अन्नदान

अन्नदान
अंतकाळापेक्षा माध्यान्हकाळ कठीण आहे कारण तो नित्य येतो हे दत्त महाराजांचे वचन आहे आणि म्हणूनच अन्नदान हे श्रेष्ठ सांगितले आहे . या दानात याचक हा अन्न सेवून तृप्त असता नये ( अर्थात भुकेलेला असावा ) हि मुख्य अट आहे अन्यथा केलेले दान हे वृथा ठरते म्हणून दत्त माहात्म्यात योग्या योग्य द्यावे असे म्हटलेले आहे . जे दान ज्याला योग्य आहे त्यालाच ते दिले गेले पाहिजे असा याचा अर्थ आहे .

क्षुधिता द्यावे अन्न ll तृषिता द्यावे पान ll ---- घासभर अन्न हे माध्यान्ह काळी गोरगरीब ,साधू संन्यासी यांना दान केल्याने दत्त महाराज संतुष्ट होतात आणि याचे फळ म्हणजे पुढील कोणत्याही जन्मात क्षुधाक्रान्त अवस्था होत नाही . या माध्यान्हकाळच्या अन्नाप्रमाणे थंडीत उबदार कपडे अथवा लाकडे ,पर्जन्यात निवारा ,ग्रीष्मात थंड पाणी हि दाने देखील दत्त महाराजांना संतोष देणारी आहेत . भक्तिमार्गाबरोबर ह्या सर्व सेवा मार्गाचाही अवलंब झाला पाहिजे. 

घरी आलेल्या अतिथीला पाणी आणू का ? चहा घ्याल ना ? असे विचारण्यापेक्षा थंड पाणी पुढे करून चहा फराळाची अथवा भोजनसमय असल्यास भोजनाची सिद्धता झाली आहे तेव्हा दोन घास समवेत घेतल्यास आम्हाला आनंद होईल असे म्हटल्यास आणि त्याप्रमाणे केल्यास भक्तिमार्गाप्रमाणेच पुण्यप्राप्ती होईल यात संशय नाही . 
श्री गुरुदेव दत्त !!! 

Post a Comment

0 Comments