💫 वाहन सौख्य 💫
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
🚗 वाहन सुख आणि ज्योतिष शास्त्र फलकथन...
👆आताच्या वर्तमान काळात कूटूंबाला स्वतः ची एक तरी गाडी गरज बनलेली आहे, किती तरी लोक आयुष्यात गाडी घेण्यासाठी प्रयत्न करत असतात परंतु ते त्यांना प्राप्त करता येत नाही. ज्योतिषा मध्ये या विषयी विशेष योग नमूद आहे. पत्रिकेतील चतुर्थ भाव किंवा चतुर्थेश ग्रह सम्पत्ति आणि वाहनसुख दर्शवतो. यात सर्वात महत्वाची भुमिका बजावणारा ग्रह म्हणजे शुक्र ग्रह आहे. शुक्र हा आपल्या जीवनात विलासता आणि वैभवपूर्ण वस्तूंना प्रदान करतो. म्हणून पत्रिकेत हा ग्रह चतुर्थ किंवा चतुर्थेश मध्ये असणं वाहन सुखाचा कारक मानला जातो.
🚗 ज्योतिषाशास्त्रानुसार जाणून घेऊया जीवनात वाहन सुखाचा योग केंव्हा बनतात.
१)- जेंव्हा चतुर्थेश हा चतुर्थ भावात असेल आणि चतुर्थेश ची दृष्टी चतुर्थ भावात असेल तर व्यक्ती ला चांगले वाहन सुख मिळते....
२)- चतुर्थेश स्व किंवा उच्च राशीत होउन शुभ भावात असेल तर चांगला वाहन योग बनतो....
३)- चतुर्थेश नवम, दशम व लाभेश, लग्नेश किंवा पंचमेश सोबत राशी परिवर्तन सुध्दा व्यक्ती ला चांगले वाहन सुख देते......
४)- पत्रिकेतील शुक्र जर स्व किंवा उच्च राशीत म्हणजे वृषभ,तुळा,व मीन मध्ये होउन शुभ भावात असेल तर व्यक्ति ला मोठं वैभवपूर्ण वाहन सुख मिळते...
🚗५)- पत्रिकेत जर माल्वय योग बनला असेल तर व्यक्ति ला चांगले वाहन सुख मिळते....
६)- जर पत्रिकेत शुक्र १२व्या भावात असेल आणि पापी ग्रहांच्या प्रभावातून मूक्त असेल तर व्यक्ती ला चांगले वाहन प्राप्त होते..
७)- ज्यांच्या पत्रिकेत चतुर्थेश ६/८/१२ व्या भावात असेल, आपल्या नीच राशीत असेल, शत्रू ग्रहाने पीडित असेल तर अशा व्यक्तींना वाहनसुखात अडचणी येतात.
८)- चतुर्थ भाव पीडित किंवा कमजोर असेल तर व्यक्ती ला वाहन प्राप्तीत अडचणी येतात...
९)- ज्यांच्या पत्रिकेत शुक्र नीच राशीत कन्येत असेल आणि षष्ठ व अष्टम भावात असेल, केतु मंगळाने पीडित असेल, अस्त असेल किंवा अन्य कोणत्याही प्रकाराने कमजोर असेल तर अशा जातकाला कोणत्याही प्रकारचे वाहनसुख मिळत नाही....
🌸🌸🌸
0 Comments