श्री गणपतीची प्राणप्रतिष्ठापना करताना पुरोहीत अपुर्या संख्येमुळे सर्व भक्तांकडे पोचू शकत नाहीत . अशा वेळी आपण स्वतः प्राणप्रतीष्ठा करू शकता . पूजाविधीचा मराठीत स्वैर अनुवाद केला आहे .
आता आपणच पूजा करू शकता . .
ही पोस्ट शेअर करून जास्तीत जास्त भक्तांपर्यंत पोचवा . . . . . . . . .
॥श्री॥
श्री गणेशाय नमः॥
गजानना, विघ्ननाशका
आजि तुझा दिन
तव पायी नमन, स्मरतो तव चरण
विष्णूदेवा स्मरोनी
( असे म्हणून नमस्कार करावा आणि तीनदा पळीतून उजव्या हातात पाणी घेऊन . . . . . .
ॐ केशवाय नमः॥
ॐ नारायणाय नमः॥
ॐ माधवाय नमः॥
असे म्हणत ते प्यावे . . . . ( आचमन करावे)
ॐ गोविंदाय नमः॥ म्हणून पळीभर पाणी ताम्हणात सोडावे . हाच प्रकार परत करावा आणि पुढे . . . . .
विष्णूदेवा नमस्कार
मधुसूदना नमस्कार
त्रिविक्रमा नमः
वामना नमः
श्रीधरा नमः
ह्रुषिकेषा नमः
पद्मनाभा नमः
दामोदरा नमः
संकर्षणा नमः
वासुदेवा नमः
प्रद्द्युम्ना नमः
अनिरूद्धा नमः
पुरूषोत्तमा नमः
अधोक्षजा नमः
नारसिंहा नमः
अच्युता नमः
जनार्दना नमः
उपेंद्रा नमः
हरीदेवा नमः
श्रीकृष्णा त्रिवार नमः
असे २४ नमस्कार कृष्णाला करावे .
गायत्री देवी तुला स्मरून मी प्राणायम करीत आहे . गायत्री मंत्राच्या स्मरणाने माझा देह शुद्ध व्हावा .
दोन्ही कानांना उजवा हात लावावा . देवाकडे नजर लावून सर्व देवांची आठवण आणि स्तुती करावी .
हे महागणेशा नमस्कार
हे गावदेवे नमस्कार
हे माझ्या कुलदेवते नमस्कार
हे या ठिकाणच्या देवी नमस्कार
माझ्या आई वडीलांना नमस्कार
लक्ष्मी नारायणाला नमस्कार
सर्व देवांना नमस्कार
तुला नमितो एकदंता गजानना
धुम्रकेतू, कपिला, विकटा
गणाधिपा, भालचंद्रा, गणाधिपा
तुझी ही आठ नावे मंगल करोत .
हे, शिवे, दुर्गे, गौरी, त्र्यंवके आदिमाते नमस्कार . . . .
ज्याच्या ह्रुदयात श्रीकृष्ण आहे त्याला म्हणजेच मला अमंगल शिवणार नाही .
सरस्वतीलाही माझा नमस्कार .
वंदोनी सर्व देवांना, या कलियुगाच्या पहिल्या भागात भारत देशात, गोदावरीच्या दक्षिणतीरी मी . . . . . . . . . (आडनाव) कुळातला . . . . . . . . . (स्वतःचे नाव) नावाचा इसम, भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवशी,
माझ्या व माझ्या कुटुंबाच्या, परिवारांतील पशुसकट सर्वांच्या कोटकल्याणासाठी सोळा उपचार करून, दर वर्षाप्रमाणे महागणपतीच्या या मातीने बनवलेल्या मुर्तीचे पूजन करण्याचा संकल्प करत आहे .
त्या आधी कलश, शंख, घंटा याचे पूजन करत आहे .
तांब्यावर हात ठेवून त्याची प्रार्थना करावी .
हे कलशा तुझ्या मुखात विष्णु आहे .
गळ्यात शंकर, मुळाशी ब्रह्मदेव आणि सगळ्या माता मधोमध आहेत .
तेव्हा तुला नमन करतो .
गंगे, गोदे, यमुने, नर्मदे, सिंधु, कावेरी
माता देवी सरस्वती
या कलशात येऊनी पूजा माझी स्वीकारी . . . .
हे कलशा , तुला गंध, अक्षत आणि फुले वाहतो . .
पूर्वी सागरातून उत्पन्न झाला कृष्णाहाती शंख
नवरत्नापैकी एक हे पांचचजन्या तुला नमस्कार .
शंखा तुला गंध, तुळशी आणि फुले वाहतो . ( शंखाला अक्षत वाहू नये . )
येताना देवांना तुझाच करितो नाद
जाताना रक्षिण्यासाठी तुझाच आवाज
तुझा होता गजर देवता येती घरी
घंटादेव तुला गंध, अक्षत आणि फुले वाहतो . . . .
ज्योत तुझी उजळता,नाश होई अंधाराचा
तेवत रहा तू दीपदेवा,जोवर चाले गणेशपूजा
समईला नमस्कार,गंध-फुल समर्पित
पवित्र असो वा असो अपवित्र,
कृष्णाला आठवूनी,शिंपीतसे हे पाणी
माझे मन शुद्ध व्हावे,पूजेचे सामान आणि
असे केल्यावर
मूर्तीत प्राण फुंकण्या साठी ,बोलावितो तीन देव
ब्रम्हा,विष्णु,महेश्र्वर,अन् प्राणशक्ती तुझा भाव
देवाच्या हृदयाला उजवा हात लावून 15वेळ ॐ म्हणावे
देवाला सांगावे की,गर्भाधानाचे 15 संस्कार पूर्ण व्हावेत म्हणून 15 वेळ मी हा प्रणव उच्चारत आहे.
जिच्या प्रसादे, मम शरीर,
ती ही माता पराशक्ति सुखकर
करावा तू मूर्तीत या प्रवेश,
व्हावा तुझ्या कृपेने मातीत या गणेश
नंतर...
तुझे डोळे शंभर शरद नक्षत्र पाहू दे
शंभर शरद जगू दे
असे म्हणून दुर्वेने देवाच्या डोळ्याना तूप लावावे.(आता आपल्या मूर्तीत प्राण आले आहेत)
श्री सिद्धिविनायका,तुला गंध,अक्षत,फुले,हळद,कुंकू वाहून नमस्कार करतो.
श्री सिद्धीविनायका,तुला धूप,दीप,नैवेद्य समर्पून नम. करतो.
तुला मुखवासा साठी हा विडा,सोन्याचं फुल,दक्षिणा,तसेच मंत्ररूपी फुल समर्पण,!
करून पु न्हा नमस्कार करतो
ही पूर्वपूजा मधुर मानून घे
यानंतर आपण 16 उपचार करणार आहोत.
ध्यान-
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ,निर्विघ्नं कुरू मे देव,सर्वकार्येषु सर्वदा॥
श्री सिद्धीविनायका, या श्लोकाने मी तुझे ध्यान करतोय
विघ्नेशा,देवानी,राजानी तुज वंदिले
अनाथनाथा तुजला,पुजा करम्या मी बोलाविले॥
श्री सिद्धिविनायका,आवाहना(बोलावण्या)साठी या अक्षता वाहून नमस्कार.
करण्या
ऩानारत्ने सजविले,
मणि लावूनी नटविले,
कला कुसरे सज्ज केले,
ऐसे आसन तुजला दीधले॥
श्री सिद्धिविनायका,आसन म्हणून या अक्षता घ्या,नमस्कार
हे लोकनाथा,सर्व क्षेम असो तुमचे
भक्तीने अर्पियले हे पाणि पाय धुण्याचे.
(फुलाने देवाच्या पायावर पाणी शिंपडा)
गंधाक्षतफुल मिसळुनी पाणी अंगी शिंपित मी,
अर्घ्य तुम्हासी अर्पित आता,जगदाधारा कृपा करी ॥
कापूराचा सुवास त्याते मंदाकिनीचे हे पाणी
आचमनूनी प्यावे आता,कृपा मजवरी करा स्वामी.
कापूराचा सुवास त्याते मंदाकिनीचे हे पाणी
आचमनूनी प्यावे आता,कृपा मजवरी करा स्वामी.
गंगादि नद्यांचे पाणी मी आणिले हो
स्नान करावे त्यात साजिरे,देवा गजानना हो
(हे सात उपचार झाले)
(देवावर फुलाने पाणी शिंपडा)
कामधेनूूने दिलेले,
कृष्णाला प्रिय पेय हे,
शुभ्र धवल अमृत असे
दुधस्नान देव करे
दुधानंतर परत शुद्ध पाणी अंघोळीला
श्री सिद्धिविनायका,सर्व पुजा म्हणून या अक्षता अर्पून तुला वंदन
दही हे प्रिय देवांना,जणू हे चंद्रमंडल
स्नानासाठी तुला देतो,तुष्ट व्हा भक्तवत्सल
दह्यानंतर परत शुद्ध पाणी अंघोळीला
श्री सिद्धिविनायका,सर्व पुजा म्हणून या अक्षता अर्पून तुला वंदन
यज्ञामध्ये वापर ज्याचा,तूप आहार देवांचा
ऐसे खासे परम पवित्र,तुझ्या न्हाण्यात वापर त्याचा
तूपानंतर परत शुद्ध पाणी अंघोळीला
श्री सिद्धिविनायका,सर्व पुजा म्हणून या अक्षता अर्पून तुला वंदन
पराग वेचूनी मध हा जमला,
औषध असूनी अवीट गोडी
अंघोळीस्तव तुला अर्पितो
पुण्यफळाची आशा थोडी
मधानंतर परत शुद्ध पाणी अंघोळीला
श्री सिद्धिविनायका,सर्व पुजा म्हणून या अक्षता अर्पून तुला वंदन
ऊसामधले सार काढले
साखर त्याची मधुर जाहली
जगदाधारा,अशी शर्करा
तुमच्या स्नाना कामी आली
साखरेनंतर परत शुद्ध पाणी अंघोळीला
श्री सिद्धिविनायका,सर्व पुजा म्हणून या अक्षता अर्पून तुला वंदन
सुगंधी द्रव्याचा परिमळ
कापूराचे चूर्ण मिसळले
चंदन घासूनी केले हे जळ
अंघोळीला तुझ्या घेतले
गंधजळानंतर परत शुद्ध पाणी अंघोळीला
श्री सिद्धिविनायका,सर्व पुजा म्हणून या अक्षता अर्पून तुला वंदन
श्री सिद्धिविनायका,तुला गंध,अक्षत व फुले वाहून वंदन करतो.
श्री सिद्धिविनायका,तुला व तुझ्या अंगीभूत रिद्धी सिद्धीना हळद,कुंकू,करंडा फणि,वाहून वंदन करतो.
कापसाची वात करूनी तुपामध्ये भिजविली
निरांजनाची ज्योत उजळुनी देवा तुजला दाकविली
वनस्पतीचा रस हा गंधित तुझ्याचसाठी परमेशा
ओवाळीतसे धूप तुम्हाला पुरवावी माझी मनीषा
उरले आता पंचामृत ते नैवेद्यार्थे दाखवितो
पुन्हा एकदा नमस्कारूनी देवा तुजला मी भजतो
पाण्यात करंगळी जवळची दोन बोटे बुडवून जमिनीवर चौकोन करा.त्यावर पंचामृत(दूध,दही,तूप,मध,साखर)एकत्र केलेली वाटी ठेवून तीनदा भोवती पाणी फिरवावे.डाव्या हाताने नाक धरून उजव्या हाती देवाला नैवैद्य पाच घासात भरवल्यासारखे करावे
प्राणाला स्वाहा,अपानाला स्वाहा,व्यानाला स्वाहा,उदानाला स्वाहा,समानाला स्वाहा असे पंचप्राणाना भरवावे.शेवटी ब्रम्हाला स्वाहा म्हणून नैवेद्य दाखविण्याची क्रीया पूर्ण करावी
यानंतर
तुला देत मी आपोष्णी(भोजनानंतर प्यायचे पाणी),हात धुण्यासाठी पाणी,चूळ भरण्यासाठी पाणी.असे तीनवेळा ताम्हणात पाणी पळीतून हातावर घेऊन सोडावे.
हाता तुझीया सुवास या म्हणूनी अर्पि चंदन हे.असे म्हणून फुल गंधात बुडवून देवाला वहावे
देवापुढील नव्या विड्यावर पाणी सोडावे.हे देवा,तुला मुखवासासाठी ही पान सुपारी व सोन्यासारखी दक्षिणा अर्पण!
श्री सिद्धिविनायका,हे मंतरलेले फुल वहात आहे.
एवढे झाल्यावर........
गणेशा ही पूर्वपुजा गोड मानून घ्या!असे म्हणून ताम्हणात पळीने पाणी सोडावे.
ऩिर्माल्य टाकतो उत्तरेला.असे म्हणून वाहिलेली फुले उत्तर दिशेस टाकावी.
आता दुर्वेनी देवाला अभिषेक करावा.करताना अथर्वशीर्ष वा गणपती स्तोत्र म्हणावे.
झाल्यानंतर
गणराया अमृताचा अभिषेक घ्या
सर्वजनांना सुख शांती द्या
म्हणत घंटा वाजवावी
हे गणराया हा महा अभिषेक तुम्हास समर्पण म्हणून ताम्हणात पळीभर पाणी सोडावे.
महाभिषेकानंतर देवा,सुगंधी स्नान करा हो
त्याचसाठी तुजला, अत्तर मी लावितो हो
सुगंध झाला,अभिषेकानंतर
आता गरम पाणी घ्या.
असे उन पाणी शिंपडा
लोकांपासून लाज झाकणे वस्त्रांचे या काम खरे
तुमच्याकरिता कपडे आणली,अर्पण करतो स्वामीपुढे
ब्रम्हसूत्र हे जानवे
गणाधीशा तुम्ही ल्यावे
जानवे घातल्यावर पळीभर पाणी प्या
मलयावरचे चंदन आणूनी
सुंदर तुजला लेपन केले
गंध लावितो अता ललाटी
लंबोदरा द्या मला सुमती
तांदुळाच्या शुभ्र अक्षता,कुंकू लावूनी घ्या, गणराया
अलंकार हे मानुनी घ्यावे,दीन तुझा मी पडतो पाया
सोन्या जैसा रंग जियेचा
प्रतीक आहे सौभाग्याचा
हळद वाहतो देवी तुम्हा
मोदे गाईन गणेशमहिमा
हळदीमधुनी बनले कुंकू
ललाट शोभा वाढविण्यासी
देवी तुजला कुंकू वाहून
मागे तुजसी मी सुखराशी
रवी उगवता जैसा शेॆदूर
का दिसते ते जास्वंदाचे फुल
तुम्हासी व्हावा भूषण ऐसा
सोंडेमध्ये भरतो शेॆदूर
ज्योत्स्नापती नमीतो देवा
अबीर लावे घ्यावी सेवा
सृष्टीमध्ये सुमने फुलली
तुमच्या अंगी आणिक खुलला
परिमळ त्यांचा इथे पसरला
धन्य वाटते मम मनाला
सृष्टीमध्ये सुमने फुलली
तुमच्या अंगी आणिक खुलली
परिमळ त्यांचा इथे पसरला
धन्य वाटते मम मनाला
बकुळीची,कण्हेर,जाई,चाफा तुला समर्पण!
आता गणपतीच्या सर्व अंगाची पुजा करू या(प्रत्येक अवयवाला अक्षता वा फुले वहायची.
वंदन तुम्हा गणेश्र्वरा,पाय पूजितो.
वंदन करीतो विघ्नराजा,गुडघे पूजितो
वंदन करीतो आखुवाहना,मांड्या पूजितो
वंदन करीतो हेरंबा,कमर पूजितो
वंदन करीतो लंबोदरा,पोट पूजितो
वंदन करीतो गौरीसूता,स्तन पूजितो
वंदन करीतो गणनायका,हृदय पूजितो
वंदन करीतो स्थूलकर्णा,गळा पूजितो
स्कंधाग्रजा वंदन,खांदे पूजतो
पाशहस्ता नमन,हात पूजतो.
गजवक्त्रा नमन,तोंड पूजतो
विघ्नहर्त्या वंदन,कपाळ पूजतो
सर्वेश्र्वरा नमन,डोके पूजतो
गणाधिपा नमन,सर्वांगाचे तुमच्या पूजन,!
यानंतर निसर्गात वर्षऋतूत उगवलेल्या विविध वनस्पतीच्या पानांनी या निसर्ग राजाची पुजा बांधायची,हे कौतुक आपल्या पूर्वजांच्या सौंदर्य दृष्टिचे.
सुमुखा नमन,मधुमालती अर्पण
गणाधिपा नमन,माका अर्पण
उमापुत्रा नमन,बेल अर्पण
गजानना नमन,पांढर् या दुर्वा अर्पण
लंबोदरा नमन,बोरपान अर्पण
हरपुत्रा नमन,धोत्रा अर्पण
गजकर्णा नमन,तुळशी अर्पण
वक्रतुंडा नमन,शमी अर्पण
गुहाग्रजा नमन,आघाडा अर्पण
एकदंता नमन,डोरली अर्पण
डोरलीचे पान
विकटा नमन,कण्हेर पान अर्पण
कपिला नमन,रूई अर्पण
गजदंता नमन,अर्जुनसादडा अर्पण
विघ्नराजा नमन,विष्णुक्रांता अर्पण
बटुराजा नमन,डाळिंब पान अर्पण
सुराग्रजा नमन,देवदार अर्पण
भालचंद्रा नमन,मरवा अर्पण
हेरंबा नमन,पिंपळपान समर्पण
चतुर्भुजा नमन,जाईपान समर्पण
विनायका नमन,केवडा समर्पण
सर्वेश्र्वरा नमन,अगस्तिपान समर्पण
(टीप-देवाला पानांच्या हिरवाईने सुशोभित करणे व भावपूर्वक नावे घेणे हा उद्देश लक्षात घ्यावा,पानाची जात न मिळाल्यास दुसऱ्या प्रकारची पाने वापरावीत,)
वनस्पतीचा रस हा गंधित तुझ्याचसाठी परमेशा
ओवाळीतसे धूप तुम्हाला पुरवावी माझी मनीषा
कापसाची वात करूनी तुपामध्ये भिजविली
निरांजनाची ज्योत उजळुनी देवा तुजला दाखविली
नैवेद्य आणला देवा,मन भक्तीने भरून आले,
इच्छा माझ्या पूर्ण कराव्या,आनंदाने दान पावले
खाण्यासाठी पंचखाद्य हेे नैवेद्यार्थे दाखवितो
पुन्हा एकदा नमस्कारूनी देवा तुजला मी भजतो
पाण्यात करंगळी जवळची दोन बोटे बुडवून चौकोन आखावा,तीनदा भोवती पाणी फिरवून,डाव्या हाताने नाक धरून उजव्या हाती देवाला नैवैद्य पाच घासात भरवल्यासारखे करावे
प्राणाला स्वाहा,अपानाला स्वाहा,व्यानाला स्वाहा,उदानाला स्वाहा,समानाला स्वाहा असे पंचप्राणाना भरवावे.शेवटी ब्रम्हाला स्वाहा म्हणून नैवेद्य दाखविण्याची क्रिया पूर्ण करावी
यानंतर
तुला देत मी आपोष्णी(भोजनानंतर प्यायचे पाणी),हात धुण्यासाठी पाणी,चूळ भरण्यासाठी पाणी.असे तीनवेळा ताम्हणात पाणी पळीतून हातावर घेऊन सोडावे.
हाता तुझीया सुवास या म्हणूनी अर्पि चंदन हे.असे म्हणून फुल गंधात बुडवून देवाला वहावे
देवापुढील नव्या विड्यावर पाणी सोडावे.हे देवा,तुला मुखवासासाठी ही पान सुपारी,खारीक,बदाम व सोन्यासारखी दक्षिणा अर्पण!
तुझिया पुढती नारळ ठेवूनी,मनोरथाची करे मागणी
श्रीफळ घेऊन सफल करावे,गजानना रे हीच विनवणी
देवापुढे नारळ ठेवून त्यावर पाणी सोडावे
या नंतर....दोन दुर्वांची एकएक जोडी घेऊन गंध,अक्षता सकट देवाला 10 जोड्या व नंतर एक वहावी
गणाधिपा वंदन,दुर्वाजोडी समर्पण
उमापुत्रा वंदन,दुर्वाजोडी समर्पण
अघनाशना वंदन,दुर्वाजोडी समर्पण
विनायका वंदन,दुर्वा........
ईशपुत्रा वंदन,दुर्वा............
सर्वसिद्धिदात्या वंदन,दुर्वा.........
एकदंता वंदन,दुर्वा.......
इभवक्त्रा वंदन,दुर्वा.....
आखुवाहना वंदन,दुर्वा......
कुमारगुरु वंदन,दुर्वा....
गमाधिपा,नमितो तुजला उमापुत्रा,अघनाशना
एकदंता,इभवक्त्रा,देवा मूषकवाहना
विनायका,ईशपुत्रा तू,सर्वसिद्धिप्रदायका
कुमारगुरु तू,नित्य घडावी तुझी पुजा
ही एक दुर्वा समर्पण
गणाधिपा
सूर्य चंद्र धरणी आणि अग्नि वीजहि
या सर्व तत्वाना, एकत्र तूच बांधिशी
कापूराची ज्योत लावूनी पाहीन तव मूर्ती
जी पापे पूर्वजन्माची,तशीच या जन्माची
नाश होती प्रदक्षिणेनी,संचिते दुष्कर्माची
श्री सिद्धिविनायका,कापूर आरती व प्रदक्षिणा तुला समर्पण
जीवेम शरद: चं भाषांतर बदल
होऊनी शतायू स्वामी,तुझी पुजा करेन मी
शतवर्षे राहो दृष्टी,पाहीन तुला सदैव मी
श्री सिद्धिविनायका, कापूर आरती,आरत्या व प्रदक्षिणा तुला समर्पण
प्रदक्षिणेआधी आरत्या म्हणाव्या
दु:खहर्त्या,विघ्नहर्त्या गणेशा)
देवांचाहि देव गजानन
नमस्कार हा माझा घेऊन
वंदन तुम्हा गणेश्र्वरा,पाय पूजितो.
वंदन करीतो विघ्नराजा,गुडघे पूजितो
वंदन करीतो आखुवाहना,मांड्या पूजितो
वंदन करीतो हेरंबा,कमर पूजितो
वंदन करीतो लंबोदरा,पोट पूजितो
वंदन करीतो गौरीसूता,स्तन पूजितो
वंदन करीतो गणनायका,हृदय पूजितो
वंदन करीतो स्थूलकर्णा,गळा पूजितो
स्कंधाग्रजा वंदन,खांदे पूजतो
पाशहस्ता नमन,हात पूजतो.
गजवक्त्रा नमन,तोंड पूजतो
विघ्नहर्त्या वंदन,कपाळ पूजतो
सर्वेश्र्वरा नमन,डोके पूजतो
गणाधिपा नमन,सर्वांगाचे तुमच्या पूजन,!
यानंतर निसर्गात वर्षऋतूत उगवलेल्या विविध वनस्पतीच्या पानांनी या निसर्ग राजाची पुजा बांधायची,हे कौतुक आपल्या पूर्वजांच्या सौंदर्य दृष्टिचे.
सुमुखा नमन,मधुमालती अर्पण
गणाधिपा नमन,माका अर्पण
उमापुत्रा नमन,बेल अर्पण
गजानना नमन,पांढर् या दुर्वा अर्पण
लंबोदरा नमन,बोरपान अर्पण
हरपुत्रा नमन,धोत्रा अर्पण
गजकर्णा नमन,तुळशी अर्पण
वक्रतुंडा नमन,शमी अर्पण
गुहाग्रजा नमन,आघाडा अर्पण
एकदंता नमन,डोरली अर्पण
डोरलीचे पान
विकटा नमन,कण्हेर पान अर्पण
कपिला नमन,रूई अर्पण
गजदंता नमन,अर्जुनसादडा अर्पण
विघ्नराजा नमन,विष्णुक्रांता अर्पण
बटुराजा नमन,डाळिंब पान अर्पण
सुराग्रजा नमन,देवदार अर्पण
भालचंद्रा नमन,मरवा अर्पण
हेरंबा नमन,पिंपळपान समर्पण
चतुर्भुजा नमन,जाईपान समर्पण
विनायका नमन,केवडा समर्पण
सर्वेश्र्वरा नमन,अगस्तिपान समर्पण
(टीप-देवाला पानांच्या हिरवाईने सुशोभित करणे व भावपूर्वक नावे घेणे हा उद्देश लक्षात घ्यावा,पानाची जात न मिळाल्यास दुसऱ्या प्रकारची पाने वापरावीत,)
वनस्पतीचा रस हा गंधित तुझ्याचसाठी परमेशा
ओवाळीतसे धूप तुम्हाला पुरवावी माझी मनीषा
कापसाची वात करूनी तुपामध्ये भिजविली
निरांजनाची ज्योत उजळुनी देवा तुजला दाखविली
नैवेद्य आणला देवा,मन भक्तीने भरून आले,
इच्छा माझ्या पूर्ण कराव्या,आनंदाने दान पावले
खाण्यासाठी पंचखाद्य हेे नैवेद्यार्थे दाखवितो
पुन्हा एकदा नमस्कारूनी देवा तुजला मी भजतो
पाण्यात करंगळी जवळची दोन बोटे बुडवून चौकोन आखावा,तीनदा भोवती पाणी फिरवून,डाव्या हाताने नाक धरून उजव्या हाती देवाला नैवैद्य पाच घासात भरवल्यासारखे करावे
प्राणाला स्वाहा,अपानाला स्वाहा,व्यानाला स्वाहा,उदानाला स्वाहा,समानाला स्वाहा असे पंचप्राणाना भरवावे.शेवटी ब्रम्हाला स्वाहा म्हणून नैवेद्य दाखविण्याची क्रिया पूर्ण करावी
यानंतर
तुला देत मी आपोष्णी(भोजनानंतर प्यायचे पाणी),हात धुण्यासाठी पाणी,चूळ भरण्यासाठी पाणी.असे तीनवेळा ताम्हणात पाणी पळीतून हातावर घेऊन सोडावे.
हाता तुझीया सुवास या म्हणूनी अर्पि चंदन हे.असे म्हणून फुल गंधात बुडवून देवाला वहावे
देवापुढील नव्या विड्यावर पाणी सोडावे.हे देवा,तुला मुखवासासाठी ही पान सुपारी,खारीक,बदाम व सोन्यासारखी दक्षिणा अर्पण!
तुझिया पुढती नारळ ठेवूनी,मनोरथाची करे मागणी
श्रीफळ घेऊन सफल करावे,गजानना रे हीच विनवणी
देवापुढे नारळ ठेवून त्यावर पाणी सोडावे
या नंतर....दोन दुर्वांची एकएक जोडी घेऊन गंध,अक्षता सकट देवाला 10 जोड्या व नंतर एक वहावी
गणाधिपा वंदन,दुर्वाजोडी समर्पण
उमापुत्रा वंदन,दुर्वाजोडी समर्पण
अघनाशना वंदन,दुर्वाजोडी समर्पण
विनायका वंदन,दुर्वा........
ईशपुत्रा वंदन,दुर्वा............
सर्वसिद्धिदात्या वंदन,दुर्वा.........
एकदंता वंदन,दुर्वा.......
इभवक्त्रा वंदन,दुर्वा.....
आखुवाहना वंदन,दुर्वा......
कुमारगुरु वंदन,दुर्वा....
गमाधिपा,नमितो तुजला उमापुत्रा,अघनाशना
एकदंता,इभवक्त्रा,देवा मूषकवाहना
विनायका,ईशपुत्रा तू,सर्वसिद्धिप्रदायका
कुमारगुरु तू,नित्य घडावी तुझी पुजा
ही एक दुर्वा समर्पण
गणाधिपा
सूर्य चंद्र धरणी आणि अग्नि वीजहि
या सर्व तत्वाना, एकत्र तूच बांधिशी
कापूराची ज्योत लावूनी पाहीन तव मूर्ती
जी पापे पूर्वजन्माची,तशीच या जन्माची
नाश होती प्रदक्षिणेनी,संचिते दुष्कर्माची
श्री सिद्धिविनायका,कापूर आरती व प्रदक्षिणा तुला समर्पण
जीवेम शरद: चं भाषांतर बदल
होऊनी शतायू स्वामी,तुझी पुजा करेन मी
शतवर्षे राहो दृष्टी,पाहीन तुला सदैव मी
श्री सिद्धिविनायका, कापूर आरती,आरत्या व प्रदक्षिणा तुला समर्पण
प्रदक्षिणेआधी आरत्या म्हणाव्या
दु:खहर्त्या,विघ्नहर्त्या गणेशा)
देवांचाहि देव गजानन
नमस्कार हा माझा घेऊन आशिर्वाद मज द्यावा .
साष्टांग नमस्कार करावाय
0 Comments