॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰
जगदगुरु तुकोबाराय व बिज यांचा काय संबंध जोडावा किंवा काय जोडु नये हेच एक संभ्रमाचे बिज आमच्या मनात आज पेरल्या गेलयं...
शेवटी विचार व चर्चेअंती याविषयी एवढच सांगावेसे वाटते
की -
तुकाराम महाराज एका अभंगात सांगतात की,
आम्हीं वैकुठवासी।आलो याची कारणासी॥
आता या अभंगातील कारण म्हणजे नेमके काय काम करण्यासाठी तुकाराम महाराज या मृत्युलोकी आले असतील,
तर -
आता आह्मां हेंचि काम।वाचें गाऊ तुझे नाम॥
केवळ तुझे नाम आह्मां मुखाने गाऊनच जिवनमुक्त होता येते हा अनुभवस्वरुप दाखलाच समाजासमोर ठेवण्यासाठी आह्मीं या मृत्युलोकी आलोय, हेच आमचे येथील येण्याचे मुळ बिजरुपी प्रयोजन आहे...
परिणामी त्याचकारणे आता -
हेंचि करणे आह्मा काम। बिज वाढवावे नाम॥
म्हणजेच सर्वसामान्य भक्तांच्या हृदयी नामरुपी बिजाचे,
बिजारोपन करण्यासाठी तर
आह्मीं तुज नामाचे आधारभुत बिज
वैकुंठाहुन घेवुन,
तुज आज्ञेनेच बिज वाढीचे कामासाठी मुद्दाम मृत्युलोकी आलेलो आहोत...
परीणामी या नामरुपी बिजाचा आह्मां संसारी जीवास आतां एवढा चटका लागु दे की तुज बिजाच्या सहवासानेच आह्मां संसारीकांच्या विषयवासनेची लाही होवुन आमुचे जन्ममरणाचे बंधपाश मोकळे करण्यास सामर्थ्य आह्मां अंगी येईल -
बिज भाजुनी केली लाही। आह्मां जन्ममरण नाही॥
मुक्तीचा अधिकारी होणे किंवा जिवनमुक्त होणे यासाठीच तर हा नरदेह लाभलेला असतो परीणामी त्यासाठीच मुक्तीच्या बिजांचा शोध घेणे आपणांस अनिवार्य होत नाही का..?
अहो हि मुक्तीचे बिजे म्हणजे दुसरे तिसरे काही नसुन श्री' नाम चिंतनाचीच बिजे आहेत.हेच तुकोबारायांना "बिज वाढवावे नाम" या चरणातुन सर्वांना सांगायचे तर नाही ना..!
एक बिजा केला नाश।
मग भोगिले कणिस॥
या चरणाप्रमाणे,
पुन्हा एका बिजाचा विस्तार किंवा बिजारोपन तुकोबारायांनी केलय ते म्हणजे जन्माला आल्यानंतर मत्युलाही हरविण्याचे सामर्थ्य निःसंदेह या नरदेहात भरलेलंच आहे,
हे मरेपर्यंत वारकर्यांनी विसरुच नये म्हणुन स्वतः तुकोबारायांनी स्वतःच्या सदेह वैकुठगमनाचा, बिजरुपी दाखलाच,
आपणा सर्वांसाठी अनुभवसिध्द करुन,(कणिसरुपात)आपल्या संग्रही ठेवलेला आहेच ना..!
कारण-
तुका पंढरिसी गेला।पुन्हा जन्मा नाही आला
मग असे तुकोबारायांचे सदेह वैकुंठगमनाचे, अनुभवसिध्द बिज वारकरी संप्रदायात उपलब्ध असतांना,
वारकरी संप्रदायाचे अनुयायी असणार्या वारकर्यांनी,
विनाप्रयास मृत्युपुढे का हात टेकुन शरणागती पत्करावी..? वारकर्यांची ही अशी शरणागती जगदगुरु तुकोबारायांचे संस्कार आपण किती अंगिकारले याचे आत्मपरिक्षण करायला आपणास प्रवृत्त करीत नाही का..?
मग विना आत्मपरिक्षणा आधीच "तुकाराम बिजे"चा उत्सव कितीही गाजावाजा करुन साजरा केला तर त्या गाजावाज्याला महत्व तरी किती येणार व आले तरी ते कुणा उपयोगी पडेल..? अहो शेवटी पालथ्या घड्यावर पाणी घालुन काय उपयोग होईल..! म्हणुन
विचार करा...
आत्मपरीक्षण करा ...
व
तुकारामांच्या सदेह वैकुठगमनाच्या बिजरुपी वाटेवर पाऊल टाकायला आजपासुन प्रयत्न करायला काय हरकत आहे..! भाग्यपरत्वे आपल्यासाठीही यथावकाश तो विठ्ठल कधीतरी विमान घेवुन येईल, निदान हि छोटीसी आशा आपण तुकोबारायांचा आदर्श घेवून मनी का ठेवु नये..!
चला तर मग...
येताय ना...
देहु वाट बघतेय आपली...
चिंतनातील योग्यता ही श्रीं' व आईसाहेबांच्या कृपादृष्टीकारणे तसेच आपल्या श्री'हरिप्रिय सहवासाकारणे लाभ... अयोग्यता ही मज बुध्दीदोषामुळेच... अवाजवीपणा आपण सांभाळून घ्याल हि आशा ठेवतो...
...जय मुक्ताई...
.."रामकृष्णहरी"..
...॥👣स्पर्श॥...
पोस्ट साभार-चैतन्याचा जिव्हाळा
0 Comments