रात्री देवी

आरोग्यासाठी दीपसाधना या शीर्षकाअंतःर्गत आपण पाहिले की,दिवसभराच्या धावपळीनंतर आपली शारिरीक शक्ती क्षीण व्हायला लागते. चित्ताची अस्वस्थता वाढायला लागते. याला कारण कफ,पित्त आणि वात यामध्ये असंतुलन निर्माण झालेले असते. क्षीण शरीर आणि अस्वस्थ चित्ताला शांतता लाभल्या शिवाय मन कुठल्याही गोष्टीत रमत नाही अशावेळी देवी कवचातील खालील श्लोक प्रभावी ठरतो. 
       " आन्त्राणि कालरात्रिश्च पित्तम् च मुकुटेश्वरी
        पद्मावती पद्मकोशे कफ चूडामणि स्तथा || "
कालरात्री माझ्या पोटातील आतड्यांचे रक्षण करो.
मुकुटेश्वरी माझ्या पित्ताशयाचे रक्षण करो.
पद्मावती माझ्या ह्रदयी स्थित वाताचे रक्षण करो.
चूडामणि माझ्या फुफूसातील कफाचे रक्षण करो.
श्री देवीमहात्म्यामध्ये रात्र ही आकाशाची पुत्री मानल्या गेली आहे. रात्र हा प्रहर आहे. रात्री येणारी ती निद्रा. म्हणून तिला रात्री देवी किंवा निद्रा देवी असेही म्हटले जाते. रात्री देवीच्या आगमनाने आपण हळूहळू शांत होत जातो. पशु पक्षी मनुष्य दिवस भर भ्रमण संपवून आपापल्या घराकडे विश्रांतीसाठी परतत असतात. आणि रात्री देवी त्यांना विश्रांती चे दान देऊन दुसर्या दिवशीचे सुख उपभोगण्यासाठी संपन्न बनवित असते. आपण जेव्हा स्वतःला रात्री देवीच्या आधीन करतो तेव्हा ती आपले वाईट प्रवृत्ती, दुःस्वप्न,पीडा आणि घनघोर अंधःकारापासून आपले रक्षण करींत असते. 
आजच्या आधुनिक काळात निद्रा नाश झालेल्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. अशांनी संधीकाळ साधून चित्त शांत करण्याचा प्रयत्न करावाच. म्हणजे निद्रा देवी प्रसन्न होवून शांत झोप येण्यास मदत होईल.
कुठलाही देवीचा मंत्र म्हणताना श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती असे म्हणून देवीला नमस्कार करावा.
प्रस्तुत फोटो हा कालरात्रिदेवीचा आहे.

Post a Comment

0 Comments