संपत्ती ( property ) योग

संपत्ती ( property ) योग

• संपत्तीचे कुंडलीत आणि हस्त रेषा नुसार काय योग असतात? संपत्ती प्राप्ती चे वेळ कोणते असतात? संपत्ती घेण्याचा मुहूर्त काय असतो? कोणते शुभ लग्न असतात? कोणत्या नक्षत्रात प्रॉपर्टी पर्चेस करावी? 

• शनि आणि मंगळ जमीन, ज्यायज्याद, इस्टेट प्रोपार्टी चे प्रिन्सिपल प्लानेट मानले आहेत. मंगळ भूमी पुत्र आहे जमिनीचा कारक आहे, शनि जमिनीतील आतील भाग, आतील वस्तूंचा कारक आहे त्यामुळे शनि जमिनी संबंधित विषय म्हणजे घर बांधताना पाया किंवा पीलर खोदून घालतो म्हणजे शनि घराचा पण कारक बनतो. हातावर शनि आणि मंगळ पर्वत उंच स्थितीत असतील तर आपल्ये प्रोपार्टीचे योग सर्वात उत्तम होतात. या वर जर आडव्या –उभ्या रेषा जास्त असतील तर प्रोपार्टीचे वादविवाद, संघर्ष होईल, या दोन्ही पर्वतावर शुभ चिन्ह असतील जसे त्रिकोण, त्रिशूल, झेंडा असे निशाण असतील, तर समझा आपली मोठी प्रॉपर्टी असेल, चांगली असेल. जर शुक्र पर्वत पासून जर रेषा येऊन शनि किंवा मंगळ पर्वता पर्यन्त जाईल. (हिला राहू रेखा म्हणतात) तर प्रॉपर्टी संबंधित वादविवाद होतील. 

• जन्म कुंडली नुसार- मंगळ ला भूमी पुत्र म्हटले आहे, आपल्या कुंडलीत मंगळ मजबूत असणे आवशक आहे, शनि पण मजबूत असणे आवशक आहे, संपत्ति संचय करण्यासाठी आपल्या कुंडलीत शुक्र, चंद्र, गुरु हे तिन्ही ग्रह मजबूत असणे आवशक आहे, कुंडलीत चंद्र-शुक्र चतुर्थ स्थानाचे कारक मानले जातात. म्हणून शुक्र वैभव आणि विलास चे कारक मानले आहेत, नैसर्गिक कुंडलीत चतुर्थ भावात गुरु उच्चचे होतात. तर शुक्र, चंद्र, मंगळ, शनि हे सर्व ग्रह कुंडलीत मजबूत नसतील पण यातील कोणताही एक ग्रह मजबूत असेल तरी काहींना काही प्रॉपर्टी असतेच. 

• लग्नाचा संबंध जर चतुर्थाशी झाला तर संपत्ति सुख प्राप्त होईल. किंवा या दोन्ही स्थानात शुक्र, चंद्र, गुरु सारखे ग्रह असतील तर संपत्ति सुख प्राप्त होते, चथुर्थात चंद्र, गुरु, शुक्र ग्रह असतील तर मोठी वास्तु लाभते, सूर्य किंवा केतू असेल तर लहान वास्तु लाभते, शनि असेल तर जुने घर लाभते, राहू, मंगळ असतील तर घरात संघर्ष आणि वादविवाद होतात, शक्यतो चतुर्थ भावात अग्नि तत्व ग्रह असू नहेत, ते वास्तु विषयी अशुभ फळ देतात. नैसर्गिक कुंडलीत येथे कर्क ही जल तत्वाची राशी येते जल तत्व ग्रह चंद्र, शुक्र सर्वात जास्त शुभ होतात, येथे अग्नि तत्वाचे काम नाही. म्हणून शास्त्रा नुसार असे घर सर्वात उत्तम सांगितले आहे जे पाण्याच्या जवळ असते, जसे तलाव, नदी च्या जवळ. म्हणून आपल्या घराच्या आसपास पाण्याचा सोर्स तरी नक्कीच करावा. 

• वारसा हक्काने किवा वडीलोपार्जित संपत्ति- या संपत्तीचा कारक शनि होतो, जर शनि मजबूत असेल तर आपणास वारसा हक्काने संपत्ती प्राप्त होते, कुंडली अष्टम स्थान मजबूत असेल तर आपणास वडीलोपार्जित, पैतृक, वारस हक्क संपत्ति प्राप्त होते. 

• कुंडलीत चतुर्थ भावाचा संबंध अकराव्या भावाशी जोडेल तर जातकास रीयल इस्टेट संबंधित काम करून भरपूर लाभ होतो. 

• चतुर्थ स्थानाचा सबंध 11 भावशी होईल तर व्यक्तीचे अनेक घर होतात, चथुर्त चा संबंध सप्तमाशी असेल तर आपल्या जोडीदाराच्या नावाने प्रॉपर्टी घेतल्यास फायदा होतो.

• चतुर्थ स्थानाचा संबंध जर आपल्या सप्तम भावाशी होईल तर चतुर्थ भाव प्रॉपर्टी आहे आणि सातवा भाव आपला जीवनसाथी च्या नावाने घर घेतल्याने लाभ होतात. 

• चतुर्थ स्थानाचा स्वामी चतुर्थामधेच असेल तर जातकाची प्रॉपर्टी चांगली असते, त्यातून त्याला लाभ होत असतात. 

• प्रथम आणि चतुर्थ स्थानात शुभ ग्रह असतील किवा या स्थानान वर शुभ ग्रहांची दृष्टी असेल तर प्रॉपर्टी संबंधित चांगले योग बनतात. 

• चतुर्थ स्थानाचा स्वामी आपल्या उच्च राशी किंवा आपल्या नवांश मध्ये चांगला असला तरी प्रॉपर्टी पासून लाभ होतो. 

• लग्न स्वामी जर चतुर्थ स्थानी असेल तर जातकाळ आपले घर खूप प्रिय असते, आशा स्थितीत वर्कफ्रॉम होम काम चांगली होतात. 

• विदेश मध्ये घर आणि प्रॉपर्टी असण्याचे काय योग असतात- चथुर्त स्थान चा स्वामी बलवान होऊन जर अष्टम किंवा द्वादश भावात असेल, तर विदेशात मोठी प्रॉपर्टी होते. किंवा आपल्या जन्म स्थानापासून दूर जाऊन घर प्रॉपर्टी प्राप्त होते. 

• पण जर चथुर्तेश 6/8/12 या स्थानी बलहीन असेल नीच असेल तर प्रॉपर्टी साठी संघर्ष आणि वादविवाद पण होतात. 

• चतुर्थ स्थानी कोणताही नीच ग्रह असेल तर प्रॉपर्टी संबंधित नियमित अडचणी राहतील. आशा जातकांनी कधी ही आपल्या नावावर प्रॉपर्टी घेऊच नहे, प्रॉपर्टी पासून सुख प्राप्त होणार नाही. 

• ह्या सर्व योगात पाहताना आपणास जन्म कुंडली बरोबर चंद्र, नवमांश आणि चथुर्तांश कुंडली पण पहाणे आवशक आहे. 

• अशाच काही वाईट योगात आपली असलेली प्रॉपर्टी योग्य वेळी आणि योग्य दरात विकली पण जात नाही. 
आता आपण पाहुयात आपल्या जीवनात संपत्तीची प्राप्ती कधी होईल? आपल्या साठी प्रॉपर्टी योग आहेत का नाही? 

• चथुर्त स्थांचा स्वामी मजबूत असून त्याची दशा योग्य वेळत येत असेल तर आणि त्याचा संबंध गोचरीने चथुर्ताशी होईल तर आशा वेळी प्रॉपर्टी चे योग बनतात. 

• शनि मजबूत असून जर गोचर स्थितीत चथुर्ताशी संबंध करेल तर प्रॉपर्टी चे योग बनतात. 

• दूतीय स्थान पण प्रॉपर्टी साठी उत्तम असते कारण हे चथुर्ता पासून अकरावे असते. कुठल्याही भावा पासून 11 वे घर इच्छापुर्ति दर्शवते, म्हणजे प्रॉपर्टी पासून लाभ होणार की नाही हे दूतीय स्थान दर्शवते. दूतीय स्थान स्थायी संपत्ति साठी ही पाहिले जाते. म्हणून दूतीय स्थान स्वामीची महादशा चालेल त्याचा संबंध चतुर्थ स्थांनच्या स्वामी शी होईल तरी ही प्रॉपर्टी प्राप्त करणायचे योग बनतात. 

• या व्यतिरिक्त गोचर गुरुची दृष्टी ही योग कारक बनते. 
प्रॉपर्टी केव्हा घ्यावी ? 
शास्त्र सांगते चांगल्या वेळी घेतलेली प्रॉपर्टी जास्तीत जास्त फायदेशीर ठरते. म्हणून प्रॉपर्टी घेताना मुहूर्त, नक्षत्रांचा आवशक विचार करावा, ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. 

• वार- सोमवार, मंगळवार, बुधवार, शनिवार या दिवशी स्थिर लग्नात प्रॉपर्टी खरेदी करावी. 

• नक्षत्र- अश्विनी, रोहिणी, मृग, पुनर्वसु, पुष्य, उत्तरा फाल्गुनी, हस्त, स्वाति, अनुराधा, उत्तरा षाढा, उत्तरा भाद्रपद, धनिष्ठा, शततारका हे नक्षत्र प्रॉपर्टी साठी शुभ मानले जातात. येथे आपण म्हणाल की यात राहूची पण नक्षत्र आहेत, पण धन, संपत्ति ह्या सर्व गोष्टी माया या विषयात येतात आणि राहू मायेचा कारक आहे. 

• बिझनेस साठी जर प्रॉपर्टी बनवायची असेल तर त्याची सुरवात भरणी, आद्रा, जेष्ठा, मूल, कृतिका, मघा, उत्तरा षाढा आणि पूर्वा फाल्गुनी. 

• कुठचेहि काम, प्रॉपर्टी रीपेअर करण्या साठी मंगळवार वर्जित करावा, राहू केतू शनि गोचरिने चतुर्थ नसावे. अशुभ ग्रहाची महादशा नसावी. 

• गृहप्रवेश साठी पण चंद्र शुक्ल पक्ष तिथित असावा, कृष्ण पक्ष अष्टमी पर्यन्त चालू शकतो. नक्षत्र-रोहिणी, मृग, पुष्य, हस्त, अनुराधा, श्रवण. गृहप्रवेश वेळी जर आपल्या कुंडलीतील जन्म लग्न असेल तर अति उत्तम कारण लग्न म्हणजे आपले स्वास्त्य आहे. म्हणजे आपण आजारी पडण्याची शक्यता कमी होते. या वेळी अष्टम स्थान लग्नात नसावे म्हणून कूटचीहि संपत्ति घेताना या साठी आपली कुंडली बनवून वेळ निच्छित करणे योग्य.       
       
  धन्यवाद.🌹🙏

Post a Comment

0 Comments