विकासाच्या नावाखाली भविष्य टांगणीवर?

अंधश्रद्धा मूक्त, विज्ञानवादी, विकसित, सूशिक्षीत, अधूनिक समाज खरच जगाला प्रगतीच्या नावाने विनाशाकडे तर नेत नाही ना?
पूर्वजांना अशीक्षीत अंधश्रद्धाळू म्हणून  हिणवणारे...
विकासाच्या नावाने संस्कृतीचा र्हास करून अधूनिकतेचा गर्व करणार्यानी हा लेख जरूर वाचावा....
पूर्वज मूर्ख होते का आपण मूर्ख आहोत...!

विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा र्हास केलाय तूम्ही....

 मधमाशी विविध प्रकारचा वनस्पतीचे परागीभवन करीत असतात, बरीच फळझाड, फुलझाड, भाजीपाला, धान्य पिके याचं परागीभवन फक्त मधमाश्याच करू शकतात. जर याचं प्रमाण कमी होत गेल तर आपल्या खाद्यातील अनेक घटक नष्ट होतील आणि मग वनस्पतीच्या अनेक प्रजाती नष्ट होऊन, अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होऊन भूकबळी वाढतील आणि मग अन्नही मिळणार नाही.* अश्या अनेक बाबी त्यांनी जगासमोर मांडल्या आहेत. विशेष म्हणजे जे अन्न परागीभवन होऊन येत नाही ते खाण्यासाठी सुद्धा जास्त पौष्टिक नसते.

 *हायब्रीड अन्न खाऊन आपल्या शाररीक क्षमतेचा विकास, मानसिक क्षमतेचा विकास होत नाही हे आता विज्ञानानं सिद्ध केले आहे.*

 मात्र जगण्याच्या स्पर्धेत आपण हरवून बसलोय. मात्र पुढील पिढीला अतिशय कुमकुवत करीत आहोत. शाररीक क्षमता नसल्याने मानव आपली पुढील पिढी वाढवू सुद्धा शकणार नाही असे भाकीत होत आहेत. आपण बारकाईने पाहिल्यास अलीकडील काळात अनेक डाळिंब बागायतदार मधमाश्याच्या पेटांच्या शोधात असतात कारण कि *डाळींब असे झाड आहे कि याचे परागीभवन फक मधमाश्याच करू शकतात. जर मधमाश्या नसतील तर डाळिंब फुलांचे रुपांतर फळात होतच नाही कारण याची नर व मादी फुले वेगवेगळी असतात आणि मग मधमाश्या एका फुलामधील नर उचलून मादी फुलावर सोडण्याचे महत्वाचे काम करतात. आणि फक्त माधामाश्याच हे काम करू शकतात, हे आजच्या जगाला समजले आहे. मात्र *मधमाश्यांना काय आवडते हे आपण शिकत नाही, तिला पोळे करायला कुठली झाडे आवडतात, पराग व मकरंद गोळा करायला कुठली झाडे आवडतात.*

आपल्यापैकी बहुतेकजन हिमालयात जातात मात्र हिमलायात मनालीच्या पायथ्याशी अनेक गावे आहेत कि जिथ अगदी २०० वर्षेपूर्वी पासून मधमाशी पालन करीत आहेत, मात्र हे कधीच पाहत नाहीत, खरतर आपल पर्यटन हे शाश्वत व ग्रामीण भागाला उर्जा देणार असले पाहिजे. मात्र असे होताना दिसत नाही. अर्थात मधमाशी पालन २०० वर्षपूर्वी ते पण शास्त्रीयदृष्ट्या पालन केल्याचे आढळून येते. आपल्या राहत्या घरात मधमाश्या पालन करीत आहेत आणि दरवर्षी १० किलो मध विकतात आणि ३ किलो  मध स्वतःसाठी ठेवतात. मात्र खरतर हे करण्यापाठीमागे उद्धेश परागीभवन हा असून अनेक पिके यावर अवलंबून आहेत. आणि हे सगळ त्या मधमाश्यांनी सुद्धा स्वीकारले आहे. यात ही माणस त्यांना अति थंडीत गुळाचा व साखरेचा पाक करून ठेवतात काहीजण तर गोळा केलेला मधसुद्धा ठेवतात.    

आपल्याला वाटत आपणच शेती करतो मात्र मुंग्या, मधमाश्या, कीटक, गांडुळे, साप, पक्षी असे सर्वच जीव शेतकऱ्याला शेती करण्यासाठी मदत करीत असतात. यात सर्वात आघाडीवर मधमाश्या आहेत हे विसरून चालणार नाही कारण फुलांचे फळात रुपांतर करण्यात मधमाश्या पटाईत असतात, त्यांच्याशिवाय दुसरे किटक हे काम करूच शकत नाहीत, अगदी डाळिंब, काकडी, सफरचंद अशी अतिशय महत्वाची फळे. आपण फक्त जगात मधमाश्या आहेत तोपर्यंतच करू शकतो हे वेळीच जगाने लक्षात घेणे गरजेचे आहे.   मधमाश्याची बदलती जीवनशैली यावर अनेक बाबी समोर येत आहेत, यात १९९० मध्ये साध मधमाश्यांच पोळ हे फक्त काटेरी झाडावर बसायची यात *साधी बाभूळ, बोर* ही झाड महत्वाची होती, मात्र आजच्या काळात हीच पोळी काटेरी झाड सोडून जांभूळ, आंबा अश्या सहज शिकार होईल अश्या झाडांवर शिवाय घरात, भिंतीवर दिसू लागली, हा अतिशय महत्वाचा बदल दिसून येत आहे.  हा बदल करण्यापाठीमागे कारण सुद्धा असेच आहे की, *आजकाल बोरी व बाभळी तोडण्याचे प्रमाण भयानक वाढत गेले आणि वास्तवात तर आता बोरी व बाभळी दुर्मिळ होत गेल्या, पर्यायाने त्यांनी आपल्या मूळ नैसर्गिक अधिवासात बदल करीत नवे पर्याय स्वीकारला केवळ माणसांच्या चुकामुळेच..*

आगी मधमाश्या तर जंगलातील उंच झाड कमी होत गेली शिवाय, नैसर्गिक पाणवठे कमी होत गेले, ज्यात या मधमाश्या सहज मातीत उतरून गाळात पाणी पिऊ शकत होत्या, आता हे पाणवठे नष्ट झालेत, यात काही वन अधिकाऱ्यांनी तर पर्यटकांना वाघ दिसावा म्हणून जंगलातील नैसर्गिक पाणवठे नष्ट केले आणि आता नवीन पाणवठे रोडलगत तयार करून वाघ दिसावा अशी व्यवस्था निर्माण केली. मात्र यात सिमेंटच्या टाक्या बांधल्याने त्यात मधमाश्या पाणी प्यायला उतरतात आणि बुडून मरतात. असे हे व्यवस्थापन कसे जंगल वाढविणार.
यात या माश्यांनी आपला नैसर्गिक अधिवास बदलून इमारती, मंदिरे अश्या जागा निवडून लोकवस्तीत प्रवेश केला. कारण पाणी सहज मिळू लागले शिवाय उसाची रसवंती हे सुद्धा महत्वाचे आहे कारण यात त्यांना उन्हाळ्यात गोड रस मिळत असतो. 

आजकाल शिकलेल्या लोकांना मधमाशी काय करू शकते याच महत्त्व राहिलेले नाही. मात्र शेतीत अडचण आली की मग आपण सर्व पर्याय शोधत असतो. 
मी पोस्ट ग्रॅज्युएशन करताना एकजण  मित्र झाला होता,  त्याने सध्या पॉली हाऊस करून आधुनिक शेती करण्यास सुरुवात केली. अर्थात शेती घेतली त्यावेळी शेतीच्या बांधावर बोर, बाभूळ, जांभूळ, आंबा, शेवगा, भोकर, रुई अशी विविध झाड बांधावर होती. मात्र इतरांचे ऐकून सर्व झाडे तोडली आणि जास्त पाणी पिणारी नारळाची झाडे बांधावर लावली, यात शेतीची जैव विविधता झपाट्याने कमी झाली हे लक्षात आलेच नाही. 

आता खरी गंमत अशी आहे की, लॉकडाऊन मध्ये अनेक बिझी मित्र free झाले व त्यांचे फोन आले तसाच त्याचा पण फोन आला की, व तो सांगू लागला पॉली हाऊसमध्ये काकडी लावली आहे आणि खूप मोठी पिवळी फुल येत आहेत, आणि जळून जातायेत शिवाय काकडी अंगठ्या एवडीच राहतेय, काय कराव लागेल, म्हणून मी नैसर्गिक शास्वत शेतीचा अभ्यास केला तेव्हा लक्षात आले की या काकडीचे परागीभवन होत नाही कारण या फुलात आत शिरून परागीभवन कोणीही करत नाही, त्यामुळे त्याचे पराग फुटत नाहीत आणि मग फुल जळून जात आहेत, मग यावर उपाय म्हणजे मधमाश्याच जगात हे काम करू शकतात, खटपट करून मधमाश्यांच्या पेट्या आणल्या  आणि त्याच रात्री दोन पेट्या पॉली हाऊसच्या तोंडाजवळ ठेवल्या. सकाळी लवकर मधमाश्यांनी आपले परागीभवनाचे काम सुरु केले. मग ७ दिवसांनी १ क्रेटऐवजी आता ६ क्रेट काकड्या तोडल्या आणि शिवाय टवटवीत माल सापडला, २० किलोची वाढ १५ पटीने उत्पन्न वाढले. याचा टक्केवारीत अर्थ काढायचा असेल तर १५०० टक्क्यांनी वाढ झाल्याचे सांगितले. माझा मित्र सहज म्हणाला शिक्षणात कधी अस शिकवलं जात नाही, यापुढे मात्र पर्यावरण पूरक वृक्षारोपण करणार असल्याचे स्पष्टपणे बोलून दाखविले. अगदी *शेतीच्या बांधावर बोरी, बाभळी, करंज, भोकर, उंबर, पिंपळ, कडुलिंब, जांभूळ* अशी जैव विविधता पूरक झाडे लावणार असे कबूल केले. अनेकजण सांगतात झाडांची सावलीमुळे पिकांना फटका बसतो मात्र हे खोटं असून आपली स्थानिक झाडांच्या पानांचे खतात लवकर रुपांतर होते, शिवाय सावलीमुळे काही फरक पडत नाही, मात्र यात परदेशी निलगिरी, गुलमोहर आणि नारळ झाडे बांधावर असल्यास भूजल पातळी झपाट्याने खोलवर जाते आणि यांची पाने जमिनीवर पडल्यास जमीन नापीक होत असते. त्यामुळे *फक्त स्थानिक झाडेच* शेतीच्या बांधावर लावली पाहिजेत.   

काकडीचे परागीभवन करताना मधमाशी फुलात शिरून परागीभवन करीत असते. आणि मग काकडीचे वेलींची वाढही झपाट्याने होत असते, याचा अर्थ वेलीची वाढ जोरात होते आणि उत्पादन क्षमता वाढते ती पण कित्येक पटीने...काहीजण दिवसा कीटकनाशक फवारतात आणि मग मधमाश्या मारतात. यावर उपाय म्हणजे रात्री मधमाश्यांनी आपले परागीभवन काम थांबविले की फवारणी करावी जर गरज असेल तरच.. अगदी ज्येष्ठ निसर्गतज्ञ मारुती चितमपल्ली यांनी नागझिरा येते सांगितले की, जंगलात अस्वले मधमाश्यांची पोळी व मध आवडीने खातात, त्याच्या भाकरी करतात त्या करताना झाडांची पाने टाकतात आणि मग त्या सर्व भाकरी गुहेत ठेवतात कारण त्यांच्या पिल्लांसाठी उपयोगी येतील, मात्र काहीवेळा या भाकरी चोरायला आदिवासी लोक येतात आणि मग अस्वले हल्ले करतात मात्र अस्वलाचा हल्ला म्हणजे जगात सर्वात वाईट चेहरा होतो, कारण त्याची एक चापट म्हणजे चेहरा विद्रुपीकरणच. मात्र एकदा त्यांनी एक अस्वल झाडावर चढत असल्याचे पहिले, ते झाडावर मधमाशी पोळे खाण्यासाठी झाडाच्या शेंड्यावर गेले आणि वरून खाली पडले आणि मेले याचा अर्थ असा आहे की , त्या मध्यामाश्याच्या पोळ्यावर अनेकदा अस्वल हल्ले झाले होते आणि मग त्या पोळ्यातील राणीने आपल्यात बदल करीत झाड फांदी ऐवजी अस्वल आल्यावर फांदी सहज तुटेल अश्या फांदीवर आपले पोळे केले आणि यावर कायमस्वरूपी आगी माश्यांनी उपयायोजना केली. 

ज्या प्रजाती बदलायला शिकतात त्याच निसर्गात टिकतात आता वेळ आहे मानवाला बदलायची, जर आपण आपल्या जीवनशैलीत बदल केला नाहीतर आपणसुद्धा संपणार यात शंकाच नाही, हे विशेष लक्षात घेणे आवश्यक आहे. 

*आज कोरोना च्या रूपाने धोक्याची घंटी वाजली आहे वेळीच सुधारणा बदल नाही केला तर मानवी जीवन संपायला वेळ लागणार नाही !*

Post a Comment

0 Comments