केतू

#संदर्भ,आधार- नवग्रहज्योतिष पोस्ट स्वलिखीत.

🔶️ ज्योतिष मध्ये केतुला सर्वात वृद्ध आणि जुना ग्रह अस सांगितला आहे, कारण केतूची प्रत्यादी देवता चित्रगुप्त महाराज आहेत, जे सर्व कर्माचा हिशोब ठेवतात. मग कर्म करणारे कोण आहेत तर जीव, म्हणून जीवांच्या उत्पतीचा हिशोब ठेवणारे देवता चित्रगुप्त, यमराज यांना प्रथम देवता पैकी मानले आहे.

🔹️केतुला मीन आणि वृच्छिक राशींचे स्वामित्व ही मानले आहे, मीन राशीला समुद्रावर अधिकार दिला आहे, आणि विज्ञान ही सांगते सर्वात प्रथम जो जीव होता तो समुद्रातून उत्पन्न झाला म्हणजे तो जीव जलीव जंतु होता. म्हणजे केतूच्या रूलरशिप वाली राशी पहिल्या जीव उत्पत्तीची कारण होती, आणि अश्विनी या पहिल्या नक्षत्रा चा तो स्वामीही आहे, म्हणजे केतू सृष्टी च्या आधीन होता. 

♦️केतू परिवर्तनाचा ग्रह आहे, व्यक्तीगत स्थरावर बदल करतोच त्याच बरोबर केतू जगत स्थरावर पण बदल जास्त प्रमाणात घडून आणतो जेव्हा केतू आपल्या मूळ या नक्षत्रात प्रवेश करतो, म्हणजे केतूची तीन नक्षत्र आहेत अश्विनी, मघा आणि मूल, जेव्हा जेव्हा केतू मूळ नक्षत्रात येतो जगात मोठे हिंसक बदल पाहाला मिळतात.

🔸️ आताच्याच कोरोंना व्हायरसच्या प्रारंभ काळात केतू मूळ नक्षत्रात पहायला मिळाला, त्या अगोदर अमेरिका टीव्हीन टॉवर आक्रमण झाले त्यावेळी ही केतू मूळ नक्षत्रात होता, 1983 मध्ये एड्स आऊट ऑफ ब्रेक झाला केतू मूळ नक्षत्रात होता, जपान वर अणू बॉम्ब हल्ला झाला त्यावेळी केतू मूळ नक्षत्रात होता. केतू जगात मोठ्यात मोठे बदल घडून आणतो. 

🔹️व्यक्तीगत स्तर मध्ये पण जेव्हा केतू महादशा किंवा गोचर अशुभ स्थितीत येतो त्यावेळी व्यक्तीगत जीवनात मोठे बदल पाहायला मिळतात. निच्छितच केतूच्या महादशा काळात लोक घाबरून जातात. केतुला dark side of moon असे ही म्हटले आहे, जो आपल्याला दिसत नाही, विश्वात जे मोठे बदल घडून येतात ते केतू मुळे पहाला मिळतात. राम चरित्र मानस मध्ये असा उललेक आहे की रावणाची मृत्युची वेळ जसी निकट येते त्या वेळी रावणाला अपशकुन स्वरुपात आकाशात धूम केतू दिसायला लागले, शकुन शास्त्रात केतू महत्वपूर्ण आहे, म्हणून केतुला intuition चा ग्रह मानला आहे.

 ♦️केतु अतींद्रियज्ञानाचा कारक आहे, ज्योतिषांनवर केतूचा अधिकार सांगितला आहे, केतू गूढ, रहस्यमय गोष्टींचा कारक आहे. निगेटिव्ह केतू- जे लोक जुगार, छल-कपट करणारे, गारुडी विध्या, तांत्रिक विद्या ह्या वर निगेटिव्ह केतूचा प्रभाव असतो. राहू-केतू पासून होणारे घटना आकस्मित असतात. राहु आणि केतू माया आणि मोक्ष आहेत, राहू रूपी माया आपण पार करूनच केतू रूपी मोक्ष प्राप्त करू शकतो. 

🔹️केतू साधनेचा ग्रह आहे, आपण साधनेत विलीन होतो त्यावेळी मोक्षाचे दरवाजे उघडू लागतात. राहू केतु ला छाया ग्रह म्हटले आहे, कारण हे काही आकाशीय पिंढ दुसर्‍या ग्रहा प्रमाणे नाही आहेत.

केतू ग्रह अशुभ असल्याची लक्षणे- 

1) स्क्रीन, लेक्स, मिस्टिरिअस एलिमंट्स संबंधित आजार अशुभ केतू मुळे होतात, जे डॉक्टरच्या हाताच्या बाहेर असते. जसे आजार होतच नसतात जे असल्यासारखे भासतात, मग ते डॉक्टरांना कसे सापडतील.  

2) अशुभ योगातील केतु संतती विलंब करतो, संतीत योगा पासुन वंचित करतो.

3) अशुभ केतू मुळे शस्त्रक्रिया योग व अपघात योग घडतात जसा केतू-मंगळ, केतू-रवी, केतू-शनि, केतू-हर्षल, अशुभ चंद्राशी युती अश्या ग्रहांसी, युती किंवा अशुभ योग करत असेल.

4) किडनी किंवा युनिनरी सिस्टम चा प्रॉब्लेम होत असेल, मायग्रेन ची समस्या उद्भवत असेल, तर आपला केतू अशुभ परिणाम देत आहे. 

5) जीवनात अचानक अशुभ बदल घडून येणे जसे अचानक जॉब जाणे, अचानक मोठी दुर्घटना घडणे ज्यात आपणास त्यातून बाहेर येण्यास जास्त वेळ लागेल. 

6) केतू प्रत्तेक प्रकारचा नशा आहे, जुगार आहे, जर अशी काही सवय आपणास जडत असेल तर समझा आपला केतू अशुभ होत आहे. 

7) आपल्या कामाचा ठिकाणी गुप्त शत्रू पासून अडचणी आणि त्रास, नुकसान होत असेल तर समझा आपला केतू अशुभ आहे.

8) सर्प दंश, कुत्राचे चावा घेणे हे एक लक्षण आहे, पण आपण आजकाल शहरात वास्तव्य जास्त करत असलो तर हेच औषधांचे रिएक्शन होणे, चुकीचे औषध घेतले जाणे, काहीवेळा डॉक्टरांची बाय मिसटेक मुळे चुकीचे औषध दिले जाणे. अशी पण काही उदारण आहेत ज्यांना चुकीच्या औषधानी पर्मनंट नुकसान झाले आहेत. 

9) विनाअपराध दंड होणे, जेल होणे, विनाकारण त्रास होणे हे पण एक अशुभ केतू लक्षण आहे.         

उपाय- 
1) केतू रुद्र पूजन अर्चन केल्याने शांत होतो, महादेवांची उपासना करावे. पंचमीला अभिषेक, सर्प पूजन, नवनाग स्त्रोत्र पाठ करावा. 

2) काळ्या कुत्र्यांना तुपाची भाकरी किंवा खाऊ द्या केतू शुभ फलित होईल. 

3) 9 मुखी रुद्राक्ष वापरुन आपण केतूचा वाईट प्रभाव कमी करू शकता. रुद्राक्ष वापर केल्याने शरीरातील नकारात्मक शक्ति नष्ट होते. 

4) केतू आपला पूर्वजिक स्थर दर्शवतो, आपल्या पितरांची सेवा करा, पितृ शांति करा. पितृशांत करण्याचा एकदम सोपा उपाय- शनिवारी नियमित स्वच्छ वाहत्या जलात गूळ आणि तीळ मिसळून पितरांच्या नावाने अर्पण करावे. पितृ पक्षात तर्पण विधी करा. 

5) आपल्या कुलदेवतेची पुजा, उपासना करा, कारण सर्व देव आपल्या जागी, आपली कुलदेवता सर्वात प्रथम पूज्य असते. 

धन्यवाद.🙏

              ज्योतिष आणि अध्यात्म विषयक अधिक माहिती साठी || ज्योतिष आणि अध्यात्म || या ग्रुपला आवश्य भेट द्या.        

Post a Comment

0 Comments