सहकारी बंधु भगिनींनो !!
आपण सर्वजण सध्या या कोरोना महामारीच्या संकटाला
तोंड देत आहोत.! अनेक जण
बाधित होत आहेत.! मृत्यूशी झुंज देत आहेत.! बरेच जण मृत्युमुखी पडत आहेत.!!तरी अद्याप या कोरोनाच्या विषारी राक्षसाचा अंत होताना दिसत नाही.!! मित्रांनो! तुम्हाला भगवान विष्णूच्या नृसिंह आवताराची माहिती आहेच.! हिरण्यकश्यपू सारख्या महाप्रचंड बलवान राक्षसाचा नाश भगवान विष्णुंनी नृसिंह आवतार धारण करूनच केलेला आहे.!!!हिरण्यकश्यपू यानी आपला लहान बंधु हिरण्याक्ष याच्या विष्णुंनी केलेल्या वधाचा बदला घेण्यासाठी खोल दरीत एका पायाच्या अंगठ्यावर उभा राहून ब्रह्मदेवाच्या कृपा प्राप्तीसाठी घोर तपश्चर्या केली. तेंव्हा प्रसन्न झालेल्या ब्रह्मदेवाला वर मागताना खूप हुशारीने अमरत्वाचा वर मागीतला.!
"हे ब्रह्मदेवा ! माझा मृत्यू मानव अथवा तुम्ही निर्माण केलेल्या प्राण्यापासून होऊ नये" ! दिवसा अथवा रात्री होऊ नये" ! घरात अथवा घराच्या बाहेर होऊ नये.!
अस्त्र अथवा शस्त्राने होऊ नये.!
आणि भगवान विष्णूंनी त्या प्रचंड शक्तीशाली महा दैत्याचा हिरण्यकश्यपूचा वध करण्यासाठी #नृसिंह अवतार धारण केला.! (ना मानव ना पशु!) म्हणजे सिंहाचे मुख व मानवी देह! (ना दिवसा ना रात्री) म्हणजे सूर्यास्ताच्या समयी! (ना घरात ना घराबाहेर ) म्हणजे उंबरठ्यावर.!(ना शस्त्राने ना अस्त्राने) म्हणजे आपल्या हाताच्या बोटातील नखाने ! वध केला.!!!!
मित्रांनो ! उद्या मंगळवारी दि.25 मे रोजी संध्याकाळी नृसिंह जयंती आहे.! यानिमित्ताने मी आज आपणास #अत्यंत प्रभावी अशा #नृसिंह कवचाबाबत माहिती देत आहे.! मित्रांनो ! जर आपल्या घरात कुणाला काही दुष्ट शक्तीची बाधा झाली असेल! घर कोरोना आदी महामारी मुळे बाधित असेल.! रोगभय, शत्रुभय ,ग्रहबाधा असेल !भूत पिशाच्च बाहेरबाधा या कल्पनेने आपण भयभीत व अस्वस्थ झाला असाल!! तर आता काळजीचे कारण नाही!! नृसिंह जयन्तीच्या जन्मकाली संध्याकाळी मी देत असलेल्या पद्धतीने नृसिंह कवचाचे पठण करा !! आणि बघा ! काय चमत्कार होतो ते !!!!
[ गृहशुद्धी,आत्मशुद्धी प्राणायामाने करून शुचिर्भूत होऊन पूजा करावी]
॥ श्रीनरसिंहाय नमः ॥
ब्रह्मोवाच $। अनेक मंत्र कोटीशनृसिंहनाममुच्चरेत् ।
अनेकविधिरक्षार्थविषरोगनिवारणम् ।।
एवढे म्हणून खालील संकल्प करावा !!--
🌠 संकल्पः 🌠
ओम् अस्य श्रीलक्ष्मीनृसिंहकवचस्य
ब्रह्माऋषिरनुष्टुप्छन्दःक्षौं बीजं ऐं शक्तिः रौं कीलकं श्रीनृसिंहदेवता प्रीत्यर्थं ममसर्व-रोगाणां सर्वदेव दोषाणां चौरपन्नगव्याघ्रवृश्चिक भूतप्रेतपिशाचशाकिनीडाकिनी यंत्रमंत्राद्यनेकदोषनिवारणार्थं जपे विनियोगः।।...
[ यानंतर अंगन्यास व ह्रदयादि न्यास खालीलप्रमाणे करावा]
🎆 अथ अंगन्यासः 🎆
ॐ क्षौं अंगुष्ठाभ्यां नमः । ॐ प्रौं तर्जनीभ्यां नमः । ॐ ह्रौं मध्यमाभ्यां नमः । ॐ रौं अनामिकाभ्यां नमः । ॐ व्रौं कनिष्ठकाभ्यां नमः । ॐ ज्रौं करतलकरपृष्ठाभ्यां नमः।।अस्त्राय फट् ।
📱 हृदयादि न्यासः📱
क्षौं हृदयाय नमः । ( अंगठ्याने छातीला स्पर्श करणे) प्रौं शिरसे स्वाहा । (पहिल्या बोटाने मस्तकाला स्पर्श करणे) ह्रौं शिखाये वौषट् । (मधल्या बोटाने शेंडीच्या जागी स्पर्श करणे) रौं कवचाय हुं । (अंगठा व अनामिका या बोटाने अंगाला कवच घातल्याप्रमाणे करावे) व्रौं नेत्रत्रयाय वौषट् । ( अंगठा आणि करंगळी जोडून दोन्ही डोळ्याला स्पर्श करावा) ज्रौं अस्त्राय फट् । (दोन्ही हात एकमेकावर चोळून टाळी वाजवावी व आपल्या डोक्याभोवती उजवा हात टिचकी वाजवून फिरवावा)
वरील क्रिया फार महत्त्वाची असते दुष्ट शक्तीला पळवून लावण्याची ती एक तांत्रिक प्रक्रिया असते.!!
यानंतर नृसिंहाचे ध्यान करावे.
🔥॥ अथ ध्यानं ।।🔥
ॐसत्यज्ञानसुखस्वरूपममलंक्षीराब्धिमध्यस्थितं । योगारूढमतिप्रसन्नवदनं भूषासहस्रोज्ज्वलं ॥ त्र्यक्षं छत्रपिनाकसाभयकरान् बिभ्राणमर्कच्छवीं । छत्रीभूत फणींद्रमिंदुधवलं लक्ष्मीनृसिंहं भजे ॥🌻
🌻एकेन चक्रमपरेण करेण शङ्खमन्येन सिन्धुतनयामवलंब्य तिष्ठन् । वामेतरेण वरदाभयपद्मचिन्हं लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलम्बम् ॥🌻
एवढे ध्यान झाल्यावर खालील मूलमंत्राचे दीर्घ श्वासयुक्त पठण करावे.!!
● ओम् क्षौं प्रौं ह्रौं व्रौं ज्रौं नमः स्वाहा ●
आता खालील नृसिंह कवच पठण मोठ्या आवाजात करावे .!!! आवाज सर्व घरात घुमला पाहिजे.!!
🟪 अथ श्रीनृसिंहकवचम् 🟪
ॐ नमो नृसिंहाय सर्वदुष्टविनाशनाय । सर्वजन मोहनाय । सिंहराजाय । नरकेशाय । कालाय ।कालदंष्ट्राय। करालवदनाय । षडग्रा षडग्रविराय । वज्राय । वज्रदेहिनेरुद्राय । रुद्रघोराय । भद्रायभद्रकारुणे। कपिलजटाय। अमोघवाचा सत्यं सत्यं क्षौं महाउग्रप्रचंड रूपाय ।।
ॐ ह्रौं ह्रौं ह्रिं ह्रिं ह्रुं ह्रुं छ्रां छ्रां छ्रुं छ्रुं फट् स्वाहा ।।
ॐ नमो नृसिंहाय ।
मम सर्वरोगाणां बंधः ।
तीवृ विष रोगाणां बंधः ।
सर्वग्रहाणां बंधः ।
सर्वदेवदोषाणां बंधः।
सर्वनागानां बंधः ।
सर्वव्याघ्राणां बंधः ।
सर्ववृश्चिकाणां बंधः ।
भूत प्रेत पिशाच शाकिनी डाकिनी ब्रह्मराक्षस बंधः।
परमंत्र परयंत्र बंधः ।
कीलय मर्दय चूर्णय ।
एवं मम विरोधिनां सर्वतो
हरणं दह । मथ । पच । चक्रेण
गदावज्रेण भस्मी कुरु ।।
( वरील प्रत्येक मंत्र दोनदा म्हणावा )
🛶🛶🛶🛶🛶🛶🛶🛶🛶🛶🛶
मित्रांनो ! नृसिंह जन्मकाल उद्या दि.25-05-2021 रोजी मंगळवारी सायंकाळी 7 पासून
9 मिनिटापुरता म्हणजे आपापल्या गावातील सूर्यास्ता पर्यंत असणार आहे.! हा जन्मोत्सव सर्वांनी आपल्या घरात साजरा करायचा आहे.!
नृसिंहाचा फोटो देवाजवळ मांडून फोटो नसेल तर एका छोट्या वाटीत तांदळात एक सुपारी नाणे मांडावे.एक लाल वस्त्र (पीस) घेऊन त्यावर एक नारळ ठेवावे. संध्याकाळी बरोबर 7 वाजल्यापासून एकंदर 9 मिनिटे पर्यंत फोटो,सुपारी, नारळ व नाणे या सर्वांवर गुलाल व फूले उधळून नृसिंह जन्म काल साजरा करावा.! त्यावेळी खालील मंत्र 24 वेळेस म्हणावा!!!!
💥ओम् ज्रौं ज्रिं ह्रौं ह्रिं क्लिं क्ष्रौं
नृसिंहाय नमः स्वाहा ।।💥
आणि एकदा नृसिंह जन्मोत्सव झाला की वर दिलेले नृसिंह कवच मोठ्या आवाजात म्हणावे.!! नंतर गंध,पुष्प,धूप, दीप,नैवेद्य इत्यादी पंचोपचार पूजा करावी! शेवटी गणपती व नृसिंहाची आरती करावी.!
आणि सर्वात महत्वाचे म्हणजे पूजा झाली की ते नारळ,सुपारी, व नाणे लाल कापडात पक्के बांधून घराच्या मुख्य दरवाजाच्या वर उंच बांधून ठेवावे.!! कोरोना महामारी तुमच्या घरात कधीच येणार नाही.! तुम्हाला बाधा होणार नाही.! आणि या कवचाचे नित्य पठण केले तर महामारी व इतर संकटातून तुमचे निश्चितपणे रक्षण होईल.!!
[ संदर्भ--नरसिंह पुराण ]
0 Comments