राहू संबधित महत्वाचे उपाय

#राहू_संबधित_महत्वाचे_उपाय.
संदर्भ-फलदिपीका.
लेखक-गजानन परब.

 जेथे सूर्याचा प्रकाश कधीही पोचूच शकत नाही तो आहे राहू, ज्योतिष मध्ये राहुला उत्पातीक ग्रह मानला आहे, सर्वकाम बिघडणारा हा छाया ग्रह आहे, सर्वाधिक पाप ग्रह आहे, सर्वाधिक विच्छेदात्मक ग्रह आहे, सर्वाधिक आकस्मित घटनांचा कारक आहे.
️राहु पाप आणि पुण्याच्या बॉर्डर लाईन वर उभा असलेला ग्रह आहे, पाप ह्या साठी की हा स्वभावाने राक्षस आहे, राक्षस कुलात जन्मलेला आहे, पुण्य ह्या साठी की ह्याने अमृत प्राशन केले आहे म्हणून ह्याला नवग्रहात स्थान प्राप्त आहे. म्हणून पाप आणि पुण्याच्या रेषेवर वर उभा असलेला हा ग्रह आहे, आपण जसा ह्याचा व्यवहार कराल तसाच तो बनेल.
️जर राहू आपल्याला बंधन मुक्त करेल तर जन्म-मृत्युच्या फेर्‍यातुन मुक्ति होऊ शकते, अन्यथा राहू सर्वात निकृष्ट दर्ज्याची मानसिकता देणारा ग्रह आहे, चोरी, धोका, अपराध, घनघोर अपराध, मोठ्यात मोठे फ्रॉड केसेस हे सर्व जास्त तर राहू प्रभावित लोकच करतात. 
राहू कुंडलीत जर अतिशय खराब असेल तर व्यक्तिला दंड मिळतो, जेल मध्ये जाण्याचे योग घडतात. सरकारकडू खतरा असतो, धोका होतो.
या व्यतिरिक्त राहू अशुभ असल्याची आणखी काही लक्षणे आहेत. जर आपल्या पाठीत, आपल्या श्वासन-स्वासात अडचणी असतील, जर आपल्या दाता मध्ये त्रास असेल, तर निच्च्छितच आपला राहू वाईट रिझल्ट देत आहे, जर आपण नेहमी भ्रमाचे शिकार बनत असाल, नेहमी अंजान, अनावशक भीती वाटत असेल, फोबिया आहे, डिप्रेशन आहे, तर आपला राहू खराब असू शकतो, जर तुम्हाला नेहमीच धोका मिळत असेल, सरकारी कामात त्रास, अडचणी येत असतील हे पण खराब राहू असल्याची लक्षणे आहेत. 

️राहू ज्यावेळी खराब होतो त्यावेळी व्यक्तीच्या घरात अनाव्शक वस्तूंचा कचरा होऊ लागतो, इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रिकल सामान लवकर खराब होते, अशा घरात बंद असलेली घड्याळ मिळतील, राहूची जर महादशा, अंतर दशा चालू असेल, किंव्हा राहू गोचर मध्ये ज्या स्थानातून भ्रमण करत असेल, तर त्या स्थाना संबंधित त्रास निर्माण करेल. 

️अजून एक राहू खराब होण्याचे लक्षण म्हणजे जर लाल मुंग्या आपल्या घातरात वारंवार येत असतील तरी हे राहू खराब होत असल्याची लक्षणे आहेत, 
राहू जीवनात नेहमी अनिच्छित, अनाकलनीय घटना घडवतो. अनिच्छित आजार देतो ज्यांचे रिपोर्ट डाॅ.ना पण भेटतच नसतात. हे सर्व फोबिया आहेत जो राहू क्रिएट करत असतो. जीवनात स्थैरता लाभत नाही.

सप्तमाशी संबंध आल्यास वैवाहिक जीवनात संशय, धोका, मतभेद निर्माण होऊ शकतात. अशा सर्व लक्षणात आपण अंदाज करू शकतात की आपला राहू अशुभ फलित होत आहे.
 ( ही लक्षणे इतर ग्रहांच्या योगात पण सापडतात परंतु खास करून राहू ह्या गोष्टी खूप प्रभावित करत असतो)  

#उपाय- 

जर आपला राहू अशुभ स्थितीत असेल तर आपण काय उपाय करू शकतात? ज्याने आपला राहू शांत होईल व शुभफळ देईल.

1) राहुचा सर्वात प्रार्थमिक उपाय म्हणजे आपल्या घारात व कामाच्या ठिकाणी कधीही घाण, कचरा अजिबात ठेऊनहे. कोळ्यांची घरे रोजच्या रोज साफ करावी, जेवढी साफसफाई कराल तेवढी उत्तम. 

2) राहू जर बिघडेला असेल तर कधीही दारू, मांस सेवन करूच नहे,( कोणाची फूड ह्याबीट बदलण्याचा हा विषय नाही जे सत्य आहे.) 

3) कुठल्याही प्रकारचे बंद इलेक्ट्रिकल सामान ठेऊ नये. बंद घड्याळ ठेऊ नका. 

4) आपल्या टॉयलेटची साफसफाई नियमित ठेवा, त्याच बरोबर दक्षिण-पच्छिम भागाची आणि दक्षिण भागाची साफ-सफाई लक्ष पूर्वक करावी. 

5) आपल्या घरात समुद्री मीठ (मोठे) वापरुन फर्शी, जागा क्लीन ठेवावी. ह्यामुळे राहूचा वाईट प्रभाव दूर होतो, व हा वास्तु दोषाचा उत्तम उपाय पण आहे.

6) मोर पंख आपल्या घरात आवश्य ठेवा, आपल्या बिझनेस किंवा आपल्या ऑफिस च्या ठिकाणी आवश्य ठेवावा.( याला पौराणिक कारणे आहेत)  

7) राहू कारकतत्वात मासे पण येतात, आपण मास्याना खाध्य घाला, पालन पोषण करा.  

8) काळ्या गाय ची सेवा करा, काळ्या कुत्र्यांना अन्न द्या, राहू प्रसन्न होतो.

9) शनिवारी एक कच्चा कोळसा, एक नारळ तिन्ही सांज वेळी वाहत्या पाण्यात सोडावा. 

10) राहू बुद्धी बिघाडतो, तर बुद्धी शुद्ध ठेवा, मन स्वच्छ ठेवा आणि चांगल्या वातावरणात रहा. बुद्धी भ्रष्ट झाली तर सर्वच नष्ट होण्याच्या मार्गावर असते, बुद्धी शुद्ध कशी कराल, माता सरस्वतीची उपासना करावी. गीता अध्याय 2, श्लोक 62, 63 मध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात, बुद्धी च्या नाशाने सर्वच काही नष्ट होते, राहू बुद्धीलाच नष्ट करतो, राहू ज्यावेळी खराब होतो त्यावेळी सर्वात प्रथम आपले विचार घाणारडे बनतील, विचार उलटे होतील, कोणाचा चांगला सल्ला आपण स्वीकारणार नाही. अशा स्थितीत माता सरस्वती उपासना आवश्य करावी.

11) अजून एक महत्वाचा उपाय म्हणजे अश्या स्थितीत आपण हनुमान आणि भैरव यांची पुजा, उपासना करावी या मुळे राहुचे उत्पाद शांत राहतात. हनुमंतांच्या भीतीने राहू दबावात राहतो.  
                 
धन्यवाद.🙏
              ॥ ज्योतिष आणि अध्यात्म ॥

Post a Comment

0 Comments