अक्षय्यतृतिया: पितरांच्या पूजेचे महत्त्व

☸️🧿#अक्षय्यतृतिया🧿☸️
         
अक्षय्य "तृतिया तिथी" या तिथीचा कधीही क्षय होत नसतो. म्हणून त्या तिथीला "अक्षय्य तृतिया" असे म्हंटले जाते. साडेतीन मुहुर्तापैकी एक असल्याने या दिवसाला खूप महत्त्व प्राप्त झालेले आहे.!!!

या अक्षय्य तृतियेच्या दिवशी पितरांच्या पूजेचे महत्त्व लक्षात घेता पितराची पूजा करण्याची सोपी पद्धत इथे सांगत आहे.!!!!!!-----

          ✳️श्राद्ध संकल्प✳️

आचमन प्राणायाम करून "मम पितृणामक्षय्यतृप्त्यर्थ उदककुम्भपूजनं करिष्ये । तथाच उदककुम्भपूजनासह ब्राह्मणपूजनं च करिष्ये ।।
( ब्राह्मणकुम्भयोः गंधपुष्पफलसतिलतांबुलदक्षिणाभिः पूजनं कृत्वा )

आपल्या समोर एका वाटीत तीळ घेऊन त्यात एक 5 रुंचे नाणे ठेवावे.एक सुपारी उपडी ठेवावी.नंतर ब्राह्मणाला उद्देशून गंध, फूल,अक्षता,तीळ, तुळशीपत्र धूप ,दीप,नैवेद्य ( दूध साखर) या उपचाराने त्या सुपारीची पूजा करावी.!

       🟣उदककुम्भदान🟣

'एष धर्मघटो'--मंत्राने कुंभ ब्राम्हणाला दान द्यावा,!!

. ●संकल्प:●

प्रस्तुत श्राद्धविधीतील हा संकल्प उपरोक्त उदककुंभदानाच्या संकल्पा प्रमाणेच आहे. फक्त ' श्रीपरमेश्वर प्रीत्यर्थं"' आणि '"श्री वसंत माधव देवताऐवजी "मम पितृणामक्षय्यतृप्त्यर्थं 'असा फरक येथे आढळतो. त्याच्या अंगभूत म्हणून कुंभाचे व ब्राह्मणाचे पूजन करतो.!! असा संकल्प करून ताम्हणात पळीभर पाणी सोडावे.!

 ब्रह्मा, विष्णु, आणि शिवस्वरूप असा हा घट धर्मकार्यार्थ मी दान देत आहे. त्याच्या दानाने माझे समस्त मनोरथ पूर्ण होवोत.!!!!

        🏵️उदककुम्भदानम्🏵️

एष धर्मधटो दत्तो ब्रह्मविष्णुशिवात्मकः ।। अस्य प्रदानात्तृप्यंतु पितरोऽपि पितामहाः ।।१।। गन्धोदकतिलैंमिश्र सान्नं कुम्भं फलान्वितम् । पितृभ्यः सम्प्रदास्यामि अक्षय्यमुपतिष्ठतु ।।२।।

     

          
       【 ■मराठी भावार्थ■ 】

 ब्रह्मा, विष्णु आणि शिवस्वरूप असा हा घट मी धर्मकार्यार्थ दान देत आहे. त्याच्या दानाने माझे समस्त पितर आणि पितामह तृप्त होवोत.!!

गंधोदक,तीळ आणि अन्न त्यांनी युक्त असा हा कुंभ मी पितरांना अर्पण करीत आहे. त्यांयोगे माझे समस्त पितर अक्षय्यपणे संतुष्ट होवोत.!!

अशिरितीने ज्याचे माता वा पिता जिवंत असतील त्यांनी उदककुंभ दान हा विधी करायचा असतो व ज्याचे माता वा पिता मृत झालेले असतील त्यांनी अक्षय्य तृतिया श्राद्धविधी करावा अशी पद्धत आहे.!!

विवाहित अथवा अविवाहित मुलीला इच्छा असेल तर हे करता येते. थोडक्यात म्हणजे धर्माचे आचरण करणाऱ्या सात्विक ब्राम्हणांस अमंत्रित करून त्याचा योग्य आदरसत्कार करावा व वरील पद्धतीने हा थोडक्यात सांगितलेला विधी करावा. भोजन/ दक्षिणा द्यावी.!!

【हा विधी केल्याने अक्षय्य पुण्य आपणास प्राप्त होते】

भोजन व दक्षिणा याचे एकंदरीत मुल्याची रक्कम व उदक कुंभ 
तांब्याचा कलश ,अंबे आदी आपल्या इच्छेनुसार एखाद्या वैदिक ब्राह्मणास द्यावे अथवा रक्कम आँनलाईन ट्रान्सफर करावी.!! शेवटी आपापल्या श्रद्धेचा भाग आहे.!! मात्र हे केल्याने तेज व बलवृद्धी तर होतेच पण पितृदोषाचे निवारण होते हे मात्र सत्य आहे.!!!!!

Post a Comment

0 Comments