मी कुठे म्हणालो ' परी' मिळावी



मी कुठे म्हणालो ' परी' मिळावी
फक्त जरा 'बरी' मिळावी
प्रयत्न मनापासून आहेत मग
किमान एक 'तरी' मिळावी!
स्वप्नात तशा खूप भेटतात
कधीतरी खरी मिळावी...
हवीहवीशी एक जखम
एकदातरी उरी मिळावी!!
गालावर खळी नको तिच्या
फक्त जरा हासरी मिळावी..
चंद्राइतकी सुंदर नकोच
फक्त जरा लाजरी मिळावी!!
मी कुठे म्हणालो परी मिळावी
फक्त जरा बरी मिळावी..
आयुष्य हे
विधात्याच्या वहीतील पान असतं....!
रिकामं तर रिकामं,
लिहिलं तर छान असतं...!
शेवटचं पान
मृत्यू अन्
पहिलं पान जन्म असतं...!
मधली पाने
आपणच भरायची,
कारण
ते आपलंच कर्म असतं...!
होणाऱ्या चुकांना टाळायचं असतं,
कुठलंच पान कधी गाळायच नसतं....!
चूक झाली तरी
फाडून फेकायचं नसतं,
कारण त्यातूनच
आपल्याला पुढे शिकायचं असतं.....!

🔺नाती जपण्यात मजा आहे
🔺बंध आयुष्यचे विणण्यात मजा आहे
🔺जुळलेले सूर गाण्यात मजा आहे
🔺येताना एकटे असलो तरी
सर्वांचे होऊन जाण्यात मजा आहे
🔺नशीब कोणी दुसरं लिहित नसतं
आपल नशीब
आपल्याच हाती असतं
🔺येताना काही आणायच नसतं
जाताना काही न्यायचं नसतं
मग हे आयुष्य तरी
कोणासाठी जगायचं असतं
🔺याच प्रश्नाचे उत्तर
शोधण्यासाठी
जन्माला यायचं असतं
🔺आहात तुम्ही 'सावरायला'
म्हणुन
'पडायला' आवडते,
🔺आहात तुम्ही 'हसवायला'
म्हणुन
'रडायला' आवडते,
🔺आहात तुम्ही 'समजवायला'
म्हणुन
'चुकायला' आवडते,
🔺माझ्या आयुष्यात आहेत तुमच्यासारखे "सगळे ''
म्हणुन
मला "जगायला" आवडत...*




Post a Comment

0 Comments