️️कुंडलीचा सर्वात महत्वाचा आणि बलवान भाव जन्मलग्न आणि लग्नेश होतो. संपूर्ण कुंडली स्थिति चांगली आणि वाईट असण्याचे प्रभाव लग्न, लग्नेश आणि लग्नस्थित ग्रहांवर अवलंबून आहे, कुंडलीत राजयोग भरपूर आहेत पण लग्न आणि लग्नेश अस्थ, मृत अंशबलात कमी असेल तर जातकास कुंडलीतील राजयोगाचा प्रभाव मिळत नाही. का मिळत नाही याच उत्तर सरल आहे- कर्म. कर्म आणि आकांक्षा या विषयातच सामावलेले आहे सर्वकाही.
जर कुंडलीत जन्म लग्न बलवान असेल, लग्नेश बलवान असेल तर जातकाच्या मनात इच्छा, आकांक्षा, महत्वाकांक्षा जागृत राहतील, त्याच्या मनात इच्छा येईल, ज्यावेळी तो कोणाची गाडी पाहिल, कोणाचा बंगला पाहिलं किवा एखादी वस्तु, त्यावेळी त्याच्या मनात त्यावस्तूची अपेक्षा निर्माण होईल. पण जर आकांक्षाच नसेल तर जातक म्हणेल मला काय कराचे आहे? मी जेथे आहे तेच बस आहे, मग झोपडी असेना माझासाठी हाच स्वर्ग आहे.
️जन्म लग्न म्हणजे काय? थोडक्यात जातकाच्या जन्म वेळी, जन्म ठिकाणी पूर्वक्षितिजवर (जेथे सूर्य उगवतो) जी राशी उदित झालेली असते, तीच राशी जन्मलग्न असते, आणि ती राशी जन्मलग्न कुंडली मांडताना प्रथम भावात त्या राशीचा अंक स्वरुपात लिहिली जाते. हे जन्म वेळी त्या जन्म ठिकाणच्या अंशाश-रेखांश नुसार निछित होते. सरळ सांगायचे तर हा जो क्षण असतो की आत्मा प्रथमच शरीराचे रुप धारण करून पृथ्वीवर प्रकट होतो.
️राशी नुसार आपण हे जाणु शकतो की व्यक्तीचा नैसर्गिक स्वभाव, व्यवहार कसा आहे, त्याचे गुण, रुचि, विशेषता कशी आहे. पण जन्मलग्न नुसार कोणत्याही जातकाच्या जीवनात जे काही चांगले वाईट घटना घडतील त्यांचे प्रारूप कसे राहील ह्याचा अंदाज केला जातो म्हणूनच राशी पेक्षा जन्मलग्नाला अधिक महत्व प्राप्त आहे.
️जन्म कुंडलीचा लग्न भाव आपले व्यक्तिमत्व दर्शवतो, आणि जेव्हा आपल्या मनात कुठच्या गोष्टी विषयी आकांक्षा जागृत होते, मग घर, गाडी, बंगला आपण जेव्हा पाहतो त्यावेळी त्याविषयी आपल्या मनात आकांक्षा निर्माण होते, पण आपल्याला ज्ञात आहेच जरी आकांक्षा निर्माण झाली तरी ती प्राप्त कर्मानेच होऊ शकते, आणि ज्योतिष पण हेच सांगते कर्मानेच सर्वकाही संभव आहे, जर एखाद्या जातकाचे लग्न आणि लग्नेश कमजोर असतील, आणि त्याच्या कुंडलीत खूप असे राजयोग असतील आणि ते प्राप्त करण्या साठी जातक लाख प्रयत्न करेल पण तरीही त्याला त्या राज योगाचा लाभ होणार नाही. का? राज योग म्हणजे काय तर ज्या आपल्या जीवनात ज्या अपेक्षा असतात तेज राज योग आहेत. लाभ त्याला होऊ शकतो, पण खूप कमी प्रमाणात. कारण कुठलीही सफलता प्राप्त करण्या साठी अखंड प्रयत्न, हेच तर खरे सूत्र आहे. कर्मानेच सर्वकाही शक्य आहे.
️आपल्या जीवनात भाग्याची जी क्षमता आहे ती केवळ 1% आणि 99% कर्म आहे, पण हा 1% एवढा भारी आहे की नेहमी 99% हा त्याचा खाली येतो, पण आपल्या हातात 99% हेच आहे, जे 1% आहे ते आपल्या हातात नाही, निरंतर प्रयत्नच यशाचे शिखर आहे, एक वेळा प्रयत्न करा, यश नाही आले पुन्हा करा, नाही आले पुन्हा करा- अर्थात वारंवार केला जाणारा प्रयत्नच व्यक्तिला सफल बनवतो.
आता लग्न आणि लग्नेश बलवान नसेल तर असा जातकाच्या मनात मत्वाकांक्षा कमी असल्याने किंवा नसल्याने त्याला एका वेळी प्रयत्न करून असफल झाल्यास, त्याला परत वारंवार प्रयत्नच करण्याची इच्छा होत नसते, म्हणजे त्याच्या मनात असफल होण्याचा संशय होतो.
पाहुयात लग्नेश बलवान कसा होतो आणि निर्बली कसा होतो ?
जन्म कुंडलीच्या बाराही भावाना 5 भागात विभक्त करूया.
1) प्रथम भाग कुंडलीतील चार केंद्र भाव. लग्न, चथुर्त, सप्तम, दशम.
2) दूसरा भाग जन्म कुंडलीचे त्रिकोण भाग लग्न, पंचम आणि नवंम. (म्हणजे या दोन्ही भागात जन्मलग्न येथे.)
3) तिसर्या भागात दूतीय आणि द्वादश भाव.
4) चौथ्या भागात तृतीय, षष्ठ आणि एकादश भाव.
5) पाचव्या भागात अष्टम.
️हा झाला शुभ प्रभावाचा घटता क्रम, आता या नुसार कुंडलीत लग्नेश स्थिति पहा की कुंडलीत लग्नेश या पैकी कुठल्या भागात स्थित आहे. पहिल्या चार भागात असेल तर खूप बलवान, त्रिकोणात असेल तर उत्तम स्थितीत.
आता येथे आपणास हा प्रश्न पडेल की येथे दूतीय आणि द्वादश भावाला तिसर्या भागात का? आणि तृतीय आणि एकादश चौथ्या भागात का? तर लक्ष्यात घ्या लग्नेश तृतीय भावात असेल तर जातकाचा संघर्ष कधीही सुटत नाही, आणि द्वादश भाव हा तर त्रिक भाव आहे पण तिसर्या भागात का? येथे दोन्ही प्रकारे लक्षात घ्या, आध्यात्मिक आणि संसारीक. द्वादश भाव हा व्यय भाव आहे, मुक्तीचा भाव आहे, मग आपण आध्यात्मिक दृष्टीकोण ठेवा अथवा भौतिक यात आपण एकच गोष्ट मान्य कराल जेथे मुक्ति आहे तेथे प्राप्ती आहे, शरीरातून मुक्ति मिळेल तर नवीन शरीर मिळेल, काही नाते तूटतात तर तेथे काही जुळतात, प्राप्ती रूपात हा भाव सहयोगी ठरतो, काही गमवाल तर काही प्राप्त कराल, म्हणजे द्वादश भाव तेवढा वाईट नाही जर आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर.
️एकादश भाव मागे का ? कारण हा भाव षष्टेश पासून षष्टेश होतो त्यामुळे कुठेतरी चांगला भाव होत नाही, यात संशय नाही की लग्नेश लाभात किंवा लाभेश लग्नात जातकास धनात कमी नसते पण त्याच बरोबर रोग आणि आजारपण असणे, म्हणजे धन असेल आणि आजारपण असेल तर आशा धनाचा काय उपयोग.
️पुढे अष्टम भाव हा आध्यात्मिक दृष्टीने नाही, कारण आपण सर्व साधारण, सामान्य व्यक्ति भौतिक गोष्टी जास्त अपेक्षित असतो, तर भौतिक आणि संसारीक दृष्टिकोनातून म्हणून अष्टम भाव शेवट म्हणजे पाचव्या भागात कारण लग्नेश अष्टमात किंवा अष्टमेष लग्नात ही सर्वात जास्त खराब स्थिति होते. नेहमी सर्वात जास्त समस्या व्यक्तीच्या जीवनात बनून राहते. स्वास्त्य संबंधित समस्या, जीवनात असफलतेचा सदेव सामना करावा लागेल, अशा स्थितीत जर अष्टमेशावर जर शुभ ग्रह दृष्टी असेल तर त्यात थोडा राहत, पण पाप ग्रह दृष्टी होईल तर अजूनही घातक स्थिति, लग्नेश अष्टमात या योगात कुठे तरी जातक गुप्त राहतो, स्वभावात गुप्तता येते. म्हणजे एकंदरीत भौतिक आणि संसारीक जातकास हा जास्त त्रासदायक विषय आहे.
️या प्रमाणे आपल्या लग्नेशाची स्थिति चा अंदाज घेऊ शकता, त्यानेच कुंडलीतील इतर योगांचा प्रभाव पाहता येईल.
🌹 धन्यवाद 🌹
0 Comments