ग्रह विचार - गुरू

विषय : ग्रह विचार - गुरू
लेखक व संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद
संदर्भ : कृष्णमूर्ति खंड

नमस्कार,

आज आपण गुरु या ग्रहाबद्दल माहिती घेणार आहोत.

खगोलशास्त्र : गुरु नक्षत्रांच्या समूहापासून पुष्कळ लांब आहे. हा सूर्यापासून ५० करोड़ मैल दूर असून पुष्कळ मोठा ग्रह आहे. याचा ८८००० व्यास आहे, जो पृथ्वीच्या व्यासापेक्षा जवळ-जवळ दहा पट मोठा आहे. गुरुच्या ग्रह मार्गातील अर्थ व्यास ज्याचे वर गुरु भ्रमण करतो, तो जवळ-जवळ १४ करोड़ ३० लक्ष मैल आहे. गुरूला सूर्याभोवती एक चक्कर पूर्ण करण्यास १२ वर्षापेक्षा थोडा कमी काळ लागतो.

गुरु मंगळ व शुक्रास सोडून इतर सर्व ग्रहापेक्षा तेज प्रकाशवाला ग्रह आहे. जेव्हा हा सूर्य व चंद्र यांच्या विपरित असतो, तेव्हा शुक्ल प्रतिपदे च्या दरम्यान रात्रिच्या वेळी हा स्पष्ट दिसतो. आकाशा मध्ये चंद्र प्रकाशित असेल तरीही, गुरु लहान डोळ्यांनी देखील पाहिला जाऊ शकतो.

गुरु गोल आहे. हा धृवावर चपटा आहे. हा पृथ्वीप्रमाणे त्याचे धुरीवर फिरतो. गुरुच्या वरील भागावर पूर्णपणे एकसारखा नाही म्हणून गुरुच्या सर्व भागावर भ्रमणचा काळ समान रूपाने नाही. हा आपल्या स्वत:भोवती पूर्ण एक चक्कर १० तास ला १० मिनीटे कमी असताना पूर्ण करतो.

गुरुचे ११ चंद्र आहेत, जेव्हा की पृथ्वीचा फक्त १ आहे व मंगळाचे २.

पौराणिक : गुरुला शिक्षक म्हटले जाते. अज्ञानाचे अंधकारास दूर करण्याकरता व ज्ञानाच्या प्रकाशास दीप्त करण्याकरता देवता गुरु द्वारे प्रदर्शित होते. प्राचीन ग्रीक लोक गुरुला ZEUS देवता वा पिता मानतात. इतर काही देशांमध्ये गुरुस AMMON, THOR, MERDACH ई. नावे आहेत. गुरु ईमानदारी व न्यायाची देवता आहे. हे बुद्धिमानीचे चिन्ह आहे. शैव लोक गुरुला “दक्षिणमूर्ती मानतात, वैष्णव लोक नारायण म्हणतात. गुरु हा देवांचा गुरु आणि शुक्र असुरांचा गुरु मानतात. त्यामुळे हे दोघे एकमेकांचे शत्रु आहेत असा समज आहे. परन्तु आदरणीय कृष्णमुर्ती यांचे असे मत आहे की-

१) जेव्हा गुरु व शुक्राची आकाशामध्ये युति असते, तेव्हा फक्त समृद्धीचे फल प्राप्त होते ते आकाशात भांडत नाहीत.

२) गुरु आत्माच्या विकासा करिता आहे, परलोक साधना करिता जाहे. सांसारिक जीवनात आत्मिक शांतीसाठी आहे.

शुक्र सर्व भौतिक सुखाकरिता आहे. यामध्ये ज्या मध्ये कार, फर्नीचर, ई आरामदायी वस्तू, पत्नी, प्रेम करिता इत्यादि अंतर्भूत. म्हणून जातकाचे मन हे संसाराच्या जीवनाच्या सुखाचा अधिक भोग घेण्यामध्ये रमतो. इहलोक सुख जास्त भोगतो. त्याला ईश्वराचे चिंतन करता, आध्यात्मिक विकासा करता वेळ कुठे आहे.

थोडक्यात दोन्ही ग्रहांद्वारा प्राप्त विचारधारा, चरित्र एक दुसर्याचे विपरित आहे, म्हणून ते शत्रु समाजले जातात.

(3) जर शुक्र गुरुचा शत्रु असता तर तो शत्रुची राशि मीन मध्ये उच्चचा कसा होऊ शकेल, ज्याचा स्वामी गुरु आहे. म्हणून ग्रहाचा शत्रूते बाबत बोलले जाते, त्याला वरील प्रमाणे समजून देण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

परन्तु हे काही अर्थी ठीक आहे की, जे लोक शुक्राच्या २ राशिमधून कोणत्याही एका मध्ये जन्मतात. तर गुरु ६ व ८ चा स्वामी असेल. अश्या प्रकारे जे लोक गुरु राशि धनु वा मीन मध्ये जन्मलेले असतील, त्याचे ६ व ८ चा स्वामी होईल, म्हणून गुरु शुक्र वाईट फल देईल. ज्या प्रकारे बुध जातका करिता व मंगळ व मंगळ जातका करिता बुध यांची मानसिक विचारधारा बिल्कुल विपरित असेल. बुध जातक एकदा दोनदा, तीनदा विचार करतात व मगच कार्य करितात, जेव्हा की मंगळ जातक पहिले कार्य करतील, मग विचार करितात.

जर गुरु आपल्या करिता लाभदायक आहे. स्थिती या स्वामित्व द्वारे व जर गुरु अन्य ग्रहा बरोबर युति मध्ये असेल, किंवा राशि नक्षत्रे किंवा स्थितीच्या मुळे संबंधित असेल, तर तो त्याचे प्रति आपला ठीक निर्णय करू शकतो व दृढ स्वभाव, चिंतन, मनन, ध्यान व प्रार्थना करणे यासाठी खालील स्तोत्र उपयुक्त ठरतील.

गुरु सूर्य : सूर्य नारायण, सूर्य, नवग्रह
गुरु चंद्र : राजेश्वरी देवी लक्ष्मी
गुरु मंगळ : बाळ सुब्रम्हण्यम्, कुमारम्
गुरु बुध : सत्य नारायण
गुरु : नारायण या दक्षिण मूर्ति
गुरु शुक्र : लक्ष्मीनारायण
गुरु शनी : कृष्ण (गीता पारायण) इत्यादि.
गुरु इंद्रचे प्रतिनिधित्व करतो. हा शक्तिचा आधिपति आहे. हा ऋग्वेद व हेमंत ऋतु (डिसेम्बर-जानेवारी) चा स्वामी आहे. हा सतगुणी म्हटला जातो. आपले भाग्य गुरु द्वारे दर्शित होते. तो धनाचा व परिवाराचा अधिपती ग्रह आहे.

ज्योतिष : एखादे जातकाचे कुंडली मध्ये गुरु व ९ वें स्थान त्याचे पूर्व जन्मात केले गेलेले पुण्य कार्यांना दर्शवतों. व या जन्मा मध्ये त्याला किती सफलता, मान, सन्मान, भाग्य व कीर्ति प्राप्त होईल, याची सीमा निर्धारित करतो. मग तेही अन्य ग्रह खराब स्थिति मध्ये स्थित असता व जातकाला अनेक अडचणी ना पार करणे व वाईट फळांपासून मुक्ति प्राप्त करण्या करिता कमीत कमी शेवटच्या वेळी दैवी सहाय्यता देतो. वाईट ग्रह अश्या वाईट फला’ करिता कारणीभूत होईल, परंतु गुरु ऐनवेळी दोस्त झाल्याने अंतिम क्षणी उपस्थित होईल व जातकास वाचवेल. जेव्हा की तो म्हणेल स`नकात आले होते, पण देवाने वाचवले..

उदा. एकदा एक मोटार सायकल सारखी बंद पडत होती व चालू करणे त्रासदायक वाटत होते. पोलीसामुळे त्याला थांबावे लागले होते. जेव्हा जाण्याचा संकेत दिला गेला, तेव्हा मोटर सायकल चालूच होईना. त्यावेळी अचानक मागील एक मोटरकार चा त्याला धक्का बसला, ज्या मुळे मोटर सायकल बिना काही प्रयत्न करता एकदम चालू होऊन गेली, कार त्याचे करिता ईश्वर होती.

गुरु अग्निमय, योग्य, लाभदायक, फलदायक, पुरुष ग्रह प्रसन्न, प्रसन्न आशावादी, खर्चिक, सकारात्मक ग्रह आहे, जातकाचा स्वभाव स्पष्ट व उदार असेल. गुरु उच्च आर्थिक योग्यता व योग्य निर्णय प्रदाण करितो. उच्च मेंदू व आत्मोन्नति गुरु द्वारे दर्शित होतात, म्हणून हा शिक्षण, कायदा, धर्म, देवदर्शन, बैंकिंग व्यवस्था व अर्थ व्यवस्था दर्शवितो. गुरु धार्मिकता, किती मोठ्याना सम्मान देईल, उपदेशक, पौराणिक कथा वाचक, उपनिषद, सन्मान दर्शवतो.

गुरु धनु व मीन राशिचा स्वामी आहे. हा कर्क राशि मध्ये उच्च असतो. धनु राशि चे चिन्ह धनुर्धारी आहे. म्हणून गुरुप्रधान व्यक्ती वा दशाकाळात ते नेम (निशाण लावण्यामध्ये तरबेज असतात), ते बाह्य खेळ व व्यायाम पसंत करितात. धनु राशि प्रवास दर्शवते., कारण ही राशि चक्रातील ९ वी राशि आहे व ९ वे स्थान दीर्घयात्रा ला दर्शित करते. ही एक द्विस्वभाव राशि आहे, जी लोलकाप्रमाणे हलणे फिरणे व एका स्थानापासून दूसरे स्थानी परत येणे दर्शित करते. गुरु मीन राशिचा स्वामी असल्याने जातक शांत होईल. आराम, दीर्घयात्रा व विदेशात जीवन व्यतीत करणे पसंत करेल. जातक धर्मा मध्ये विश्वास ठेवील. भावात्मक विचारधारा असू शकते. हा रहस्या मध्ये रुचि ठेवतो, कोणी व्यक्ति गुप्तचर असू शकतो, कादंबरीकार ही होऊ शकतो.

गुरु नियमाचा अधिपति आहे म्हणून जातक कायदे मानणारा, खरा, ईमानदार, विश्वसनीय वक्तव्यशील होईल. जातक तर्कयूक्त व विस्तृत विचारधारा ठेवेल. गुरु मीन राशिचा स्वामी आहे, जी राशि चक्रातील १२ वी राशि व ६ व्या राशि पासून ज्याला राशि चक्राचा दवाखाना म्हटला जातो, त्याचे विपरित आहे. कारण १२ वी राशि मीन जलराशी असल्याने हे दर्शविते की तोंडाने औषध घेण्याने तो ठीक होऊ शकतो. प्राचीनकाळी चिकित्सक लोक गुरुच्या अधिपत्या मध्ये औषध घेत असत. म्हणून गुरु जातक सामान्य पणे संभव असेल तर शल्य चिकित्सा पेक्षा औषध घेणे पसंत करतात. गुरु अधिपत्य द्वारे शुभग्रह असल्याने प्रसन्नता व उदारता, आनंद व उल्हास प्रदान करतो. याचा दशेमध्ये कोणी व्यक्ति सम्मानाची आशा करू शकतो. याचे द्वारे अनुकूल वातावरणाची प्राप्ति होईल. जीवनामध्ये उन्नति, समृद्धि, दार्शनिक व विश्वबन्धुत्वचा स्वभाव, चांगले चरित्र व नैतिकता शांति व समृद्धि स्वास्थ्य, धन, पण गुरुद्वारे मिळते.

गुरु पीडित असेल तर व वाईट स्थानांचा अधिपति असेल तर तो जातक अतिवादी होईल. हा पुष्कळ उदार, खर्चिक पण असेल अत्यंत आशावादी, खोट्या आशा, असावधानी, कर्ज, तंटे, सट्ट्यामध्ये असफलता, निराशाजनक कार्य, जुगार, बैकाचा दबाव, मुलाद्वारे कष्ट, खोटी प्रतिष्ठा, आपल्या क्षमतेपेक्षा अधिक संस्थाना दान देणे, मंदिर व धार्मिकतेचा देखावा, दुस-यावर विश्वास केल्याने नुकसान, सस्ती लोकप्रियता, कोप व कलंक, अत्यंत कष्टी, लंबोदर, चूकीचे निर्णय, चुकीची गणना हे सर्व कार्य गुरुचे आहे, जेव्हा अन्य ग्रहांची गुरुवर वाईट दृष्टि असेल.

शारीरिक आकृति : गुरुला एक न्यायाधीश म्हटले जाते व सेक्सपीयर ने न्यायाधीशचे सुदृढ शरीरवाला, लट्ठ, मोठ्या पोटाचा व्यक्ति असे वर्णन केले आहे. अश्या प्रकारे गुरु जातक युवावस्था मध्ये चांगल्या शरीराचा, मांसपेशी युक्त शरीर, बाह्य खेळामुळे असे धष्ट-पुष्ट होऊन जातात की ते आपल्या शरीर विकासाचा कारणाने सन्मानित केले जातात. जर कोणी व्यक्ति पूर्वी पासून एखाद्या सीट वर बसला असेल, ज्यामध्ये दोन व्यक्ति बसू शक्तात व जर गुरु जातक नंतर प्रवेश करितो तर व्यक्ति सीट रिक्त करून गुरु जातकास देतो. दूसरे लोकाना हे दिसले कि गुरु जातकाचे आदरामुळे असे झाले, यद्यपि त्या व्यक्तिने या करिता जागा रिकामी केली असती ज्यामुळे तो दबून जातो..

हा लिव्हर, गाठ, रक्त नळ्यांमध्ये रक्तसंचार व शरीरामध्ये चरबी दर्शवितो.

गुरु मुळे उत्पन्न होणारे रोग : लिव्हर, पीलिया, जलोदर, पोटामध्ये वायु विकार, मंदाग्नि, फोड, हर्निया, चर्मरोग इत्यादि.

प्राणी : घोड़े, हत्ती व बैल

पक्षी : मोर

स्थान : मंदिर, न्यायालय, कॉलेज, शाळा व मोठ-मोठे महाल, दरबार हॉल, विधानसभा सदन , , पुरोहित लोक व्याख्याने देतात, अथवा पुराणाचे वाचन, करितात, जेथे धार्मिक चर्चा होते, असे स्थान.

राजनैतिक : मोठ-मोठ्या योजना ज्यामध्ये अधिक खर्च होईल, मोठ-मोठे व्यापारी, अधिकारी, शासनद्वारे निर्मिती केली जाईल, शाष्ठा-कालेज-विश्वविद्यालय, दान योग्य संस्था, हॉस्पिटल, आश्रम, चिकित्सालय, वस्तीपासून दूरचे चिकित्सालय, जहाज, नोकरा करिता क्वाटर्स, बैंक बिल्डींग, चर्च, मशीद, कोर्ट मध्ये सुधारणा इत्यादि मोठ्या प्रमाणात केले जाईल.

आर्थिक : मुक्त व्यापार, अनियंत्रण, दीर्घ उत्पादन, मोठ्या प्रमाणात उत्पत्ति, मुद्रांचे चलन, रिजर्व बैंक मध्ये अधिक प्राप्ति व जमा, विदेशा मध्ये लाभ, विदेशी विनिमय ई पासून लाभ. परिणाम स्वरूप stock एक्सचेंजची गतिविधी, सामान्य पणे अधिक होतील, शेअरची किमती मध्ये अधिक दृढ़ता मध्ये वृद्धि होईल, नव्या-नव्या कंपन्या उद्द्मवतील, उत्पादन संतोषकारक राहिल, बोनस, शेअर्स दिले जातील, शासन, आयकर व अन्य अप्रत्यक्ष करामध्ये अधिक प्राप्ति करेल.

उत्पादन : सर्व चरबीयुक्त खाद्य पदार्थ, लोणी, तूप इत्यादि, मिष्ठान्न युक्त पदार्थ, मोठ-मोठे वृक्ष, रबर, धातु, सोने, टीन हत्यादि.

गुरुवर सूर्याची शुभ दृष्टि :

सूर्य जर गुरुवर शुभ दृष्टि असेल तर, तो जातक विस्तृत विचारधारा वाला असेल, विफलता व भयानक आजारापासून लवकर मुक्त व्हाल. जातकाचे प्रसन्नचित दयाळू व सहानुभूतिची प्रवृत्ति ने सर्वांशी मैत्री होईल. तो स्पष्ट रूपाने विचार करेल, कामात तरबेज असेल व योग्य तो निर्णय घेईल. तो योग्य मार्गाने कमवेल व त्याची प्राप्ति काळे धन नसेल, तो दुस-याचे नुकसान करून लाभ प्राप्त करणार नाही. तो धार्मिक असू शकतो व धार्मिक संस्थामध्ये अनेक संस्था पैकी तो एक स्वतः असू शकतो, न्याय, अर्थ, राजनीति, बैंक व शिक्षा विभाग व शिक्षण संस्था मध्ये तो कार्य करु शकतो. अध्यक्ष, मेयर, कौन्सलर, लोकसभा सदस्य, विधानसभा सदस्य, सम्माननीय पद, हे सूर्य वा चन्द्र यांच्या गुरुवर शुभ दृष्टिद्वारे प्रदर्शित होतात.

गुरुवर चंद्राची शुभ दृष्टि :

चंद्राची गुरुवर शुभ दृष्टि असेल, तर तो योग्य, महान तत्पर व आशावादी स्वभाव प्रदान करतो तो प्रसिद्ध, ईमानदार, वरिष्ठ असेल व जसजशी त्याचे वय वाढेल त्याचे शरीर रचना मजबूत होईल व तर्कबुद्धीत वाढ होईल. त्याचे आदर्श उच्च व त्याची कल्पना उपजाऊ व फलदायी होईल. कोर्ट कचेरी द्वारा कोणी त्रास व वायफळ खर्च होणार नाही. तो सट्टा वा जुगारा मध्ये निराशा चे अवसर प्राप्त करणार नाही.

गुरुवर मंगळाची शुभ दृष्टि :

मंगळ गुरु शुभ दृष्टि मध्ये असेल तर जातकास ईमानदार, विश्वसनीय व योग्यता प्रदान करतो, तो स्पष्ट वक्ता होईल व तो न हि उधळ्या व अधिक कंजूसही होणार नाही. तो व्यापारा मध्ये सफल व समाजामध्ये प्रसिद्ध होईल. कारण तो फार चतुर होईल. त्याचे मध्ये रचनात्मक योग्यता असेल. कोणतेही कार्य त्याला पूर्ण शक्ति द्वारे पूर्ण करेल, बाह्य खेळांची त्याला आवड असेल व तो उत्तम खेळाडू असेल व त्याचा नोकरीत लाभ होईल. जनरल मैनेजर ज्याचा तो स्पोर्टमन आहे प्रवासाची आवड, उच्च आदर्शाची इच्छा, जनरल मैनेजर, मैनेजिंग डायरेक्टर, एखादे समाजाचा अध्यक्ष, न्यायाधीश, धार्मिक प्रमुख, उत्तम स्वास्थ्य, चेतना, शक्ति व धैर्य हे लाभदायक दृष्टि द्वारा प्राप्त करेल, जेव्हा जातक या दोन ग्रहाची अंर्तदशा मध्ये असेल.

गुरुवर मंगळाची शुभ दृष्टि :

बुध व गुरु शुभ दृष्टि जातका करता एक संपत्ती आहे. तो नेहमी काही वस्तुच्या चांगल्या गोष्टीनाच पाहिल. प्रतिकुल वेळी सुद्धा तो उत्साह कायम ठेवेल, त्याचे मन पुष्कष्ठ विस्तृत राहील. तो चंचल राहील. बुद्धिमान पूर्ण सावधानी द्वारा शुम स्थिती निर्माण करेल. तो प्रामाणिक पणे कार्य करेल, तो बुधाला मुळे विचारधारा तयार करण्यामध्ये थोडा सावकाश असू शकतो. परन्तु त्यांना निश्चय वा अंतिम निर्णय विवादरहित असेल.

विधी, साहित्य विदेशाशी सम्पर्क, विदेशी सहयोग, आयात, निर्माण, ससंपादन, प्रकाशन, प्रसारण, गणित, बैंकिंग, अकाउन्ट्स, ऑडीटिंग, सिव्हील इंजीनियरिंग व तसेच अनेक व्यवसाय असू शकतात व एकापेक्षा अधिक व्यवसायामध्ये तो निपुण असू शक्तो, बुधा द्वारे आवडीची विविधता आढळून येते,

गुरुवर शुक्राची शुभ दृष्टि :

शुक्र व गुरु ला जर शुभ दृष्टिने पहात असेल, तर महान सफलता व उत्तम भाग्य निश्चित रुपाने दिसते. जातक धनाचा संग्रह करेल, जीवनामध्ये सर्व सुख प्राप्त करेल व चांगल्या स्त्रीशी विवाह होईल, तो अधिक सामाजिक सन्मान मिळवेल. तो नेहमी हसतमुख, प्रसन्न, आशावादी व विशाल हृदयी असतो. तो अत्याधिक आनंद आयुष्यातील सर्व सुख प्राप्त करेल. यात्रा द्वारे तो बऱ्याच मित्रांना आपलासा करेल. आपल्या इच्छांची पूर्ति मध्ये काही कमी ठेवणार नाही. तो दुस-या द्वारे विश्वासघात अथवा नुकसान प्राप्त करणार नाही. तो व्यापारा मध्ये असे जोडीदार निवडेल जे जन्मजात भाग्यशाली असतील. तो सोसायटी, क्लब, ई. मध्ये प्रिय असेल. राजनीतिज्ञ, असल्यामुळे जनता द्वारे प्रशंसनीय, सन्मानित व प्रेम प्राप्त करेल. सावकार पण त्याला सहायता देण्याकरिता तत्पर राहतील. वकील व न्यायाधीश पण त्याचे हिताचे भेटतील. गुरु व शुक्र हे दोन्ही ग्रह त्याचे पेन्शनचा हिशोब, वेतनशीट इत्यादि वेळेवर देईल व तो कष्ट भोगणार नाही. परन्तु ज्याचा गुरु व शुक्र वाईट दृष्टियुक्त असेल, तर कितीही प्रयत्न केले तरी तो आपली पेन्शन वेळेवर प्राप्त करणार नाही.

जातक वस्तुतः अकाउन्ट्स, ऑडीट, संगीत, पशु चिकित्सा, सट्टा व स्वयंचलित यंत्र जसे कार चा व्यापार, जवाहिर, बहुमूल्य विलासिताच्या वस्तु, सुगंधित पदार्थ ई. द्वारे कमाई करू शकतो.

गुरुवर शुक्राची शुभ दृष्टि :

जर जातकाचे कुंडली मध्ये गुरु, शनि द्वारे शुभ दृष्टि प्राप्त करत असेल, तर त्याचे मन दार्शनिक होईल व तो आपल्या संबंधीयाना व मित्राशी अधिक संबंध ठेवणार नाही. त्याचे मध्ये न्यायाची भावना अधिक दृढ राहील व नैतिक कार्य द्वारे तो वृद्ध, लहान, सर्वांचे प्रेम प्राप्त करेल व समाजामध्ये उच्च सन्मान प्राप्त करेल.

जर तो खाण मालक, सिमेन्ट व्यापारी, सरकारी योजनाचा अंतर्गत घरांचा ठेकेदार असेल तर कमाईत भाग्यवान असेल. तो आपल्या मुलाबाळा मध्ये सुखी व धार्मिक जीवन व्यतीत करेल. उत्तम स्वास्थ्य व धनाचे सुख प्राप्त करेल. निवृत्तीनंतर योगासन चा अभ्यास वा सन्यस्त आयुष्य जगायची इच्छा ठेवेल.

आज येथेच थांबू.

ज्योतिष मित्र मिलिंद
ज्योतिष सल्ला व मार्गदर्शनासाठी (सशुल्क) संपर्क : 7058115947

Post a Comment

0 Comments