीम्ड / प्रायव्हेट) ही आहे.

Post a Comment

0 Comments