धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे

11-10-2016 | 11:34 AM
"यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत । 
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ॥४-७॥ 
परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् । 
धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥४-८॥ "
आपण राम कृष्ण हे देवाचे अवतार समजतो।तसेच त्यांना देव मानते। पण ते सुद्दा ज्या वेळस पृथ्वी वर होते त्या वेळेस ते आपल्या सारखे मानसच होते। त्या वेळेस त्यांना देव कोणि मानत नसत। ते देव झाले ते त्यांच्या जिवनातिल कारकिर्ति मुळे। त्यांनि समाजाला जिवनातिल गमक सांगितले। जिवनातिल धर्माला प्रसतापित केले। जिवन कसे असावे त्यांचा आदर्श निर्माण केला। त्यांनि असे काहि केले कि त्या मूळे लोकांनि त्यांना देवाचा अवतार मानला। तसेच विष्णु चे दहा अवतार मानतात ज्यांचा शास्त्रात पण उल्लेख आहे। पण तसे विष्णु चे अवतार अनंत आहेत। ते म्हणतात कि ज्या ज्या वेळेस धर्म संकटात असेल त्या त्या वेळेस मि अवतार घेइन। धर्म म्हणजे सत्य असत्य त्याचा समतोल राखने। या विश्वा तिल प्रत्येक गोष्ट ज्या वेळेस नियमाबाह्य वर्तन करते त्या बिघडलेल्या घडिला सुव्यवस्थित करण्यासाठि देव अवतार घेतो ज्या कारणास्तव धर्माचे अधिपतन झाले त्यांचा नाश करुन समाजाला अनेक धडे अप्रत्यक्ष देने हे देवाचे कार्य असते। हे चक्र चालुच राहते। देवाचे अवतार चालुच असतात। कारन कितिहि चांगलि वस्तु व्यक्ति हि कालांतराने जिवनातिल सत्याचा विसर पडुन वेगळ्याच दिशेने वाटचाल करते आणि धर्म भ्रष्ट करते। देवाचे अवतार म्हणजे या पृथ्वीवरिल सामान्य व्यक्ति ज्या वेळेस असामान्य काम करतो तो समजावा। काहि अवतार युगे युगे लक्षात राहतात। काहि बराच काळ तर काहि अल्प काळ असतात। आज पर्यंत जे महापुरुष होउन गले ते पण देवाचे अवतारच होते। आपण रामाचि मुर्ति नाहि पुजत तर रामातले गुण पुजतो। राम कृष्ण हे महान झाले देवाचे अवतार झाले ते राम कृष्ण होते म्हणुन नाहि तर त्यांच्या कार्यामुळे। त्यांनि त्यांच्या कर्तृत्वातुन सिद्ध केले कि ते देव अवतार होते। आता विष्णु चा दहावा अवतार बाकि आहे तो या पृथ्वी वर जल्मलेला प्रत्येक जण असु शकतो पण गरज आहे ति सिद्ध करण्याचि। कल्कि अवतार कुठे आहे कसा आहे कोण आहे समजणार नाहि तर ते अवतार कार्य पुर्ण जाल्यावर समजेल। श्री विष्णु चे कार्य आहे ते हा संसार चालविने। ज्यावेळेस भगवंताला हा संसार चालविने अवघड होइल सर्वच कुटुंबातिल बंडखोर प्रवुत्तिने वागतिल त्यावेळेस श्री विष्णु कल्कि अवतार घेवुन या विश्वाचा खेळ मोळतिल। देवअवतार फक्त मनुष्य रुपातच नसतो तर तो प्राणी जिवजंतु तसेच निर्जिव स्वरुपात पण असतो। देव आणि देवत्व समझने म्हणजे जिवन होय।
।।जय श्री राम।।
अजय पाटिल

Post a Comment

0 Comments