विषय- शुक्रफल, शुक्र कारकतत्व

विषय- शुक्रफल, शुक्र कारकतत्व,  
संदर्भ- फलदिपीका, पाराशर ग्रंथ, नवग्रह ज्योतिष. 
लेखक- गजनान परब.  
                         शुक्र
साहित्य, संगीत, सभ्यता, सुंदरता, संतान, सुख, शांती, धन, एश्वर्य, वाहन, विवाह आणि प्रेमाचे प्रमुख कारक शुक्र ग्रह आहेत, या भौतिक जगातील सर्व सुख देऊ शकतो तो आहे शुक्र, आपल्या आकाश गंगेतील सर्वात चमकदार ग्रह, म्हणून ह्या जगात जी काही चमक आणि सौन्दर्य आहे ते या शुक्राच्या कारणाने आहे. आपल्या जीवनात जे काही भोग, विलास, आराम आणि आनंद आहे त्याचा प्रमुख कारक ग्रह शुक्र आहे, ‘शुक्र है तो सब कुछ शुक्र है’ ह्याला आपण बिगिनिंग ऑफ फेस्टिविटीच म्हणू शकतो, म्हणूनच जास्त करून नवीन फ्लिम, पिक्चर शुक्रवारीच रिलीज होताना दिसतात. 
विवाह आणि प्रेमाचा कारक आहे म्हणूनच विवाह विधी नंतर नववधूला शुक्राचा तारा आकाशात दाखवला जातो, कारण सौभाग्य कारक ग्रह शुक्राचा आशीर्वाद मिळेल, आणि वैवाहिक जीवन सुखी होईल, म्हणूनच संसारीक सुखा साठी शुक्र सर्वात महत्वपूर्ण ग्रह आहे, ज्यावेळी शुक्र गोचर मध्ये अस्त होतो, त्यावेळी विवाह कार्य, नवीन घर, नवीन जमीन, नवीन वाहन घेणे टाळण्यास सांगितले आहे, महर्षि पाराशर शुक्र आणि गुरु या दोन्ही ग्रहांना फळ देण्यास समान मानतात, कारण गुरु प्रमाणेच शुक्रा मध्ये पण दोष हरण्याची क्षमता आहे. 
शुक्र एवढे महत्वपूर्ण ग्रह आहेत की भगवान श्री कृष्ण गीतेच्या विभूति योग अध्याय मध्ये 10 व्या अध्याय च्या 36 व्या श्लोकात सांगतात- वृश्नियो मध्ये मी वासुदेव आहे, पांडवात मी धनंजय आहे, ऋषीमुनी मध्ये मी व्यास आहे आणि कवि मध्ये मी वृष्णाकवि आहे, वृष्णा हे शुक्राचार्यांचेच एक नाव आहे, कवि म्हणजेच ज्ञानी. तर शुक्र एवढा महत्वपूर्ण, शक्तिशाली आणि शुभ आहे, की भगवान ह्याला आपले स्वरूप बोलतात, आपली विभूति बोलतात, कवि म्हणजे साहित्य, संगीताचे संपूर्ण ज्ञान शुक्रा जवळ आहे, पौराणिक कथेत शुक्राच्या आईचे नाव काव्यमाता होते, यावरून शुक्र हे नाव पडल्याचे उल्लेख आहे, ह्यांचा जन्म स्वाति नक्षत्र आणि तुला राशीत झाल्याने त्यांची जन्म राशी तूळ आणि राहू नक्षत्र स्वामी असल्याने राहू मित्र मानला आहे. अंक ज्योतिष मध्ये 6 नंबरचे स्वामी मानले आहेत. 
ज्योतिषीय महत्व- 
गुरु- शुक्र दोन्ही नैसर्गिक शुभ ग्रह आहे, दोन्ही ग्रह अशुभता नष्ट करतात, आणि शुभतेत वृद्धी करतात, गुरु जेथे ज्ञान अधिक देतात तेथे शुक्र ज्ञान आणि धन दोन्ही देतात, पण शुक्र दैत्यगुरू झाल्याने त्यांचे ध्यान ज्ञानपक्ष पेक्षा धन पक्षाकडे जास्त गेले आहे, त्यामुळेच अधिकार प्राप्तीकडे कल आणि महत्वकांक्षा जास्त देतात, म्हणून शुक्र प्रभावित जातकत अधिकार प्राप्ती साठी सांसारिक लक्षाकडे विशेष ओढ असते. मग आपण कसे ओळखाल की शुक्र प्रभावित जातक कोण? अंक शास्त्र नुसार आपला जन्म 6, 15, आणि 24 तारीखला जन्म असेल, ज्यांचा मुलांक 6 येतो, व्रुषभ राशी, तुला राशी, या व्यतिरिक्त शुक्र मीन राशीत आपला प्रभाव देतो, आणि 1,2,4,5,7,9,10,11,12 या भावात पण शुक्र खूप चांगले परिणाम देतो, शुक्र केतूच्या व्यतिरिक्त एक मात्र असा ग्रह आहे जो 12 व्या भावात पण अत्यंत शुभ फळ देतो. मग लग्न राशि शुक्राची असेल तरीही जातक शुक्र प्रभावित असतो, त्याच बरोबर शुक्र, चंद्र युती, नवपंचम योग. आणि शुक्र नक्षत्र असेल तर असे जातक शुक्र प्रभावित असतात. 
शुक्र वृषभ, तुला राशीतून केंद्रस्थानी असेल तर मालव्य नावाचा महापुरुष राजयोग बनवतो, महर्षि पाराशर धन देण्यास ह्याला सर्वात मोठा राजयोग बोलतात. 
शुक्र संसारीक महत्व-
कालपुरुष कुंडलीत शुक्र दुसर्‍या आणि सातव्या भावाचे नैसर्गिक स्वामी मानले आहेत, कालपुरुष कुंडलीत दुसर्‍या स्थानात वृषभ राशी येते, आणि सातव्या घरात तुला राशी येते, येथून आपण जीवनसाथी, व्यापार आणि आपल्या सामाजिक दर्ज्याच्या विचार करतो, तर येथे हे सिद्ध होते सफल वैवाहिक जीवनासाठी, धन आणि प्रसिद्धी या साठी शुक्र सर्वात महत्वपूर्ण ग्रह बनतात. 
 त्याच बरोबर दूसरा भाव ह्याने आपण काय काय पाहतो वाणी म्हणजे आपली इमेज आणि खानपान आणि सातवा भाव अजून काय दर्शवतो आपले ‘प्रावेट बॉडी पार्ट’ तर शुक्र मध्ये ही पावर आहे. ट्रान्सफ्रांम करण्याची, म्हणजे आपण जे तोंडाने जे अॅन खातो ते अंतिम धातूच्या रूपात आपल्या शुक्रच्या रूपात म्हणजे विर्याच्या रूपात, स्पॅम च्या रूपात परिवर्तीत होते, म्हणून शुक्र जीवन आहे, म्हणून महर्षि पाराशर शुक्राला शेवटच्या म्हणजे 12 व्या घरात, 12 व्या राशीत जास्त शुभ का तर शुक्राला अंतिम रूप देण्यात सर्वात जास्त महारथ प्राप्त आहे, म्हणूनच शुक्राला कलाकार, कवि म्हटलं आहे, प्राचीन ग्रंथ सांगतात शुक्रात कुटल्याही गोष्टीस सर्वोतम रूप देण्याची क्षमता आहे, म्हणून कलेचे स्वाभाविक स्वामी मानले आहेत.
एवढे शुभ आहेत शुक्र. 
 जर आपल्या कुंडलीत शुक्र चांगला असेल तर आपण आपल्या जीवनात भोग नक्कीच कराल, चांगले वाहन सुख, घरदार, जीवन साथी, धनी आणि सुखी जीवन या सर्वांचे कारक शुक्र बनतो, प्रत्तेक प्रकारच्या इंद्रियांचे स्वामी आहेत, स्मेल, साईट, टच, टेस्ट, हिअर, लुक ह्या सर्व विषयांचे कारक पण शुक्र बनतात, त्याच बरोबर भाव म्हणजे लॉर्ड ऑफ एक्सप्रेशन चा अधिकार दिला आहे, म्हणूनच शुक्राला प्रेमाची देवी म्हटली आहे. वेगवेगळ्या प्रकारचे संगीत, नाट्य, कला, कविता म्हणजे शुक्र प्रभावित जातक या क्षेत्रात व्यवसायात असतात, म्हणजे फ्लिम, आर्ट आणि क्राफ्ट, मीडिया, फॅशन, फूड, फायनान्स, बिझनेस, ट्रान्सपोट, अडवाईजरी, कन्सल्टन्सी या विषयात करिअर बनवतात, म्हणजे नोकरी आणि व्यापारचे महत्वपूर्ण कारक बनतात शुक्र. 
आध्यात्मिक महत्व शुक्र-
शुक्र इच्छा आहे, इच्छा पासूनच सृष्टी निर्माण होते, सृष्टी निर्माण कोण करतात ब्रम्हदेव म्हणजे शुक्राचे देवता कोण आहेत ब्रम्हदेव, जसे ब्रम्हा सृष्टी निर्माण करतात याच प्रमाणे प्रत्तेक जीव पण आपल्या आतील ब्रम्हाच्या शक्तीने सृष्टी करतो, फरक फक्त हाच आहे की ब्रम्हा मानसी सृष्टी करतात आणि जीव मैथुनी सृष्टी करतो, शुक्राचे फूल पण कमळ आणि ब्रम्हाचे आसन पण फूल आहे, कमळ हे ज्ञानाचे प्रतीक मानले आहे, शुक्राची देवी आहे जगदंबा आणि जगदंबा कोण आहे मूळ प्रकृती आहे, ईश्वराची शक्ति आहे, ईश्वराला सृष्टी करण्याची ज्यावेळी इच्छा होते, त्यावेळी प्रकृतीला सृष्टी निर्माण करण्यास सांगतात, म्हणून शुक्रास संतान सृष्टी करण्याचा अधिकार दिला आहे. 
भगवान जर कमल नयन आहेत तर जगदंबा कमला आहे, तर कमळा मुळे विष्णु आणि लक्ष्मीचा संबंध बनतो, आपण जर ज्ञात असाल तर शुक्राची दोन नावे आहेत, वीर्य आणि रज यालाच रजस आणि रेतस पण म्हटले आहे, रजस यानेच राजसीक म्हणजेच सांसारिक हा शब्द बनला आहे. 
ज्यावेळी शुक्र राजसीक बनतो त्यावेळी आपल्या शरीरा मध्ये त्याची गती अधोमुखी होते, म्हणजे खालच्या भागाकडे चालतो, त्यावेळी संतान उत्पत्तीचे कार्य करतो, पण जेव्हा शुक्र रेतस रूपात चालतो त्यवेळी तो सात्विक बनतो, त्यावेळी तो उर्धोमुखी चालतो म्हणजे शरीरात वरच्या भागात चालतो, त्यावेळी तो योगी रूपात प्रकट होतो. या स्वरुपात शुक्र ब्रम्हाचे ज्ञान अंग दर्शवतो, हे शुक्रराचे आध्यात्मिक रूप आहे. 
ज्ञानाचे दोन ग्रह आहेत सूर्य आणि गुरु, शुक्र सूर्यापासून खगोलीय दृष्टीने हे 46 अंशा पेक्षा दूर जात नाही, म्हणजे शुक्र, बुध सूर्यापासून 2 राशी दूर जात नाही, आणि गुरुच्या राशीत शुक्र उच्च होतात, म्हणजे शुक्र, गुरु आणी रवी ह्यांच्या जास्त जवळ राहतात म्हणजे शुक्राचा ज्ञानाशी पण सखोल संबंध आहे, म्हणजे शुक्र केवळ संसार नाही आहे, संसार पण आहे आणि आसार पण आहे. 
आपल्या कुंडलीतील शुक्र स्थिति विषयी जर माहिती करून घ्यायची असेल तर कॉमेंट मध्ये देऊ शकता, वेळ भेटेल तस रिप्लाय नक्कीच देऊ. 

धन्यवाद.🙏
        
Astrology consultants. 
                🍂     
      Gajanan parab.
 Whtsp-9403435853.

Post a Comment

0 Comments