वसुबारस
वसुबारस सायंकाळी सवत्स गाईची (वासरासह) पूजा करावी. तिच्या पायावर पाणी टाकून ओवाळून पंचोपचार पूजा करावी. नंतर तिला उडदाचे वडे वगैरे नैवेद्य खाऊ घालावे. या दिवसापासून दीपोत्सव सुरू होतो. या दिवसापासून आकाश कंदील दारासमोर लावावा. दाराजवळ, तुळशीजवळ रांगोळी काढावी. "दिवे" (पणत्या) लावावेत.
धनत्रयोदशी
धन्वन्तरीच्या फोटोची पूजा करुन फुलांचा हार घालून नैवेद्य दाखविणे. ही आरोग्य देवता असल्यामुळे त्यांना दिर्घायु, आरोग्य, संपत्ती या दिवशी मागावी.
धनत्रयोदशी पूजा
धन्वंतरी पूजनः वेळ संध्याकाळी पूजेपूर्वी प्रथम तेलाचा दिवा किंवा समई लावावी.
साहित्यः
धन्वंतरी फोटो, हळद कुंकू, अक्षता, झेंडूची फुले व पांढरी फुले, तुळशीपत्र, नैवद्य इ. धनत्रयोदशीला संध्याकाळी पाटावर भगवान धन्वंतरी यांचा फोटो ठेवावा. नंतर जवळ पूजेचे साहित्य पाणी, ताम्हण, पळी घ्यावे. प्रथम ३ वेळा पाणी हातावर घेवून आचमन करावे (प्यावे) थोडे डोळ्यांना लावावे.
मग २४ नावे विष्णूची घ्यावी.
१) ॐ केशवाय नमः
२) ॐ नारायणाय नमः
३) माधवाय नमः
४) ॐगोविंन्दाय नमः
५) ॐ विष्णवे नमः
६) ॐमधुसूदनाय नमः
७) ॐत्रिविक्रमाय नमः
८) ॐ वामनाय नमः
९) ॐश्रीधराय नमः
१०) ॐऋषिकेशाय नमः
११) ॐपद्मनाभाय नमः
१२) ॐदामोदराय नमः
१३) ॐसंकर्षणाय नमः
१४) ॐ वासुदेवाय नमः
१५) ॐप्रद्युम्नाय नमः
१६) अनिरूध्याय नमः
१७) ॐपुरूषोत्तमाय नमः
१८) ॐ अधोक्षजाय नमः
१९) ॐनृसिंहाय नमः
२०) ॐ अच्युताय नमः
२१) जनार्दनाय नमः
२२) ॐ उपेंद्राय नमः
२३) ॐ हरये नमः
२४) ॐश्रीकृष्णपरमात्मनेनमः
नंतर गायत्री मंत्र २४ वेळा म्हणावा.
(प्राणायाम करावा) पूढील स्तोत्र वाचावे. -
१. गणपती अथर्वशिर्ष,
२. श्रीसुक्त, पुरूष सुक्त किंवा श्रीसुक्त व पुरूष सुक्त आलटून-पालटून १६/१६ वेळा वाचावे
नंतर फोटो स्वच्छ पुसून त्यांना अष्टगंध, अक्षता व पांढरी फुले व झेंडू फुले वाहावी, धुप-दीप ओवाळावा, अन्न व बत्ताशांचा नैवद्य दाखवावा नंतर धन्वंतरी स्तवन म्हणावे.
धन्वंतरी स्तवन
शंड्ङ्ख चक्र जलौकां दधत्मममृतघटं चारूदोर्भिश्चतुर्भिः । सुक्ष्मस्वच्छातिहृद्यांशुकपरी विलसन्मौलिमभोजनेत्रम् ।। कालाम्मोदाज्वलाङ्गकटितटिविलसच्चारूपिताम्बराढ्यम्ः। वन्दे धन्वंतरीम् तम् निखिलगदवन प्रौढदावाग्निनीलम् ।।
धन्वंतरी मंत्र
।। धं धन्वंतरये नमः ।।
ॐ नमो भगवते वासुदेवाये धन्वंतरये अमृतकलशहस्ताय सर्वामय विनाशाय त्रैलोक्यनाथाय महाविष्णवे स्वाहा ।।
प्रार्थना
"हे भगवान आमच्या घरात सर्वाना सुख शांती समृद्धी आयुआरोग्य ऐश्वर्य लाभू दे." नंतर १ वेळा विष्णु सहस्त्रनाम / १ वेळा श्रीरामरक्षा, गीता १५ वा अध्याय / कालभैरवाअष्टक, १ माळ महामृत्युंजय मंत्र म्हणावा.
नरक चतुर्दशी
(आश्विन वद्य १४) अभ्यंग स्नानानंतर श्री कृष्णाचे फोटोसमोर पुरूषसूक्त किंवा पवमान सूक्त म्हणावे नंतर बत्ताशे, खडीसाखर, फळे इत्यादींचा नैवद्य दाखवावा.
संध्याकाळी दारासमोर दक्षिणेकडे तोंड करून शेणाचा दिवा लावावा. नंतर घरात येवून एक वेळा श्री लक्ष्मी नृसिंह स्तोत्र वाचावे. रात्री ९ वाजे नंतर दारापुढील शेणाचा दिवा उकीरड्यावर ठेवावा. हातपाय धुवून घरात यावे.
रात्री घरी सर्वांनी मिळून गीतेच्या १५ व्या अध्यायाचे वाचन करावे व एक माळ श्री लक्ष्मी गायत्री, विष्णू गायत्री, विष्णू मंत्र, एक वेळा रामरक्षा व विष्णू सहस्त्र नाम वाचावे.
(आश्विन वद्य ३०) या दिवशी शुभ लक्ष्मीमातेचे स्वागत व अलक्ष्मी निसःरणम् करावे.
पूजेची वेळः संध्याकाळी सुर्यास्तापूर्वी २४ मिनीटे व सुर्यास्तानंतर २४ मिनीटे.
पूजेची मांडणी व पुर्व तयारी
✓ स्वस्तिक काढून त्यावर नवीन केरसूणी ठेवावी
✓ लक्ष्मी नारायणाचा फोटा (दरबाराप्रमाणे)
✓ जोड पानावर श्री लक्ष्मीची सुपारी (कोजागरी पौर्णिमेस वापरलेली)
✓ जोड पानावर श्री कुबेराची सुपारी (कोजागरी पौर्णिमेस वापरलेली)
✓ कुलदेवतेचा टाक
✓ श्री लक्ष्मी (नाणे किंवा प्रतिमा)
✓ सोने, चांदी, नाणे, नोटा,
✓ नारळ
✓ खोबरे वाटी त्यात खडी साखर, साळीच्या लाह्या, बत्ताशे, फळे, एका ठिकाणी जोड पानावर खारीक, बदाम सुपारी
✓ मांडणी झाल्यावर तेथे रांगोळी काढावी.
✓ घरासमोर तुळशी जवळ रांगोळी काढावी.
✓ तुळशीपासून देवापर्यंत लक्ष्मीची व गाईची पावले काढावी.
✓ प्रवेशद्वाराबाहेर दोन्ही बाजूस स्वस्तिक काढावे.
✓ घरात तेलाचा दिवा लावून घ्यावा.
पूजेचे साहित्य
निरांजन, अगरबत्ती, पाण्याचा तांब्या,
पळी, फुलपात्र, चमचा, पंचामृत, फुले (फुले शक्यतो पांढरी कन्हेर, पांढरी शेवंती, पांढरा जास्वंद, पांढरी रूई, झेंडू व इतर पांढरी फूले) तुळशीपत्र जवळ ठेवावे. नैवद्यास पुरणपोळी, साळीच्या लाह्या, बत्ताशे, हळदी-कुंकू फळे ठेवावे.
तुलसी पूजन
तुळशीजवळ जाऊन दिवा अगरबत्ती लावून तिची हळद कुंकू अक्षता फुले वाहून पुजा करावी व तुळसी स्तोत्र एक वेळा किंवा तुलसी मंत्र ११ वेळा म्हणावा.
।। ॐहीं क्लीं ऐं वृन्दावन्यै स्वाहा ।।
तुलसी स्तोत्र
तुलसी सर्व प्रतांना महापातक नाशिनी।
अपवर्ग प्रदे देवी वैष्णवाना प्रिय समा ।।
सत्थे सत्यवतीचैव त्रेताया मानवी तथा ।
द्वापारे चावतीर्णासि वृन्दात्व तुलसी क्ली : ।।
तुलसी स्नान मंत्र
यद वल्हाभा देवी भवत चैतन्य कारिणीम् । स्नपयामी जगद्वत्री विष्णूभक्ती प्रदायिनीम् ।।
तुलस्य वजयन मंत्र
तुलस्यमृ तामसी सदा त्व केशवप्रिया। केशवार्थेचितोमि त्वा वरदा भव शोभने ।।
तुलसी प्रणाम
वृन्दायै तुलसी दैव्यै पियायै केशवस्यच ।
विष्णू भक्ती प्रदेदेवी सत्यवत्यैः नमो नमः ।।
नंतर प्रवेश द्वाराजवळ यावे. प्रवेश द्वाराची हळद कुंकू वाहून पूजा करावी. पूजेच्या मांडणीची हळद कुंकू वाहून (पंचोपचार) पूजा करावी. प्रथम श्री लक्ष्मी पूजन ध्यान मंत्र म्हणावा.
श्री लक्ष्मी ध्यान मंत्रः
ध्यायामी ता महालक्ष्मी कर्पूक्षोदंपाण्डूराम ।
शुभ्र वस्त्र परिधाना मुक्ताभरण भुषिताम् ।।
पंकजासन संस्थान स्मेराननसरोरूहाग।
शारदेन्दू कला कान्ती स्निग्धनेत्रा चतुर्भुजाम् ।।
पद्मयुग्गा अक्षयवर व्यग्रचारू कराग्बुजाम् ।
अभितो गजयुग्मेन सिच्यामाना करानुना ।।
सर्व पूजेवर प्रथम फुलाने चार वेळा पाणी शिंपावे. (पाद्य, अर्घ्य, आचमन, जलस्नान) नंतर पंचामृत शिंपावे सर्वांना हळद कुंकू अक्षता फुल वहावे. पंचामृताचा नैवद्य दाखवावा व सर्व पूजेवर फुलाने थोडे थोडे पाणी शिंपून १६ वेळा श्रीसुत्त म्हणून नंतर लक्ष्मीनारायणाचे फोटोसमोर एक वेळा पुरूष सूक्त वाचावे, सर्वांना अष्टगंध, हळद कुंकू, अक्षी, फुले वहावी व पुढील प्रार्थना म्हणावी.
पूजेनंतर पुढील सेवा सामुदायिकपणे करावी.
✓ श्री लक्ष्मी गायत्री १ माळ
✓ श्री विष्णू गायत्री १ माळ
✓ श्री विष्णूचा मंत्र १ माळ
✓ श्री स्वामी समर्थ १ वेळा
✓ गीता १५ वा अध्याय १ वेळा
✓ १ वेळा श्रीसूक्त १ वेळा
✓ पुरूष सूक्त १ वेळा
✓ २४ वेळा विष्णू सहस्त्रनामाचा मंत्र,
✓ श्रीरामरक्षा १ वेळा
श्री लक्ष्मी प्रार्थना मंत्र
कमला चपला लक्ष्मीः चलाभूतीः हरिप्रिया । पद्मा पद्मात्मया सपदुच्चैः श्रीपद्मधारिणी ।। नमस्ते सर्व देवांना वरदासी हरिप्रिये ।
या गतीः त्वतप्रपन्नाना सागे भूयात त्वदर्चनात ॥ या देवी सर्व भुतेषू लक्ष्मीरूपेण संस्थिता । नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमोनमः ।। धनदायै नमस्तुभ्य निधी पद्धिपायच । भवन्तूत्वत्प्रसादान्मे धन धान्यादी संपदा ।।
अलक्ष्मी निसाःरणम्
घराचे सर्व दरवाजे खिडक्या व सर्व दिवे रात्री. १२ वाजेपर्यंत सुरू ठेवावेत. घराच्या मागील भिंतीपासून केरसूणीने एका सरळ रेषेत झाडू न उचलता प्रवेश द्वारापर्यंत झाडत आणावे. उंबरठ्यावर केरसूणी ठेवावी व केरसूणीचा एक फड तोडून बाहेर फेकावा व धुंकावे त्यानंतर अलक्ष्मीचा नाश होवो (अलक्ष्मी निसाःरणम् असे म्हणावे.)
फोटो व सुपारीच्या स्वरूपातील देवतांची पंचोपचार पूजा करावी व सर्वांना एकच नैवेद्य दाखवावा व आरती करावी. शेवटी क्षमा प्रार्थना म्हणून पूजेची सांगता करावी.
0 Comments