महाराष्ट्रात अनेक मंदिरे, श्रध्दास्थळे आहेत. अष्टविनायक, जेजुरीचा खंडोबा, साईबाबा, असे अनेक श्रद्धास्थळे जिथे फक्त महाराष्ट्रातील माणुसच नाही तर संपुर्ण भारत आणि भारताबाहेरील माणसे नतमस्तक होतात. सोन्याची जेजुरी ओळखली जाणारी जेजुरीचे अनेक पैलू आज आम्ही उलगडणार आहोत.
सह्याद्रीच्या कुशीत वसलेले जेजुरी गाव जिथे नांदतो महाराष्ट्राचे आराध्य दैवत मार्तंड मल्हारी. जेजुरीचे नाव पुर्वी जयाद्री होते. पण जयाद्री गावचे नाव काळाच्या ओघात जेजुरी झाले.
खंडेरायाला हळद प्रिय आहे म्हणुन गडावर हळद म्हणजेच देवाचा भंडारा उधळला जातो. म्हणुन गडाला सोन्याची जेजुरी म्हणतात.
जेजुरी गड समुद्र सपाटीपासून ८०२ मीटर उंचीवर आहे. आणि पायथ्यापासून ६८ मी उंच आहे. गडाला ३८५ पायरी आहेत. सर्वांनी ऐकलेच आहे ‘९ लाख पायरी गडाला’ म्हणजेच या पायरीसाठी ९ लाख दगडी वापरले आहेत.
मंदीराच्या समोरचा कोट अष्टकोनी आहे. हा कोट होळकरांच्या योगदानातून उभा राहिला आहे.मल्ल आणि मनी नावाच्या दोन राक्षसी बांधवांचा जुलूम पृथ्वीवर खूप वाढला होता, ज्यामुळे भगवान शिव यांनी मार्तंड भैरवाचा अवतार घेतला.
असे म्हणतात की देवाने मल्लाचे डोके कापले आणि ते मंदिराच्या पायऱ्यांवर सोडले, तर मनीने देवाला मानवजातीच्या आशीर्वादाने आशीर्वाद द्यावा अशी विनंती केली होती, म्हणूनच देवाने त्याला सोडले. आणि खंडोबाला मल्हार असेही नाव आहे. मंदिराच्या उजव्या बाजूला याच मल्लासूराची शेंदुरी मुर्ती उभी आहे.
खंडोबा मंदिर प्रामुख्याने दोन भागात विभागलेले आहे. पहिल्या भागाला मंडपा म्हणतात तर दुसर्या भागाला गर्भगृह आहे, ज्यामध्ये भगवान खंडोबाची मूर्ती स्थापित आहे. हेमाडपंथी शैलीत बांधलेल्या या मंदिरात पितळांनी बनविलेले एक मोठे कासव आहे.
मंदिरात २३ किलो वजनाची तलवार आहे. ही तलवार महीपत पानसे, रामराव पानसे, यांनी देवाला अर्पण केली आहे. दसर्याच्या दिवशी, दातांच्या मदतीने तलवार धरुन ठेवण्याची एक स्पर्धा देखील होते, जी अत्यंत प्रसिद्ध आहे.
खंडेरायाला सामान्य पूजेप्रमाणे हळद व फुले अर्पली जातात, परंतु काहीवेळा बकरीचे मांस मंदिराच्या बाहेर परमेश्वराला अर्पण केले जाते. जेजुरी गडाच्या नैरुत्य दिशेला कडेपठार आहे. आणि हे खंडोबाचे मुळस्थान आहे. जे जेजुरी गावापासुन २५९ मीटर उंच आहे.
रोज पहाटे ५ वाजता मंदिर उघडते. पहाटे दुपारी आणि रात्री अशी तीन वेळा आरती होते. सोमवती आमवस्या, दसरा, चंपाषष्टी, पौष पौर्णिमा, माघ पौर्णिमा, महाशिवरात्री असे उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे करतात.
ज्ञानदेव या लेखकाने जयाद्री महात्म्य या ग्रंथाचे लेखन केले आहे ज्यात जेजुरीचे महात्म लिहले आहे. गंगाधर कमलाकर यांनी मार्तंड विजय हा ग्रंथ लिहला
सुभेदार मल्हारराव होळकर यांनी इ.स. १७३५ मध्ये जेजुरी गडाचे पुनर्निर्माणाचे काम सुरु केले. मल्हाररावांच्या निधनानंतर गडाच्या पुनर्निर्माणाचे काम तुकोजी होळकरांनी पुढे सुरु ठेवले.होळकर तलाव, गौतमेश्वर मंदिर, बल्लाळेश्वर, जानाई मंदिर, पेशवे तलाव अशी अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत.
सर्वांचे आराध्य आणि कुलदैवत खंडेरायाच्या नावाने बोला यळकोट यळकोट जय मल्हार
0 Comments