जीईएस ई-लर्निंग प्रोग्राम 2020
जीईएस ई- लर्निंग प्रोग्राम 2020 Trailer Video
जर आपल्या मनात खालील प्रश्न येत असतील तर कृपया पूर्ण लेख वाचा…
कोविड -19 महासाथीच्या काळात शिक्षकांनी काय काम केले?
शिक्षक नुसतेच घरी बसून होते का?
घरी बसून अध्ययन अध्यापन कसे शक्य असेल?
शिक्षकांनी खरोखरच मुलांना शिकवले का?
असे अनेक प्रश्न असतील मनात…
गोखले एड्युकेशन सोसायटी बद्दल माहिती
कोविड -19 मुळे वाढता संसर्ग आणि सतत लॉकडाऊन मुळे प्रत्येक क्षेत्र बाधित झालेले असताना शिक्षण क्षेत्रा पुढील आव्हान हे सर्वात मोठे होते आणि त्या पेक्षा पुढच्या पिढ्या सुरक्षित ठेवून त्यांना शैक्षणिक प्रवाहात टिकवून ठेवण्याचे काम कदाचित कोणत्याही क्षत्रा पेक्षा नक्कीच कठीण असेल.
"शिक्षक" सर्वात सभ्य, शांत समजला जाणारा वर्ग कोणत्याही गोष्टीचा गाजावाजा न करता कोणतेही तंत्रज्ञानाशी, ऑनलाईन अध्यपणाशी कधीही परिचित नसलेला शिक्षक आणि आपल्या विद्यार्थ्यांना कधीही ज्ञाना पासून वंचित न ठेवणाऱ्या शिक्षकांपुढे त्यांच्या आयुष्यातील अनोळखी संकटावर मात करण्याचे मोठे आव्हान होते.
अनेक शिक्षक, संस्था यांनी वेगवेगळ्या पद्धतींनी आपापल्या परीने ऑनलाईन संसाधनानी विद्यार्थांना शैक्षणिक प्रवाहात टिकवून ठेवायचे आव्हान स्वीकारले.
यातच एक शैक्षणिक संस्था गोखले एज्युकेशन सोसायटी, नाशिक ने आपली अनोखी ओळख जीईएस ई- लर्निंग प्रोग्राम 2020 या आपल्या 100% यशस्वी उपक्रमातून निर्माण केली. आम्ही शिक्षणा प्रती कोणत्याही परिस्थितीत किती सुसज्ज आहोत हे संस्थेच्या कार्यातून दिसते. करोना काळात इतर संस्थेच्या तुलनेत किती वेगळे आहोत हे सिद्ध केले आहे.
शिक्षक काय करू शकतात? याचे अप्रतिम उदाहरणं संस्थेचे महासचिव सर डॉ.एम.एस.गोसावी सर याच्या नेतृत्वाच्या माध्यमातून प्रस्तुत केले आहे.
या संस्थेने आपल्याच काही तंत्रस्नेही शिक्षणाच्या मदतीने संस्थेतील 200 पेक्षा जास्त शिक्षकांना ऑनलाईन ई कंटेंट बनवण्याचे प्रशिक्षण देवून तरुण शिक्षकांबरोबर 55 वर्ष पेक्षा जास्त वयाच्या शिक्षाकडून सुद्धा युट्यूब व्हिडिओ निर्मिती करून एक रेकॉर्ड बनवले आहे.
संस्थेतील तंत्रस्नेही शिक्षकांकडून हे सर्व यूट्यूब व्हिडिओ वेबसाईटवर अतिशय नियोजन बद्ध उपलब्ध करून उपक्रमाला यश प्राप्त झाले आहे. या वेबसाइटवर इयत्ता 1 लि ते 10 वी पर्यंत मराठी माध्यम तसेच इंग्रजी माध्यमचे विषया प्रमाणे तसेच विषयाच्या अनुक्रमणिका प्रमाणे व्हिडिओ उपलब्ध आहेत.
या 200 शिक्षकांनी जवळ जवळ 4000 पेक्षा जास्त व्हिडिओ बनवलेले आहेत.
संस्थेच्या चार जिल्ह्यांमध्ये असलेल्या शाळांमधील जवळ जवळ 5000 विद्यार्थ्यानं पर्यंत प्रत्येक वर्गाच्या व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून अतिशय नियोजन बद्ध शेवटच्या विद्यार्थ्यांपर्यंत हे व्हिडिओ पोहचवण्याचा पराक्रम संस्थेतील शिक्षकांनी केलेला आहे.
आज या संस्थेतील सर्व विद्यार्थ्यांनी सर्व अभ्यासक्रम पूर्ण करून प्रथम द्वितीय चाचणी तसेच प्रथम सत्र परीक्षा गृहपाठ असे शैक्षिणक कार्य पूर्ण केले आहे ही सांस्थे साठी आणि शिक्षकांसाठी गर्वाची गोष्ट आहे.
गूगल मीट, झूम मीटिंग सारखे सर्वांना वेळेवर उपलब्ध न होवू शकणारे ऑनलाईन साधन न वापरता संस्थेने यूट्यूब व्हिडिओ चा मोठा हुशारीने उपयोग केला जो कोणत्याही विद्यार्थ्याला आपल्या सोई नुसार जेव्हा पाहिजे तेव्हा उपयोग होऊ शकेल.
झूम मीटिंग आणि गूगल मीट वापरतांना स्क्रीन क्वालिटी अस्पष्ट आवाज नेटवर्क इश्यू वेळेची मर्यादा असे अनेक समस्या असल्यामुळे या तुलनेने यूट्यूब व्हिडिओ हे अतिशय प्रभावी आणि वारंवार कितीही वेळेस आणि कोणत्याही वेळेस बघण्याची सुविधा उत्तम स्क्रीन आणि आवाज क्वालिटी मुळे संस्थेने यूट्यूब व्हिडिओ वर उपक्रम राबवण्याचे ठरवले.
या उपक्रमात संस्थेतील प्रत्येक शिक्षकाचे, पदाधिकारी यांचे योगदान हे मोलाचे आहे.
व्हिडिओ बनवणे यूट्यूबवरून वेबसाईट वर पाठवणे नियोजन प्रमाणे विद्यार्थी वर्गाच्या व्हॉट्सॲप ग्रुप वर पाठवणे तसेच तो वेद्यार्थ्यांनी बघितला की नाही याचा पाठपुरावा करणे. अश्या गोष्टीचा समावेश होता.
शिक्षकांनी फक्त पाठ्यक्रम नाहीतर शारीरिक शिक्षण, चित्रकला या विषयावर सुद्धा व्हिडिओ बनवले आहेत.
या संस्थेतील सर्वच शिक्षकांनी खूप मेहनत घेवुन विद्यार्थ्यांना या शैक्षणिक प्रवाहात टिकवून ठेवले आहे. यात मुद्दाम मी खालील शिक्षकांचा उल्लेख केला आहे की ज्यांचे वय 56+ असून या तंत्रज्ञानाचा कोणताही गंध नसतांना या उपक्रमात भाग घेवून शिक्षक वेळ आल्यास काय करू शकत नाही याचे उत्तम उदाहरण सादर केले आहे …. या शिक्षकांनी यूट्यूब स्वतःचे चॅनल ओपन करून शैक्षणिक व्हिडिओ बनवून आपले कर्तव्य पर पडत आहेत... याचा अर्थ शिक्षक कोणत्याही विपरित परिस्थितीत कोणत्याही उपलब्ध साधनांच्या मार्गाने विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करण्यास सक्षम आहे हे सिद्ध होते.
जीईएस ई- लर्निंग प्रोग्राम 2020 ची सुरुवात काशी झाली, कोणत्या परिस्थितीत झाली संस्थेने या उपक्रमास कसा आकार दिला ते खालील विडियो मध्ये बघा .
खालील शैक्षणिक योद्धे..
संस्थेची वेबसाईट...
इयत्ता 1लीं ते 10 वी प्रत्येक विषयाचे व्हिडिओ
व्हिडिओ लिंक्स पुस्तकातील अनुक्रमणिका प्रमाणे उपलब्ध
इंग्रजी, सेमी इंग्रजी, मराठी माध्यम.
शाररिक शिक्षण , चित्रकला व्हिडिओ
4000+ पेक्षा जास्त व्हिडिओ निर्मिती.
एकूण विषया नुसार व्हिडिओ
पालक विद्यार्थी प्रतिक्रिया
व्हिडिओ बनवणारे शिक्षक, व्हिडीओ संख्या तक्ता...त्यांचे बेस्ट व्हिडिओ..
या उपक्रमाबाबत विद्यार्थी आणि पालक यांच्या प्रतिक्रिया आणि मत
खालील विडियो मध्ये बघा
याच संस्थेतील तंत्रस्नेही शिक्षक श्री. अजयसिंग पाटील यांनी वेबसाईट बनवण्या बरोबर वर्षभर विद्यार्थी आणि शिक्षक यांना ऑनलाईन तंत्राच्या माध्यमातून शैक्षणिक कामकाज साठी सहकाऱ्यांच्या माध्यमातून आणि मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनातून यशस्वी रित्या प्रथम, द्वितीय घटक चाचणी प्रथम सत्र परीक्षा तसेच सर्वांगीण विकासासाठी ऑनलाईन अनेक शैक्षिणक दीन साजरा करून वार्षिक क्रीडा मोहत्सव सुद्धा पार पडला...
त्यासाठी सर्व कामकाजाच्या लिंक्स....
1) लिंक -
2) लिंक -
3) लिंक - विद्यार्थी ऑनलाईन उपस्थिती
4) लिंक - द्वितीया घटक चाचणी
5) लिंक -वार्षिक परीक्षा 9 वी
6) लिंक - वार्षिक क्रीडा मोहत्सव
वार्षिक क्रीडा मोहोत्सव विद्यार्थी आणि पालकांना लाईव दाखवण्यात आला. इतिहासात प्रथमच असा क्रीडा मोहोत्सव विद्यार्थ्यांनी बघितला. अतिशय सुंदर लाईव प्रक्षेपण बघा
8) इयत्ता नववी चा वार्षिक निकाल सुद्धा ऑनलाइन दिलेला आहे ते आपण खालील लिंक वर बघू शकता.
9) उपक्रम तर बनवला पण खरोखर विद्यार्थ्यांना याचा लाभ झाला का? जाणून घ्या पालक आणि विद्यार्थी यांच्या 4428 प्रतिक्रिया. पालकांचे मत.
10) जर आपल्या मनात प्रश्न असतील की विद्यार्थ्यांकडे नेटवर्क उपलब्ध होते का?, फोन होते का? व्हिडिओ त्यांना समजत होते का? खालील लिंक वर बघा..
वरील सर्व लिंक्स आज सुद्धा शिक्षकांची धडपड दर्शवतात....... विपरीत परिस्थितीत सुद्धा शिक्षक काय करू शकतात हे वरील अतुलनीय कार्यातून सिद्ध होते.
वरील सर्व लिंक्स बघून आपल्याला लक्षात येईल की शिक्षकांनी
व्हिडिओ एडिटिंग, व्हिडिओ रेकॉर्डिंग, व्हिडिओ यूट्यूब वर पब्लीश करणे, गूगल फॉर्म चा प्रभावी वापर करून परीक्षा , वेबसाईट चा वापर करून विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाशी अवगत केले, वेबसाईट वर ऑनलाईन निकाल जाहीर, वेबसाईट च्या मदतीने अनेक शैक्षणिक दिवस साजरा केलेत...अश्या प्रकारे एक अद्वितीय कार्य शिक्षकांच्या हातून झाले.
पण ज्या वेळेस समाजातील काही लोक कोणतेही वास्तव लक्षात न घेता पूर्व ग्रहाने शिक्षकांचा कर्या बद्दल शंका उपस्थित करतात त्या वेळेस असे शिक्षकांचे कार्य समाजापुढे सादर करावेसे वाटले.
शिक्षकांच्या covid-19 लॉकडाउन मधील कामाचा पुरावा म्हणून लिंक्स या मेसेज सोबत देण्यात आलेला आहे.
या उपक्रमाचे प्रेरणास्थान संस्थेचे महासचिव सर डॉ. एम.एस. गोसावी सर, सर्वंकष कुशल नेतृत्व आणि मार्गदर्शक संस्थेचे एच.आर.डायरेक्टर डॉ. दीप्ती देशपांडे मॅडम आणि विभागीय सचिव डॉ. राम कुलकर्णी सर तसेच या उपक्रमाचे यशस्वी पणे संचलन करणारे श्री. विनोदजी देशपांडे सर यांनी या या अनोख्या ऐतिहासिक उपक्रमात आम्हाला सर्व शिक्षकांना सहभाग घेण्याची मोलाची संधी दिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद!
आज आम्ही सर्व शिक्षक समाजाने कोरोणा काळात शैक्षणिक योद्धा म्हणून तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अध्यापनाचे जे काही काम केले आहे ते नक्कीच विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित ठेवणार असा विश्वास आहे.
गोखले एज्युकेशन सोसायटी, शिक्षकांनी शिक्षकांसाठी स्थापन केलेल्या संस्थेचे कोरोना काळातील हे अद्वितीय कार्य विद्यार्थी कल्याण हेतू कौतुकास्पद आहे.
शिक्षण फक्त पुस्तकातील नसते; ह्या विपरित परिस्तिथीत सुद्धा ऑनलाईन शिकता शिकता विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी कठीण परिस्थितीवर मात कशी करावी आणि आपापले लक्ष प्रती उद्दिष्ट कसे साध्य करावे याचा मौल्यवान अनुभव घेतला आणि या अनुभवाची ही शिदोरी ही नक्कीच कामात येईल.
0 Comments