अम्लपित्त(ऍसिडिटी)


या व्याधीमध्ये पित्ताची अम्लता वाढते म्हणून *’अम्लपित्त'* असे म्हणतात.अनेक दिवसांपासुन चुकीच्या पद्धतीचे खान-पान व वागणं असल्याने अम्लपित्त हा व्याधी होतो. 
कारणे-
*आहारासंबंधित कारणे-*
१. जास्त तिखट, आंबट,अति मसालेदार व खारट पदार्थांचे जास्त प्रमाणात सेवन.
२. तळलेले, अतिउष्ण पदार्थ सेवन.
३.आंबवलेले पदार्थ उदा. इडली, डोसा, जिलेबी इत्यादि खाणे.  
४. बेकरीचे पदार्थ  उदा. ब्रेड, पाव, केक, टोस्ट, बटर इत्यादि खाणे.
५. लोणचे, पापड, चटण्या, मिरचीचा खर्डा रोजच्या जेवणात खाणे.
६. जास्त चहा पिणे.
७. मद्यपान, धुम्रपान करणे.
८. खूप वेळा बाहेर जेवण करणे.
                                   
*विहारासंबंधित कारणे-*
१. रात्री उशीरा झोपणे (जागरण करणे).
२. भुक लागली असतांना,वेळेत जेवण न करणे व भुक नसतांना, वेळ निघुन गेल्यावर जेवण करणे.
४. जास्त उपवास करणे व साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडा व तळलेले पदार्थ खाणे.
५. जेवणानंतर लगेच,दुपारी झोपणे.
६. शारीरिक श्रम न करणे.
 
*ॠतू संबंधित कारणे-*
 पावसाळ्यात(वर्षाऋतु) निसर्गताच शरीरात पित्त साठत असते व त्यानंतर येणाऱ्या शरद ॠतूमध्ये पित्ताचे तीव्र लक्षणे दिसत असतात.  

*लक्षणे-*
१. अन्न पचन सुरळीत न होणे
२. वारंवार छातीत व पोटात जळजळणे किंवा आग पडणे.
३. वारंवार आंबट किंवा तिखट/करपट ढेकर येणे
४. घश्यात जळजळणे, आग पडणे.
५. पोटात दुखणे किंवा छातीत दुखणे.
६. पोटात जडपणा वाटणे, पोट फुगल्यासारखे वाटणे,  
७. डोकं दुखणे (शिरःशूल), चक्कर येणे.
८. वारंवार पित्ताची उलटी होणे.
९. मलप्रवृत्ती पातळ होणे.
१०. संपुर्ण शरीराची किंवा हातापायाची आग होणे.
११. भुक न लागणे.
१२. श्वास घेतांना छातीत दुखणे / त्रास होणे.

*काय काळजी घ्यावी?*

*आहारा विषयक-*
१. तिखट, आंबट, खारट व मसालेदार व तळलेले पदार्थ टाळावे. 
२.आहारात फळभाज्यांचा वापर करावा. उदा. भेंडी, पडवळ, भोपळा, लाल-भोपळा, दोडकी, गिलके, शेवगा.
३.तूरीची डाळ पित्त वाढवते म्हणून टाळावी व त्याऐवजी मुगाची डाळ वापरावी.
४. ज्वारीच्या भाकरी चा आहारात समावेश करावा.
५. फळ-आवळा,डाळींब,मनुका,खजूर खावे.
६. रोजच्या आहारात गाईच्या शुद्ध तुपाचा समावेश करावा.

*विहारा विषयक-*
१. रात्री लवकर झोपावे (किमान ६ ते ८ तासाची झोप घ्यावी)
२. सकाळी लवकर उठावे व डॉक्टरांच्या सल्ल्याने कमीत कमी ४५ मिनिट फिरावे. 
३. जेवणानंतर लगेच व दिवसा झोपू नये.

*उपचार-*

१. औषधोपचार- सुतशेखर, कामदुधा,प्रवाळ पंचामृत,अविपत्तिकर चूर्ण,भुनिंबादि काढा हे व अशाच विविध पित्तशामक औषधांची योजना वैद्य रुग्णाची प्रकृति परीक्षण करून करत असतात. 

२. पंचकर्म- स्नेहन, स्वेदन पूर्वक वमन व विरेचन असे पंचकर्म उपचार आवश्यकतेनुसार केले जातात.
आपल्याला वरील पैकी लक्षणे दिसत असल्यास त्वरीत आपल्या आयुर्वेद डॉक्टरांची भेट घ्यावी.शुद्ध आयुर्वेदिक उपचाराने साधारणतः एक महिन्याच्या कालावधीत अम्लपित्त चा पूर्ण उपचार होतो.    > Social Media

Post a Comment

0 Comments