आजार आणि उपचार पद्धती- ज्योतिष

आजार आणि उपचार पद्धती..
*पंचमस्थानाचा संबंध शनीशी आल्यास
आयुर्वेदिक उपचार करावेत दीर्घकाळ उपचार घ्यावे लागतात

*पंचम स्थानाचा संबंध रविशी असल्यास अँलोपँथी चे उपचार करावेत*पत्रिकेतील रवि शुभ असता लवकर आरोग्य लावताना दिसते.

*पंचम स्थानाचा संबंध बुधाशी असल्यास आयुर्वेदीक उपचार करावेत*
बुद्ध म्हणजे त्रिदोष प्रकृती याची ट्रीटमेंट उशिरापर्यंत घ्यावी लागते ऋतूनुसार त्रिदोष कमी-जास्त होतात. परंतु मूळ प्रकृती तिनी दोषांनी युक्त असते कधी वात वाढतो तर कधी पित्त वाढते तर कधी कफ वाढतो

*पंचम स्थानाचा संबंध शुक्राशी असल्यास होमिओपँथी चे उपचार करावेत*
जन्म पत्रिकेमध्ये शुक्रवार शुभ स्थितीत असावा तरच लवकर उपचार घेऊन जा तक बरा होताना दिसतो.

*पंचम स्थानाचा संबंध मंगळाशी,असल्यास गरम पदार्थ , शेक देणे, अग्निमांद्य अवश्य करावेत* मंगळाचा संबंध आयुर्वेदिक अशी असल्यामुळे आयुर्वेदिक औषधोपचार घ्यावेत जसे की पंचकर्म.

*पंचम स्थानाचा राहूशी संबंध निगडीत असल्यास युनानी औषधी करावीत*
राहू बुद्धी भ्रम निर्माण करीत असल्यामुळे
लवकर निदान होताना दिसत नाही त्यामुळे लोक ऍलोपॅथी आयुर्वेदिक आणि शेवटी होमिओपॅथिक औषधांकडे वळतात परंतु दीर्घकाळ औषध घ्यावे लागते

 *रवी*
*षष्ठ स्थात रवी असल्यास किंवा* *उपनक्षत्र रवी असल्यास हमखास* *रक्तदाब ,उष्माघात* *पाठदुखी ,मणका नैत्रविकार, मेंदूत रक्ताच्या गाठी होणे*
*हदयविकार होतात*रवीची पत्रिकेतील शुद्ध स्थिती लवकर बरे करण्याच्या दृष्टीने चांगले लाभ देते
*चंद्र*
*षष्ठात चंद्र किंवा उपनक्षत्र जर चंद्रावर असल्यास मनोविकार, सर्दी , दमा, जलोदर, हार्निया , अपचन , सांधेदुखी होते*

*मंगळ*
*षष्ठात मंगळ असल्यास किंवा मंगळ उप नक्षत्र असल्यास मूळव्याध, गुप्तरोग, अपघात विकार, स्नायुंचे विकार, ब्रेन ट्युमर सारखे विकार होतात*उष्णतेमुळे होणारे लघवीचे विकार गर्भाशय मूत्राशय यांचे होणारे विकार मंगळामुळे होते कदाचित सर्जरी देखील करावी लागते.

*बुध*
*षष्ठ स्थानी बुध असल्यास किंवा उप नक्षत्र स्वामी बुध असल्यास किडनी ने पायात चेहऱ्यावर सूज येते. मज्जातंतूचे विकार होतात. हातापायाला मुंग्या येणे. त्वचाविकार, भूक मंदावते, पोटदुखी, अल्सर, फोड येणे. चेहऱ्यावर मुरुम (तारुण्य पिटिका) असे विकार होतात*
बुध हा त्रि दोषयुक्त असल्यामुळे त्रि दोषयुक्त उपचार पद्धती अमलात आणावी

*गुरु*
*षष्ठात गुरु असल्यास किंवा गुरू उप नक्षत्रात असल्यास ▪️मधूमेह ▪️हमखास होते. अतिस्थूल व्यक्ती, सतत अँलर्जी, रक्तदोष हे विकार होतात*गुरु शनीच्या राशीत असेल तर दीर्घकाळ रेंगाळणारे आजार होतात.

*शुक्र*
*षष्ठात शुक्र असल्यास अथवा शुक्र* *उपनक्षत्र म्हणून असल्यास* *गळा , घसा , स्रयंत्र, जीभ, दात, मुत्राशय* 
*या संबंधित विकार होताता* शुक्राचे आजार पाहता मधुमेह आमवात पाळीचे विकार मूत्राशयाचे विकार होताना दिसतात गळ्याचे विकार घसा यासंबंधी दोष होताना दिसतात

*शनी*
*षष्ठात शनी असल्यास वा उप नक्षत्र* *शनी असल्यास कँल्शिअम* *कमतरता, हाडे ठिसूळ* *होणे. छातीत कफ होणे* *लकवा, सर्व प्रकारच्या हाडांचे विकार, क्षय ( T.B ). खोकला* *लकवा, पार्किसन.डोक्यात कोंडा होणे. केस गळणे हे विकार होतात*शनि रवि शी संबंधित असल्यास थायराइड चे विकार दिसून येतात

*राहू व केतू*
*षष्ठात राहू-केतू असल्यास किंवा उप नक्षत्रात संबंध षष्ठ,अष्टम,तृतीय,व्यय संबंध असल्यास हमखास अति क्लिष्ट विकार, कृष्ठरोग वगैरे होतात*राहू निदान न करणारे आजार देतो राहू-केतू सहाव्या स्थानी असता ज्या राशीत आहेत त्या राशींचे आजार दिसून येतात किंवा ज्या ग्रहान बरोबर आहेत त्या ग्रहांचे आजार होताना दिसतात.
सौ सुवर्णा सूत्रावे
कुंडली मित्र
ज्योतिष पंडित
पुणे

Post a Comment

0 Comments