पितृदोषावर प्रभावी उपाय


*॥ श्री दत्तात्रेय दिव्य स्तोत्र ॥*

हे *दत्तात्रेय दिव्य स्तोत्र* अतिशय दिव्य असून, श्रीदत्तात्रेयांचे साक्षात् दर्शन करविणारे आहे. तसेच हे *पितृदोषावर प्रभावी* स्तोत्र आहे. याने तात्काळ पितृदोष निवारण होण्यास मदत होते. 

हे *श्री दत्तात्रेय दिव्य स्तोत्र* म्हणण्यापूर्वी 
खालील दिव्य पितृ तर्पण विधी अवश्य करावा. 

हा विधी घरातील कर्त्या पुरुषाने करावा. *ज्यांचे वडील हयात आहेत त्यांनी हा पितृ तर्पण विधी करु नये.* 

*दिव्य तर्पण विधी 

*साहित्य -:* 
तांब्याचे ताम्हण, पंचपात्र , त्यात पाणी घ्यावे, आणि पळी

1) हा विधी सकाळी आंघोळ झाल्यावर लगेच करावा. 
 
2) विधी करण्यासाठी दक्षिण दिशेला तोंड करून बसावे . 

3) *प्रार्थना -:* 
हे ज्ञात, अज्ञात समस्त पितृ देवता मी तुम्हाला नमस्कार करते /करतो.
माझ्याकडून माझ्या पती / पत्नी कडून , माझ्या आई, वडीलांकडून ( जिवंत असतील त्यांची नावे घ्यावी ),   
स्त्री असेल तर माझ्या आई, वडील, सासू ,सासरे आणि घरातील सर्वांकडून काही चुकले असेल, तुमचे काही करायचे राहिले असेल तर आम्हांला क्षमा करा आणि जे काही करायचे राहिले असेल ते आमच्या कडून करवून घ्या. त्यासाठी आम्हाला कळेल असे संकेत देऊन, बुद्धी, शक्ती, संधी आणि मार्ग द्या. तुमच्या सगळ्या इच्छा अतिशय शांतपणे आमच्या कडून पूर्ण करून घ्या. तुम्हाला शांती, मुक्ती, सदगती, मोक्ष प्राप्ती होउदे. आणि त्यासाठी आवश्यक अशा सर्व गोष्टी आमच्या कडून करवून घ्या.
तुमचे शुभाशिर्वाद सदैव आमच्या पाठीशी राहू देत. तुमच्या आशीर्वादाने आमच्या मार्गातले ,कार्यातले सगळे अडथळे दूर होऊ देत. 
 ( यात मी माझ्या पद्धतीत प्रार्थना सांगितली आहे. तुम्हाला हवे असलेले आणखी तुम्ही यात वाढवू शकता.)  
 
4) अशा प्रकारे, प्रार्थना केल्यानंतर उजव्या हाताच्या तळव्यात पळीने पाणी घ्यावे.
पुढील मंत्र म्हणून पाणी अंगठ्याच्या बाजूने ताम्हणात सोडावे. 
पुन्हा हातात पाणी घेऊन मंत्र म्हणून पाणी अंगठ्याच्या बाजूने ताम्हणात सोडावे. 
*हि क्रिया १२ ते १५ वेळा करावी.* 
 
मंत्र -: *ॐ सर्वेभ्यो पितृभ्यो स्वधा नमः स्वधा तर्पयामी।* 
 
5) आता हात जोडावे. आणि म्हणावे... 
 
*ॐ शांती! शांती! शांती!*
*इति दिव्य पितृ तर्पण विधी समाप्तः ।*
*पितृ देवतार्पणमस्तु ।।*

6) आता ते पाणी बेसिन मध्ये टाकावे . झाडाला टाकू नये.    

*हा विधी करताना एखाद्या ठराविक व्यक्तीचे नाव सुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि त्यांच्या राहिलेल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी सांगण्यास विनंती करू शकता.* 

7) विधी करून झाल्यानंतर तोंड, हात, पाय धुवून नंतर देवाला नमस्कार किंवा पूजा करावी.

8) आपली नित्य देवपुजा झाली कि मग हे *श्री दिव्य दत्तात्रेय स्तोत्र* पुर्ण श्रद्धेने म्हणावे.

9) स्तोत्र पठण करण्यापूर्वी आणि स्तोत्र पठणानंतर *श्री दत्तात्रेयांना* आपल्या *सर्व ज्ञात आणि अज्ञात पितरांना शांती, मुक्ती, सदगती, मोक्षा मिळवून देण्यासाठी मनोभावे प्रार्थना करावी.* 

ज्यांना *प्रखर पितृदोष* आहे. त्यांनी *रोज सकाळ, संध्याकाळ* हे *दिव्य श्री दत्त स्तोत्र* म्हणावे.
या उपायाने अल्पावधीतच आपला *पितृदोष समाप्त होईल.* यात तिळमात्र शंका नाही. 

*हे दिव्य स्तोत्र श्रीनारदपुराणातील असुन हे स्वतः श्रीनारदमुनींनीच रचले आहे.*

नारदमुनींच्या नामस्मरणाबाबत आपण सर्वच जाणून आहोत . सतत भगवान नारायणाच्या नामाचा नामघोष करीत नारद मुनीं वैकुंठामध्ये कायम गमन करीत असतात आणि त्यांनी भगवंताच्या हृदयात कायम स्थान मिळविले.  

भगवान दत्तात्रेय हेच भगवान विष्णु असून यांच्या नानारूपधर ख्यातीची नारदमुनींना कल्पना होती अर्थात आहे. या स्तोत्राची रचना करताना नारदमुनींनी सामान्यजनांस सहज आकलन व्हावे आणि सर्वांकडून स्तुतीरूप स्मरण भक्ती व्हावी हि इच्छा समोर ठेवली होती . 

अष्टादश अर्थात अठरा श्लोकात या स्तोत्राची रचना आहे. अठरावा श्लोक हा फलश्रुतीचा आहे.
हे स्तोत्र *शत्रूंचा नाश करणारे*, तसेच *शास्त्रज्ञान व प्रत्यक्ष ब्रह्मानुभव देणारे* असून याच्या पठणाने *सर्व पापांचे शमन* होते. 
आता शत्रू म्हणजे इथे तुम्हाला न आवडणाऱ्या माणसांची अथवा प्राण्यांची यादी नव्हे तर कामादि षड्रिपूना इथे शत्रू म्हटले आहे. त्यांचा नाश झाल्यावरच *ब्रह्मानुभव* प्राप्त होऊ शकतो     

*।। श्री दत्तात्रेय दिव्य स्तोत्र ।।*
जटाधरं पाण्डुराङ्गं शूलहस्तं कृपानिधिम् । 
सर्वरोगहरं देवं दत्तात्रेयमहं भजे ।।

अस्य श्रीदत्तात्रेयस्तोत्रमन्त्रस्य भगवान् नारदऋषिः।
अनुष्टुप् छन्दः । श्रीदत्तपरमात्मा देवता । 
श्रीदत्तप्रीत्यर्थे जपे विनियोगः ॥ 

जगदुत्पत्तिकर्त्रे च स्थितिसंहार हेतवे । 
भवपाशविमुक्ताय दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥ १॥ 

जराजन्मविनाशाय देहशुद्धिकराय च । 
दिगम्बरदयामूर्ते दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥ २॥ 

कर्पूरकान्तिदेहाय ब्रह्ममूर्तिधराय च । 
वेदशास्त्रपरिज्ञाय दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥ ३॥ 

र्हस्वदीर्घकृशस्थूल-नामगोत्र-विवर्जित । 
पञ्चभूतैकदीप्ताय दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥ ४॥ 

यज्ञभोक्ते च यज्ञाय यज्ञरूपधराय च । 
यज्ञप्रियाय सिद्धाय दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥ ५॥
 
आदौ ब्रह्मा मध्य विष्णुरन्ते देवः सदाशिवः । 
मूर्तित्रयस्वरूपाय दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥ ६॥ 

भोगालयाय भोगाय योगयोग्याय धारिणे । 
जितेन्द्रियजितज्ञाय दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥ ७॥ 

दिगम्बराय दिव्याय दिव्यरूपध्राय च । 
सदोदितपरब्रह्म दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥ ८॥ 

जम्बुद्वीपमहाक्षेत्रमातापुरनिवासिने । 
जयमानसतां देव दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥ ९॥ 

भिक्षाटनं गृहे ग्रामे पात्रं हेममयं करे । 
नानास्वादमयी भिक्षा दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥ १०॥ 

ब्रह्मज्ञानमयी मुद्रा वस्त्रे चाकाशभूतले । 
प्रज्ञानघनबोधाय दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥ ११॥ 

अवधूतसदानन्दपरब्रह्मस्वरूपिणे । 
विदेहदेहरूपाय दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥ १२॥ 

सत्यंरूपसदाचारसत्यधर्मपरायण । 
सत्याश्रयपरोक्षाय दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥ १३॥ 

शूलहस्तगदापाणे वनमालासुकन्धर । 
यज्ञसूत्रधरब्रह्मन् दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥ १४॥ 

क्षराक्षरस्वरूपाय परात्परतराय च । 
दत्तमुक्तिपरस्तोत्र दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥ १५॥ 

दत्त विद्याढ्यलक्ष्मीश दत्त स्वात्मस्वरूपिणे । 
गुणनिर्गुणरूपाय दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥ १६॥ 

शत्रुनाशकरं स्तोत्रं ज्ञानविज्ञानदायकम् । 
सर्वपापं शमं याति दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥ १७॥
 
इदं स्तोत्रं महद्दिव्यं दत्तप्रत्यक्षकारकम् । 
दत्तात्रेयप्रसादाच्च नारदेन प्रकीर्तितम् ॥ १८॥

*॥ इति श्रीनारदपुराणे नारदविरचितं दत्तात्रेयस्तोत्रं सुसम्पूर्णम् ॥*

आपण रोज हे दिव्य दत्तात्रेय स्तोत्र पठण करून *श्री दत्तात्रेय भगवानांची कृपा* प्राप्त करून घ्यावी आणि त्याच सोबत *पितृदोषातुन मुक्त* व्हावे. 

*॥ श्री स्वामी समर्थ ॥*
*॥ श्री गुरुदेव दत्त ॥*

Post a Comment

0 Comments