शुभ दीपावली

पाच दिवसीय दीपोत्सवाचे महत्त्व


दिवाळी म्हणजे दिव्यांची रांग. हा प्रकाशाचा सण दरवर्षी कार्तिक अमावस्या तिथीला साजरा केला जातो. दिवाळीची तयारी खूप आधीपासून सुरू होते. दिवाळीच्या दिवशी लोक फुलं, रांगोळी, दिये, मेणबत्त्या आणि तोरणांनी आपली घरे आणि प्रतिष्ठान सजवतात. जाणून घेऊया काय आहे दिवाळीचे महत्त्व.

१- दिवाळी दरवर्षी इंग्रजी कॅलेंडरच्या ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात साजरी केली जाते. हिंदू कॅलेंडरनुसार, दिवाळी दरवर्षी कार्तिक कृष्ण पक्षाच्या अमावास्येला साजरी केली जाते.

2- दिवाळीच्या दिवशी देवी लक्ष्मी, भगवान गणेश, कुबेर देवता, माँ सरस्वती आणि त्यांच्या कुटुंबातील देवतांची धन-संपत्ती प्रदान करण्यासाठी विशेष पूजा केली जाते. प्रदोष काळात दिवाळीच्या संध्याकाळी लक्ष्मीची पूजा आणि निशिथ काळात रात्री काली देवीची पूजा करण्याचा नियम आहे.

3- पौराणिक मान्यतेनुसार कार्तिक अमावस्येच्या रात्री सुख आणि वैभवाची देवी लक्ष्मी पृथ्वीवर येते आणि प्रत्येक घराला भेट देते. या दरम्यान ज्या घरांमध्ये चांगली रोषणाई आणि सजावट असते तिथे माता लक्ष्मी अंशाच्या रूपात विराजमान असते.

4- व्यापारी वर्ग दिवाळीला नवीन वह्या खात्याची पूजा करतात.

5- जैन धर्मासाठी दिवाळी या सणाला विशेष महत्त्व आहे. जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर भगवान महावीर यांनी दीपावलीच्या दिवशी निर्वाण प्राप्त केले. या दिवशी दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी जैन धर्माचा पंचांगही सुरू होतो.

6- त्याचप्रमाणे शीख धर्मात दीपोत्सवालाही महत्त्व आहे. शीख धर्मात, दिवाळीची परंपरा गुरु हरगोविंद सिंग यांच्या तुरुंगातून मुक्ती दिवसाशी संबंधित आहे. या दिवशी सर्व गुरुद्वारा दिव्यांनी सजवले जातात.

7- भगवान राम, माता सीता आणि लक्ष्मण यांच्या वनवासाला 14 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल दिवाळी हा सण साजरा केला जातो.

दिवाळी 2022 शुभ योग

यावेळी दिवाळीत अनेक शुभ योगायोग होत आहेत. 24 ऑक्टोबर रोजी हस्त नक्षत्र आणि वैधृती योगात दिवाळी साजरी होत आहे. हा योग खूप शुभ परिणाम देतो आणि आनंदी जीवनासाठी चांगला आहे. याशिवाय गणेशाला समर्पित असलेला बुध तूळ राशीत राहील. जेथे सूर्य आणि शुक्र आधीच उपस्थित आहेत. त्याचबरोबर गुरू आणि शनी देखील आपापल्या राशीत असतील. अशा परिस्थितीत ही दिवाळी खूप शुभेची जाईल आणि आर्थिक सुबत्ता वाढेल.

दिवाळी 2022 तारीख आणि लक्ष्मीपूजन मुहूर्त

कार्तिक अमावस्या तिथी सुरू होते: 24 ऑक्टोबर 2022 संध्याकाळी 05:29 पासून.

कार्तिक अमावस्या तिथी समाप्त होईल: 25 ऑक्टोबर 2022 दुपारी 04:20 वाजता.

अमावस्या निशिता वेळ: 11:39 ते 00:31 पर्यंत.

कार्तिक अमावस्या सिंह लग्न वेळ: 01:26 ते 03:44 PM.

अभिजीत मुहूर्ताची वेळः सकाळी ११:१९ ते दुपारी १२.०५.

विजय मुहूर्ताची सुरुवात: 24 ऑक्टोबर रोजी 01:36 ते 02:21 पर्यंत.

दिवाळी 2022: लक्ष्मी पूजनाची वेळ आणि मुहूर्त

लक्ष्मी पूजन मुहूर्त: 18:54 ते 20:16 मिनिटे

पूजा कालावधी: 1 तास 21 मिनिटे

प्रदोष काल : १७:४३ ते २०:१६ मिनिटे

वृषभ तास: 18:54 ते 20:50 मिनिटे

दिवाळी २०२२ महानिषीत काल मुहूर्त

लक्ष्मी पूजन मुहूर्त: 23:40 ते 24:31 मिनिटे

पूजा कालावधी: 0 तास 50 मिनिटे

महानीशेठ वेळ: 23:40 ते 24:31 मिनिटे

सिंह वेळ: 25:26:25 ते 27:44:05

दिवाळी चोघडिया मुहूर्ताच्या शुभेच्छा

संध्या मुहूर्त (अमृत, चर): 17:29 ते 19:18 मिनिटे

रात्रीचा मुहूर्त (लाभ): 22:29 ते 24:05 मि

रात्रीचा मुहूर्त (शुभ, अमृत, चाल): 25:41:06 ते 30:27:51


लक्ष्मी पूजन मंत्र 

.  ॐ ह्रीं श्रीं लक्ष्मीभयो नमः॥

. ॐ श्रीं श्रीयै नम:

. ॐ ह्रीं श्रीं लक्ष्मीभ्यो नमः॥ 

. ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद ॐ श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मयै नम:॥


मां लक्ष्मीजी की आरती

ऊं जय लक्ष्मी माता,मैया जय लक्ष्मी माता।। 

तुमको निशदिन सेवत,हरि विष्णु विधाता। 

ऊं जय लक्ष्मी माता।।


उमा,रमा,ब्रह्माणी,तुम ही जग-माता। 

मैया तुम ही जग-माता।।

सूर्य-चंद्रमा ध्यावत,नारद ऋषि गाता। 

ऊं जय लक्ष्मी माता।।


दुर्गा रूप निरंजनी,सुख सम्पत्ति दाता। 

मैया सुख संपत्ति दाता। 

जो कोई तुमको ध्यावत,ऋद्धि-सिद्धि धन पाता। 

ऊं जय लक्ष्मी माता।।


तुम पाताल-निवासिनि,तुम ही शुभदाता। 

मैया तुम ही शुभदाता। 

कर्म-प्रभाव-प्रकाशिनी,भवनिधि की त्राता। 

ऊं जय लक्ष्मी माता।।


जिस घर में तुम रहतीं, सब सद्गुण आता। 

मैया सब सद्गुण आता।

सब संभव हो जाता, मन नहीं घबराता। 

ऊं जय लक्ष्मी माता।।

तुम बिन यज्ञ न होते, वस्त्र न कोई पाता। 

मैया वस्त्र न कोई पाता।

खान-पान का वैभव,सब तुमसे आता। 

ऊं जय लक्ष्मी माता।।


शुभ-गुण मंदिर सुंदर, क्षीरोदधि-जाता। 

मैया क्षीरोदधि-जाता।

रत्न चतुर्दश तुम बिन, कोई नहीं पाता। 

ऊं जय लक्ष्मी माता।।


महालक्ष्मी जी की आरती,जो कोई नर गाता। 

मैया जो कोई नर गाता।

उर आनन्द समाता, पाप उतर जाता। 

ऊं जय लक्ष्मी माता।।


ऊं  जय लक्ष्मी माता,मैया जय लक्ष्मी माता। 

तुमको निशदिन सेवत, हरि विष्णु विधाता। 

ऊं जय लक्ष्मी माता।।



खरं तर आपल्या हिंदू धर्माचा सर्वात मोठा सण येतोय दीपावली, ज्याला आपण दिवाळी म्हणतो I

परंतु ३०% लोकांनाच माहीत आहे की दिवाळी हा सण का साजरा केला जातो. बाकी ७०% तर फक्त लहानपणापासून असे समजतात की फक्त दिवे लावणे, फराळ, आणि फटाके फोडणे, लक्ष्मी पूजन करणे, बस हीच आहे दिवाळी. असो काही हरकत नाही...

आज मी तुम्हाला या पोस्टमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे की दिवाळी का साजरी केली जाते आणि दिवाळीला प्रभु श्रीराम यांच्या जागी महालक्ष्मी आणि श्री गणेशाची पूजा का केली जाते.

नीट वाचा 👍

दिवाळी हा सण हिंदूंचा सर्वात मोठा सण आहे. या दिवशी प्रभु श्रीराम, बंधू लक्ष्मण आणि सितामाता यांच्यासोबत १४ वर्षाचा वनवास संपल्यानंतर अयोध्येत परत आले होते.

अयोध्या नगरीमध्ये जेव्हा हे कळले की प्रभु श्रीरामाने रावणाचा अंत केला आहे आणि अयोध्येमध्ये पुन्हा येणार आहेत तेव्हा पूर्ण अयोध्येमधल्या लोकांनी त्या जल्लोषात दसऱ्यापासूनच रांगोळी आणि दिव्यांनी अयोध्या सजवली होती.

जेव्हा दसऱ्याच्या दिवशी रावणाचा अंत झाला त्याच्याबरोबर २१ दिवसांनी श्रीराम हे अयोध्येत पोहोचले होते तेव्हापासून दिवाळी हा सण साजरा केला जातो.

म्हणजे लाखो वर्षांपासूनची ही परंपरा अजूनही हिंदू बांधव साजरी करतात. 

दिवाळी हा सण ५ दिवस चालणारा सण आहे आणि याच्या प्रत्येक दिवसाचं एक वेगळं महत्त्व आहे.

चला तर तुम्हांला या ५ दिवसाचं महत्त्व सांगतो. 👍

१:- पहिला दिवस आहे धनत्रयोदशी. पूर्वीच्या मान्यतेनुसार सगळ्या देवांनी असुरांसोबत समुद्रमंथन केलं होतं तेव्हा समुद्रातून १४ रत्न निघाले. याच्यातील एक आहे भगवान धन्वंतरी. आपल्या पंचांगानुसार पितृपक्षाच्या १३ दिवसांनंतर भगवान धन्वंतरी हे समुद्रातून हातामध्ये अमृताचा कुंभ घेऊन प्रकट झाले. भगवान धन्वंतरी हे आयुर्वेदाचे जनक आहेत. त्यांनीच पूर्ण संसाराला आयुर्वेदाची ओळख करून दिली. त्यादिवसांपासून या दिवसाला धनतेरस, धनत्रयोदशी असे नांव पडले आणि भगवान धन्वंतरी यांच्या नावाने हा दिवस साजरा केला जातो.

२:- दिवाळीचा दुसरा दिवस आहे नरकचतुर्दशी.

👍

एके काळी या संसारात भूमिपुत्र नरकासुराचा आतंक होता, त्याला वरदान होतं की त्याचा मृत्यू फक्त त्याच्या आईच्या हातानेच होऊ शकतो. पुढच्या जन्मात भूमिदेवीने सत्यभामाच्या रूपात अवतार घेतला, सत्यभामेचे लग्न भगवान श्रीकृष्णासोबत झाले. त्यानंतर सत्यभामेने नरकासुराचा अंत केला.

तेव्हापासून आजपर्यंत त्या दिवसाला नरकचतुर्दशी या नावाने ओळखलं जातं.

३:- दिवाळीचा तिसरा दिवस आहे लक्ष्मीपुजन.

👍

देव आणि दैत्य जेव्हा समुद्र मंथन करत होते तेव्हा माता लक्ष्मी प्रकट झाली होती. तेव्हापासून त्या दिवशी आपल्या घरी भरपूर यश, सुख आणि संपत्तीसाठी माता लक्ष्मी यांची पुजा होते.

दिवाळीच्या दिवशी माता लक्ष्मी यांच्यासोबत श्री गणेश यांची सुध्दा पुजा होते.

पुरातन मान्यतेनुसार महालक्ष्मीला कोणतेही संतान नव्हते आणि माता पार्वतीचे २ पुत्र होते.


लक्ष्मीने पार्वतीजवळ श्री गणेश यांना दत्तक घेण्याची इच्छा प्रकट केली. पार्वतीला चिंता होती की लक्ष्मी कधीच एका जागी थांबत नाही. मग गणपतीची काळजी ती कशी घेईल. याच्यावर लक्ष्मी म्हणाली की मी जिथे जाईन तिथे गणपतीला सोबतच घेऊन जाईन.

म्हणून तेव्हापासून

जिथे लक्ष्मीची तिथे गणपतीची सुध्दा पुजा होते.


खरंतर दिवाळीच्या दिवशी श्रीराम अयोध्येत आले होते परंतु या दिवशी लक्ष्मी आणि श्री गणेशाची पुजा होते.

पुरातन ग्रंथानुसार त्यावेळी भगवान विष्णू हे आराम करतात आणि श्रीराम हे विष्णूचा अवतार आहेत. त्यामुळे श्रीराम यांची पुजा केली जात नाही.

४:- मित्रांनो अश्विन अमावस्येला लक्ष्मीपुजन झाल्यानंतर बलिप्रतिपदा हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून साजरा होतो.

साडे तीन मुहूर्तांपैकी एक हा दिवस अतिशय शुभ मानला जातो.

अक्षयतृतीया, गुढीपाडवा, विजयादशमी हे पूर्ण मुहूर्त असून दिवाळी पाडवा हा अर्ध मुहूर्त आहे. यादिवशी सोने खरेदी, सुवासिनी कडून पतिला ओवाळले जाते.

असे खूप काही महत्त्व आहेत

व्यापारी लोकांचे नविन वर्ष याच पाडव्यापासून सुरू होते.

हिशोबाच्या नविन वह्या ज्याला खतावणी म्हणतात त्यांचे पुजन करून नवीन सुरूवात केली जाते.

कोणतीही नवीन गोष्ट विकत घेण्यासाठी हा उत्तम मुहूर्त मानला जातो.

५:- दिवाळीचा पाचवा दिवस आहे गोवर्धन पुजा.

👍

रामायणानुसार जेव्हा श्री राम हे लंकेवर आक्रमण करण्यासाठी सेतूचे बांधकाम करत होते तेव्हा सगळे वानर हे आप आपल्या शक्तीनुसार दगड जमा करत होते तेव्हा हनुमानजीनी हा सेतू बांधण्यासाठी गोवर्धन पर्वतच उचलून आणला होता.

परंतु ते यायच्या आतच सेतूचं काम झालं होतं. सेतूमध्ये मदत नाही करता आली म्हणून गोवर्धन पर्वताने त्याचं दुःख श्रीरामांकडे प्रकट केलं. श्री राम यांनी वचन दिलं की पुढच्या जन्मात ते त्या पर्वताचा उपयोग नक्की करतील.

आणि हनुमंताला सांगितले की हा पर्वत पुन्हा त्या जागी ठेवून ये.

पुढच्या जन्मात जेव्हा भगवंतांनी कृष्ण अवतार घेतला तेव्हा गावातील लोकांना गोवर्धनाची पुजा करण्यास सांगितली.

याला नाराज होऊन इंद्राने गोवर्धन पर्वतावर आक्रमण केले. तेव्हा श्रीकृष्णाने लोकांना वाचवण्यासाठी पर्वत करंगळीवर उचलला आणि इंद्राचा गर्व मोडला.

तेव्हापासून गोवर्धनाची पुजा केली जाते.

६:- सहावा दिवस आहे भाऊबीज 👍

यादिवशी देवता यमराज आपल्या बहिणीला यमुनेला भेटायला त्यांच्या घरी गेले.

त्यांच्या बहिणीकडून झालेला आदर सत्कार पाहून ते खूप प्रसन्न झाले. तेव्हा यमराजांनी हे वरदान दिले की या दिवशी जो भाऊ त्याच्या बहिणीच्या घरी जाईल त्याला संकटापासून मुक्ती मिळेल आणि मोक्ष मिळेल. तेव्हापासून हा दिवस भाऊबीज नावाने साजरा होतो.

यादिवशी सगळ्या बहिणी तिच्या भावाच्या सुरक्षेची देवाला प्रार्थना करतात.

तर मित्रांनो हे ६ दिवस दिवाळीचे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत.

आपण कट्टर हिंदू आहोत आपल्याला या गोष्टी १००% माहीत असायला हवी.

भविष्यात सेक्युलर अथवा गैरहिंदुनी " दिवाळी " का साजरी केली जाते असे विचारल्यास तुम्हाला या गोष्टी तोंडपाठ पाहिजेत.

ही माहिती प्रत्येक हिंदूपर्यंत पाठवा!..

जय श्रीराम 🙏🚩

दीपावलीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

श्री. अजयसिंग पाटील 
आणि 
सुहासिनी पाटील  परिवार 

Post a Comment

0 Comments