● 28 नक्षत्राचा जन्म
श्रीब्रम्हा देवाचे मानस पुत्र श्री दक्ष प्रजापति राजा हे होते. श्री दक्षराजा व त्याची पत्नी प्रसुति देवी या पासुन यांना साठ(60) मुली होत्या. या साठ मुलीतील 27 मुली म्हणजे 27 नक्षत्र ह्या होत्या व त्यातिल एक 28 वे नक्षत्र म्हणजे अभिजीत नक्षत्र हे आहेत हे एकमेव पुरूष नक्षत्र आहेत. या 27 नक्षत्रांचे लग्न (विवाह) चंद्र या ग्रहा सोबत झाला. म्हणून चंद्र ज्या नक्षत्रात आहे ती राशी ग्राह्य मानल्या जाते. चंद्र हा एका नक्षत्रात सव्वा दोन दिवस असतो.
या आधीच्या पोस्ट मध्ये आपण ग्रह, ज्योतिष, कुंडली या विषयावर माहिती घेतली या लेखात नक्षत्र विषयांवर माहिती घेऊ
फार पूर्वी पासून मानव आपल्या जिज्ञासेमुळे निरनिराळ्या विषयांवर विचार करून संशोधन करीत आला आहे. आजपर्यंत मानवाने सर्वच विषयांवर सखोल संशोधन केले आहे. ह्या निरनिराळ्या विषयांपैकी एक विषय होता आकाश. हजारो वर्षापासून म्हणजे आदिमानवापासून अवकाश या विषयावर विचार केला जात आहे. नंतर अवकाश हा वेगळाच विषय बनला आणि ह्या विषयाचा अभ्यास अधिक सोईस्कर व्हावा म्हणून मानवाने अवकाशातील प्रत्येक तार्यास निरनिराळे नाव दिले. पुढे ह्या प्रत्येक तार्याचे नाव व ठिकाण लक्षात ठेवणे कठीण होऊ लागले म्हणून आकाशातील तारकांचे ८८ विभाग केले व त्या तारकासमुहांना निरनिराळी नावे देण्यात आलीत.
आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये देखिल वेदकाळापासून अवकाशातील सर्व तारकासमुहांवर संशोधन केले गेले आहे. परंतु आपल्या येथे फक्त २७ तारका समूहांनाच देण्यात आले त्याचे कारण म्हणजे प्रती वर्षी सूर्याचा प्रवास या तारकासमुहामधून होतो.
वेदकाली नक्षत्रे चोवीस होती. तेव्हा फाल्गुनी, आषाढा आणि भाद्रपदा हे प्रत्येकी चार तारकांचे एक-एक असे नक्षत्रसमुह मानले होते. पण नंतरच्या काळात प्रत्येकी दोन तारकांचे पूर्वा आणि उत्तरा असे विभाग पाडण्यात आले आणि नक्षत्रे सत्तावीस झाली. त्यानंतर अभिजित तार्याला एक नक्षत्र मानून एकूण नक्षत्र संख्या २८ झाली. शतपथ ब्राम्हणात ही २८ नक्षत्रे दिलेली आहेत. त्याला 'सर्वतोभद्रचक्र' असे म्हणत असत. परंतु नंतर केव्हातरी अभिजित नक्षत्र वगळण्यात आले कारण ते नक्षत्र सूर्य-चंद्राच्या मार्गापासून फार लांब उत्तरेकडे आहे.
पृथ्वीचा ध्रृव सरळ नसल्यामुळे सूर्याच्या व चंद्राच्या उगवण्याच्या आणि मावळण्याच्या मार्गामध्ये दररोज थोड्या प्रमाणात बदल होत असतो. पृथ्वी जर स्थिर आहे असे मानल्यास सूर्य, चंद्र आणि इतर ग्रहांसोबत सर्व तारकासमूह पृथ्वी भोवती गोलाकार भ्रमण करीत असल्याचे आपणास जाणवेल ह्या सर्वांमध्ये आपण फक्त सूर्य आणि चंद्र ह्यांचाच विचार केल्यास त्यांच्या दररोजच्या उगवण्याच्या आणि मावळण्याच्या मार्गास 'आयनिकवृत्त' असे म्हणतात. आयनिकवृत्ताचे १२ प्रमुख भाग पाडून त्यांना 'राशी' असे नाव देण्यात आले व त्याच आयनिकवृत्ताचे आणखी २७ भाग पाडून त्यांना एक नाव दिले आहे आणि ते नाव आहे 'नक्षत्र'.
सूर्य-चंद्रादी नवग्रह पूर्वेला उगवताना आणि डोक्यावरून मागे जाऊन पश्चिमेला मावळताना दिसतात. ग्रहांच्या या भासमान मार्गाला क्रांतिवृत्त किंवा आयनिकवृत्त अशी संज्ञा आहे. क्रांतिवृत्त गोलाकार म्हणजेच ३६० अंशाचे असते या क्रांतिवृत्ताचे समान १२ भाग म्हणजे १२ राशी आणि याच क्रांतिवृत्ताचे समान २७ भाग म्हणजेच नक्षत्रे होत. क्रांतिवृत्ताच्या ३६० अंशाला १२ ने भाग जातो.
त्यामुळे प्रत्येक राशी ३० अंशाची होते. त्याप्रमाणे नक्षत्र किती अंश कलेचे असते ते समजण्यासाठी थोडी आकडेमोड करावी लागेल. त्यासाठी सर्वप्रथम ३६० अंशाच्या कलाकरून घ्याव्या लागतील. १ अंश = ६० कला. त्यावरून ३६० x ६० = २१६०० कला होतात. याला २७ ने भागल्यावर ८०० कला हे उत्तर येते. म्हणजे १ नक्षत्र ८०० कलांचे असते. या कलांचे अंश करताना पुन्हा ६० ने भागावे म्हणजे १३ ने पूर्ण भाग जातो. व २० उरतात. (१३x६०=७८०+२० कला ८०० कला) म्हणजे १३ अंश २० कलांचे एक नक्षत्र होते. एका नक्षत्राच्या १३ अंश २० कला किंवा८०० कला होतात. एका नक्षत्राचे चार चरण असतात म्हणजे एका चरणाचे २०० कला होतात. २०० भागिले ६० (कला) केले तर ३ अंश पूर्ण (३x६०=१८०+२०=२०० कला) व २० कला येतात. त्यावरून ३ अंश २० कलांचे एक नक्षत्र चरण होते. आता १२ राशीत २७ नक्षत्रे म्हणजे प्रत्येक राशीत किती नक्षत्रे येतील? एका नक्षत्राचे चार चरण, तर २७ नक्षत्रांचे २७*४=१०८ चरणे होतात. १०८ ला (चरण) १२ ने भागले असता भागाकार ९ येतो. म्हणजे एका राशीत ९ चरणे येतात. चार चरणांचे एक नक्षत्र म्हणजे ८ चरणांची २ नक्षत्रे झाली. एक चरण उरले. एक चरण म्हणजे पाव भाग म्हणजे एका राशीत (९ चरणे म्हणजे) सव्वादोन नक्षत्रे येतात. दोन राशीत साडेचार नक्षत्र, तर ८ राशीत १८ आणि १२ राशीत २७ नक्षत्रांची विभागणी बरोबर होते. कोणत्या राशीमध्ये कोणती नक्षत्रे हे ठरलेले असते. नक्षत्रांमध्ये अश्विनी हे पहिले नक्षत्र आहे आणि राशीमध्ये मेष ही पहिली राशी आहे. त्यामुळे अश्विनी नक्षत्र व मेष राशीची सुरुवात एकाच बिंदूपासून होते. मेष राशी नंतर जसे वृषभ, मिथुनादी राशी ओळीने येतात तशी नक्षत्रेही ठरलेल्या क्रमाने येतात. १) अश्विनी, २) भरणी, ३) कृत्तिका, ४) रोहिणी, ५) मृगशीर्ष, ६) आर्द्रा, ७) पुनर्वसू, ८) पुष्य, ९) आश्लेषा, १०) मघा, ११) पूर्वा फाल्गुनी, १२) उत्तरा फाल्गुनी, १३) हस्त, १४) चित्रा, १५) स्वाती, १६) विशाखा, १७) अनुराधा, १८) ज्येष्ठा, १९) मूळ, २०) पूर्वाषाढा, २१) उत्तराषाढा, २२) श्रवण, २३) धनिष्ठा, २४) शततारका, २५) पूर्वाभाद्रपदा, २६) उत्तराभाद्रपदा, २७) रेवती. ही २७ नक्षत्रे असून, ती याच क्रमाने येतात. म्हणजे याच क्रमाने चंद्र एका नक्षत्रातून दुसर्या नक्षत्रात जातो. चंद्र ज्या नक्षत्रात असतो ते त्या दिवसाचे नक्षत्र असते. साहजिकच चंद्र ज्या नक्षत्रात असतो ते त्या व्यक्तीचे चंद्र नक्षत्र आणि चंद्र ज्या राशीत असतो ती त्या व्यक्तीची चंद्रराशी. बहुतांशी लोकांना ही चंद्रराशी माहीत असते. सव्वादोन नक्षत्राची एक राशी होते म्हणजेच चंद्र दोन-सव्वादोन दिवस एकाच राशीत असतो. साहजिकच तेवढ्या काळात जन्मलेल्या व्यक्तींची राशी एक येते, मात्र नक्षत्र वेगळे असते. उदाहरणार्थ अश्विनी ( चार चरण ), भरणी (चार चरण), कृत्तिका (एक चरण) मिळून एक चरण होते.
आकाशातले काही विशिष्ट तारकासमूह नक्षत्र ह्या नावाने ओळखले जातात. नक्षत्रांची यादी अथर्ववेद, तैत्तरीय संहिता, शतपथ ब्राह्मण यांत दिली आहे. सूर्य आकाशात ज्या दीर्घ वर्तुळ मार्गातून भ्रमण करताना दिसतो त्या मार्गाला क्रांतिवृत्त म्हणतात. क्रांतिवृत्ताचे सत्तावीस समान भाग कल्पिले आहेत. त्यांतील प्रत्येकात येणाऱ्या एकेका तारकापुंजाला नक्षत्र म्हणतात. अशी एकूण २७ नक्षत्रे आहेत.
{नोटः या पैकी खालील जे आपले जन्म नक्षत्र आहे त्या
1)नक्षत्राची देवतेची सुवर्ण प्रतिमा पुजा करणे
2)नक्षत्र वृक्ष: जी आहे ती वृक्ष वर्षांतून एकदा तरी नक्की लावावी
3)नक्षत्र देवतेच्या मंत्राचा जप करवा ही विनंती}
● नक्षत्र माहीती ●
● नक्षत्र: अश्विनी
नक्षत्र देवता : अश्विनीकुमार
नक्षत्र स्वामी : केतु
नक्षत्र आराध्य वृक्ष : कुचला
नक्षत्र पर्यायी वृक्ष : अडुळसा
राशी व्याप्ती : ४ हि चरण मेष राशीमध्ये
नक्षत्र प्राणी: घोडा
नक्षत्र तत्व : वायु
नक्षत्र स्वभाव : शुभ
पौराणिक मंत्र:
अश्विनी देवते श्वेतवर्णो तौव्दिभुजौ स्तुमः
lसुधासंपुर्ण कलश कराब्जावश्च वाहनौ ll
नक्षत्र देवता मंत्र:१)ॐअश्विनी कुमाराभ्यां नमः
२) ॐ अश्विभ्यां नमः
नक्षत्र पीडाहर मंत्र:
स्वर्वेद्यावश्वीनौ देवौव्दिभुजौ शुक्लवर्णकोl
सर्वारिष्ट विनाशाय अश्विभ्यांवै नमो नमः
नक्षत्र नाम मंत्र: ॐ अश्वयुगभ्यां नमःl
● भरणी
नक्षत्र :भरणी
नक्षत्र देवता : यम - आद्य पितर
नक्षत्र स्वामी :शुक्र
नक्षत्र आराध्य वृक्ष : आवळा
नक्षत्र पर्यायी वृक्ष : खैर
राशी व्याप्ती : ४ हि चरण मेष राशीमध्ये
नक्षत्र प्राणी : हत्ती
नक्षत्र तत्व : अग्नी
नक्षत्र स्वभाव : क्रूर
पौराणिक मंत्र:
पाशदण्डं भुजव्दयं यमं महिष वाहनम l
यमं नीलं भजे भीमं सुवर्ण प्रतीमागतम् ll
नक्षत्र देवता नाममंत्र: ॐ यमाय् नमः l
नक्षत्र पीडाहर मंत्र:
दंडहस्तघरं देवं महामहिष वाहनं l
सर्वारिष्टं विनाशय नैमिनित्यं ll
नक्षत्र नाम मंत्र:ॐ अपभरणीभ्यो नमःl
● कृतिका
नक्षत्र: कृतिका
नक्षत्र देवता : अग्नी
नक्षत्र स्वामी : रवि
नक्षत्र आराध्य वृक्ष : उंबर, औदुंबर
नक्षत्र पर्यायी वृक्ष : बेहडा
राशी व्याप्ती : १ले चरण मेष राशीमध्ये,
बाकीचे ३ चरण वृषभ राशीमध्ये
नक्षत्र प्राणी: बकरी
नक्षत्र तत्व :अग्नी
नक्षत्र स्वभाव : क्रूर
पौराणिक मंत्र:
कृतिका देवतामाग्निं मेशवाहनं संस्थितम् l
स्त्रुक् स्तुवाभीतिवरधृक्सप्तहस्तं नमाम्यहम् ll
नक्षत्र देवता नाममंत्र: ॐ आग्नेय नमः l
नक्षत्र पीडाहर मंत्र:
आग्नेयः पुरुषोरक्त सर्व देवमयोव्ययः ll
नक्षत्र नाम मंत्र :ॐ कृतिकाभ्यो नमःl
● रोहिणी
नक्षत्र: रोहिणी
नक्षत्र देवता :ब्रम्हा
नक्षत्र स्वामी : चंद्र
नक्षत्र आराध्य वृक्ष :जांभळी, जांभूळ
नक्षत्र पर्यायी वृक्ष: बेल
राशी व्याप्ती : ४ हि चरण वृषभ राशीमध्ये
नक्षत्र प्राणी: सर्प
नक्षत्र तत्व: पृथ्वी
नक्षत्र स्वभाव: शुभ
पौराणिक मंत्र:
प्रजापतीश्वतुर्बाहुः कमंडल्वक्षसूत्रधृत् l
वराभयकरः शुध्दौ रोहिणी देवतास्तु मे ll
नक्षत्र देवता नाममंत्र: १)ॐ ब्रम्हणे नमःl
२) ॐ प्रजापतये नमःll
नक्षत्र पीडाहर मंत्र:
त्रुवाक्ष मालाकरक पुस्तकाढ़यं चतुर्भुजं l
सर्वारिष्ट विनाशाय दातवत्क्रं नमामिच ll
नक्षत्र नाम मंत्र: ॐ रौहिण्यै नमःl
● मृगशीर्ष
नक्षत्र: मृगशीर्ष
नक्षत्र देवता: चंद्र
नक्षत्र स्वामी: मंगळ
नक्षत्र आराध्य वृक्ष : खैर (कात)
नक्षत्र पर्यायी वृक्ष: पिंपळ
राशी व्याप्ती : २ चरण वृषभ राशीमध्ये,
बाकीचे २ चरण मिथुन राशीमध्ये
नक्षत्र प्राणी :सर्प
नक्षत्र तत्व: वायु
नक्षत्र स्वभाव: शुभ
पौराणिक मंत्र:
श्वेतवर्णाकृतीः सोमो व्दिभुजो वरदण्डभृत् l
दशाश्वरथमारूढो मृगशिर्षोस्तु मे मुदे ll
नक्षत्र देवता नाममंत्र :१)ॐ चंद्रमसे नमःl
२) ॐ सोमाय नमःl
नक्षत्र पीडाहर मंत्र:
सर्व नक्षत्रं मध्येतु सोमोराजा व्यवस्थितःl
सर्वारिष्ट विनाशाय सोमाय सततं नमः ll
नक्षत्र नाम मंत्र : ॐ मृगशीर्षाय नमःl
● आर्द्रा
नक्षत्र: आर्द्रा
नक्षत्र देवता : रुद्र (शिव)
नक्षत्र स्वामी : राहु
नक्षत्र आराध्य वृक्ष : कृष्णागरू
नक्षत्र पर्यायी वृक्ष : चंदन
राशी व्याप्ती : ४ हि चरण मिथुन राशीमध्ये
नक्षत्र प्राणी : कुत्रा
नक्षत्र तत्व : जल
नक्षत्र स्वभाव : तीक्ष्ण
पौराणिक मंत्र:
रुद्र श्वेतो वृशारूढः श्वेतमाल्यश्चतुर्भुजःl
शूलखड्गाभयवरान्दधानो मे प्रसीदतु ll
नक्षत्र देवता नाममंत्र: ॐ रुद्राय नमः l
नक्षत्र पीडाहर मंत्र:
रुद्रोदेवो वृषारुढश्चतुर्बाहुस्त्रिलोचनःl
सर्वारिष्ट विनाशाय रुद्रायच नमोनमःll
नक्षत्र नाम मंत्र:ॐ आर्द्रायै नमःl
● पुनर्वसु
नक्षत्र: पुनर्वसु
नक्षत्र देवता: अदिती
नक्षत्र स्वामी: गुरू
नक्षत्र आराध्य वृक्ष : वेळू/ बांबू
नक्षत्र पर्यायी वृक्ष : वड
राशी व्याप्ती: 3 चरणे मिथुन राशीमध्ये,
बाकीचे १ चरण कर्क राशीमध्ये
नक्षत्र प्राणी: मांजर
नक्षत्र तत्व: वायु
नक्षत्र स्वभाव: चर
पौराणिक मंत्र:
अदितीः पीतवर्णाश्च स्त्रुवाक्षकमण्डलून l
दधाना शुभदा मे स्यात पुनर्वसु कृतारव्या ll
नक्षत्र देवता नाममंत्र :१)ॐ आदित्यै नमःl
२)ॐ आदितये नमःl
नक्षत्र पीडाहर मंत्र:
अदितीर्देवमाताच पुनर्वस्वधिपातया l
सर्वारिष्ट विनाशाय आदित्यैय नमोनमःll
नक्षत्र नाम मंत्र: ॐ आर्द्रायै नमःl
● पुष्य
नक्षत्र: पुष्य
नक्षत्र देवता: गुरु
नक्षत्र स्वामी: शनि
नक्षत्र आराध्य वृक्ष: पिंपळ
नक्षत्र पर्यायी वृक्ष : पळस
राशी व्याप्ती :४ हि चरण कर्क राशीमध्ये
नक्षत्र प्राणी :बकरी
नक्षत्र तत्व :अग्नी
नक्षत्र स्वभाव:शुभ
पौराणिक मंत्र:
वंदे बृहस्पतिं पुष्यदेवता मानुशाकृतिम् l
सर्वाभरण संपन्नं देवमंत्रेण मादरात् ll
नक्षत्र देवता नाममंत्र :ॐ बृहस्पतये नमःl
नक्षत्र पीडाहर मंत्र:
देवमंत्री विशालाक्ष सदालोकहिते रतःl
सर्वारिष्ट विनाशाय धिषणाय नमोनमःll
नक्षत्र नाम मंत्र: ॐ पुष्याय नमःl
● आश्लेषा
नक्षत्र:आश्लेषा
नक्षत्र देवता: सर्प
नक्षत्र स्वामी : बुध
नक्षत्र आराध्य वृक्ष: जुई (नागचाफा)
नक्षत्र पर्यायी वृक्ष :उंडी
राशी व्याप्ती :४ हि चरण कर्क राशीमध्ये
नक्षत्र प्राणी : मांजर
नक्षत्र तत्व : जल
नक्षत्र स्वभाव: तीक्ष्ण,शोक
पौराणिक मंत्र: सर्पोरक्त स्त्रिनेत्रश्च फलकासिकरद्वयःl
आश्लेषा देवता पितांबरधृग्वरदो स्तुमे ll
नक्षत्र देवता नाममंत्र: ॐ सर्पेभ्यो नमःl
नक्षत्र पीडाहर मंत्र:
स्वर्वेद्यावश्वीनौ देवौ व्दिभुजौ शुक्लवर्णको l
सर्वारिष्ट विनाशाय तुस्मै नित्यं नमोनमःll
नक्षत्र नाम मंत्र: ॐ आश्लेषायै नमःl
● मघा
नक्षत्र: मघा
नक्षत्र देवता: पितर
नक्षत्र स्वामी: केतु
नक्षत्र आराध्य वृक्ष: वड
नक्षत्र पर्यायी वृक्ष: रिठा
राशी व्याप्ती : ४ हि चरण सिंह राशीमध्ये
नक्षत्र प्राणी: उंदीर
नक्षत्र तत्व: अग्नी
नक्षत्र स्वभाव :क्रुर, उग्र
पौराणिक मंत्र :
पितरः पिण्डह्स्ताश्च कृशाधूम्रा पवित्रिणःl
कुशलं द्घुरस्माकं मघा नक्षत्र देवताःll
नक्षत्र देवता नाममंत्र:ॐ पितृभ्यो नमःl
नक्षत्र पीडाहर मंत्र:
पितरः कृष्णवर्नाश्च चतुर्हस्ता विमा नगाःl
सर्वारिष्ट विनाशाय तेभ्योनित्यं नमोनमःll
नक्षत्र नाम मंत्र: ॐ मघायै नमःl
● पुर्वा (फाल्गुनी)
नक्षत्र: पुर्वा (फाल्गुनी)
नक्षत्र देवता : भग
नक्षत्र स्वामी : शुक्र
नक्षत्र आराध्य वृक्ष : पलाश (पळस)
नक्षत्र पर्यायी वृक्ष: बेल
राशी व्याप्ती : ४ हि चरण सिंह राशीमध्ये
नक्षत्र प्राणी:उंदीर
नक्षत्र तत्व: क्रुर
नक्षत्र स्वभाव : शुभ
पौराणिक मंत्र:
भगं रथवरारुढं व्दिभुंज शंखचक्रकम् l
फाल्गुनीदेवतां ध्यायेत् भक्ताभीष्टवरप्रदाम् ll
नक्षत्र देवता नाममंत्र: ॐ भगाय नमःl
नक्षत्र पीडाहर मंत्र:
स्वर्वेद्यावश्वीनौ देवौ व्दिभुजौ शुक्लवर्णको l
सर्वारिष्ट विनाशाय अश्विभ्यांवै नमो नमः
नक्षत्र नाम मंत्र: ॐ पुर्व फाल्गुनीभ्यां नमःl
● उत्तरा (फाल्गुनी)
नक्षत्र:उत्तरा (फाल्गुनी)
नक्षत्र देवता : अर्यमा
नक्षत्र स्वामी: रवि
नक्षत्र आराध्य वृक्ष : पायरी पिंपरी( प्लक्ष )
नक्षत्र पर्यायी वृक्ष :अर्जुन
राशी व्याप्ती १ ले चरण सिंह राशीमध्ये,
बाकीचे ३ चरण कन्या राशीमध्ये
नक्षत्र प्राणी: गाय
नक्षत्र तत्व :वायु
नक्षत्र स्वभाव: शुभ
पौराणिक मंत्र: संपूजयाम्यर्यमणं फाल्गुनी तार देवताम् l
गायत्री मंत्रः धुम्रवर्णं रथारुढं सुशक्तिकरसंयुतम् ll
नक्षत्र देवता नाममंत्र : ॐ अर्यम्ने नमः
नक्षत्र पीडाहर मंत्र:
उत्तराधिपतिश्चैव लोकसंरक्षकस्तथा l
सर्वारिष्ट विनाशाय तस्मै नित्यं नमोनमःll
नक्षत्र नाम मंत्र : ॐ उत्तरा फाल्गुनीभ्यां नमःl
● हस्त
नक्षत्र :हस्त
नक्षत्र देवता : सुर्य
नक्षत्र स्वामी : चंद्र
नक्षत्र आराध्य वृक्ष : जाई,चमेली
नक्षत्र पर्यायी वृक्ष: रिठा
राशी व्याप्ती :४ हि चरण कन्या राशीमध्ये
नक्षत्र प्राणी : म्हैस
नक्षत्र तत्व : वायु
नक्षत्र स्वभाव: शुभ, सत्वगुणी
पौराणिक मंत्र:
सवितारहं वंदे सप्ताश्चरथ वाहनम् l
पद्मासनस्थं छायेशं हस्तनक्षत्रदेवताम् ll
नक्षत्र देवता नाममंत्र : ॐ सवित्रे नमःl
नक्षत्र पीडाहर मंत्र:
हस्तस्याधिपतीः सुर्यःजगदात्मा तथैवच l
सर्वारिष्ट विनाशाय अश्विभ्यांवै नमो नमःll
नक्षत्र नाम मंत्र: ॐ हस्ताय नमःl
● चित्रा
नक्षत्र : चित्रा
नक्षत्र देवता: त्वष्टा
नक्षत्र स्वामी: मंगळ
नक्षत्र आराध्य वृक्ष: बेल
नक्षत्र पर्यायी वृक्ष: बकुळ
राशी व्याप्ती : २ चरण कन्या राशीमध्ये,
बाकीचे, २ चरण तुळ राशीमध्ये
नक्षत्र प्राणी: वाघ
नक्षत्र तत्व : वायु
नक्षत्र स्वभाव: तीक्ष्ण
पौराणिक मंत्र:
त्वष्टारं रथमारूढं चित्रानक्षत्रदेवताम् l
शंखचक्रान्वितकरं किरीटीनमहं भजे ll नक्षत्र देवता नाममंत्र: ॐ त्वष्ट्रे नमःl
नक्षत्र पीडाहर मंत्र:
त्वाष्ट्राॠक्षधिपश्चैव भक्त संरक्षकस्तथा l
सर्वारिष्ट विनाशाय त्वष्ट्राधिप नमोनमःll
नक्षत्र नाम मंत्र: ॐ चित्रायै नमःl
● स्वाती
नक्षत्र :स्वाती
नक्षत्र देवता: वायु
नक्षत्र स्वामी : राहु
नक्षत्र आराध्य वृक्ष: अर्जुन
नक्षत्र पर्यायी वृक्ष : काटे सांवर
राशी व्याप्ती : ४ हि चरण तुळ राशीमध्ये
नक्षत्र प्राणी: म्हैस
नक्षत्र तत्व: अग्नी
नक्षत्र स्वभाव: शुभ
पौराणिक मंत्र:
वायुवरं मृगारुढं स्वाती नक्षत्र देवताम् l
खड्.ग चर्मोज्वल करं धुम्रवर्ण नमाम्यह्म् ll नक्षत्र देवता नाममंत्र:ॐ वायवे नमःl
नक्षत्र पीडाहर मंत्र:
स्वर्वेद्यावश्वीनौ देवौव्दिभुजौ शुक्लवर्णकोl
सर्वारिष्ट विनाशाय अश्विभ्यांवै नमो नमः नक्षत्र नाम मंत्र: ॐ स्वात्यै नमःl
● विशाखा
नक्षत्रः विशाखा
नक्षत्र देवता : इंद्राग्नी
नक्षत्र स्वामी : गुरू
नक्षत्र आराध्य वृक्ष: देव बाभुळ ( दा.पं. = नागकेशर )
नक्षत्र पर्यायी वृक्ष : पारिजातक
राशी व्याप्ती : पहिले 3 चरण तुळ राशीमध्ये,
बाकीचे १ चरण वृश्चिक राशीमध्ये
नक्षत्र प्राणी : वाघ
नक्षत्र तत्व : वायु
नक्षत्र स्वभाव: अशुभ
पौराणिक मंत्र:
इंद्राग्नीशुभदौ स्यातां विशाखा देवतेशुभे l
नमोम्ये करथारुढौ वराभयकरांबुजौ ll नक्षत्र देवता नाममंत्र: ॐ इंद्राग्नीभ्यां नमः
नक्षत्र पीडाहर मंत्र: स्वर्वेद्यावश्वीनौ देवौ व्दिभुजौ शुक्लवर्णकोl
सर्वारिष्ट विनाशाय इंद्राग्नीभ्यां नमोनमःll नक्षत्र नाम मंत्र: ॐ विशाखाभ्यां नमःl
● अनुराधा
नक्षत्र :अनुराधा
नक्षत्र देवता : मित्र
नक्षत्र स्वामी : शनि
नक्षत्र आराध्य वृक्ष :नागकेशर
नक्षत्र पर्यायी वृक्ष : सिता अशोक
राशी व्याप्ती : ४ हि चरण वृश्चिक राशीमध्ये
नक्षत्र प्राणी: हरीण
नक्षत्र तत्व: पृथ्वी
नक्षत्र स्वभाव: शुभ
पौराणिक मंत्र:
मित्रं पद्मासनारूढं अनुराधेश्वरं भजे l
शूलां कुशलसद्भाहुं युग्मंशोणितवर्णकम् ll नक्षत्र देवता नाममंत्र: ॐ मित्राय नमः l
नक्षत्र पीडाहर मंत्र:
अनुराधाधिपोमित्रः आयुष्योवर्धकस्तथा l
सर्वारिष्ट विनाशाय मित्रायच नमोनमः
नक्षत्र नाम मंत्र: ॐ अनुराधाभ्यो नमःl
● जेष्ठा
नक्षत्र: जेष्ठा
नक्षत्र देवता: इंद्र
नक्षत्र स्वामी :बुध
नक्षत्र आराध्य वृक्ष: निर्गुडी/सांबळ (दा.पं. = सांबर )
नक्षत्र पर्यायी वृक्ष: लोध्र
राशी व्याप्ती : ४ हि चरण वृश्चिक राशीमध्ये
नक्षत्र प्राणी: हरीण
नक्षत्र तत्व: पृथ्वी
नक्षत्र स्वभाव: तीक्ष्ण
पौराणिक मंत्र:
श्वेतहस्तिनमारूढं वज्रांकुशलरत्करम् l
सहस्त्रनेत्रं पीताभं इंद्रं ह्रदि विभावये ll
नक्षत्र देवता नाममंत्र: ॐ इंद्राय नमःl
नक्षत्र पीडाहर मंत्र: इंद्रः सुरपतिः श्रेष्ठो वज्रहस्तो महाबलः l
रातयज्ञाधिपो देवस्तर मैनित्यं नमो नमः|l
नक्षत्र नाम मंत्र: ॐ जेष्ठायै नमःl
● मूळ
नक्षत्र:मूळ
नक्षत्र देवता: निॠति (राक्षस)
नक्षत्र स्वामी: केतु
नक्षत्र आराध्य वृक्ष : राळ
नक्षत्र पर्यायी वृक्ष: देव बाबुळ
राशी व्याप्ती : ४ हि चरण धनु राशीमध्ये
नक्षत्र प्राणी: कुत्रा
नक्षत्र तत्व : जल
नक्षत्र स्वभाव: तीक्ष्ण
पौराणिक मंत्र: खड्.गखेटधरं कृष्णं यातुधानं नृवाहनम् l
अर्ध्वकेशं विरुपाक्षं भजे मुलाधिदेवताम् ll
नक्षत्र देवता नाममंत्र: ॐ निॠतये नमः l
नक्षत्र पीडाहर मंत्र: निॠति खड्.गहस्तंच सर्व लोकैक पावन l
नरवाहन मत्युग्रं वंदेहं कालिकाप्रियं ll
नक्षत्र नाम मंत्र: ॐ मुलाय नमःl
● पूर्वाषाढा
नक्षत्र: पूर्वाषाढा
नक्षत्र देवता: जल/ उदक
नक्षत्र स्वामी: शुक्र
नक्षत्र आराध्य वृक्ष: वेत
नक्षत्र पर्यायी वृक्ष: अशोक सीता
राशी व्याप्ती : ४ हि चरण धनु राशीमध्ये
नक्षत्र प्राणी:वानर
नक्षत्र तत्व: जल
नक्षत्र स्वभाव: उग्र
पौराणिक मंत्र:
आषाढदेवता नित्यमापः सन्तु शुभावहाःl
समुद्र गास्तरा गिणोल्हादिन्यःसर्वदेहिनाम्ll
नक्षत्र देवता नाममंत्र: ॐ अद्भयो नमःl
नक्षत्र पीडाहर मंत्र: स्त्रीरूपाः पाशाकलशहस्ता मकरवाहनाःl
श्वेतमौक्तिक भूषाढ्या अद्भस्ताभ्यो नमो नमःll
नक्षत्र नाम मंत्र: ॐ पूर्वाषाढाभ्यां नमःl
● उत्तराषाढा
नक्षत्र: उत्तराषाढा
नक्षत्र देवता: विश्वदेव
नक्षत्र स्वामी: रवि
नक्षत्र आराध्य वृक्ष :फणस
नक्षत्र पर्यायी वृक्ष: कांचन
राशी व्याप्ती : पहिले चरण धनु राशीमध्ये,
बाकीचे ३ चरण मकर राशीमध्ये
नक्षत्र प्राणी: मुंगुस
नक्षत्र तत्व: पृथ्वी
नक्षत्र स्वभाव: स्थिर
पौराणिक मंत्र:
विश्वांदेवान् अहं वंदेषाढनक्षत्रदेवताम् l
श्रीपुष्टिकीर्तीधीदात्री सर्वपापानुमुक्तये ll
नक्षत्र देवता नाममंत्र:ॐ विश्वेभ्यो देवेभ्यो नमः l
नक्षत्र पीडाहर मंत्र:
देवता बहुरूपत्वात् विश्वेदेवास्तथैवच l
सर्वारिष्ट विनाशाय तेभ्यो नित्यं नमो नमःll
नक्षत्र नाम मंत्र: ॐ उत्तराषाढाभ्यां नमःl
● श्रवण
नक्षत्र: श्रवण
नक्षत्र देवता: विष्णु
नक्षत्र स्वामी: चंद्र
नक्षत्र आराध्य वृक्ष: रुई ( अर्क ) मंदार
नक्षत्र पर्यायी वृक्ष: आंबा
राशी व्याप्ती : ४ हि चरण मकर राशीमध्ये
नक्षत्र प्राणी: वानर
नक्षत्र तत्व: पृथ्वी
नक्षत्र स्वभाव: चर
पौराणिक मंत्र:
शांताकारं चतुर्हस्तं श्रोणा नक्षत्रवल्लभम् l
विष्णु कमलपत्राक्षं ध्यायेद् गरुड वाहन् ll
नक्षत्र देवता नाममंत्र: ॐ विष्णवे नमः l
नक्षत्र पीडाहर मंत्र:
विष्णुं विष्णुं महाविष्णुं महेश्वरं l
सर्वारिष्ट विनाशाय नमामि पुरुषोत्तम ll
नक्षत्र नाम मंत्र:ॐ श्रवणाय नमःl
● धनिष्ठा
नक्षत्र: धनिष्ठा
नक्षत्र देवता :वसु
नक्षत्र स्वामी: मंगळ
नक्षत्र आराध्य वृक्ष: शमी
नक्षत्र पर्यायी वृक्ष: नीम
राशी व्याप्ती: पहिले २ चरण मकर राशीमध्ये,
बाकीचे २ चरण कुंभ राशीमध्ये
नक्षत्र प्राणी: सिंह
नक्षत्र तत्व: पृथ्वी
नक्षत्र स्वभाव: थोडेसे शुभ
पौराणिक मंत्र
श्राविष्ठादेवतां वंदे वसुन्वरधराश्रिताम् l
शंखचक्रांकितरांकिरीटांकित मस्तकाम् ll
नक्षत्र देवता नाममंत्र: ॐ वसुभ्यो नमःl
नक्षत्र पीडाहर मंत्र:
अष्टौदेवाच वसवो यज्ञ संरक्षकास्तथा l
सर्वारिष्ट विनाशाय तेभ्यो नित्यं नमो नमःll
नक्षत्र नाम मंत्र:ॐ धनिष्ठायै नमःl
● शततारका
नक्षत्र: शततारका
नक्षत्र देवता: वरुण
नक्षत्र स्वामी: राहु
नक्षत्र आराध्य वृक्ष :कदंब
नक्षत्र पर्यायी वृक्ष:आपटा
राशी व्याप्ती : ४ हि चरण कुंभ राशीमध्ये
नक्षत्र प्राणी: घोडा
नक्षत्र तत्व: जल
नक्षत्र स्वभाव: चर
पौराणिक मंत्र:
वरुणं सततं वंदे सुधाकलश धारीणम् l
पाशहस्तं शतभिशग् देवतां देववंदीतम ll
नक्षत्र देवता नाममंत्र:ॐ वरुणाय नमः
नक्षत्र पीडाहर मंत्र:
पाशहस्तंच वरुणं यादसां पतिमीश्वरं l
अपांपति महं वंदे देवं मकरवाहनं ll
नक्षत्र नाम मंत्र : ॐ शतभिषजे नमः
● पुर्वाभाद्रपदा
नक्षत्र: पुर्वाभाद्रपदा
नक्षत्र देवता: अजैक चरण
नक्षत्र स्वामी: गुरू
नक्षत्र आराध्य वृक्ष: आंबा
नक्षत्र पर्यायी वृक्ष: हिरडा
राशी व्याप्ती : पहिले ३ चरण कुंभ राशीमध्ये,
बाकीचे १ चरण मीन राशीमध्ये
नक्षत्र प्राणी :सिंह
नक्षत्र तत्व: अग्नी
नक्षत्र स्वभाव: उग्र
पौराणिक मंत्र:
शिरसा महजं वंदे ध्येकपादं तमोपहम् l
मुदे प्रोष्ठपदेवानं सर्वदेवनमस्कृतम् ll
नक्षत्र देवता नाममंत्र: ॐ अजैकपदे नमःl
नक्षत्र पीडाहर मंत्र
0 Comments