मना पासून वाचा

*कुणी लिहिले माहित नाही पण छान लिहिले एकदा अवश्य वाचुन पहा*

*"शब्द" बदलला की "अर्थ"*
*बदलतो..*.😂
गरिब माणुस *दारु* पितो.
मध्यमवर्गीय *मद्यपान*  करतो..
तर, श्रीमंत लोक *Drink's* घेतात...

काम केल्यावर गरिबाला *मजुरी* मिळते.
काम केल्यावर मध्यमवर्गीयाला *पगार* मिळतो..तर, काम केल्यावर आॅफिसरला *Salary* मिळते...

गरिब करतो ते *लफडं*.
मध्यमवर्गीय करतो ते *प्रेम*..
तर, श्रीमंत करतो ते *Affair*...

शब्दाबरोबर शब्द मांडला की *कविता* होते
शब्दाने शब्द वाढला की *भांडण* होते..
शब्दाने शब्द वाढत गेला की लेखकाची *Royalty* वाढते...

पैशाने गरिब असलात तरी चालेल पण , मनाने श्रीमंत रहा कारण गरिबाच्या घरावर लिहीलेलं असतं *" सुस्वागतम् " !*
आणि, श्रीमंताच्या घराबाहेर लिहीलेलं असतं *" कुत्र्यापासून सावधान " !!*
*काही राहिलं तर नाही ना !!!*
🌀*जीवनामध्ये तुम्ही खूप काही मिळवलं असलं तरी आयुष्याच्या प्रत्येक *टप्प्यावर पुढे जात असताना नेहमी हा प्रश्न सर्वांनाच पडतो...*
*"काही राहिलं तर नाही ना?”*
🌀*वर्षभराच्या पोराला बाईच्या हवाली टाकून जॉबसाठी जाण्याऱ्या आईला ती बाई जेव्हा विचारते*
*"पर्स, चावी घेतली ना, काही राहिलं तर नाही ना?”*
*ती आई कशी सांगेल कि ज्याच्या भविष्यासाठी एवढा आटापिटा चालू आहे तोच तर राहिला !!!*
🌀*खूप आशेने आईबापाने पोराला शिकविले. पोरगा परदेशात सेटल झाला. नातू जन्मला म्हणून आजी आजोबा टूरिस्ट विसावर गेले. ३ महिने झाल्यावर निघताना पोरगा सहजच बोलून गेला*
*"सगळ चेक करून घ्या, काही राहिलं तर नाही ना?”*
*काय उत्तर द्यावे त्या म्हातार्यांना कळेना कारण “आता मागे राहायला शिल्लक तरी काय आहे”*
🌀*लग्न होऊन पोरगी वरातीसोबत निघून गेली तेव्हा बापाला आत्या विचारते*
*“दादा, पोरगी काही विसरली नाही ना रे, काही राहिलं तर नाही ना?”*
*भूतकाळात गेलेल्या त्या बापाला पोरीच्या रूम मध्ये सुकलेली फुले दिसतात.*
*अश्रू लपवत लपवत बाप बोलला “ती गेली पण आठवणी इथेच राहिल्या, दुसरे काय राहणार”*
🌀*६० वर्षे वय झाल्यावर आज साहेबाचा ऑफिसमध्ये शेवटचा दिवस होता. चपरासी बोलला*
*"साहेब, काही राहिलं तर नाही ना?”*
*साहेबानी डोळे बंद केले तर लक्षात* *आले कि पूर्ण आयुष्य या* *जागी काम करण्यात केले. सगळ्च* *इथे आहे मग “मागे काय राहणार”*
🌀*स्मशानात आईच्या चितेला अग्नी देऊन बाहेर पडलेल्या पोराला मित्र विचारतो*
*“मित्रा, काही राहिलं तर नाही ना?”*
*तो धावत धावत परत अग्नीजवळ गेला. आईचा चेहरा पाहण्यासाठी केलेला प्रयत्न अयशस्वी झाला.*
*त्याला उमजेना कि काय राहून गेले. डोळे पुसत पुसत तो म्हणाला “काही नाही रे, जे राहिले ते आता सदा स्मरणात राहील”*
🌀*एकदा तरी वेळ काढून मागे बघा, जुन्या आठवणी ताज्या करा. डोळे भरून येईल. मन प्रफुल्लित होईल आणि आत्ताचा हा क्षण जगण्याची नवी उमेद मिळेल. मग कधीही काहीच मागे राहणार नाही.*

👏👏👏

Post a Comment

0 Comments