🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
----------------------------------
एका अध्यात्मिक गुरु ना एका माणसाने विचारले "माझे कामगार माझ्याशी प्रामाणिक नाहीत. पत्नी, मुलं, सगळं जग हे स्वार्थी आहे. सगळे चुकीचेच वागतात. अस का?"
तेव्हा गुरु हसले आणि त्यांनी एक गोष्ट सांगितली.
एका गावात एक खोली होती. त्या खोलीत १००० आरसे होते. त्यात खोलीत एक छोटी मुलगी खेळायला जायची. अर्थातच तिला तिच्या भोवती अनेक मुली दिसायच्या. ती खुश व्हायची. ती हसली की त्या सगळ्या हसायच्या. तिने टाळ्या वाजवल्या की त्या सगळ्या टाळ्या वाजवायच्या. त्यामुळे तिला ती खोली म्हणजे सर्वोत्तम जागा वाटायची.
त्याच खोलीत एकदा एक खूप त्रासलेला, एकदम नाराज माणूस शिरला. त्याला त्याच्या भोवती सगळे चिडलेले, नाराज ,अस्वस्थ चेहरे दिसायला लागले. ते सगळे त्याच्याकडे रोखून पहात होते. त्याने एकदम भडकून त्यांच्यावर हात उगारला तर त्या सगळ्यांनी ही त्याच्यावर हात उगारला. त्याच्या मनात विचार आला अरेच्या काय ही खोली. जगात यापेक्षा वाईट जागा नसेल.
हे जग म्हणजे अशाच हजारो आराशांची मोठी खोली आहे.
आपण जसे असू तसे त्या आरशातून दिसू. जग म्हणजे स्वर्ग की नरक हे आपल्यावर अवलंबून आहे. आपण जसं पाहू तसं ते दिसेल."
0 Comments