काळाच्या ओघात हा समाज केवळ कृषीवर मर्यादित न राहता विविध व्यवसाय, प्रादेशिक स्थलांतर आणि सांस्कृतिक देवाणघेवाण यामुळे असंख्य उपगटांमध्ये विभागला गेला.यामध्ये काही उपगट शुद्ध कृषिजन्य राहिले तर काहींनी लष्करी, कारागिरी, व्यापार किंवा धार्मिक सेवांमध्ये स्थान मिळवले. उदाहरणार्थ, कुणबी (साधा) हे मूळ शेतकरी; कुणबी-लेवा पाटीदार गुजरात मध्य भारतातून स्थलांतरित होऊन प्रामुख्याने समृद्ध शेती करणारे लोक कुणबी-तिरले व कुणबी-देशस्थ हे महाराष्ट्रातील स्थानिक प्रादेशिक गट आहे; कुणबी-माळी यांनी बागायती शेती व फुलशेती स्वीकारली.याशिवाय इतर अनेक उपगट विशिष्ट व्यवसायाशी जोडले गेले. उदाहरणार्थ, कुणबी-तांबोळी (पानवाले), कुणबी-लोहारी (लोहार), कुणबी-नाभिक (क्षौरकर्म), कुणबी-धोबी (धुण्याचा व्यवसाय), कुणबी-शिंपी (शिंपाई), कुणबी-सुतार (सुतारकाम), कुणबी-तेली (तेल घाण्याचा व्यवसाय), कुणबी-भाट (कीर्तन तसेच पुरोहिती), कुणबी-गवळी (दुग्धव्यवसाय).काळाच्या ओघात अनेक कुणबी उपगट यादव किंवा गवळी यादव म्हणूनही ओळखले जाऊ लागले. याचे कारण म्हणजे यादव–गवळी व कुणबी यांच्यातील सांस्कृतिक–व्यावसायिक जवळीक. त्यामुळे “कुणबी गवळी यादव”, “कुणबी शिंदे यादव”, “कुणबी भोसले यादव” अशा मिश्र ओळखी उदयास आल्या. यामुळे सामाजिक स्तरावर एकत्रितपणा टिकून राहिला, पण उच्च कनिष्ठतेच्या कल्पना देखील निर्माण झाल्या.धार्मिक व आध्यात्मिक सेवेशी संबंधित उपगटही दिसतात कुणबी-गोसावी, कुणबी-गुरव, कुणबी-परदेशी, कुणबी-देवांग हे त्याचे उदाहरण. हे गट मंदिरसेवा, व्रत-उपवास व धार्मिक संस्काराशी जोडले गेले.या सर्व उपगटांच्या विविधतेतून हे स्पष्ट होते की कुणबी समाज हा एकसंध नसून प्रादेशिक, आर्थिक व सांस्कृतिक गरजेनुसार सतत बदलत गेला. कुणबी समाजाने महाराष्ट्र, गुजरात, मध्य भारत या सर्व भागात पाय रोवले आणि त्या प्रत्येक ठिकाणी तेथील परिस्थितीनुसार नवीन ओळखी स्वीकारल्या.थोडक्यात, कुणबी समाजाचा मूलाधार शेती असला तरी उपगटांची समृद्ध विविधता समाजातील गतिशीलता व संस्कृतीकरणाच्या प्रक्रियेचे द्योतक आहे. महाराष्ट्राबरोबरच मध्यप्रदेश, गुजरात, कर्नाटक, गोवा आणि केरळ या राज्यांतही हा समाज पसरलेला आहे. महाराष्ट्र शासनाने कुणबींना कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी यांना इतर मागासवर्गीय (OBC) प्रवर्गात समाविष्ट केले असून, त्यांना शैक्षणिक व सामाजिक मागासलेपणाच्या निकषांवर आरक्षण दिले १९९१ साली दिले आहे.. मराठा साम्राज्याच्या इतिहासात कुणबींचा मोठा वाटा मानला जातो.काही घराणी विशिष्ट राजघराण्यांशी व लष्करी परंपरेशी जोडली गेली जसे कुणबी-निंबाळकर, कुणबी-पवार, कुणबी-शिंदे, कुणबी-भोसले. या घराण्यांनी पुढे मराठा सरदारकीत मोठे योगदान दिले आणि त्यांच्या नावावरून उपगट ओळखले जाऊ लागले. शिवाजी महाराजांच्या मावळ्यांमध्ये बहुसंख्य कुणबी समाजातील होते. शिंदे व गायकवाड यांसारख्या प्रभावशाली घराण्यांचे मूळही कुणबी समाजाशी जोडलेले आहे. चौदाव्या शतकानंतर अनेक कुणबी तरुणांनी विविध राजांच्या सैन्यात नोकरी स्वीकारली आणि संस्कृतीकरणाच्या प्रक्रियेतून स्वतःला मराठा म्हणून ओळखू लागले. हाच बदल पुढे "मराठा–कुणबी" या एकत्रित संकल्पनेचा पाया ठरला. कोकणातील मराठे स्वतःला कुणबी मानत नाहीत. देशमुख पाटील हे ही स्वतःला कुणबी मानायला तयार होत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. .कुणबी हा शब्द मूळतः "शेतकरी" या अर्थाने आहे आणि उत्तर–पूर्व भारतातील कुर्मी समाजाशी त्यांचा घनिष्ठ संबंध आहे. 2006 मध्ये भारत सरकारने कुर्मी व कुणबी समान असल्याचे जाहीर केले व राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने त्यांना सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास मान्यता दिली. ऐतिहासिकदृष्ट्या पाहता, 14व्या शतकात "मराठा" हा शब्द मुख्यतः मराठी भाषा बोलणाऱ्यांसाठी वापरला जात होता. बहामनी सुलतानांनी सैन्यात स्थानिकांना नोकरी दिल्यानंतर "मराठा" या शब्दाला लष्करी ओळख मिळाली, तर सैन्यात नसलेले शेतकरी स्वतःला "कुणबी" म्हणवू लागले.. याचा स्पष्ट उल्लेख Imperial Gazetteer of India, Bombay Presidency, Vol. I (Calcutta: Government Printing, 1909), p. xx. Imperial Gazetteer of India Bombay Presidency, Deccan div. येथे नमूद आहे
इंग्रजी उतारा बघा काय म्हणतो
“Socially and by occupation there is hardly any distinction between the Maratha and the Kunbi; they are one and the same people.” “सामाजिकदृष्ट्या आणि व्यवसायाचे आधार घेतले तर मराठा आणि कुणबी यांत फारसा फरक नाही; ते एकच समाज आहेत.”
तर काळ जसजसा पुढे गेला तसतसे अनेक कुणबी सैन्यात भरती झाले आणि मराठा म्हणून आपली ओळख निर्माण करू लागले. काही घराणी स्वतःला "अस्सल मराठा" किंवा खरे क्षत्रिय म्हणवू लागली व त्यांनी राजपुत वंशाचा दावा केला. यास पुरावाHyderabad Gazetteer, Nizam's Territory (1918) मधील, विदर्भ मराठवाडा विभाग.. यातील.इंग्रजी उतारा काय म्हणतो बघा
“The Kunbi is the original stock of the Marathas. In many districts, Kunbis when they take to military service are called Marathas, while those who remain agriculturists continue to be known as Kunbis.”
“कुणबी हा मराठ्यांचा मूळ समाजगट आहे. अनेक जिल्ह्यांत कुणबी जेव्हा सैनिकी सेवेत जातात त्यांना ‘मराठा’ म्हणून ओळखले जाते; तर जे शेतीत राहतात, त्यांना ‘कुणबी’च म्हणतात.”
दुसरा एक पुरावा Bombay Gazetteer Dharwar District, Vol. XXII, Part I (Bombay Government Press, 1884), p. xx. वर सापडतो.. त्यात स्पष्ट उल्लेख आहे की
“The Marathas are in fact Kunbis who, by military service or holding rank in the armies of the Deccan rulers, came to be known as Marathas.”
“मराठा प्रत्यक्षात कुणबीच आहेत, जे सैनिकी सेवेमुळे किंवा दख्खनच्या सत्ताधाऱ्यांच्या सैन्यात पद प्राप्त करून ‘मराठा’ या नावाने ओळखले जाऊ लागले.”
तसेच Hyderabad State Gazetteer (Hyderabad: Nizam’s Govt.), Sec. on Agriculture and Society, p. xx.स्पष्ट उल्लेख आहे की
“In the Deccan, the Kunbi cultivator and the Maratha soldier are but two branches of the same stock.”
“दख्खन प्रदेशात कुणबी शेतकरी आणि मराठा सैनिक हे एकाच समाजाच्या दोन शाखाच आहेत.”
समाजशास्त्रज्ञ इरावती कर्वे यांच्या मते मराठा जात ही कुणबी समाजातूनच संस्कृतीकरणाच्या प्रक्रियेतून उदयास आली. ब्रिटिश काळात छत्रपती प्रतापसिंह भोसले यांनी आपल्या डायरीत गायकवाड घराण्याचे कुणबी मूळ नमूद केले आहे. त्यांनी लिहिले की "आजकाल कुणबी आणि इतर श्रीमंत होत आहेत " मध्यंतरी ज्योतिरदित्य शिंदे यांनी आम्ही कुर्मी अर्थात कुणबी आहोत असे म्हंटले होते
1965 मध्ये मराठी ज्ञान प्रसारक या वर्तमानपत्राने नमूद केले की फक्त काही घराणी (उदा. शिवाजी भोसले घराणे) खरे क्षत्रिय वंश सांगू शकतात. लोकसंख्येच्या दृष्टीने पाहता, इरावती कर्वे यांच्या मते पश्चिम महाराष्ट्रातील 40% लोकसंख्या मराठा लोक कुणबी गटातील आहे.., तर 1990 मध्ये समाजशास्त्रज्ञ लेले यांच्या मते संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचे प्रमाण सुमारे 31% आहे.
याच समाजजीवनात मराठावाड्यात एक गंभीर अपमानित करणारी "११ माशी" आणि "१२ माशी" या संज्ञांचा उल्लेख लोक बोलताना सरास वापरतात विशेष उस्मानाबाद लातूर साईडला तो महत्त्वाचा ठरतो. या संज्ञा केवळ कुळदेवता परंपरेशी संबंधित नसून, त्यात सामाजिक उन्नतीचा प्रवास दडलेला आहे. मूळतः ११ कुळींची परंपरा असलेले गट हे शेतकरी कुणबी मूळाचे मानले जात. नंतरच्या काळात काही घराण्यांनी राजपुत किंवा क्षत्रिय वंशाचा दावा करून आणखी एक कुळ परंपरा सामील केली व "१२ माशी" परंपरा प्रचलित झाली. समाजशास्त्रीय विश्लेषणानुसार, ११ माशी हा मूळ शेतकरी कुणबी घटक आहे, तर १२ माशी हे सामाजिक उन्नती साधणारे आणि उच्च देशमुख पाटील मराठा मानले गेलेले घराणे आहेत
थोडक्यात सांगायचे तर, कुणबी हे महाराष्ट्रातील मूळ शेतकरी असून त्यातूनच काही घटक संस्कृतीकरणातून मराठा झाले. त्यामुळे कुणबी व मराठा यांचा संबंध हा ऐतिहासिक, सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या गुंतागुंतीचा आहे. हे गॅझेटीअर दस्तऐवज दाखवतात की सामाजिक-व्यवसायाच्या आधारावर कुणबी हा मराठ्यांचा मूळ घटक आहे.. कुणबी हे मूळ ते नंतर मराठा झाले.."हैद्राबाद गॅझेटीअर" हे आणखी एक पुरावा म्हणून शासनाने स्वीकारले आहे.. यात एक उल्लेख महत्वाचा आहे मराठवाड्यातील कुणबी समाजात मामाशी भाच्चीचा विवाह ही पद्धत आजही मोठ्या प्रमाणावर अस्तित्वात आहे. विशेषतः मामाच्या मुलीशी विवाह म्हणजे मामेबहिण–मामा–भाचा संबंध आणि आत्याच्या मुलाशी किंवा मुलीशी विवाह म्हणजे हे प्रकार इतर मागास प्रवर्गातील जाती तसेच अनुसूचित जाती जमाती भटके विमुक्त मधे आढळतात. ही विवाहप्रथा दख्खनातील कुणबी समाजाची वैशिष्ट्यपूर्ण खूण आहे. समाजशास्त्रीय भाषेत याला cross-cousin marriage असे म्हटले जाते. ही प्रथा आर्य-सामान्य क्षत्रियांमध्ये मान्य नव्हती, परंतु दख्खनातील शेतकरी कुणबींमध्ये ती रूढ होती. आजही अनेक गावांत सून आपली सासूला “आत्या” म्हणून संबोधते आणि याचे मूळ ह्याच विवाहपद्धतीत आहे. या प्रथेमुळे रक्ताच्या नात्यांमध्ये परस्पर विवाह होतो आणि तो समाजमान्य मानला जातो. यावरून स्पष्ट दिसते की मराठवाड्यातील कुणबी समाजाचे सांस्कृतिक जीवन स्वतंत्र वैशिष्ट्य घेऊन उभे आहे. सामाजिक मागासलेपणाचे दस्तऐवजीकरण करताना ही प्रथा महत्त्वाची ठरते कारण “उच्च क्षत्रिय ” म्हणून स्वतःला ओळखणारे गट अशा विवाहपद्धतीला मान्यता देत नाहीत. म्हणजेच मामाशी भाचीचा विवाह ही परंपरा कुणबी समाजाच्या ओळखीचा एक महत्त्वाचा पुरवा आहे े..
लेखक : विशाल फुटाणे सोलापूर
Mo 8888113111
0 Comments