संतान समस्या

कुंडली विश्लेषण
 
             विषय :- संतान समस्या
               कुंडली क्रमांक : ११
             
                दर्शना काल्पनिक नाव
                    15/10/1997
                       11:00 pm
                          बारामती

यांचा प्रश्न संतान संदर्भात आहे.

संतान संदर्भाचा प्रश्न आपण पंचम स्थानावरून बघतो.

या कुंडली मध्ये पंचम स्थानामध्ये तुला राशि आहे.

 आणि तुला राजाचा स्वामी शुक्र सहाव्या घरात मंगळासोबत आहे.

सहाव्या घरात शुक्र कधीही चांगले फळ देत नाही कारण सहावे घर हे रोग, कर्ज, घटस्फोट, भांडण तंटा, शत्रु यांचे आहे.
शुक्र का आहे तर शुक्र सगळे भौतिक व वैवाहिक सुख.
 आणि या घराचा कारक शनी आहे त्यामुळे या घरामध्ये शुक्र आपले कारकत्व हरवतो.
आणि मंगळा सोबत शुक्र पीडित झालेला आहे.
 शुक्र मंगल सोबत असल्या कारणामुळे शारीरिक कष्ट होणे यासारख्या गोष्टी घडतात. या ठिकाणी मंगळ हा स्व राशीचा असल्या कारणामुळे खूप मजबूत आहे. मंगळाचा संबंध पाचवा स्थानाशी किंवा पंचमेशशी आल्यास गर्भपाताच्या समस्या निर्माण होतात.
  अग्नी आणि पाणी एकाच ठिकाणी एकमेकाचा ऱ्हास करतात.

मुलींच्या कुंडलीमध्ये संतान सुखाचा कारक ग्रह गुरु हा अष्टमस्थानामध्ये निचराशीमध्ये पीडित आहे.
मुलींच्या कुंडलीमध्ये जर गुरु हा पीडित असेल नीच राशीमध्ये असेल कमजोर असेल तर वैवाहिक सुख व संतान सुख यात कमतरता येते.
 संतान प्राप्तीसाठी खूप समस्या येतात.

 तसेच सप्तम स्थानावर शनी महाराजांची दृष्टी आहे.

नवमाश कुंडलीचा विचार केला असता पंचम स्थानाचा स्वामी बुध हा अष्टमस्थानामध्ये आहे.

 नवमाश कुंडलीचा लग्नेश बाराव्या स्थानामध्ये आहे.

आणि संतान सुखाचा कारक ग्रह गुरु शत्रू राशीत पंचम स्थानात आहे.
मित्रांनो एकटा गुरु जर पंचम स्थानात असेल तर गुरु भावनाश करतो.

अष्टक वर्गामध्ये पंचम स्थानाला फक्त 21 गुण आहे

सप्तमाश कुंडली मध्ये पंचम स्थानामध्ये राहू असून पंचमेश शनि हा अष्टमस्थानामध्ये चंद्रासोबत आहे.

म्हणजे सप्तमास कुंडली मध्ये सुद्धा पंचम स्थान व पंचमेश शनि पीडित आहेत.

त्यामुळे शनि हा उशिराने अपत्य प्राप्ती दाखवतो.
 राहू पंचम स्थानांमध्ये सर्पदोष निर्माण करतो आणि प्रजनन क्षमते संदर्भात हानी निर्माण करतो.

सप्तमाश कुंडलीत लग्नेश बुध हा मंगल व सूर्य यांच्या कात्रीत आहे.
परंतु स्वराशीचा असल्याकारणामुळे मुलं निश्चित होतील.

उपाय म्हणून सदर महिलेने

पंचमेश शुक्राची उपासना करावी.
 शुक्राच्या मंत्राचा जप करावा.
 श्रीसूक्त वाचन करावे.

वैभव लक्ष्मी उपासना करावी.

संतानकारक गुरुची उपासना करावी.

गुरु नीच राशीमध्ये आहे म्हणून गुरुची उपासना करावी.
 गुरु मंत्र जप करावा.
 पिवळ्या वस्तूंचे दान करावे.
दत्ताची उपासना करावी.
राहू केतूची उपासना करावी.

संतान गोपाल मंत्र जाप करावा.

स्कंदमाता पूजन करावे.

गर्भ गौरी रुद्राक्ष परिधान करावे.

वास्तु पूजा करावी व नवग्रह पूजा करावी.


Post a Comment

0 Comments