सेमिस्टर सिस्टिम: नवीन शिक्षण प्रणाली
सेमिस्टर सिस्टिम; 150 विषयांचा पर्याय, वर्षात 2 परीक्षाअनिरुद्ध शर्मा . नवी दिल्ली17 मिनिटांपूर्वी
नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार (एनईपी) तिसऱ्या वर्गापासून बारावीपर्यंतचा राष्ट्रीय आराखडा (एनसीएफ) तयार झाला आहे. त्याच्या प्रकाशनाची तयारी सुरू झाली आहे. एनईपी-२०२० जाहीर होण्याचा तिसरा वर्धापन दिन २९ जुलै किंवा त्याच्या आधी एनसीएफ जाहीर होऊ शकतो. सर्व दहा वर्गासाठी नवीन पुस्तके तयार करण्यासाठी विषयतज्ज्ञांची निश्चिती करण्यात आली आहे. एनसीएफ जाहीर होताच पुस्तके तयार करण्यासाठी समित्यांची स्थापना होईल. इयत्ता तिसरी ते बारावीपर्यंतच्या शालेय शिक्षणात आता १५० विषयांची पुस्तके तयार केली जातील. शैक्षणिक सत्र २०२४-२५ च्या सुरुवातीच्या महिन्यांत नवीन एनईपीनुसार इयत्ता ३, ६ वी आणि नववीची पुस्तके येऊ शकतात.
मागील धोरण १९८६ मध्ये आले. पुस्तके २००८ पर्यंत आली. या वेळी २०२० मध्ये धोरण, २ वर्षांत प्री स्कूलची पुस्तके, बारावीपर्यंतचा अभ्यासक्रम पूर्ण झाला.
केंद्रीय विद्यालयांत बालवाटिका प्री-स्कूल वर्ग सुरू झाले. केव्हीएस-एनव्हीएसच्या शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले. सीबीएसई शाळांत व गुजरातमध्ये होलिस्टिक प्रोग्रेस कार्डचा पथदर्शी प्रकल्पाची चाचणीदेखील झाली. देशातील ६० बोर्डात एकरूपता आणण्यासाठी नॅशनल असेसमेंट सेंटर ‘परख’ची स्थापना झाली. पीएमश्री शाळांतर्गत माॅडेल स्कूल विकसित केले जातील.
शिशुवर्ग ( ३ ते ८ वर्षे ) : कोणतीही परीक्षा नाही
बालवाटिका / प्री-स्कूलमध्ये मुलांना जादुई पेटाऱ्यातून (५३ प्रकारचे खेळ-खेळणी, पोस्टर, बोर्ड, बिल्डिंग ब्लाॅक, प्लेइंग कार्ड) शिकवले जाईल. स्कूल बॅग नसेल. सर्व केंद्रीय शाळांत बालवाटिका सुरू झाल्या. जादुई पेटारा फेब्रुवारीत जाहीर झाला. खासगी शाळांतही प्ले ग्रुप व नर्सरीचे वर्ग घेतले जातात. आता एनईपीमध्ये सुरुवातीची तीन वर्षे सरकारी शाळांतही शिकवले जाईल.
६ ते ८ वर्षे : प्री-स्कूलिंग झालेल्या सहा वर्षांच्या मुलास पहिल्या वर्गात प्रवेश मिळेल. त्यात केवळ दोन पुस्तके असतील. भाषा व गणित. दुसऱ्या वर्गानंतर फाउंडेशन लेव्हल पूर्ण होईल. फाउंडेशन लेव्हलमध्ये कोणतीही परीक्षा नसेल. याची पुस्तके उपलब्ध आहेत.
जन्मापासून तीन वर्षांपर्यंत : आई-वडिलांसाठीदेखील पहिल्यांदाच अर्ली चाइल्ड केअर एज्युकेशन अभ्यासक्रम (पालनपोषणाबाबत) तयार झाला आहे.
उच्च माध्यमिक (१४ ते १८ वर्षे) : ९ वीचा निकाल दहावीशी जोडणार
नववी ते बारावीपर्यंत सेमिस्टर सिस्टिमने शिक्षण होईल. वर्षात बोर्ड परीक्षेसारख्या दोन संधी मिळतील. नववी-दहावी आणि अकरावी-बारावीमध्ये एकूण १६-१६ पेपर द्यावे लागतील. म्हणजे एक वर्षात किमान ८ पेपर असतील. नववीचा निकाल दहावीच्या अंतिम गुणपत्रिकेत जोडलेला असेल. तसेच अकरावीचा निकाल बारावीच्या अंतिम निकालासोबत असेल. त्याचे एकत्रित प्रमाणपत्र असेल.
९वी व १० वीत आठ स्ट्रिम असतील. मानव्यशास्त्र-भाषा, गणित, व्यावसायिक शिक्षण, शारीरिक शिक्षण, कला, सामाजिक शास्त्र, विज्ञान, इंटरडिसिप्लिनरी ग्रुप. या ८ समूहात प्रत्येकातून दोन म्हणजे १६ पेपर निवडावे लागतील. या आठ गटांतून किमान तीन समूहातील चार विषय निवडावे लागतील. प्रत्येक विषयाचे चार पेपर असतील. त्यासाठी १५० पर्याय असतील.
आतापर्यंत ११ वी व १२ वी पर्यंत विज्ञान, वाणिज्य, कला शाखा होत्या. परंतु आता शाखांचे विभाजन नसेल. संगीत, क्रीडा, क्राफ्टला कला शिक्षण, शारीरिक शिक्षण तसेच व्यावसायिक शिक्षणाचा दर्जा गणित, विज्ञान, मानव्य, भाषा व सामाजिक विज्ञानासारखाच असेल. रिपोर्ट कार्डएेवजी हाॅलिस्टिक प्रोग्रेस कार्ड असे म्हटले जाईल.
बालवर्ग (८ ते ११ वर्षे) :
तीन भाषा व गणिताचा अभ्यास इयत्ता तिसरीत ८ वर्षांच्या मुलांना प्रवेश मिळेल. तीन भाषा व गणिताचा अभ्यास असेल. पाचव्या वर्गापर्यंतचे शिक्षण मातृभाषा किंवा स्थानिक भाषेतून होईल. तिसऱ्या वर्गात पहिल्यांदा विद्यार्थ्याचे मूल्यांकन होईल. पाचव्या वर्गाच्या अखेरीस दुसऱ्यांदा मूल्यांकन होईल.
माध्यमिक (११ ते १४ वर्षे) : व्होकेशनल एक्सपोजर असेल
सहाव्या वर्गात ११ वर्षांच्या मुलास प्रवेश मिळेल. आठव्या वर्गापर्यंत मुलांना व्होकेशनल एक्सपोजर मिळेल. त्याचे मूल्यांकन होणार नाही. भाषा व विज्ञानव्यतिरिक्त मानव्यशास्त्र, विज्ञान, कला, सामाजिक शास्त्राचा पायाभूत अभ्यास असेल. आठव्या वर्गाच्या अखेरीस तिसरे मूल्यांकन होईल. तिसरा, पाचवा व आठव्या वर्गातील मूल्यांकन बोर्ड परीक्षेसारखी होणार नाही. नियमित समुपदेशन. व्यावसायिक शिक्षणाचे मूल्यांकन नवव्या वर्गापासून होईल.
0 Comments