उपवासाचे वैज्ञानिक रहस्य !

उपवासाचे वैज्ञानिक रहस्य !
उपवासाचा उपहास करणार्यांचे काळ तोंड करणारा लेख...
उपवास करण्यामागील शास्त्रीय कारणे
 आपल्या शरीरामध्ये दोन अशा शक्ति आहेत ज्या एकमेकांच्या विरोधात कार्य करतात.
१.इन्सुलिन
२.ग्लुकॅगॉन
हे दोन्ही हार्मोन स्वादुपिंडातून पाझरतात. इन्सुलिन हे साठा करणारे हार्मोन आहे.हे अतिरिक्त पिष्टमय पदार्थांचे चरबीत साठा करून ठेवते.
तर ग्लुकॅगॉन अगदी विरुद्ध कार्य करते.
ग्लुकॅगॉन जिथे जिथे चरबी असते तिथे जाते व अतिरिक्त चरबीचे पचन करते आणि ऊर्जा/शक्ती निर्माण होते.
पण रक्तामध्ये अतिरिक्त इन्सुलिन असताना ग्लुकॅगॉन पाझरत नाही.
ग्लुकॅगॉन वाटच पहात असतो कधी एकादशी येईल,उपवास येईल. इन्सुलिन ची पातळी शून्य होईल मग मला पाझरता येईल.
परंतु उपवासाच्या दिवशीही आपण पिष्टमय पदार्थच खातो त्यामुळे ग्लुकॅगॉन पाझरतच नाही.
सतत पिष्टमय पदार्थ, गोड पदार्थ खात राहिल्यामुळे इन्सुलिन ची पातळी खाली येतच नाही.
त्यामुळे वर्षानुवर्षे ग्लुकॅगॉनला काम करायला वावच मिळत नाही.
परिणामी वर्षानुवर्षे अनेक प्रयत्न करूनही वजन/चरबी कमी होत नाही. मधुमेह ही नियंत्रणात येत नाही.
इन्सुलिनची पातळी कमी करणे व ग्लुकॅगॉनला चरबी पचवण्यासाठी संधी उपलब्ध करून देणे हे खरे रहस्य आहे.
इन्सुलिन व ग्लुकॅगॉन हार्मोनचे कार्य संतुलित झाले तर पचन ही संतुलित होईल. भारतात दोन वेळाच लोक पोटभर जेवत होते तोपर्यंत सर्वच आरोग्यदायी होते.
ब्रेकफास्ट, चहा, कॉफी आले व ग्लुकॅगॉनला पाझरायला वावच राहिला नाही. संस्कृत शब्दकोशात ब्रेकफास्ट ला पर्यायवाची शब्दच नाही.
अजूनही काही उपवास करण्यामागील शास्त्रीय कारणे आहेत…
आपले शरीर अतिरिक्त इन्सुलिनसाठी तयारच केलेलं नाही.
इन्सुलिनचे काम झाले की रक्तातील इन्सुलिनची पातळी शून्य झाली पाहिजे ह्यासाठी परमेश्वराने आपले शरीर बनवलेले आहे.
उपवास करतो त्यावेळी ग्लुकॅगॉन पाझरायला संधी उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे.
दूध,ताक,लोणी,तूप,खोबरे, शेंगदाणे, राजगिरा इ. पदार्थ आपण घेऊ शकतो. ह्यामध्ये कमीतकमी पिष्टमय पदार्थ असून प्रथिने व स्निग्धपदार्थ जास्त आहेत.
त्यामुळे इन्सुलिन कमीतकमी पाझरेल.त्यासोबत फळे ही खाऊ शकतो.
पण हे दोन वेळा जेवणातच घ्यावे. मध्ये मध्ये पाणी भरपूर प्यावे. अगदीच वाटले तर पातळ ताक घेऊ शकतो.
असे आपण उपवासावेळी  करणे आरोग्यदायी आहे. तसेच इतर दिवशीही जेवणामध्येच पिष्टमय पदार्थ चपाती, भाकरी, भात, फळभाज्या,कडधान्ये,सलाड इ. घ्यावे. दोन जेवणांच्या मध्ये चहा, कॉफी,एखादा वरचा खाऊ खाणे टाळावे.
म्हणजे इन्सुलिन ची पातळी वाढणार नाही.
इन्सुलिन दोनदा जेवणाच्याच वेळी पाझरेल व पचन झाले की त्याची पातळी खाली येईल आणि मग ग्लुकॅगॉन पाझरेल जे अतिरिक्त चरबीचे पचन करेल.
रोजच्या जीवनात दोन वेळाच जेवणे हेही एकप्रकारे उपवासाप्रमाणेच आरोग्यदायी आहे.
मध्ये मध्ये काय खावे म्हणजे इन्सुलिन ची पातळी वाढणार नाही हे डॉ जगन्नाथ दीक्षितांनी संशोधित केले आहे.
त्यानुसार पातळ ताक(२चमचे दही +२००ml पाणी), नारळ पाणी,एखादा टोमॅटो हे सेवन करू शकतो. आपण चहा, कॉफी ऐवजी जे विविध काढे पाहिले तेही घेऊ शकतो.
जसे धणे+जिरे+दालचिनी+बडीशेप इ.चा काढा. परंतु ज्यांचे फास्टिंग इन्सुलिन व HBA1C जास्त आहे त्यांनी पाणी पिणेच आरोग्यदायी आहे.
एक धार्मिक विधी म्हणून उपवास आपल्या सांस्कृतीत गोवला असला तरी त्यामध्ये सखोल विज्ञानाच लपलेले आहे.

Post a Comment

0 Comments