कर्म आणि भावना

*कर्म आणि भावना....🌺🌹🙏*

*एकदा एक बाई गायीला केळे खायला घालत होती. पण गाय ते केळं खात नव्हती. ती बाई परत -परत त्या गायी जवळ जाऊन केळे गायीच्या तोंडासमोर नेत होती पण गाय केळं खायला तयार नव्हती.*
🌺🌹👍
 शेवटी गाय वैतागली आणि ती बाईला शिंगाने मारायला धावली. तशी ती बाई पळून गेली. 
त्या गायीच्या जवळच एक सांड उभा होता. तो गायीच्या जवळ येऊन बोलला, ' ती बाई एव्हढं प्रेमाने खाऊ घालत होती तर तु का नाही खालस? 
तेव्हा गाय म्हणाली, ' आज तिची एकादशी आहे म्हणून पुण्य कमावण्या साठी मला खाऊ घालत होती. एरवी मी तिच्या घरासमोर जाऊन उभी राहते तर काठी घेऊन मारायला धावते आणि मला हाकलून देते. 
🌺🙏🌹
पुढे गाय बोलली, ' *भुकेल्याला प्रेमाने सुखी भाकरी दिली तरी गोड लागते.*  

जो स्वतःच्या स्वार्थासाठी पुण्य कर्म करण्याचा प्रयत्न करतो तो *दुर्योधन* आहे. 
जो केवळ आपल्या माणसांचे भले करण्यासाठी पुण्य कर्म करण्याचा प्रयत्न करतो तो *युधिष्टीर* आहे. 
आणि जो सर्वांचे भले करण्यासाठी पुण्य कर्म करण्याचा प्रयत्न करतो तो *श्रीकृष्ण* आहे. '
🙏

 *तर लक्षात ठेवा पुण्य कर्म करण्याबरोबर भावना हि महत्वाच्या आहेत* . 

   धन्यवाद , 🙏🙏

Post a Comment

0 Comments