दैव आणि कर्म

*नक्की वाचा छान आहे..*

🙏*दैव आणि कर्म*🙏

      आमच्या गल्लीत एक ,दुकानदार आहे. 
        मी त्याच्या दुकानावर गेलो व त्याला विचारले कि बाबा रे! मला एक प्रश्न विचारायचा आहे, त्याचे उत्तर देवू शकतोस का? 
तो म्हणाला तुम्ही खुशाल विचारा, मी नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करीन.
         मी विचारले कि माणुुस मेहनत करतो, मग त्याला यश मिळाले,.कि तो म्हणतो हे देवाने यश पदरात टाकले. 
मला सांग दैव श्रेष्ठ कि मेहनत?
         मला वाटले कि याची पुरती बोलती बंद होणार, पण त्याने जे उत्तर दिले ते एकुन मी अवाक झालो. 
   . बोलती बंद त्याची नाही तर माझीच बोलती बंद झाली.
           त्याने उत्तर दिले, तो म्हणाला, मला सांगा तुमचे बँकेत सेफ डिपॉजीट चे लॉकर आहे? त्या लॉकरला दोन चाव्या असतात. एक तुमच्याकडे आणि एक बँक मँनेजर कडे. लॉकर उघडतानां त्या दोन्ही चाव्या लॉकर ला लावाव्या लागतात. तरच तो लॉकर उघडते अन्यथा नाही.बरोबर ना? मी म्हणालो बरोबर, पण याचा मी विचारलेल्या प्रश्नाचा काम संबंध?
            तो म्हणाला जसे बँक लॉकरला दोन चाव्या असतात, तश्याच आपल्या मानवास नियतीने दोन चाव्या दिल्या. एक मेहनतची चावी, ती आपल्या पाशी असते. तर दुसरी नशीब (दैव) चावी ही त्या परमेश्वरा पाशी असते. 
          आपण आपली चावी यशाच्या लॉकरला लावून द्यायची, जेव्हा परमेश्वर त्याकडची चावी यशाच्या लॉकरला लावेल, तेव्हाच आपले यशाचे लॉकर उघडेल अन्यथा नाही.
          यशा साठी मेहनत व नशीब या दोन्ही चाव्या आवश्यक आहे. त्या शिवाय यशाचे द्वार उघडणार नाही.
मानवाने मेहनत करता करता त्या परमेश्वराचे सतत नामस्मरण करत राहावे. तरच त्याला यश मिळेल, अन्यथा नाही. नुसती मेहनत करूनही उपयोग नाही व नुसती भक्ती करुन ही उपयोग नाही.
         *यश मिळवण्यासाठी मेहनत व भक्ति दोन्ही आवश्यक आहे.*

श्री स्वामी समर्थ 💐🙏

Post a Comment

0 Comments