पितृअष्टक

* पितृपक्ष निमित्त*
            *पितृअष्टक*
  
जयांच्या कृपेने या कुळी जन्म झाला
पुढे वारसा हा सदा वाढविला 
अशा नम्र स्मरतो त्या पितरांना
नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना || १ ||
इथे मान सन्मान सारा मिळाला 
पुढे मार्ग तो सदा दाखविला 
कृपा हीच सारी केली तयांना
नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना || २ ||
मिळो सद् गती मज पितरांना
विनती हीच माझी त्रिदेवतांना
कृती कर्म माझ्या मिळो मोक्ष त्यांना 
नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना || ३ ||
जोडून कर हे विनती तयांना  
अग्नि वरूण वायु आदी देवतांना 
सदा साह्य देवोनी उध्दरी पितरांना
नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना || ४ ||
 वसुरूद्रदित्य स्वरूप पितरांना
सप्तगोत्रे एकोत्तरशतादी कुलांना 
मुक्तीमार्ग द्यावा ऊध्दरून त्यांना
नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना || ५ ||
करूनी सिध्दता भोजनाची तयांना
पक्वान्ने आवडीनें बनवून नाना
सदा तृप्ती होवो जोडी करांना
नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना || ६ ||
मनोभावे पुजूनी तिला, यवाने
विप्रास देऊन दक्षिणा त्वरेने 
आशिष द्याहो आम्हा सकलांना
नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना || ७ ||
सदा स्मृती राहो आपुलीच आम्हा 
न्यून काही राहाता माफी कराना 
गोड मानुनी घ्यावे सेवा व्रतांना 
नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना || ८ |।
*हे अष्टक पितृपक्षात रोज निष्ठेने म्हणावे.... आणि आपल्या पितरांच्या मोक्षगती साठी प्रार्थना करावी...* *ह्याचे परिणाम पाहुन आश्चर्यचकित व्हाल*

Post a Comment

0 Comments