सूर्य सिद्धांत
भाग २ - कालभेद: ( काळाची भिन्नता आणि त्याचे स्वरूप )
सूर्य सिध्दांत ह्या लेख मालिकेच्या भाग - १ मध्ये ग्रंथाचा परिचय करून घेताना आपण मध्यमाधिकार : विभागातील मड़लाचरणम् मध्ये ग्रंथाची सुरवात परब्रम्हाला वंदन करून केली हे जाणून घेतले.!
मयासुरतपोवर्णन प्रकरणात ज्योतिषशास्त्र बद्दल जिज्ञासा निर्माण झालेल्या मय नामक महान असुराने ज्ञान मिळवण्यासाठी भगवान सूर्य देवांची केलेली कठोर तपस्या देखील जाणून घेतली.!
मयं प्रति सूर्योपदेश: ह्या प्रकरणात मय असुरच्या कठोर तपस्या पाहून संतुष्ट झालेल्या भगवान सूर्य देवांनी मय असुरला ज्योतिष शास्त्र व खगोल विज्ञानाचे ज्ञान देण्यासाठी आपला अंशावतार पुरुष नियुक्त केला हे देखील जाणून घेतले.!
एकाग्रचित्त करून बसलेल्या शिष्यरुपी मय नामक महान असुराला सूर्य सिद्धांत या ज्योतिष आणि खगोल विज्ञानाच्या गुरुकुलाचे आचार्य भगवान सूर्य देवांचे अंशावतार पुरुष काळाची भिन्नता समजावण्यास सज्ज झालेले आहेत.!
काळाचे भेद समजावताना आचार्य म्हणतात,
लोकानामन्तकृत् काल: कालोज्न्य: कलनात्मक: ।
स॒ द्विधा. स्थूलसूक्ष्मत्वान्मूर्तश्चामूर्त उच्यते ॥ १०॥
(मध्यमाधिकार : , कालभेद :, श्लोक १०)
सदरील श्लोकातून आचार्य मय असुराला काळाची भिन्नता समजावत आहेत.!
काळ दोन प्रकारचे आहेत.!
त्यामधील पहिला काळ हा संसाराचा नाश करतो.! ह्या काळाची कल्पना देखील करू शकत नाही.! कारण आपल्याला माहिती नाही ह्या काळाची सुरवात कुठून झाली आणि शेवट कुठे होणार आहे... हा काळ अखंड आणि व्यापक आहे.!
परंतु ह्या काळाच्या उपस्थितीत जगाचा अंत होतो.! ब्रम्हा उत्पन्न होतात सृष्टीची रचना करतात.. परंतु हा काळ सैदव सुरु राहतो.! ह्यामुळेच ह्या काळाला जगाचा जगाचा शेवट, नाश करणारा काळ असे देखील म्हणतात.! मृत्याला देखील काळ म्हंटले जाते.!
दुसऱ्या प्रकारच्या काळाला कलनात्मक काळ असे म्हणतात.! हा काळ जाणला जाऊ शकतो... गणना केली जाऊ शकते.!
परंतु कलनातम्क काळ देखील स्थूल आणि सूक्ष्म अशा दोन प्रकाराचा असतो.!
स्थूल काळ मोजला जाऊ शकतो म्हणून त्यास मूर्त काळ असे म्हणतात.!
सूक्ष्म काळ मोजला जाऊ शकत नाही म्हणून त्यास अमूर्त असे म्हणतात.!
काळाची भिन्नता समजावल्यावर आचार्य पुढे म्हणतात,
प्राणादि: कथितो मूर्तस्त्रुट्याद्योश्मूर्तसंज्ञक: ।
घड़्भि: प्राणैविनाडीस्यात्तत्वष्ट्या नाडिका स्मृता ॥ ११ ॥
नाडीषष्ट्या तु नाक्षत्रमहोरात्रं प्रकीर्तितम् ।
तत् त्रिंशता भवेन्मास: सावनो5्कोदियैस्तथा ॥ १२॥
(मध्यमाधिकार : , कालभेद :, श्लोक ११, १२)
प्राण पासून पुढे जेवढे वेळेचे घटक आहेत त्यांना मूर्त असे म्हणतात आणि प्राण पासून जेवढे घटक मागे आहेत त्यांना अमूर्त असे म्हणतात.!
स्वास्थ्य माणसाला बसलेल्या अवस्थेत जेवढा वेळ प्राण वायू आत घेऊन बाहेर सोडायला लागतो त्या वेळेला प्राण असे म्हणतात.! त्याकाळी प्राण हे वेळ मोजण्याचे सर्वात सूक्ष्म साधन होते.! त्यापेक्षा कमी वेळ मोजण्यासाठी कुठलेही साधन उपलब्ध नसल्या कारणाने त्यास अमूर्त असे म्हंटलेले आहे.!
६ प्राणांची एक विनाडी (क्षण ) होते.!
६० विनाडी (क्षण ) म्हणजे १ नाडी होते.!
६० नाडी (घटी ) म्हणजे एक नक्षत्र अहोरात्र होते.!
३० अहोरात्र ( दिवस आणि रात्र मिळून ) १ महिना होतो.!
२ सूर्योदयाच्या मधली जी वेळ असते तीला सावन दिवस म्हणतात.!
अश्या प्रकारे भगवान सूर्य देवांच्या अंशावतार पुरुषाने मय असुराला काळाची भिन्नता कालभेद: ह्या प्रकरणात समजावलेली आहे.!
0 Comments