हिंदु धर्म
लोकशाही असलेल्या आपल्या भारतात ‘सर्वधर्मसमभाव’ हा शब्द वरचेवर आपल्या कानावर पडतो; परंतु ‘हिंदु धर्मच खर्या अर्थाने सर्वधर्म (पंथ) समभाव मानणारा धर्म आहे’, हे आपणास ठाऊक नाही. प्रस्तूत लेखात हिंदु धर्म म्हणजे नेमके काय, त्याचे महत्त्व, त्याची अद्वितीय वैशिष्ट्ये यांविषयी या पहाणार आहोत. याबरोबरच ‘हिंदुत्ववाद’, ‘राजकीय हिंदु’, ‘हिंदु कोणाला म्हणावे’, ‘आस्तिक आणि नास्तिक’ यांसारख्या अन्य वैशिष्ट्यपूर्ण सूत्रांचाही या लेखातून वेध घेण्यात आला आहे.
सर्वधर्मसमभाव म्हणजे एक निरर्थक शब्द !
सर्वधर्मसमभाव या शब्दाला काहीच अर्थ नाही; कारण जगात धर्म एकच आहे आणि तो म्हणजे हिंदु धर्म. इतर सर्व पंथ, नाहीतर संप्रदाय आहेत. याचे कारण हे की, फक्त धर्मातच व्यक्ती तितक्या प्रकृती तितके साधनामार्ग हा सिद्धांत सांगितला आहे. प्रत्येकाला आजाराप्रमाणे निरनिराळे औषध असते, तसेच हे आहे. याउलट सर्व पंथ आणि संप्रदाय यांत सर्वांना एकच साधना सांगितली आहे. सर्व रुग्णांना एकच औषध द्यावे, तसेच हे आहे. यामुळेच हिंदु धर्मातील साधकांची आध्यात्मिक उन्नती जलद होते, तर इतर पंथ आणि संप्रदाय यांची शिकवण अतिशय मर्यादित असल्याने त्या मार्गांनी जाणार्यांची फारच थोडी प्रगती होते किंवा अधोगतीही होते.
– प. पू. डॉ. आठवले
१. व्युत्पत्ती आणि अर्थ १ अ. हिंदु शब्दाची विस्तारित व्युत्पत्ती
‘हीनान् गुणान् दूषयति इति हिंदुः ।’ अशी ‘हिंदु’ शब्दाची व्युत्पत्ती `मेरुतंत्र’ नामक ग्रंथात दिली आहे. ‘हीनान् गुणान्’ म्हणजे हीन, कनिष्ठ अशा रज आणि तम गुणांचा ‘दूषयति’ म्हणजेच नाश करणारा. रज-तमात्मक हीन गुणांचा आणि त्यामुळे होणार्या कायिक, वाचिक आणि मानसिक अशा हीन कर्मांचा जो तिरस्कार करतो, त्याला आणि अखंड सत्त्वप्रधान वृत्तीत रममाण झाल्यामुळे ईशभजन हेच जो आपल्या जीवनाचे सार मानून ईश्वरप्राप्ती करून घेतो आणि समाजाला मार्गदर्शन होण्यासाठी अजोड कर्मयोगाचे आमरण आचरण करतो, त्याला ‘हिंदु’ म्हणावे, अशी हिंदु शब्दाची विस्तारित व्युत्पत्ती आहे. म्हणजेच हिंदु ही एक वृत्ती (सत्त्वप्रधान) आहे. तिचा अर्थ ‘साधक’ असा आहे. बाह्यांगाने कोणी मुसलमान, खिस्ती, यहुदी, पारशी इत्यादी असला, तरी जर तो रज-तम प्रवृत्तींचा नाश करणारा सत्त्वप्रधान साधक असला, तर तो हिंदुच होय; म्हणून हिंदु धर्मच खर्या अर्थाने सर्वधर्म (पंथ) समभाव मानणारा धर्म आहे.’
२. वैशिष्ट्ये
२ अ. हिंदु अध्यात्माचे एकमेव शाश्वत ध्येय काय ?
‘मानवातील ईश्वराचे दर्शन घडविणे,हे हिंदु अध्यात्माचे एकमेव शाश्वत ध्येय आहे, मानवातील ईश्वर प्रकट करणे,भारतीय जनतेच्या आर्थिक जीवनाची पुनर्रचना करावयाची खटपट असो किंवा पारतंत्र्यातील भारतीय जनतेच्या मुक्तीसाठी करावे लागणारे महान झगडे असोत, दोन्ही धडपडीत वर उल्लेखिलेले आपले शाश्वत ध्येय सिद्ध करण्यासाठी हिंदु अध्यात्म झटत आहे.’
– श्री अरविंद (वंदेमातरम्, २४ जून १९०८)
२ आ. सर्वांवर प्रेम करण्याचे शिक्षण आणि आत्यंतिक विचारस्वातंत्र्य देणारा धर्म
सर्वांवर प्रेम करण्याचे शिक्षण आणि आत्यंतिक विचारस्वातंत्र्य देणारा धर्म ‘दुसर्यावर प्रेम करण्याच्या कलेचे शिक्षण आपला धर्म देत असतो. ‘दुसर्यावर प्रेम करणे कठीण किंबहुना अशक्यच आहे’, असे पुष्कळांचे म्हणणे असते. त्यांना आपल्या धर्मशिक्षणाची ओळख झाली नाही, असे खेदाने म्हणावे लागते; कारण दुसर्यावर प्रेम करतांना तो असंतुष्ट झाला, तर प्रेम करणारा मनुष्य दुःखी होत असतो; कारण दुसर्याच्या असंतुष्टतेचे कारण ‘माझा त्याच्यावर प्रेम करण्यातला न्यूनपणा (कमीपणा)’ हे आहे, असे त्याला वाटत असते. याचे उत्तम उदाहरण रामराज्यातील रजकाच्या प्रसंगाने सांगता येईल.
रामराज्यात एका रजकाला भूमंडलाच्या एका लोकमान्य, राजमान्य आणि धर्ममान्य असलेल्या, तसेच एकपत्नी, एकवाणी आणि एकवचनाचे अखंड व्रत आमरण चालविणार्या राजाच्या परमसाध्वी धर्मपत्नीच्या विरुद्ध विचार आणि भाषण करायला प्रतिबंध केला गेला नाही. लौकिक मनुष्य, वानरे, भालू, राक्षस त्याचप्रमाणे अलौकिक महर्षी, देवता यांच्या साक्षात सीतेची अग्नीपरीक्षा झाली होती. असे असतांनाही एक रजक राजाविरुद्ध आपले विचार मांडू शकला. रामाला त्या रजकाचे वर्तन अयोग्य असल्याचे समजत असतांनासुद्धा त्याने असा विचार केला, ‘त्या रजकाला दंड देऊन एकाचे तोंड बंद करता येईल; पण सहस्रो मुखांतून त्याचे विचार बाहेर पडतील आणि त्यानंतर त्या सर्वांचा प्रतिकार करतांना राज्यात अराजक माजेल. तेव्हा व्यवहाराद्वारेच आपण जनतेचे विचार पालटू शकू, दंडाद्वारे नाही.’
विचार आणि भाषण यांचे स्वातंत्र्य हे परमावश्यकच आहे. वास्तविक स्वतंत्र राष्ट्राचे ते भूषणच आहे आणि भारतीय संस्कृतीने त्याचा नेहमी आदरच केलेला आहे. या देशात चार्वाक, शून्यवादी, द्वैती, अद्वैती असे अनेक प्रकारचे दार्शनिक होऊन गेले. त्यांची मते परस्परविरोधी होती आणि त्यांच्यात नेहमी विचारसंघर्ष चालू राहिला. त्यांच्यात कधीही एकवाक्यता झाली नाही; पण या राष्ट्राने केव्हाही त्यांचे भाषण किंवा विचार यांवर बंदी आणली नाही. विचारप्रणालीच्या भेदामुळे परदेशांप्रमाणे त्यांना केव्हाही फासावर लटकविले गेले नाही.’ – प.पू. काणे महाराज, नारायणगाव, जिल्हा पुणे, महाराष्ट्र.
२ इ. विरोधकांनाही ऋषीपद आणि अवतारत्व देणे
विरोधकांनाही ऋषीपद आणि अवतारत्व देणे.पुनर्जन्म आणि ईश्वर या दोन्हींवर विश्वास न ठेवणार्या चार्वाकाचा छळ तर झाला नाहीच, उलट त्याला ऋषीपद दिले गेले ! ईश्वराचे अस्तित्व नाकारणार्या आणि प्रचलित यज्ञयागांवर कडक टीका करणार्या सिद्धार्थ गौतमाला तर देवपद देण्यात आले आणि तो श्रीविष्णूचा अवतार मानला गेला ! निरीश्वरवादी महावीरालाही देवपद मिळाले.
२ ई. ‘हिंदु धर्म इतका लवचिक आसणे
‘हिंदु धर्म इतका लवचिक आहे की, लवचिकपणाची ही सीमा इतर कोणत्याही धर्मात आढळणार नाही; म्हणूनच बाकीचे सर्व पंथ आपल्या धर्माची अंगप्रत्यंगे आहेत.’ – स्वामी विवेकानंद
३. महत्त्व३ अ. इतर ‘वाद’ आणि ‘हिंदुत्ववाद’
‘भगवंताच्या चरणी निःस्सीम प्रेम असणे आणि ते सारखे अर्पण होत असणे, हेच हिंदूंच्या हिंदुत्वाचे लक्षण आहे. ‘तुमचा ‘वाद’ (समाजवाद, साम्यवाद इत्यादी) कोणता ?’, असे विचारल्यावर, ‘आमचा यथार्थवाद आहे’, असे पं. दिनदयाळ उपाध्याय म्हणत. वास्तविक कोणताही वाद पृथ्वीवर नसतांना हिंदुत्व होतेच. सर्व वाद उत्पन्न झाले असले, तरी ते आहेच आणि पृथ्वीवरील सर्व वाद नष्ट होण्यासाठीही ते आहेच; म्हणून तो कोणताच ‘वाद’ नाही. मी तर त्याला, म्हणायचेच असेल, तर ‘सुखसंवाद’ म्हणेन. ते एक सद्विद्य संभाषण (ज्ञाननिष्ठ किंवा ज्ञानपूर्वक केलेले संभाषण) आहे. सद्विद्य संभाषणाची परिणती सुखात होते. इतर वाद हे विवादीय संभाषणात मोडतात. त्यांत शब्दच्छल आहे. त्यामुळे त्यांची परिणती दुःखात होते.
३ आ. हिंदु धर्माचे आंतरराष्ट्रीयत्व
मानवाच्या मनाचा स्थायीभाव हिंदुत्व (साधकत्व) असल्यामुळे तसे झाल्याविना मानवाच्या जन्माची जी इतिश्री ईश्वरप्राप्ती, ती होणेच शक्य नाही आणि हीच मानवाच्या मनाची अवस्था आपल्या धर्मशिक्षणातून होऊ शकते. हिंदू धर्मात असे सांगितले आहे की, जगातील सर्व मानवाला सुखी व्हायचे असेल, तर त्याने हिंदु धर्मनिष्ठांच्या पादपद्मी बसून शिक्षण घेऊन कायमचे सुखी होऊन जावे. ज्या ज्या लोकांनी जीवनाची इतिश्री, म्हणजे ईश्वरप्राप्ती करून घेतलेली दिसते, त्यांत कोणी इंग्रज होते, कोणी अमेरिकन होते, तर कोणी जर्मन होते. ते कोणत्याही पंथाचे (धर्माचे) असले, तरी त्यांनी भारतियत्वाची (साधकत्वाची), म्हणजे आपल्या मनाच्या मूळ स्थायीभावाची प्राप्ती करून घेतल्यामुळे ते कल्याण करून घेऊ शकले. मॅक्सम्युलर (जर्मन), थोरो (अमेरिकन) इत्यादींनी हिंदु धर्म न स्वीकारता ते मनाने हिंदु, म्हणजे भारतीय झाल्यामुळे आपले कल्याण करून घेऊ शकले. अशी पुष्कळ नावे आहेत. थोरो तर भगवद्गीता वाचून कृष्णप्रेमाने वेडा झाला होता. गीतेला तो आई मानत होता. डॉ. अॅनी बेझंट आणि भगिनी निवेदिता या सि्त्रया इंग्रज होत्या. डॉ. अॅनी बेझंट यांनी तर ‘मानवाला त्याचे कल्याण शिकविणारे उपनिषदांसारखे श्रेष्ठ वाङ्मय जगात दुसरे नाही’, असे सांगितले होते.
तेव्हा केवळ जन्माने हिंदु धर्मीयच नव्हे, तर सर्व मानव सुखी होण्यासाठी हिंदु (साधक) राष्ट्राची अत्यंत आवश्यकता आहे. मानवी हक्कांचे संरक्षण केवळ हिंदुराष्ट्रच करू शकते. सर्वांचे प्रयत्न विश्वशांतीसाठी चालले आहेत; पण हिंदुराष्ट्रनिर्मितीविना विश्वशांती नांदणेच शक्य नाही.’ – प.पू. काणे महाराज, नारायणगाव, जिल्हा पुणे, महाराष्ट्र.
४. हिंदु कोणाला म्हणावे ?
अ. ‘वेद, वेदांगे, पुराणे आणि तदनुकूल संप्रदाय हे ज्यास मान्य आहेत आणि जो परंपरागत हिंदूच्याच पोटी जन्माला आला आहे, त्यास.
आ. वरील ज्यास मनापासून प्रमाणच वाटतात, त्यालाही ‘दीक्षाहिंदु’ म्हणतात.
इ. ज्याला वेद, वेदांगे, पुराणे आणि तदनुकूल संप्रदाय, हे दोन्ही मान्य नाहीत आणि केवळ हिंदूच्या पोटी जन्माला आला आहे, तो ‘जन्मार्थ’ म्हणजे जन्महिंदु होय. वेद, वेदांगे, पुराणे आणि तदनुकूल संप्रदाय दोन्ही सर्वथा श्रेष्ठ आहेत; पण उभयार्थ नसेल, तर पूज्यतेच्या दृष्टीने दीक्षार्थच मी श्रेष्ठ मानतो. तथापी लग्नाच्या संदर्भात जन्मार्थ्याचीच योजना करावी.’
५. राजकीय हिंदु
‘काही हिंदूंच्या संदर्भात सांगायचे झाले, तर त्यांनी हिंदुराष्ट्रवादासाठी फार मोठा त्याग केलेला आढळतो. त्यांच्या त्यागाविषयी सर्व हिंदूंनाच परमादर आहे; परंतु हिंदवेतर जनांनी भूतकाळात हिंदूंवर जे अननि्वत अत्याचार केले, त्यांच्याविषयी त्यांच्या मनात असीम द्वेष आढळतो; पण हे खर्याखुर्या हिंदूचे लक्षण नव्हे. याला मी ‘राजकीय हिंदु’ मानतो. ते इतके अष्टपैलु बुद्धीमान असतांनाही सम्यक उपासनेच्या अभावी धर्मगुह्य जाणण्याच्या संदर्भात अज्ञानी राहिले. हे त्यांच्या द्वेषाचे एकमेव कारण सांगता येईल. त्यामुळे असे लोक त्यांच्या मृत्यूनंतर लगेच मनुष्याच्या जन्माला न आले, तरी ज्या वेळी येतील, त्या वेळी हिंदु धर्माच्या सेवेसाठीच त्यांचा जन्म असेल. गोळवलकर गुरुजी, शिवाजी महाराज आणि तत्सम व्यक्तींचे तसे होत नसते. ईश्वरप्राप्तीची त्यांची साधना अपुरी राहिली असल्यास ते लगेच पुन्हा मनुष्याच्या जन्माला येऊन, त्या ठिकाणी ती पूर्ण होऊ शकते; कारण त्यांनी हिंदुराष्ट्रनिर्मितीचे कार्य ईश्वरप्राप्तीची साधना म्हणून केलेले असते.’ – प.पू. काणे महाराज, नारायणगाव, जिल्हा पुणे, महाराष्ट्र.
६. आस्तिक आणि नास्तिक
‘समस्त विश्वव्यापारांमागे त्यांचा कोणीतरी नियंता असला पाहिजे. हा जो कोणी असेल, तोच ईश्वर होय. तोच या विश्वाचा कर्ता, धर्ता आणि संहर्ता असून चैतन्य किंवा ज्ञान हे त्याचे वैशिष्ट्य आहे. हिंदु धर्माप्रमाणे अशा ईश्वराचे अस्तित्व आणि वेदांचे प्रामाण्य मानणार्याला आस्तिक आणि ते न मानणार्याला नास्तिक अशी संज्ञा आहे.’
‘वेदान्ती ज्याप्रमाणे भगवंताला अनादी मानतात, त्याप्रमाणे वेदांनासुद्धा. तरीही वेद मानून त्याप्रमाणे साचार असणार्यांनाच आस्तिक ही उपाधी लावली जाते. ‘नास्तिको वेदनिन्दकः ।’ असे म्हणतात. वेदान्ती भगवंतापेक्षा वेदांचा सन्मान अधिक करीत असतात. वेद ईश्वरनिर्मित आहेत, या कारणास्तव त्यांचे प्रामाण्य मानण्यापेक्षा वेदांची सिद्धी होत असल्यामुळे, म्हणजे वेद सिद्ध ठरत असल्यामुळे वेदान्ती ईश्वराचे अस्तित्व मानतात. सामान्यांना ईश्वर अनुमानगम्य आहे. अर्थात त्यांचे आस्तिक्य सामान्य असते, विशेष नसते. धूर दिसल्यावर अग्नीची सिद्धी सामान्यपणे होत असते, विशेषपणे नव्हे. तसे हे आहे. वेदांमुळे ईश्वराची विशेष सिद्धी होत असते. विशेष सिद्धी म्हणजे निःसंशय सिद्धी, म्हणजेच अनुभूती.’ – प.पू. काणे महाराज, नारायणगाव, जिल्हा पुणे, महाराष्ट्र.
६ अ. आस्तिक आणि नास्तिक यांतील भेदआस्तिकनास्तिक१. वेदप्रामाण्यमान्य
शास्त्रे स्वीकारिलिया मार्गास, आदरे जे का मानणे ।
ते आस्तिक्य मी म्हणे, तो नववा गुण जेणे ।। (टीप)अमान्य२. ईश्वरआहे. सर्व विश्व हा ईश्वराचा परिवार आहे.नाही३. जगन्नियंताआहेनाही४. योजनाबद्धताआहे. जग ही एक व्यवस्था आहे. जगात जे आहे ते
प्रयोजनपूर्वक आहे. त्यामागे कार्यकारणभाव आहे.
विनाकारण काहीही उत्पन्न होत नाही. वृक्षाचा
आराखडा जसा त्याच्या बिजात असतो, तसाच जगाचा
आराखडा परमेश्वरात अदृश्य स्वरूपात असतो.
विकासवाद हेच तत्त्व नवीन कल्पांत वापरले जाते.नाही. येथे सर्व
अराजक आहे.५. सत्यआहेसत्य नाही आणि असत्यही नाही.६. काळवर्तुळाकार आहे. विश्व हे उत्पत्ती, स्थिती आणि लय या अवस्थांतून गेल्यानंतर पुन्हा तेच वर्तुळ चालू होते.रेषेप्रमाणे आहे. भूतकाळातील घटना पुन्हा कधीही घडत नाहीत.
टीप – शम, दम, तप, शौच, क्षमा, आर्जव, ज्ञान, विज्ञान आणि आस्तिकता हे नऊ गुण होत.
एखाद्या विषयाच्या संदर्भात पाश्चात्त्य विचारसरणी
आणि भारतीय (हिंदु) विचारसरणी यांत भेद असला, तर हिंदु विचारसरणी सत्य समजा !
प.पू. डॉ. आठवले
याचे कारण हे की, हिंदु विचारसरणी लाखो वर्षांची आहे, उदा. सूर्यस्नान कधी करावे ?, याची वेळ पाश्चात्त्य सकाळी १० नंतर अशी सांगतात, तर हिंदु धर्मात कोवळ्या उन्हाची, म्हणजे सकाळी ९ च्या आधीची वेळ सांगितली आहे.
तसेच हिंदु विचारसरणीत कधीही पालट होत नाहीत, तर पाश्चात्त्य विचारसरणीत काही वर्षांतच पालट होतात, उदा. वैज्ञानिक नवीन सिद्धांत सांगतात.
– (प.पू.) डॉ. आठवले (१५.१२.२०१४)
संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘धर्म’
Categoriesधर्म
Share this on :TwitterFacebookGoogle +Whatsapp
संबंधित लेखज्योतिषशास्त्रानुसार व्याधी निवारणासाठी औषध सेवनाचे मुहूर्त आणि रुग्णाईत व्यक्तीची सेवा करणार्या सेवकाच्या कुंडलीतील योगनखे कोणत्या वारी कापावीत, यामागील ज्योतिषशास्त्रीय दृष्टीकोनभारतात सर्वत्र दिसणार्या खंडग्रास चंद्रग्रहणाच्या वेळा, त्या कालावधीत पाळावयाचे नियम आणि राशीपरत्वे फलवैदिक धर्म आणि संस्कृती यांच्या उत्थापनासाठी तरूणांच्या सहभागाचे महत्त्व !ज्योतिषशास्त्रानुसार भविष्य सांगण्याच्या पद्धती आणि प्रारब्धावर मात करण्यासाठी साधना अन् क्रियमाणकर्म यांचे महत्त्वजल्लीकट्टू : हिंदूंचे शौर्य जागृत करणारा साहसी खेळ !
CategoriesCategories Select Category अध्यात्म : एक परिपूर्ण शास्त्र (169) अध्यात्माचे महत्त्व आणि लाभ (19) अनुभूती (38) गुरुकृपायोग (70) अहं निर्मूलन (6) गुरुकृपायोगानुसार साधना केल्याने अनुभवलेला पालट (1) त्याग (2) नाम (16) प्रीती (1) भावजागृती (10) सत्संग (1) सत्सेवा (2) स्वभावदोष निर्मूलन (21) मृत्यू आणि मृत्यूनंतर (11) वास्तूशास्त्र (6) विविध साधनामार्ग (14) कर्मयोग (7) ज्ञानयोग (1) ध्यानयोग (1) भक्तीयोग (3) हठयोग (1) साधना (5) अध्यात्म कृतीत आणा ! (362) अंधानुकरण टाळा ! (19) आचारधर्म (103) अलंकार (8) आहार (30) केशभूषा (17) दिनचर्या (28) निद्रा (1) वेशभूषा (17) धार्मिक कृती (44) आरती (2) ओटी (1) औक्षण (2) कुंकू कसे लावावे ? (1) देवपूजा (9) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (6) देवीची पूजा (2) नमस्कार (6) प्रार्थना (6) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (33) विविध प्रकार (5) श्राद्धाचे महत्त्व (4) सण, उत्सव आणि व्रते (159) उत्सव (50) गुरुपौर्णिमा (11) दत्त जयंती (1) रंगपंचमी (2) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (15) श्रीकृष्ण जयंती (4) हनुमान जयंती (2) होळी (5) व्रते (32) एकादशी (5) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (10) महाशिवरात्र (1) वटपौर्णिमा (3) हरितालिका (1) सण (67) गुढीपाडवा (16) दसरा (6) दिवाळी (21) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (4) उद्घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (76) अध्यात्मविषयक (6) देवताविषयक (4) धर्मग्रंथविषयक (2) धर्मविषयक (17) प्रथा-परंपराविषयक (13) सनातनवरील टीका (18) स्त्रीविषयक (4) आध्यात्मिक उपाय (47) आध्यात्मिक उपायांसाठी मंत्र (2) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (3) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (30) उतारा (1) दृष्ट काढणे (6) देवतांचे नामजप (14) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (1) व्याधी आणि उपाय (2) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (23) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (20) आपत्काळासाठी संजीवनी (64) अग्निहोत्र (6) आयुर्वेद (22) सौंदर्य साधना (2) औषधी वनस्पती (9) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (3) फिजिओथेरपी (2) बिंदूदाबन-उपचार (10) स्वरोदयशास्त्र (3) आमच्याविषयी (176) अभिप्राय (171) आश्रमाविषयी (121) मान्यवरांचे अभिप्राय (85) संतांचे आशीर्वाद (31) प्रतिष्ठितांची मते (14) संतांचे आशीर्वाद (25) स्थापना आणि उद्दिष्टे (1) इतर (81) अध्यात्मविषयी शंकानिरसन (24) आध्यात्मिक संज्ञा (2) प्रसिध्दी पत्रक (21) मराठी भाषा (19) कार्य (510) अध्यात्मप्रसार (192) धर्मजागृती (220) राष्ट्ररक्षण (78) समाजसाहाय्य (29) लवकरच प्रसिद्ध होत आहे ! (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (477) गोमाता (4) थोर विभूती (145) प्राचीन ऋषीमुनी (12) महर्षींची वाणी (10) तीर्थयात्रेतील अनुभव (10) लोकोत्तर राजे (14) संत (72) अग्नीस्वरूप संत प.पू. रामभाऊस्वामी (1) स्वामी विवेकानंद (7) स्वातंत्र्यवीर सावरकर (10) धर्म (50) ज्योतिष्यशास्त्र (5) यज्ञ (2) धर्मग्रंथ (29) श्रीमद्भगवद्गीता (25) भारतीय संस्कृती (60) इंडोनेशिया (19) कुंभमेळा (15) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (13) वैदिक गुरुकुल संस्कृती (7) संस्कृत भाषा (3) सोळा संस्कार (16) विवाह संस्कार (5) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी ? (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा ? (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे ? (1) स्त्री (4) हिंदु देवता (109) अवतार (1) ईश्वर (1) देव (104) इतर देवता (15) दत्त (11) मारुति (11) शिव (24) श्री गणपति (26) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (2) श्रीकृष्ण (2) श्रीराम (7) श्रीविष्णु (1) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (21) हिंदूंची श्रद्धास्थाने (56) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (45) आरती (10) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (16) इतर देवता (6) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (8) दत्त (2) श्री गणपति (2) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (1) सनातन वृत्तविशेष (2,495) आपत्काळ (44) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (43) मडगाव स्फोट प्रकरण (21) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती ! (25) साहाय्य करा ! (23) हिंदु अधिवेशन (70) सनातनचे अद्वितीयत्व (420) ‘ईश्वरप्राप्तीसाठी कला’ (43) आध्यात्मिक कोडी (प्रहेलिका) (5) चित्रकला (2) नृत्यकला (2) फुलांच्या वैविध्यपूर्ण रचना (1) मूर्ती कला (2) वाद्य (1) संगीत (9) सात्त्विक रांगोळी (12) सूक्ष्म चित्रकला (2) आध्यात्मिक संशोधन (82) अध्यात्मविषयक (2) धार्मिक कृतीविषयक (1) परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले (124) अमृत महोत्सव (18) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संतांनी केलेला गौरव ! (9) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची ओळख (25) आध्यात्मिकदृष्ट्या (18) वैद्यकीयदृष्ट्या (1) सामाजिकदृष्ट्या (1) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची वैशिष्ट्ये (14) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची शिकवण (14) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे व्यापक कार्य (37) हिंदुत्ववाद्यांची आध्यात्मिक प्रगति (9) संत घडवणारे उपक्रम (2) अध्यात्म विश्वविद्यालय (1) साधक-पुरोहित पाठशाळा (1) सनातनचे आश्रम (22) आश्रमांची वैशिष्ट्ये (9) ठिकाणे (1) सनातनचे गोकुळ (10) सनातनचे संत (88) साधकांची वैशिष्ट्ये (53) ६० टक्के पातळीचे साधक (9) दिव्य ज्ञानाची प्राप्ती (1) दैवी गुणांनी संपन्न (1) भावामुळे स्फुरणारी कला (36) चित्र (35) सूक्ष्मातील प्रक्रिया जाणणे (6)
अधिकमास
हातापायांना तेल कोणत्या दिशेने लावावे ?
नामजपाचे काही वैशिष्ट्यपूर्ण लाभ
Buy Online
Enter your email address:
Delivered by FeedBurner
DisclaimerTerms of useContact UsOther WebsitesSpiritual TerminologySanatan Shop
We are available on
Follow Us
contact [at] sanatan [dot] org
Donate to us
© 2017 • Sanatan.org
आमच्याविषयीहिंदु धर्मधर्माचरण कराअष्टांग साधनाआध्यात्मिक त्रासउपचार पद्धतीगॅलरीसहभागी व्हा
Scroll back to top
0 Comments