कर्माची सूत्रे अतिशय गहन असतात. आयुष्यात घडणारी प्रत्येक घटना अथवा प्रत्येक जीवाशी या जन्मात घडलेली इथली भेट ही आपले कार्मिक अकाऊंट्स क्लीअर करण्यासाठी झालेली असते, "ऋणानुबंधाशिवाय एखादे रोपही आपल्या अंगणात फुलत नाही. अनंत जन्मांत प्रत्येक जीवाशी होत असलेला एनर्जी एक्सचेंज पुनःपुनः भेटी घडवण्यास कारणीभूत ठरत असतो." *कोणास दिलेला अथवा घेतलेला एक रुपयासुद्धा चुकविण्यास पुढील जन्मी यावे लागते, म्हणून शक्यतोवर कोणाचेही ऋण आपल्यावर ठेवू नये. आपली ही सत्कर्मे किंवा दुष्कर्मेच पुढे संचितरुपाने आपले प्रारब्ध ठरत जातात.*
"सत्कर्मांची वाढ झाली की आपल्या नित्य 'जवळच' असलेले गुरुतत्त्वं अनुभवास यायला सुरूवात होते, *गुरु कधीही 'करावे' लागत नाहीत, ते जन्मोजन्मी आपल्या सोबतच असतात! आपल्यातील शिष्य जागा होणं गरजेचं असतं, इतकचं!"*
एकदा सद्गुरुंचा अनुग्रह प्राप्त झाला, की आपण आपल्या प्रत्येक कर्मास 'सद्गुरार्पण' करावयास शिकतो, *मी जे करतोय ते कोणती तरी शक्ती माझ्याकडून करवून घेतेय ही 'विनम्रता' अंगी रुजते आणि मग अर्थातच 'कर्तेपणाचा' अहंकार गळून पडल्याने हातून घडणारे प्रत्येक कर्म 'अकर्म' घडून कर्मबंधनातून हळुहळू मुक्त होण्यास आरंभ होतो.* म्हणूनच सद्गुरुकृपेचे महत्त्वं अनन्यसाधारण अाहे.
तरी प्रारब्धभोग टळत नाहीत, गुरुकृपेने सौम्य प्रकारचे प्रारब्ध टळू शकते, पण तीव्र प्रारब्धकर्म भोगणे अनिवार्य असते. गुरु ते सोसण्यासाठी बळ देतात. कठिण काळात देखील शिष्याच्या चेहर्यावरची प्रसन्नता आणि आत्मिक समाधान कधीही कमी होऊ देत नाहीत. भिंतीवर मारलेला चेंडू बुमरँग होऊन आपल्याजवळ येणारच, फक्त त्याची आपल्यावर येऊन आपटण्याची तीव्रता गुरुकृपेने कमी होते.
*आपल्या चांगल्या वाईट कर्मांपासून आपली सूटका कधीही नसते, म्हणून हातून घडणारे प्रत्येक कर्म जागृतपणे, परमेश्वराला समर्पित, स्वार्थविरहित, 'आत्म्यास पटलेले', सत्याच्या आधारावर असलेलेच घडावे. मनाविरुद्ध, केवळ जगाला दाखवायला, ह्रदय साथ देत नसलेले कोणतेही कर्म कधीही करु नये ते यासाठी.*
ज्योतिष्य आपल्याला आपल्या पूर्वसंचितानुसार घडणार्या घटनांचा केवळ आलेख देतं, पण *गुरुकृपा आज्ञाचक्र जागृत करुन 'कर्माप्रती सजग' करत जाते. म्हणून एकदा गुरु आयुष्यात आल्यानंतर विवेकी जीव सहसा, ग्रह, तारे, नक्षत्र, पत्रिका यात भरकटत बसत नाही!* तर......
*सगळे ग्रह ज्याचे अंकित आहेत अशा सद्गुरुंना संपूर्णतः शरण जातो....!!!**कर्मफळ / प्रारब्ध भोग आणि आपल्या आयुष्यात गुरू येणं*

*सगळे ग्रह ज्याचे अंकित आहेत अशा सद्गुरुंना संपूर्णतः शरण जातो....!!!*
0 Comments