जिवनातील सत्य

सर्वानी नक्की वाचा
😵😵

माजी उप मुख्यमंत्री छगन भुजबळ हे आपल्या आमदारकीच्या मताची किंमत ओळखून राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी विधान भवनात आल्याचे टीव्हीवर पाहिले.

पांढरीशुभ्र दाढी वाढलेली.
अतिशय थकलेले.
डोक्यावर कानटोपी घातलेली.
एकेक पाऊल सांभाळत चाललेले.
विधान भवनातील पायऱ्या चढतानाही धाप लागत होती.

कोणी विचारले, ' कसे आहात ?' तर फक्त ' ठीक आहे ' इतकेच बोलले.

त्यांनी जवळपास 8 हजार कोटींची माया जमवली.
साखर कारखाना विकत घेतला.
परदेशात खाण आहे.
मुलाला आमदार बनवले.
पुतण्याला खासदार बनवले.
घरात असलेले पोस्टर काही कोटींचे आहेत.
नाशिक मध्ये मोठमोठे महाल आणि भुजबळ नॉलेज सिटी आहे.
बंगले कोट्यवधींचे आहेत.

इतकी वर्षे वैभवात राहीलेला आणि बाळासाहेब ठाकरेना आव्हान देणारा हा निधड्या छातीचा वाग गलितगात्र /  हवालदिल झालेला पाहून मन खिन्न झाले.

सामान्य कैद्यांसारखे जीवन जगतो आहे.
गाद्यागिरद्यांवर झोपणारा जमिनीवर झोपतो आहे.
तुरुंगातून बाहेर येण्याची धडपड करतो आहे.

पण आपल्या वैभवाचे सुख घेऊ शकत नाही. थोडासा आराम करावा म्हणून दवाखान्यात ऍडमिट झाले तर त्यांच्यावर आरोप होतात आणि पुन्हा तुरुंगात जमिनीवर झोपायला पाठवतात.

मनसेचे तत्कालीन आमदार गोल्डन मँन रमेश वांजळे दोन - अडीज किलो सोने अंगावर घालायचे. एका क्षणात मृत्यूने कवटाळले.

अर्धे जग जिंकलेला आणि पूर्ण जग जिंकण्याची जिद्द बाळगलेला सिकंदर आपल्या सहकाऱ्यांना म्हणाला, ' मी मरेल तेंव्हा माझे प्रेत नेताना माझे हात पेटीच्या बाहेर मोकळे सोडा, जगाला कळू द्या, जिवंतपणी जग जिंकायला निघालेला सिकंदर मेल्यानंतर खाली हात गेला.

फ्रान्सचा सम्राट नेपोलियन बोनपार्ट वाटरलूच्या तुरुंगात खंगुन खांगुन मेला.

जर्मनीचा शहेनशहा ज्याने दुसरे महायुद्ध घडवले त्या एडॉल्फ हिटलरला आत्महत्या करावी लागली.

इराकचा बादशहा सद्दाम हुसेन याने इराकवर हुकूमत केली. नको तीतकी संपत्ती गोळा केली. शेवटी फासावर लटकावे लागले.

आपल्या वडिलाला ( शाहजहानला ) तुरुंगात टाकून, भावांचा खून करून सत्ता मिळवलेल्या, भारतावर साम्राज्य असलेल्या बादशहा औरंगजेबाच्या समाधी कडेही कोणी बघत ही नाही.

एकेकाळी दहशत असलेल्या बेनेटो मुसोलिनीला झाडाला टांगून लोक त्याच्या प्रेतावर थुंकले.

फ्रांसची हुकूमत ताब्यात असलेल्या 16 व्या लुईला लोकांनी गिलोटिनवर चढवले.

कार्ल मार्क्सला डोक्यावर घेणाऱ्या लोकांनीच त्याचे पुतळे फोडून टाकले.

जगाला आपल्या अभिनयाने हसवणारा चार्ली चॅप्लिन असाच झटका येऊन मेला.

भल्याभल्यांना आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने भुरळ पाडणारी अभिनेत्री मर्लिन मंरो ही अति मद्य सेवनाने मेली.

मनोरंजनातून लोकांच्या जीवनावर राज्य करणारे राजेश खन्ना, विनोद खन्ना, भगवान दादा, ए के हँगल, परवीन बाबी, माला सिन्हा यांचे मृत्यू आठवा.

इंदिरा गांधी, राजीव गांधी, प्रमोद महाजन, विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे यांचे मृत्यू आठवा.

काय कमी होते यांच्या कडे ? काहीच नाही ना?

*सांगायचा उद्देश की,* पदाचा, संपत्तीचा कधी गर्व करू नये. आयुष्य कितीही वैभवात काढले तरीही मयत त्याच मांजरपाट कपड्यात नेले जाते. कोणी तरी म्हटले आहे, *' कफन ब्रँडेड नही होता.'*

आपल्या कडे जे काही आहे त्याचा चांगला उपयोग करा. लोकांच्या उपयोगी पडा. पद आणि पैसा आज आहे उद्या नसेल.
पण माणुसकीने मिळवलेली माणुसकीच साथ देईल.

आपल्या कडे असलेल्या संपत्तीचा बडेजाव करू नका. भरकटलेल्या जहाजात कितीही पैसा असला तरी पिण्याचे पाणी मिळत नाही. जमिनीशी जोडलेले राहा. संपत्ती आणि पदाचा गैरवापर करू नका.

*शेवटी एकच सांगतो, जीवन सुंदर आहे,👌 आनंदाने जगा व जगू दया.. आपले हातून एखादयाचे काम होत असेल तर ते निस्वार्थी व निसंकोच करा.. नेहमी मदत करा,🤝 , दुसर्याला त्रास होईल असे कदापी वागू नका.. प्रत्येकाला शेवटी तिथेच जायचे आहे... जिथे परत येण्याचा रस्ताच नाही...
लेखकः Anonymous

Post a Comment

0 Comments