अध्यात्मीक विश्वास

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

*पत्रकार :* बाबाजी, तुमचे वय किती आहे ?
*वारकरी :* ६५ वर्षे आहे बेटा.
*पत्रकार :* तुम्ही किती वर्षापासून पंढरपूरला येत आहात ?
*वारकरी :* जवळपास ५० वर्षापासून.
*पत्रकार :* तुम्हाला विठ्ठल दिसला का..? एकदा तरी..?
*वारकरी :* नाही बेटा, नाही दिसला.
*पत्रकार :* तरमग तुम्ही का बरे येता दरवर्षी?

*वारकरी : गावाकडे आम्ही घरात कुत्रा पाळतो, तुमच्यासारखा फॅशन म्हणून नव्हे तर चोरांपासून संरक्षणासाठी.*
*रात्रीच्यावेळी एका कुत्र्याला चोर दिसला की तो जोरात भुंकायला लागतो, ते ऐकून आजूबाजूच्या घरातले २० कुत्रेपण भुंकायला लागतात.*

*२०पैकी १९ कुत्र्यांनी चोराला बघितलेले नसते, पण पहिल्या कुत्र्यावर विश्वास ठेवून ते भुंकायला सुरूवात करतात. जर जनावरं एकमेकांवर विश्वास ठेवू शकतात तर माणूस माणसावर का नाही?*

*संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव आणि अशा अनेकांनी विठोबा पाहिला आणि माझा त्यांच्यावर विश्वास आहे, की एक दिवस मलाही विठ्ठलाचे दर्शन होईल...!*

🙏🏼🙏🏼 आपल्या सर्वांमध्ये असणाऱ्या श्रीहरी विठ्ठलास माझा नमस्कार. 🙏🏼🙏🏼

         *"जय हरी विठ्ठल"*

Post a Comment

0 Comments