दानधर्म

💫💫 दानधर्म 💫💫
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

दानाचे महत्त्व आणि प्रकार.

     
 वेदांमध्ये तीन प्रकारचे दान सांगितले आहेत.
१) उत्तम,२) मध्यम,३) निकृष्ट...

 जो धर्माच्या प्रगतीसाठी सत्यविद्या देतो ते श्रेष्ठ दान.

- प्रसिद्धी किंवा स्वार्थासाठी जो देतो तो मध्यम.

जो वेश्या, जुगार या मध्ये विनाकारण खर्च करतो हे सर्वात वाईट दान......

  पुराणात अनेक दानांचा उल्लेख आहे. जसे गाय, छत्री, बूट, चप्पल, बेड, ब्लॅंकेट, कंगवा, टोपी, औषध, जमीन, ईमारत, धान्य, तेल,कोरफड, मीठ, गूळ, रांजण, विद्या. 

मुख्य म्हणजे:- अन्नदान, वस्त्रदान, औषध दान, ज्ञानदान, अभयदान. आहेत.

  काही देणग्या अशा आहेत ज्या कोणत्याही व्यक्तीला दिल्या जात नाही. जसं की, दीपदान , छायादान आणी श्रमदान.....

 मुख्य दोन प्रकारचे दान आहेत...१) मायेसाठी २) भगवंतासाठी..

पहिल्या दानात स्वार्थ आणि दुस-या दानात भक्ति असते.....

दानाचे महत्व.....
१) वेद आणि पूराणात दानाचे महत्व सांगितले आहे, दान केल्याने व्यक्ती ला इंद्रियांच्या भोग आसक्ती पासून मुक्ती मिळते. मनाच्या ग्रंथी मोकळ्या होतात, ज्यामुळे मृत्यूच्या वेळी त्याचा फायदा होतो. मृत्यू येण्यापूर्वी, जीवनात काही प्रसंगामुळे बांधल्या गेलेल्या गाठी खुलणे आवश्यक असते. दान हा त्यावर सोपा उपाय आणि उत्तम मार्ग आहे.

 दान कोणत्याही प्रकारचे असो. त्याने मनातील विचारांना मोकळेपणा मिळतो. आसक्ति कमकुवत होते, जी शरीराच्या मुक्ततेमध्ये महत्वाची भुमीका बजावते. कोणत्याही प्रकारचे आजार आणि दु:ख दानी व्यक्तीला चिकटत नाही. मृत्यू सहज सोपा होतो. हा शांततेचा उत्तम मार्ग आहे. 

 दान हे पुण्यकर्म मानले जाते. दान केल्याने मनुष्याचे इहलोक, परलोकात कल्याण होते. मनुष्याला मोक्ष प्राप्ती होते...
     दान केल्याने जीवनातील सर्व समस्या आपोआप संपुष्टात येतात, व्यक्ती चे कर्म सुधारते. नशीब सुधारायला वेळ लागत नाही....

५) व्यक्ती ने एका हाताने केलेले दान त्याला अनेक पटीने परत मिळते, अट एवढीच आहे कि, दान हे समाजाच्या भल्यासाठी नि:स्वार्थपणे आणि निष्ठापूर्वक केले पाहिजे.

  दान हे गुप्त असावे, त्याचा बोलबाला नसावा. दान केल्याने सर्व प्रकारची शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक अडचणी दूर होतात ..‌

दान केल्याने ग्रहदोष,नक्षत्रदोषआणि पितृदोष इत्यादी सर्व प्रकारच्या पीडा कमी होतात.

 गरजू व्यक्तीला दान करावे, त्यांच्या आशीर्वादाने आपल्या सर्व ईच्छा पूर्ण होतात.

 दानाच्या संस्कारामुळे आपल्या कुटुंबावर कोणत्याही प्रकारचे संकट येत नाही, आणि कुटुंबात सुख समृद्धी राहते....

 तुमच्या दारी कोणी भिकारी आला तर त्याला जेवण पाणी दान करा...
  आपल्या कडे पाहुणा आला असेल त्याला दान स्वरूपात काहीही दान करा..
 तिर्थक्षेत्री गेला असता तेथे अन्नदान, करावे.
  जर कोणीही श्राद्धकर्म करत असेल तीथ दान स्वरूपात काहीही द्यावे.
👉🏻 संक्रांतीच्या सणाला दान करावे.
👉🏻 ओळखीतल्या कोणाही गरजवंताला पैशाची, वस्तूची किंवा अन्नाची जशी गरज असेल त्याप्रमाणे दान करावे.
देशावर व समाजावर कोणत्याही प्रकारचे संकट आले तर त्यानुसार मदतीने दान करावे.
शाळा, रुग्णालय,गोठा,आश्रम, मंदिर, तीर्थक्षेत्र अशा ठिकाणी दानधर्म करावे.


💫💫💫💫💫💫💫💫💫💫💫💫

Post a Comment

0 Comments