लेखक व संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद
संदर्भ : कृष्णमूर्ती खंड
नमस्कार,
आज आपण कुंडलीतील रिक्त स्थान याबाबत थोडक्यात जाणून घेणार आहोत.
प्रत्येक कुंडलीत १२ स्थान असतात. त्यामध्ये कोणता ग्रह किती अंश कलांवर आहे त्यानुसार नवग्रह व हर्शल, नेपच्यून, प्लुटो असे मिळून १२ ग्रह मांडलेले असतात.असे होत नाही कि प्रत्येक स्थानात १ ग्रह या प्रमाणे सर्व स्थाने व्यापून गेली. कोणते ना कोणते स्थान हे रिकामे च राहणार असते. पण याचा अर्थ असा नाही कि कोणता ग्रह नाही म्हणजे ते स्थान फळ देण्यास सक्षम नाही. उलट माझी मते रिक्त कुंडलीचा अभ्यास आधी प्राधान्याने करावा. त्यातून अनेक गोष्टी आपल्याला जसजसे सराव कराल तसे नजरेस पडतात, ज्याचा कुंडली सोडवताना नक्कीच फायदा होतो.
वस्तुत: ते स्थान रिकामे दिसत असले तरी, अनेक घटक त्या स्थांचे फळ देण्यासाठी कारणीभूत ठरत असतात. त्याचाच आपण इथे थोडक्यात विचार करणार आहोत.
प्रथम ज्या स्थानाचे फळ पाहायचे आहे, त्या स्थानाची कारकात्वे कोणती आहेत याची आधी मनाशी उजळणी करावी.
उदा. १ ले स्थान : डोके, रंग, रूप, शरीराची ठेवण, शरीर सुख, आवड, स्वभाव, शील आरोग्य, आयुष्य, प्रश्न कर्ता, धर्म त्रिकोण ई. गोष्टी दर्शवते.
२ रे स्थान : धन, कुटुंब, वाणी, कुटुंबातील वाढ, वक्तृत्व. उजवा डोळा, आरोग्यासाठी मारक स्थान, अर्थ त्रिकोण ई. गोष्टी दर्शवते.
३ रे स्थान : कर्तुत्व, भावंडे, लेखन, वाचन, छोटे प्रवास, बदल, पत्र व्यवहार, दस्त, प्रकाशन, सन्मान, करार, अफवा, कान, कंठ, बाहू, काम त्रिकोण ई. गोष्टी दर्शवते.
४ थे स्थान : सुख, आई, जमीन, मालमत्ता, शेतीवाडी, जलाशय, गुरे ढोरे, स्थावर, वाहन सौख्य, छाती, मोक्ष त्रिकोण ई. गोष्टी दर्शवते.
५ वे स्थान : संतती, करमणूक, नाटक, सिनेमा, कला, क्रीडा, प्रेम प्रकरण, जुगार, पूर्व जन्म, छंद, प्रेम विवाह, धर्म त्रिकोण ई. गोष्टी दर्शवते.
६ वे स्थान शत्रू, कालः, वाद, संकटे, संघर्ष, आजार, नोकर, नोकरी, कोर्ट कचेरी, कर्ज, पाळीव प्राणी, भाडेकरू, कंबर, वासना, अर्थ त्रिकोण ई. गोष्टी दर्शवते.
७ वे स्थान : विवाह, जोडीदाराचा स्वभाव, लैंगिक सुख, व्याभिचार, प्रतिस्पर्धी, आयुष्य, चोर, चोरी, प्रवासा दरम्यान थांबा, व्यवसाय, पश्चिम दिशा, आरोग्यास मारक स्थान, काम त्रिकोण ई. गोष्टी दर्शवते.
८ वे स्थान : मृत्यू, आयुष्य, कर्ज मुक्ती, स्त्री धन, गुप्त धन, शत्रू वारसा हक्क, लाचलुचपत, मानहानी, संकटे, पीडा, दुर्भाग्य, मोक्ष त्रिकोण ई. गोष्टी दर्शवते.
९ वे स्थान : भाग्य, वडील, गुरुजन, धर्म, लांबचा प्रवास, प्रगती, कीर्ती, उच्च शिक्षण, पूर्व पुण्याई, अंतर्ज्ञान, मांड्या, धर्म त्रिकोण ई. गोष्टी दर्शवते.
१० वे स्थान : कर्म, नोकरी, उद्योग, अधिकार, प्रतिष्ठा, भागीदार, वैद्य, दक्षिण दिशा, अर्थ त्रिकोण ई. गोष्टी दर्शवते.
११ वे स्थान : सर्व प्रकारचे लाभ, इच्छापूर्ती, मोठे भावंड, मित्र, शेजारी, काम त्रिकोण ई. गोष्टी दर्शवते.
१२ वे स्थान : त्रिक स्थान, मोक्ष त्रिकोण, हानी, खर्च, कर्जमुक्ती, परदेश गमन, गुंतवणूक, दिवाळखोरी, दान, गुप्त शत्रू, डावा डोळा ई. गोष्टी दर्शवते.
हे झाले बहुतांशी लग्नाच्या अनुरोधाने. त्यानंतर इतर स्थानांशी त्या स्थानाचा संबंध पापासून पहावा.
उदा. लग्नापासून ३ रे स्थान आपले धाकटे भावंड दाखवते. लग्नापासून ५ वे स्थान प्रथम संतती दाखवते, मग आपल्या दुसर्या संततीचा विचार करायचा झाल्यास प्रथम संततीचे धाकटे भावंड, म्हणजे ५ वे स्थानापासून ३ रे स्थान म्हणजेच लग्नापासून ७ वे स्थान आपली द्वितीय संतती दर्शवते.
४ थे स्थान आई दर्शवते मग आई चे धाकटे भावंड म्हणजेच लग्नापासून ६ वे स्थान आपला मामा, मावशी दर्शवतो.
२ रे स्थान कुटुंब स्थान मानले जाते, मग जोडीदाराचे(७ वे स्थान) २ रे स्थान म्हणजेच लग्नापासून ८ वे स्थान बायकोचे कुटुंब आणि आपली सासुरवाडी दर्शवते.
४ थे व ३ रे स्थान विचारात घेतले तर घरात बदल, घर विक्री, आईस आपल्या भावाव्दारे त्रास, आईचा खर्च, आईची यात्रा
९ वे १० वे स्थान विचारात घेतले तर, नोकरी व्यवसायातील स्थित्यंतरे, कामाच्या स्वरूपातील बदल, ई फळे विचारात घ्यावी.
अशा प्रकारे प्रत्येक स्थानापासून वेगवेगळी फळे निर्माण होतात. जातकाच्या प्रश्नाच्या अनुरोधाने त्याचे परीक्षण करावे.
त्यानंतर त्या स्थानात कोणती रास आलेली आहे याचे अवलोकन करावे. कोणत्या स्थानात कोणती रास आलेली आहे, त्या राशीची वैशिष्ट्ये व त्या राशीचा स्वामी त्याचे गुणधर्म या सर्व बाबी नीट तपासून त्याप्रमाणे फलादेशाची एक रूपरेखा तयार होईल.
येथे काही मुद्दे देत आहे ते ध्यानात घ्यावेत-
१. तो राशी स्वामी कोणत्या स्थानात स्थित आहे, त्याची २ री रास कोणते स्थान दर्शवते.
२. राशी स्वामी त्रिक स्थानाशी ( ६ वे, ८ वे, १२ वे) संबंधित आहे का.
३. ज्या स्थानाचे फळ बघायचे आहे त्या स्थानापासून अनिष्ट स्थानाशी संबंधित आहे का.
४. राशी स्वामी ग्रहावर कोणत्या ग्रहाची दृष्टी आहे का.
५. राशी स्वामी कोणत्या ग्रहाच्या युतीत आहे का.
६. त्या स्थानावर कोणत्या ग्रहाची दृष्टी आहे.
७. कृष्णमूर्ति पद्धती अनुसार रिक्त स्थानाचे अधिपतिच्या नक्षत्रात स्थित ग्रह त्याचे फल दर्शवितात. भावारंभास देखील महत्व दिले जाते. तो कोणत्या राशीत, नक्षत्रात व उपनक्षत्रात आहे हे तपासले जाते.
एका पित्याचा जन्म कन्या लग्न, चित्रा नक्षत्र प्रथम चरण मध्ये झाला. त्याला शनिची दशा चाललेली आहे. व चंद्र सुद्धा लग्नी स्थित आहे. जन्मवेळी शनि मेष मधे ८ वे स्थानात होता. याचे तात्पर्य पुढील प्रमाणे काढावयास हवे –
शनि मकरेचा अधिपति आहे व तो कन्या लग्ना पासून पंचम स्थानात आहे. मेषमध्ये स्थित असल्याने पंचम स्थानापासून केंद्रात आहे (अनेक ज्योतीषाचार्यांनी प्रतिपादन केले आहे एखाद्या स्थानापासून ४, ६, ८, १२ वे स्थानी पाप ग्रह असता ते स्थानाचे फळ नष्ट करू शकतील, आणि अन्य स्थानात स्थित ग्रह त्या स्थानांच्या फळामध्ये वाढ करतील.)
म्हणून अडचणी ज्या व्यक्तिस होतील, त्या पंचम स्थानाशी संबंधित व त्याचे द्वारा दर्शित होतील. खेळात त्याला अपयश येईल. प्रथम संततीची हानि होईल. त्याच्या मुलाचे संतुलन ठीक राहणार नाही, ज्या मुळे उत्तम स्वास्थ लाभणार नाही, त्याला स्वत:ला नेहमी पैसा कमविण्याची चिंता राहिल (शनि पंचमापासून दुस-या स्थानाचा पण अधिपति आहे) शनि षष्ठेश असून अष्टम असल्याने आपल्या स्थानावर शुभ दृष्टि देतो. म्हणून त्याचे कर्ज वाढू शकते व हे करताना त्याला अडचणी येणार नाही, कारण ती स्थिति शुभ आहे. जर एखादा ग्रह लाभ स्थानाचा अधिपति असून नुकसान दायक असता त्याच्या दशेमधे शुभ ग्रहाच्या मुक्तित लाभ प्राप्त होईल व अशुभ ग्रहाच्या मुक्ति मधे त्यास नुकसान होईल.
काही जणांची ही विचारधारा आहे कि, एखाद्या शुभ स्थानांचा अधिपतित्व द्वारा दर्शित शुभफल निरस्त होईल, कारण तो अशुभ स्थानाचा पण अधिपति आहे. माझ्या अभ्यासाप्रमाणे हे योग्य नाही. त्याला दोन्ही प्रकारचे फळ अनुभवास येतील. तो एक माध्यम द्वारा लाभ प्राप्त करेल व दुस-या माध्यम द्वारा नुकसानीत राहिल. त्याच्या खात्यात दोन प्रकारच्या घटना होतील १ जमा २ खर्च (लाभ व हानि). असे दोन्ही प्रकारचे फळ दिल्या विना दशा समाप्त होणार नाही. शेवटी तर त्याच्या दशेत अशुभ ग्रहांच्या अंतर्दशे/विदशे मधे त्याचा एक्सीडेन्ट होवून तो जखमी होईल, पण शुभ ग्रहाच्या अंतर्दशे/विदशे मधे तो ठीक पण होईल व त्याचे स्वास्थ्य उत्तम राहिल. चांगल्या स्थानाचे शुभफळ वाईट स्थानाचा वाईट फळाद्वारा निरस्त होणार नाही. जर ग्रह दोन्ही स्थानाचा अधिपति असेल.
अशा पद्धतीने अभ्यास व सराव करत गेले तर कोणीही माणूस एक चांगला ज्योतिषी बनू शकतो.
ज्योतिष मित्र मिलिंद
पुणे
संपर्क : ७०५८११५९४७
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)
0 Comments