विवाह वर्ष पाहण्याची ढोबळ पद्धत

विषय : विवाह वर्ष पाहण्याची ढोबळ पद्धत
संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद
संदर्भ : जातक वेध 
नमस्कार,
मुले मुली शिक्षण पूर्ण होऊन त्यांचे विवाह वय होणे ही पालकांसाठी चिंतेची व संवेदनशील बाब असते. अर्थात त्यामागे त्यांचे आयुष्य मार्गी लागावे हेच उद्दिष्ट असते.

जातकाचे साठी विवाह कोणत्या वर्षी होऊ शकतो हे पाहण्याची एक ढोबळ पद्धत येथे देत आहे. या पध्दतीत हो किंवा नाही हे सांगता येत नाही. परंतु “हो” हे उत्तर गृहीत धरले, तर विवाह कोणत्या वर्षी होऊ शकतो हे सांगता येते. काही अपवादात्मक कुंडल्यांना ही पध्दत लागू पडत नाही. त्याचबरोबर लग्न होईल साठी आलेली वये ९, १८, २७, ३६, ४५ अशी असली तरी त्यातील त्याचे सध्याचे वयास अनुसरून त्याप्रमाणेच उत्तर मिळवता येते.

या पध्दतीसाठी एक सूत्र वापरले आहे. ते पुढीलप्रमाणे आहे.

ड = अ – ब – क + १ (यामध्ये १ हा नेहमी अंशात असेल.)

हे सूत्र वापरण्याची पद्धत :

आजकाल SOFTWARE मुळे सायन निरयन अंश तुम्ही सहज पाहू शकता.

१. जातकाचे सायन कुंडलीतील सप्तमेश कोण आहे हे पाहून त्याचे निरयन अंश कला याची नोंद करणे. यास अ मानू.

२. सप्तमेश सायन कुंडलीत कोणते स्थानी आहे याची नोंद करणे. यास ब मानू. (ही संख्या नेहमी अंकात असेल)

३. चंद्राचे निरयन अंश व कलेची नोंद करणे यास क मानू.

४. दिलेल्या सूत्रात अंश कला लिहून ड ची संख्या काढणे. (उत्तर वजा मध्ये आल्यास ३० अंश मिळवणे, संख्या ३० पेक्षा मोठी आली तर ३० वजा करणे)

ड = अ – ब – क + १

५. ड चे अंश कला नुसार दिलेल्या तक्त्यातील जातकाचे चालू वयाचे पुढील वय पाहणे. ते जातकाचे विवाहाचे वेळी वय असेल.

उदा.
एका जातकाचा जन्म २००० साली झाला आहे.
१. जातकाचे सायन कुंडलीतील सप्तमेश कुंभ राशीचा स्वामी शनी आहे. शनी निरयन कुंडलीत २३ अंश १२ कला वर आहे. यास अ मानू.

२. सप्तमेश सायन कुंडलीत १० वे स्थानी आहे. यास ब मानू.

३. चंद्राचे निरयन २२ अंश व ५१ कला आहेत. यास क मानू.

४. ड = अ – ब – क + १
= २३ १२ – १० – २२ ५१ + १
= -२२ ५१ + १४ १२
= -७ २१

५. यात -७ २१ हे अंश कला आल्याने ३० मिळवा.
= २३ २१ हे तक्त्यातील रकान्यात ८ व्या ओळीत आहेत.
 त्या ओळीत ५, १४, २३, ३२, ४१, ५०, ५९, ६८, ७७ ही वये दिली आहेत.
आत्ता जातकाचे वय २४ चालू आहे व शिक्षण घेत आहे. त्यामुळे त्यापुढील ३२ वय हे विवाहाचे वय असेल.
म्हणजेच जन्मवर्ष २००० + ३२ = २०३२ हे विवाह वर्ष असेल.

जातक वेध मध्ये दिलेली प्रोग्रेशन वर आधारित ही गणिती पद्धत ढोबळ मानाने विवाह वर्ष निर्णयासाठी उपयुक्त वाटते. तरी अजून अनेक कुंडल्यांचा दशा, गोचर, कृष्णमुर्ती अशा पद्धतीने पडताळा घेऊन तपासता येईल. पण या पद्धतीला मर्यादा आहेत, त्यामुळे सखोल विश्लेषणाची अपेक्षा ठेवता येत नाही.

(टीप : जातक वेध या पुस्तकात ही पद्धत दिलेली असून मी फक्त आपल्या समोर मांडलेली आहे, काही शंका असल्यास मूळ पुस्तक वाचावे.)

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

Post a Comment

0 Comments