आषाढ अमावस्या

आषाढ अमावस्या
आषाढ अमावस्या आहे. हिलाच दिव्याची आवस किंवा दीप अमावस्या असेही म्हणतात. अलीकडे या उत्सवाला एक नवीनच नाव लाभले आहे ते म्हणजे 'गटारी अमावस्या ' आषाढ महिना संपल्या नंतर श्रावण येतो आणि नंतर भाद्रपद या महिन्यामध्ये मद्यपान व मांसाहार वर्ज मानला जातो. मग या सर्वाचे शौकीन आषाढ मधील हा दिवस पुन्हा काही दिवस मिळणार नाही म्हणून मद्यपान व मांसाहार याने साजरा करतात, तर काही बेधुंद होऊन गटारात लोळतात. हीच आहे का आपली भारतीय संस्कृती आणि ऋषी परंपरा ?????....

घरामध्ये सुख, समृद्धी आरोग्य व लक्ष्मी यांची फलप्राप्ती होण्यासाठी व घरातील इडापिडा टळावी म्हणून अंधःकार नाहीसा करून तेजोमय प्रकाश देणा-या दिव्यांची पूजा करावी असे शास्त्रात सांगितले आहे. आषाढ महिन्यातील संतत धारेमुळे धरणी हिरवाईच्या शालूने नटते त्यासोबतच जलप्रदूषणाने साथीचे आजार हि घेऊन येते. अशा साथीच्या आजारापासून रक्षण करणारी म्हसोबा, मरीआई सारख्या क्षेत्रपाल दैवतांना संतुष्ट करण्यासाठी या महिन्यात सामिष आहार दिला जाण्याची परंपरा आहे. अमावस्या हा महिन्यातील शेवटचा दिवस महिनाभरात राहिलेले सर्वच विधी या दिवशी पुर्ण केले जातात,
तिन्ही सांजेला दिवे लागणीच्या वेळी लक्ष्मी घरात येते व त्याचवेळी अलक्ष्मी निघुन जाते अशी कल्पना आहे .या दिवशी सुवासिनी स्त्रिया घरातले दिवे,समया, निरांजनी, तांब्याचे दिपदानातले दिवे, लामणदिवे, कापूरवाती लावायच्या आरत्या इत्यादी घासून-पुसून एकत्र मांडून त्याभोवती रांगोळ्या घालतात व ते दिवे प्रज्वलित केले जातात त्याची हळद, कुंकू, अक्षता, फुलांनी पूजा केली जाते. कणकेचे गोड, उकडलेले दिवे करायचे, आणि मग त्यात साजुक तूप आणि कापसाची वात घालून सर्व दिवेपेटवून त्यांनी दिव्यांची आरती करून देवाला त्यानंतर गोडाचा महानैवैद्य दाखविला जातो. त्यावेळी पुढील मंत्राने दिव्याची प्रार्थनाकरतात. ती प्रार्थना अशी-
‘‘दीप सूर्याग्निरुपस्त्वं तेजसां तेज उत्तमम्‌|
गृहाण मत्कृतांपूजां सर्वकामप्रदो भव॥
त्याचा अर्थ असा – ‘‘हे दीपा, तू सूर्यरुप वअग्निरुप आहेस. तेजामध्ये तू उत्तम तेज आहेस. माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणिमाझ्या सर्व इच्छा पूर्ण कर.
 
दीपज्योति:परब्रह्म: दीपज्योति: जनार्दन:।
दीपोहरतिमे पापंसंध्यादीपं नामोस्तुते।।
शुभं करोतुकल्याणमारोग्यं सुखं सम्पदां।
शत्रुवृद्धिविनाशं च दीपज्योति: नमोस्तुति।।

तेव्हा लाजिरवाणी गटारी नाही तर पुढच्या पिढीला सुसंस्कृत बनवणारी दिप अमावस्या साजरी करा.

Post a Comment

0 Comments