साडेसाती

🟦*साडेसाती*🟦
24 जानेवारी 2020 पासून कुंभ राशीला साडेसाती सूरु झाली असून ,धनु,मकर व कुंभ ला साडेसाती असेल🟨
बऱ्याच जणांनी काही सूचना केल्याने हि माहितीसादर करत आहे शिवाय वृश्चिक ची साडेसाती संपली आहे 
साडेसाती हि🟨
 ही आपल्या *मागील चुकांची जाणीव* करून देण्यासाठी येते, जेणेकरून आपण त्याच किंवा त्या प्रकारच्या *चुका पुन्हा करू नयेत*
त्याचबरोबर आपल्या जीवनाला एक चांगली दिशा ही देते
*नेहमी लक्षात ठेवावे की, आपल्या सम्पूर्ण जीवनावर शनी महाराजांचे लक्ष असते*🟦
शनीची साडेसाती... धसका ? कि दिलासा
आपल्या संपूर्ण आयुष्यात कुणाला घाबरत असेल तर “शनी महाराजांना” .शनीची साडेसाती आली आता माझे काही खरे नाही...अश्या प्रकारची विधाने आपण ऐकत असतो. पण खरच त्यात घाबरण्यासारखे काही आहे का ? चला आज ह्या समज गैरसमजापलीकडे असलेल्या ह्या ग्रहाची खरी ओळख करून घेवूया आणि त्यांच्यापुढे नतमस्तकही होवूया . शनी म्हणजे त्रास , वेदना , मानसिक यातना ,क्लेश याची जणू शृंखलाच अशीच आपली समजूत आहे. अमुक एका माणसाचे साडेसातीत हे हे असे झाले म्हणजे माझेही तसेच होणार हा समज सगळ्यात आधी डोक्यातून काढून टाका. 

ज्योतिषी नरेंद्र जोशी कर्वेनगर पुणे
9763439584🟦

प्रत्येकाच आयुष्य वेगळ आहे आणि प्रत्येकाच्या पत्रिकेतील शनीची स्थितीही वेगळीच असणार आहे. शनीचा धसका घेण्याऐवजी जर त्याला निट समजून घेतलत तर त्याबद्दल असणारे गैरसमज तर दूर होतीलच उलट तुमची साडेसाती सुखकर होण्यास मदतच होईल. मला सांगा आयुष्यात काय फक्त साडेसातीच्या काळातच वाईट घटना घडतात का ? नाही इतरही वेळी घडतात. खर तर साडेसाती हि मानूच नका. शनी हा तुमचा शत्रू नाही तर तो तुमचा मित्र आहे. शनी ज्याला कळला त्याला सगळेच सोपे होवून जाईल. अहो आपला एक संपूर्ण दिवस सुद्धा चांगल्या वाईट घटनांनी भरलेला असतो मग संपूर्ण साडेसात वर्ष वाईटच जातील हे असे का समजायचे , विचार करा..🟦

शनीची साडेसाती हि साडेसात वर्षाची असते हे आपण सर्वांनाच माहित आहे. एखाद्याची रास “सिंह “ असेल तर शनी कर्क राशीत प्रवेश करेल तेव्हा ह्या सिंह राशीला साडेसाती सुरु झाली असे समजावे आणि जेव्हा शनी तुला राशीत प्रवेश करेल तेव्हा सिंह राशीची साडेसाती संपली असे समजायचे . याचाच अर्थ कर्केत २|| वर्षे ,सिंहेत २|| वर्षे आणि कन्येत २|| वर्षे असा साडेसात वर्षाचा काळ म्हणजे सिंहराशीची साडेसाती . आपली जी कुठली रास असेल त्या राशीच्या आधीच्या राशीच शनी आला कि आपल्याला साडेसाती सुरु आणि आपल्या पुढील राशीतून शनी जेव्हा पुढे जाईल तेव्हा आपली साडेसाती संपली अस समजायचे. सध्या धनू, मकर आणि कुंभ राशिना साडेसाती चालू आहे.

शनी हा वैराग्याचा , उदासीनतेचा कारक आहे. आळशी ,अप्रामाणिक लोक शनीला अजिबात नाही आवडत. कष्ट करणारा समाज शनीला आवडतो. असेल हरी तर देयील खाटल्यावरी म्हणणार्यांना शनी झोडपून काढेल. शनीला सर्वात न आवडणारा गुण म्हणजे अहंकार , मिजास ज्या माणसाना अतिशय मिजास आहे तसेच जी माणसे अत्यंत माजोरीपणाने ,अहंकाराने मी म्हणजे कोण ? अश्या थाटात वागत असतात त्यांना शनीची साडेसाती कशी गेली विचारा.🟩

साडेसातीत माणसाची सगळी मिजास उतरते, मी असा आणि मी तसा म्हणणाऱ्यांची शनी झोप उडवतो. शनी साडेसातीत मनुष्याला सगळ्या मोहापासून दूर करतो, अंतर्मुख होण्यास शिकवतो. साडेसाती मध्ये लग्न होणे, घर होणे , परदेशगमन , चांगली नोकरी , प्रमोशन मिळणे अश्या चांगल्या घटनाही घडतात. साडेसाती दर ३० वर्षांनी येते कारण एका राशीत शनी २|| वर्षे वास्तव्य करतो त्यामुळे पूर्ण आयुष्यात साडेसाती कमीतकमी २ वेळा तरी येते असे म्हणायला हरकत नाही. चांगल्या घटनांचे श्रेय शनी महाराजांना न देता फक्त विपरीत घटनांचे खापर मात्र शनी महाराजांवर फोडणे हा मनुष्य स्वभावाच आहे. परंतु हि पळवाट योग्य नाही. साडेसातीत आपली वाईट कर्मे एकामागून एक आपल्या समोर हात जोडून उभी राहतात आणि त्याबद्दल शासन ठोठावण्याचे काम शनी महाराज निरपेक्षपणे करत असतात इतकच. तुमच्या चांगल्या कार्माचही फळ ते नक्कीच देतात .

इतर कुठल्याही देवाची पूजा करत नसलात तरी शनी महाराजांचे नित्य स्मरण तुमचे जीवन आनंदी करेल यात शंकाच नाही.

साडेसातीत खोटे आरोप येणे, तुरुंगवास, अप्तेष्टांबरोबर कलह , कुटुंबात मोठ्या प्रमाणात वाद निर्माण होणे, घरातील इस्टेट जमिनी वरून वाद , व्यवसायाची हानी होणे , अपकीर्ती , दीर्घ आजारपण, आपत्ती, धननाश होणे, अपमानास्पद घटना घडणे , मनस्ताप , आपल्याबद्दल समाजात गैरसमज पसरणे यासारख्या गोष्टी घडून येतात .

कुटुंबात एकाच वेळी एकापेक्षा जास्ती व्यक्तींना साडेसाती येणे हे चांगले नाही. ज्यांच्या पत्रिकेत चंद्र ६/८/१२ या स्थानात असतो त्यांना तसेच ज्यांना शनी किंवा राहूची महादशा, अंतरदशा चालू आहे अश्या लोकांना साडेसाती संघर्षमय जावू शकेल. चंद्र-शनी युती हि पत्रिकेत चांगली नाहीच.

साडेसातीत काय करावे ?🟨

सगळ्यात उत्तम उपाय हा कि गप्प बसावे. आवश्यक तेव्हडे आणि कमीतकमी बोलावे, कुणाची निंदा नालस्ती करू नये. कुणाही बद्दल वाईट बोलू नये. कुठल्याही व्यसनाच्या आहारी न जाता आळस झटकून कामाला लागावे. घरातील वडीलधाऱ्यांचा मान ठेवावा ,शनी हा वृद्ध ग्रह आहे त्यामुळे वृद्ध माणसांची सेवा करावी. कुणालाही गृहीत धरू नये , कुणाला जामीन राहू नये, सगळ्यात महत्वाचे म्हणजे अहंकारास तिलांजली द्यावी , असत्य भाषण करू नये. कुणाकडूनही पैसे उधार घेवू नयेत .आपण मेहनत करावी आणि त्याचे शनी महाराज योग्य ते फळ दिल्याशिवाय राहणार नाहीत हे पक्के ध्यानात ठेवावे.🟩

बुधवारी आणि शनिवारी मारुतीच्या मंदिरात जावून दर्शन घ्यावे. शनी किंवा मारुती मंदिरातून घरी यावे आणि मग पुन्हा पुढील कामास जावे. मंदिरात दर्शन घेवून तसेच पुढे बाजारात किंवा तसेच पुढे सिनेमाला जावू नये. जमल्यास या काळात शनिशिंगणापूर इथे जावून शनी महाराजांचे दर्शन घेवून तैलाभिषेक करावा. एक लक्ष्यात ठेवा आपण करत असलेली कुठलीही साधना किंवा उपाय याचा उहापोह किंवा त्याची कुठेही चर्चा करू नये. कारण त्याचे फळ कमी होते, मी १०००० जप केला हे सांगणे म्हणजेही एक प्रकारचा अहंकाराच आहे. हनुमान वडवानल स्तोत्र तसेच शनिवारी शनीमहात्म् हा पवित्र ग्रंथ वाचवा. वाचण्यापूर्वी त्याची पूजा करावी. साडेसातीचा फारच त्रास होत असेल तर एका मातीच्या भांड्यात गोडेतेल घ्यावे व त्यात आपला चेहरा निट न्याहाळावा व ते तेल मारुतीच्या मंदिरातील समई मध्ये नेवून ओतावे. लक्ष्यात असुदे कि हे तेल जळले पाहिजे हे तेल चुकूनही मारुतीच्या मूर्तीवर वाहवयाचे नाही आहे. हा उपाय घरातील पुरुषांनी करावा. असे ३ शनिवार करावे म्हणजे आपल्याला जर कुणाची पीडा असेल तर ती जाईल . सर्वात महत्वाचे म्हणजे माजोरीपणा , अहंकार जर सोडला तर ५० % काम फत्ते तिथेच झाले असे समजावे कारण शनीला अहंकाराचा तिटकारा आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे शानि महाराजांवर नितांत श्रद्धा ठेवा.

शनी आपल्या आयुष्याचा वाटाड्या आहे हे विसरू नका.

नीलांजन समाभासं रविपुत्रं यमाग्रजम | छायामार्तंड संभूतं तं नमामि शनैश्चरम || हा शनीचा जपही जमेल तितका करावा...हे सर्व करताना मन शांत ठेवावे. आपले काही भोग असतात आणि ते भोगूनच संपवायचे असतात हे लक्ष्यात ठेवा. आता साडेसाती आली आता आपली आयुष्यातील ७|| वर्ष वजा करा असा मुर्खा सारखा विचार अजिबात करू नये. शनी हा न्यायी ग्रह आहे हे आधीच सांगितले आहे. 

आपल्या कष्टाना तो न्याय दिल्याशिवाय राहत नाही. खर सांगू का संपूर्णपणे शरणागती पत्करून नतमस्तक व्हावे यासारखा उत्तम उपाय नाही . शनी ज्याला कळला तो त्याला शत्रू नाही मित्र मानेल आणि आयुष्यभर त्याची पूजा आराधना करेल. खरच शनी हा आपला मित्र आहे साडेसातीचा घसका न घेता त्याचे आनंदाने स्वागत करा , शनी महाराजाना अनन्य भावे शरण जावून आपल्या झालेल्या चुकांचे प्रयश्चीत्त घ्या आणि मग बघा शनी महाराज तुमचे जीवन कसे आनंदाने फुलवून टाकतील. साडेसातीत मनुष्य घडतो हे लक्ष्यात ठेवा. जीवनाचा खरा अर्थ त्याला साडेसातीतच समजतो. 
साडेसाती
ज्योतिषी नरेंद्र जोशी कर्वेनगर पुणे
9763439584

या लेखात आपण साडेसाती म्हणजे काय? आणि साडेसाती मध्ये बारा राशीना शनि महाराज कसे फल देतात साडेसाती मध्ये आपण कोणते उपाय करावेत हे या लेखात पाहू🟩

सतत अडचणी येऊ लागल्या ,की नकळत आपल्या तोंडातून निघते की काय साडेसाती लागलीय .... कधी संपणार कोणास ठाऊक... ????

अनेकांनी मला साडेसाती म्हणजे नक्की काय अशी विचारणा केली. आणि हा प्रश्न आगदी रास्त आहे.
‘साडेसाती’ म्हणजे सरळ अर्थाने बघू गेल्यास एकूण साडेसात वर्षाचा कालावधी. ‘साडेसाती’ या शब्दाचा अर्थ समजून घ्यायचा असल्यास प्रथम प्रत्येक ग्रहाचे प्रत्येक राशीतून होणारे भ्रमण म्हणजे काय हे ही समजून घेणे आवश्यक आहे. या लेखात मी हे सोप्या भाषेत परंतू ढोबळमानाने समजावून द्यायचा प्रयत्न करेन.

सूर्यमालेतील प्रत्येक ग्रहाचा सूर्याभोवतीच्या भ्रमणाचा / फिरण्याचा एक ठराविक कालावधी असतो. हा कालावधी सूर्याभोवतीच्या ३६० अंशात (गोलाकार) मेष ते मीन अशा बारा राशीत विभागलेला आहे. सूर्याभोवती भ्रमण करताना हे सर्व ग्रह वर्षाला ह्या बारा राशीतून भ्रमण करतात अशी कल्पना केली आहे. प्रत्येक ग्रहाची सूर्याभोवती भ्रमण करण्याची कक्षा वेगवेगळी असल्याने आणि प्रत्येक ग्रह दुसऱ्या ग्रहापासून ठराविक अंतरावर असल्याने, प्रत्येक ग्रहाचा प्रत्येक राशीतून सूर्याभोवती भ्रमण करण्याचा कालावधीही साहजिकच वेगवेगळा आहे. आपण राशी शिकलो नसलो तरी सुर्य/ग्रहमाला आपण पूर्वी कधीतरी शाळा-कॉलेजात शिकलो आहे त्यामुळे हे लक्षात येईल.

चंद्राचं भ्रमण –🟨
चंद्र हा जरी पृथ्वीचा उपग्रह असला तरी चंद्राला ज्योतीषशास्त्राने ग्रह मानला आहे आणि भ्रमणाचा सर्वात कमी कालावधी चंद्राचा आहे. चंद्र स्वतःभोवती व पृथ्वीभोवती भ्रमण करत असतो हे सर्वांनाच माहित आहे. पृथ्वी जसजशी सूर्याभोवती भ्रमण करते तसा पृथ्वीसोबत चंद्रही सूर्याभोवती भ्रमण करतो हे ही आपल्याला समजू शकतं. अशा चंद्राचा एका राशीतून भ्रमणाचा कालावधी साधारणत: २.२५ (सवा दोन) दिवसांचा आहे.

चंद्र ज्या राशीत असतो ती आपली जन्म राशी मानण्याची भारतीय ज्योतिषशास्त्राची परंपरा आहे. सर्वात जास्त वेगवान चंद्र असल्याने चंद्राला मनाची उपमा दिली आहे. मन जसं कोणत्याही क्षणी कोणत्याही ठिकाणी पोहोचतं किंवा कोणताही विचार करतं अन मनाला भारती-ओहोटीही येते तसाच चंद्रही दर दोन-अडीच दिवसांनी आपले रूप आणि राशी बदलतो आणि म्हणून माणसाची राशी चंद्रावरून पाहण्याची आपली प्रथा आहे. चंद्र मनाप्रमाणे चंचल आहे. चंद्राला स्त्री व जलतत्वाचं मानलं जातं..
आपले सण चंद्राच्या भ्रमणावर अवलंबून असतात म्हणून सणाचे दिवस मागेपुढे होतात. अधिक महिनाही चंद्रभ्रमणाचं फल आहे. साडेसातीचा आणि चंद्राचा जवळचा संबंध आहे म्हणून हे लक्षात ठेवावं..!

सूर्य भ्रमण 🟩–
सूर्य कुठेही भ्रमण करत नसला तरी आपल्याला सूर्य रोज उगवताना व मावळताना दिसतो. म्हणजे पृथ्वीवरून पाहताना सूर्य भ्रमण करतो असे आपल्याला दिसते. सूर्य स्थिर असून प्रत्यक्षात पृथ्वी फिरत असते म्हणून आपण सूर्य बुडाला किंवा उगवला असे म्हणत असतो. ज्य्तोतीषशास्त्रात याला पृथ्वीभ्रमण न म्हणता सूर्य भ्रमण असे म्हणतात व सूर्याचा प्रत्येक राशीतून भ्रमणाचा कालावधी एक महिन्याचा असतो. एक वर्षात सूर्य सर्व १२ राशींचे भ्रमण पूर्ण करतो असे मानले जाते. मकर संक्रांति हे याचे उत्तम उदाहरण. दरवर्षी १४ जानेवारीला मकर संक्रांत न चुकता येते. आपल्या इतर सणाप्रमाणे ही तारीख मागे-पुढे होत नाही कारण मकर संक्रांति म्हणजे सूर्याचा मकर राशीत प्रवेश आणि तो दर वर्षी न चुकता त्याच दिवशी होतो. दरवर्षीच्या १४ जानेवारीपर्यंत सूर्य सर्व राशी फिरून मकर राशीत प्रवेश करतो. मतर राशीत सूर्याने केलेले संक्रमण म्हणून मकर संक्रांत..
ज्योतिष शास्त्रात सूर्य व चंद्र हे दोन महत्वाचे घटक असल्याने वर शक्य तेवढं विस्ताराने लिहीण्याचा प्रयत्न केला आहे. शनि हा साडेसातीशी संबंधीत असल्याने त्याच्याबद्दल पुढील भागात विस्ताराने लिहीन. बाकी इतर ग्रहांचा राशी भ्रमणाचा वार्षीक कालावधी थोडक्यात देत आहे.
बुध ८८ दिवसांत यर्व १२ राशीतून भ्रमण करतो म्हणजे एका राशीत बुध साधारणत: ७-८ दिवस असतो. ग्रहांच्या भ्रमणाची कक्षा लंबवर्तुळाकार असल्याने हा कालावधी जास्तीत जास्त १७-१८ दिवसाचा होतो. हा कालावधी चंद्राखालोखाल बुध वेगवान असल्याने चंचल वृत्तीचा मानला गेला आहे, तो त्याच्या या एका राशीत कमी दिवस राहाण्याच्या सवयीमुळे.

शुक्र २२५ दिवसांत सुर्य प्रदक्षिणा म्हणजे १२ राशीतून भ्रमण पूर्ण करतो. म्हणजे शुक्र एका राशीत सामान्यत: १८ ते जास्तीत जास्त २४-२५ दिवस असतो.
मंगळ सुर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास साधारणत: ६८७ दिवस घेतो. १२ राशींना ६८७ दिवस म्हणजे एका राशीत कमीत कमी साधारणत: ४५ दिवस ते जास्तीत जास्त ५७-५८ दिवस म्हणजे ढोबळ मानाने दोन महीने मुक्कामाला असतो.🟨

तर गुरू सुर्य एका प्रदक्षिणेला १२ वर्षाचा कालावधी घेतो. याचा अर्थ गुरू एका राशीत एक वर्षभर असतो.
गुरूनंतर येतात शनीनहाराज, जे एका सूर्य प्रदक्षिणेला अदमासे २९-३० वर्ष घेतात. सूर्याभोवतालच्या १२ राशीतून भ्रमण करण्यासाठी ३० वर्ष तर एका राशीत मुक्राम २.५ वर्ष होतो.

गुरूपर्यंतचे हवेहवेसे वाटणारे ग्रह फार तर वर्षभरात मुक्काम हलवतात आणि नको असलेला शनीसारखा पाहूणा मात्र २.५ वर्ष राहातो. नुसती २.५ वर्ष असती तरी आपण ढकलली असती परंतू तो ७.५ वर्ष पिडणार या ‘समजूतीने’च आपण खलास होतो. ही ७.५ वर्षांची भानगड काय आहे हे पुढील भागात समजावतो. ते नीट कळावं यासाठी हा लेखनप्रपंच..!
 
हर्षल, नेपच्यून प्लुटो हे एका राशीत अनुक्रमे ७, १६ व २४ वर्ष राहातात आणि 
राहू व केतु हे अठरा महिने एका राशीत
राहतात पण आपल्याला या ग्रहांचा साडेसाती या विषयात अभ्यास करण्याची आवश्यकता नाही.

साडेसाती म्हणजे काय?

आपला जन्म चंद्र ज्या राशीत असतो त्याला आपली जन्मराशी असे म्हणतात. बारा राशींपकी आपली कोणतीही राशी असू शकते. भारतीय लोकांना जन्मराशी सहसा माहीत असते. या राशीच्या अगोदरच्या राशीत तो आला की साडेसाती सुरू होते. आपल्या जन्मराशीत आला असता साडेसातीचा मध्य असतो आणि त्याच्या पुढच्या राशीत आहे तोपर्यंत हा तिसरा टप्पा असतो आणि अशी ही साडेसाती चालू असते. शनी एका राशीत साधारणपणे अडीच र्वष असतो. म्हणजे आपल्या राशीच्या अगोदरच्या राशीतली अडीच वष्रे ही पहिली अडीचकी. आपल्या राशीतला अडीच वर्षांचा काळ ती मधली अडीचकी आणि आपल्या पुढच्या राशीत असलेला शनीचा अडीच वर्षांचा काळ ही तिसरी अडीचकी. अशा तीन अडीचकी मिळून साडेसात र्वष अशी ही साडेसाती असते. सर्वसाधारण तीन साडेसातींचा काळ मनुष्याला अनुभवावा लागतो. आणि शतायुषी असणाऱ्यांना कदाचित चार साडेसातीही पाहता येते.

शनि म्हटले की सर्वांच्या अंगावर काटा उभा रहातो, नाहक भीती वाटू लागते. त्यातच टी. व्ही. वर शनि बद्दल कोणी ना कोणी काही ना काही तरी बोलतच असतात. त्यातून काही तरी माहिती मिळते - शनि म्हणजे वाईट, खराब, प्रत्येक बाबतीत विलंब...त्यातच शनिची साडेसाती, शनिची दृष्टी, शनिचा प्रभाव...वगैरे वगैरे....म्हणजेच थोडक्यात लोकाना भरपूर घाबरवले जाते...पण खरे सांगायचे झाले तर शनि सारखा प्रामाणिक,न्याय देणारा, आध्यात्मिक,सचोटीने व सातत्याने काम करणारा, संशोधनवृत्ती असणारा दूसरा कोणताही ग्रह ग्रहमालेत नाही. ज्योतिषशास्त्रीयदृष्टया शनि हा वायुतत्वाचा तसेच मकर व कुंभ राशींचा अधिपती आहे.त्याची आवडती रास कुंभ आहे🟨  

शनि संस्कराचा बराचसा भाग पत्रिकेत दाखवत असतो. हा ग्रह पुर्वकर्मांचा व प्रारब्धाचा कारक आहे. बरयाच कालावधिने घडणारया गोष्टी शनि दाखवतो..... पण त्याचबरोबर अनेक कष्ट करण्याची ,दिर्घोद्योगाची चिकाटी शनि जवळ आहे. उत्तम प्रकारचे नियोजन,सुत्रबद्ता,सुसंगता उभी करणारा असा आहे. मोठमोठी, प्रचंड, यशस्वी,दूरगामी परिणाम करणारी कामे शनिच करू शकतो. तरीही शनिला नेहेमी हिणवले जाते त्याचे वाईट वाटते... 

साडेसाती : शनिची साडेसाती बापरे....कधी दुसरया ग्रहाची साडेसाती ऐकली आहे का तुम्ही ?? त्याचे कारणही तसेच आहे..... 

शुक्र, चंद्र, सूर्य, गुरु, बुध इ.ग्राहांबद्द्ल नेहेमीच चांगले वाचत आलो आहोत आपण.....ते ग्रह पत्रिकेत कशी चांगली फळ देतात ते तर अनेक ज्योतिषांकडून ऐकलेलेही असेल. पण मला असे वाटते की हे सर्व ग्रह हे फसवे आहेत...कारण जीवनाची खरी बाजू दाखवण्याची ताकद ही फक्त शनितच आहे.🟦... 

साडेसाती म्हणजे साडेसात वर्षांचा कालखंड. आपल्या मागची रास,आपली रास व त्याच्या पुढील रास अशा तीन राशीतून जेंव्हा शानिचे भ्रमण होते असते तेंव्हा त्याला साडेसाती असे म्हणतात. शनीला एक राशी भोगण्यास अडीच वर्ष लागतात. अर्थात तीन राशी भोगण्यास साडेसात वर्ष लागतात...म्हणजे समजा तुमची राशी मकर आहे....त्याच्या आधीची राशी आहे धनु.......म्हणजेच जर शनिने मकर राशीत प्रवेश केला तर धनु, मकर आणि कुंभ ह्या तिन्ही राशीना साडेसाती सुरु झाली. 
पण साडेसातीचाही खुप बाऊ केला जातो, साडेसाती म्हणजे वाईट घडणारया गोष्टींचा काळ, कुठलेही काम व्यवस्थीत होणार नाही, कामे रेंगाळत रहातील वगैरे ......पण खरे तर शास्त्रात असेही म्हटले आहे साडेसाती म्हणजे ह्या सर्व गोष्टी होणारच परंतु जी व्यक्ती सचोटीने काम करते... खोटे बोलत नाही.. आळस करत नाही .....न्यायाने वागते...त्या व्यक्तीना साडेसातीचा त्रास जाणवत नाही. पण खरे म्हटले तर आताच्या युगामध्ये हे सर्व पाळणे अशक्य आहे....सचोटीने काम करणारयालाच प्रमोशन मिळत नाही, खोटे तर दिवसातून कित्येकदा बोलावे लागते...मग ह्यावर उपाय काय ?? ह्यावरून मला एक गोष्ट नमूद करावीशी वाटते ती ही की तुम्ही साडेसाती साडेसाती म्हणुन ज्या गोष्टीचा बाऊ करताय ती तर पन्नास-शंभर वर्षापूर्वीपासून आहे....मग आजच इतकी बोंबाबोंब का होते ?? ह्याला जबाबदार आपणच आहोत...ह्या बदलत्या सामाजिक व्यवस्थेचे हे सर्व परिणाम आहेत......जेंव्हा एकत्र कुटुंबपद्धती होती तेंव्हा म्हातारया-कोतारयांपसून अगदी शेंबड्या पोरापर्यंत सर्व एकाच घरात...एकाच छताखाली रहात.....प्रामाणिकपणा होताच पण त्याच बरोबर त्याने सर्वांमध्ये एकप्रकारची बांधीलकी होती...प्रत्येकाकडून घरातल्या म्हातारया-कोतारयांची सेवा होत होती.... प्रेम होते, आपलेपणा होता आणि मुख्य म्हणजे पैशांचा हव्यास नव्हता. जे जसे चालू आहे त्यात सर्व सुख आणि समाधान मानून चालणारे होते.... आज हे सर्व नाही जमले तरी आपल्या आई- वडिलांची सेवा जरुर करू शकता...सेवा म्हणजे कमीत कमी त्यांच्याजवळ बसून काही वेळ जरी त्यांच्या बरोबर व्यतीत केला.... सुट्टीच्या दिवशी त्यांना त्यांच्या आवडीच्या ठिकाणी नेले...हे जरी करू शकलो तरी त्यांना बरे वाटेल....तुम्हाला आशिर्वाद तर मिळेलच त्याच बरोबर एक समाधानही वाटेल...शनि हा वृद्ध व्यक्तींचा कारक आहे असे म्हटले जाते....जेव्हा तुमच्याकडून आई-वडिलांची किंवा कुठल्याही वृद्ध व्यक्तींची सेवा होते,त्यांना अपशब्द बोलले जात नाहीत....तेंव्हा असे म्हटले जाते शनिची कृपादृष्टी तुमच्यावर पडायला वेळ लागत नाही. उलटपक्षी साडेसातीत बरयाच लोकांचे भले झाले आहे.... शैक्षणिकदृष्टया व आर्थिकदृष्ट्या लोकांची प्रगती झालीआहे ... ....मोठमोठ्या उद्योजकांचे नवनवीन कारखाने उभे राहीले आहेत🟨............. 

ह्याचबरोबरीने अजुन एक गोष्ट सांगावीशी वाटते ती म्हणजे शनि हा जीवनाची खरी बाजू, खरे स्वरुप तुम्हाला जाणवून देतो...जेंव्हा साडेसातीची सुरवात होते तेंव्हा त्या लोकांना त्याची जाणीव होते ती एकामागोमाग होत असलेल्या संकटाच्या मालिकेतून ........ह्याच वेळी खरया अर्थाने आपली माणसे कोणती .....ऐनवेळी मदतीचा हात अपेक्षीत असताना आपल्याला सोडून जाणारी माणसे कोणती ते ह्याच वेळी लक्षात येते.... 
म्हणुन मला वाटते की एकदातरी माणसाच्या आयुष्यात साडेसाती यावी आणि त्याला त्याच्या खरया माणसांची ओळख पटावी..🟨.

साडेसातीचा प्रभाव प्रत्येकाच्या कुंडलीनुसार वेगवेगळा मिळतो. शनीचं भ्रमण ज्या स्थानातून/राशीतून सुरु असतं, त्या स्थानावरून पाहिल्या जाणाऱ्या जीवनातील त्या त्या गोष्टींवर शनीचा प्रभाव पडतो. अर्थात नखाला दुखापत झाली तरी पूर्ण शरीराला वेदना होतात तसं इथे होतं.
शनी ज्योतिषशास्त्रात पाप ग्रह मानला गेला आहे परंतु मुळात तो तसा नाही. शनी न्यायी आहे आणि न्याय करताना तो अजिबात आपपरभाव करत नाही. शनी मृत्यूचा कारक आहे. साडेसातीत काही लोकांवर कठीण प्रसंग येतात हे खरे असलं तरी याच काळात आपलं कोण आणि परकं कोण याची नव्याने ओळख होते. साडेसातीच्या काळात आपले अनेक निर्णय चुकतात, योजना फसतात, अनेकदा नको हे जीवन असेही प्रसंग काही लोकांवर येतात परंतु स्वतःवर विश्वास आणि चिकाटी असलेली माणसं यातून तावून सुलाखून बाहेर पडतात. म्हणजे शनी चिकाटी आणि सहनशीलता वाढवतो ज्याचा अंतिमतः आपल्याला फायदाच होतो..शनी वाईट काहीच करत नाही तर आपण आपल्या पूर्वायुष्यात केलेल्या कर्माची फळ देतो. *शनीच्या स्वतःच्या राशी असलेल्या मकर आणि कुंभ या राशींना साडेसाती तेवढीशी वाईट जात नाही कारण शनीच्या असलेल्या ह्या राशी मुळात चिकाटी असलेल्या, मेहेनती असतात त्यामुळे ह्या राशीच्या लोकांना साडेसातीचा प्रभाव जाणवत नाही.🟩

अर्थात शनीची चांगली-वाईट फळं मिळणं हे प्रत्येकाच्या कुंडलीतील मूळ ग्रहांच्या स्थितीवर अवलंबून असतं. तसंच व्यक्तीच्या वयावरदेखील अवलंबून असतं. लहान मुलं किंवा फार वृद्ध व्यक्तींना साडेसाती अनुभवायला येत नाही कारण लहान वयात आपण आपल्या पालकांच्या पंखाखाली असतो तर वृद्धत्वात सर्व काही भोगून झाल्यामुळे साडेसाती आली काय आणि गेली काय, सारखंच अशी परिस्थिती असते.

आपले कोण व परके कोण?

साडेसातीमध्ये आणखी एक गोष्ट आपल्याला कळून चुकते. खरीच आपली माणसे कोण आणि परकी कोण हे या काळात कळते. एरवी आपण ज्यांना मदत केली, ज्यांच्यासाठी आपला वेळ दिला, झुरत राहिलो, त्याच्या कल्याणासाठी झटत राहिलो ती माणसे या साडेसातीच्या काळात येतीलच असे नाही. आपल्या मताचा आदर ते राखतीलच असे नाही. त्यामुळे हेच का ते, असा प्रश्न पडतो आणि त्यामुळे मनस्ताप होतो. हा मनस्ताप एवढाच भाग खरे तर साडेसातीत असतो. पण कदाचित ज्याला आपण झिडकारले किंवा कमी महत्त्व दिले अशी एखादी व्यक्ती आपल्याला येऊन मदत करते. म्हणजे आपले नातेवाईक असो, परिचित असो वा मित्रपरिवार, खरेच आपले कोण आहेत हे दाखवून देणारी साडेसाती असते. स्वत:ची व सर्व सगेसोयऱ्यांची खरी ओळख शनी करून देतो. त्यामुळे साडेसातीमध्ये आपण बऱ्याच गोष्टी शिकतो.🟩

खरा त्रास याचाच…

खरे तर साडेसातीमध्ये फार काही अजब अघटित घडते किंवा संकटांची मालिका येते ही काल्पनिक भीतीच आपल्याला अस्वस्थ करत असते. साडेसाती असणाऱ्यांच्या मनात भयगंड निर्माण होतो. न्यूनगंडही निर्माण होतो. साडेसातीमध्ये आता आपले काही खरे नाही, अशा मानसिक भीतीमुळे येणारे मानसिक दौर्बल्य आपल्याला त्रास देत असते. मनस्ताप होतो. प्रत्यक्ष झाला नाही, कसल्याही दुर्घटना घडल्या नाहीत तरी या काल्पनिक भीतीचे सावट मनावर असते. मुख्यत: ते दूर ठेवणे हेही तितकेच महत्त्वाचे असते.🟦

साडेसातीचा प्रभाव प्रत्येकाच्या कुंडलीनुसार वेगवेगळा मिळतो. शनीचं भ्रमण ज्या स्थानातून/राशीतून सुरु असतं, त्या स्थानावरून पाहिल्या जाणाऱ्या जीवनातील त्या त्या गोष्टींवर शनीचा प्रभाव पडतो. अर्थात नखाला दुखापत झाली तरी पूर्ण शरीराला वेदना होतात तसं इथे होतं.
शनी ज्योतिषशास्त्रात पाप ग्रह मानला गेला आहे परंतु मुळात तो तसा नाही. शनी न्यायी आहे आणि न्याय करताना तो अजिबात आपपरभाव करत नाही. शनी मृत्यूचा कारक आहे. साडेसातीत काही लोकांवर कठीण प्रसंग येतात हे खरे असलं तरी याच काळात आपलं कोण आणि परकं कोण याची नव्याने ओळख होते. साडेसातीच्या काळात आपले अनेक निर्णय चुकतात, योजना फसतात, अनेकदा नको हे जीवन असेही प्रसंग काही लोकांवर येतात परंतु स्वतःवर विश्वास आणि चिकाटी असलेली माणसं यातून तावून सुलाखून बाहेर पडतात. म्हणजे शनी चिकाटी आणि सहनशीलता वाढवतो ज्याचा अंतिमतः आपल्याला फायदाच होतो..शनी वाईट काहीच करत नाही तर आपण आपल्या पूर्वायुष्यात केलेल्या कर्माची फळ देतो. शनीच्या स्वतःच्या राशी असलेल्या मकर आणि कुंभ या राशींना साडेसाती तेवढीशी वाईट जात नाही कारण शनीच्या असलेल्या ह्या राशी मुळात चिकाटी असलेल्या, मेहेनती असतात त्यामुळे ह्या राशीच्या लोकांना साडेसातीचा प्रभाव जाणवत नाही.

अर्थात शनीची चांगली-वाईट फळं मिळणं हे प्रत्येकाच्या कुंडलीतील मूळ ग्रहांच्या स्थितीवर अवलंबून असतं. तसंच व्यक्तीच्या वयावरदेखील अवलंबून असतं. लहान मुलं किंवा फार वृद्ध व्यक्तींना साडेसाती अनुभवायला येत नाही कारण लहान वयात आपण आपल्या पालकांच्या पंखाखाली असतो तर वृद्धत्वात सर्व काही भोगून झाल्यामुळे साडेसाती आली काय आणि गेली काय, सारखंच अशी परिस्थिती असते.

राशीनुसार तर शनि महाराज फल देताच
आणि जन्म कुंडली नुसार कोणत्या स्थानातुन शनि महाराज देणार हे पाहू
आपल्या जन्मकुंडली समोर ठेऊन फल
पाहा...
मेष 🟥लग्न असताना शनी तुमच्या दशमातून जात आहे त्यामुळे नोकरीत त्रास व। अधिकार पद सोडावे लागण्याची शक्यता निर्माण होईल.
वृषभ🟩 लग्न असेल तर शनि तुमच्या भाग्यातुन जात आहे. दशमेश व्ययात जाण्याने नोकरीत उपद्रव घडेल पण पैशाची चिंता असणार नाही. जास्त मानसीक त्रास होईल.
मिथुन 🟦 लग्न असेल तर शनि अष्टमातुन जात आहे. संकटे येणार आहेत. तयार राहा. पण आत्मविश्वास गमाऊ नका. यातुनही बाहेर पडणार आहात.
कर्क 🟨 लग्न असेल तर शनि सप्तमातुन जाणार आहे. जोडीदाराशी जुळवुन घ्या. जोडीदाराच्या घरच्या मंडळींचा जास्त त्रास होईल. इलाज नाही.
सिंह 🟦 लग्न असेल तर शनि षष्ठ स्थानातुन जाणार आहे. एखादी कोर्ट केस असेल तर बुध्दी चातुर्यावर ती जिंकाल. शनि सहाव्या स्थानी असताना शत्रु नांगी टाकतील.परिस्थीतीवर नियंत्रण ठेवा. कारण अष्टमेश सहाव्या स्थानातुन जाणार आहे. आरोग्याकडे अजिबात दुर्लक्ष करु नका.
कन्या 🟩लग्न असताना शनि पंचम स्थानातुन जाणार आहे. विद्यार्थी असाल तर अभ्यास जास्त करा. मुले शिकत असतील तर त्यांच्या शैक्षणीक प्रगतीवर लक्ष ठेवा.
तुला 🟨 लग्न असेल तर शनि चतुर्थामधुन जाणार आहे. सुखाला ग्रहण लागेल. वहान त्रास देईल. घरात सुख रहाणार नाही. मातेशी पटणार नाही.
वृश्चिक🟩 लग्न असेल तर शनि तृतीय स्थानातुन जाणार आहे. भावंडांशी वाद होतील किंवा त्यांची काळजी करावी लागेल. लेखनाने अडचणीत येणार नाहीना हे पहा.
धनु 🟩 लग्न असेल तर शनि कुटुंब स्थानातुन जाणार आहे. कौटुंबीक विवाद तुम्हाला जास्त त्रास देतील. मातेला मनवण्यासाठी खुपच प्रयत्न करावे लागतील.
मकर🟦 लग्न असताना शनि तुमच्या लग्न स्थानातुन जाणार आहे. तुमच्या पर्सनालिटीत काही आश्चर्य कारक बदल होतील. तुम्ही बदलेले आहात असे सर्व म्हणतील. डायरी लिहा आणि हे बदल नोंद करा. धनु राशीला हे बदल आश्चर्यकारक असतील.त
कुंभ 🟨 लग्न असताना शनि तुमच्या व्यय म्हणजे खर्चाच्या स्थानातुन जाणार आहे. व्यवसायीक असाल तर नुकसान संभवते. खर्च जोडीदारासाठी सुध्दा करावा लागेल.
  मीन🟥 लग्न असताना शनि तुमच्या लाभातुन जाणार आहे. मनाप्रमाणे अनेक गोष्टी पुढील अडिच वर्षात असुन घडणार आहेत.
.
 खालील उपाय करावेत🟥

साडेसातीचा त्रास कमी व्हावा म्हणून शनि मंत्र म्हणावा असे म्हणतात . ह्या स्तोत्रांचा उपयोग संयम, परिपक्वता एखाद्या गोष्टीकडे तटस्थ दृष्टीने बघण्याची कुवत , मानसिक शांती ह्या दृष्टीने होत असावा त्यामुळे आपोआपच समस्या कमी वाटू लागतात किंवा समस्यांशी लढण्याचे बळ येत असावे .
साडेसाती म्हणजे शनि महाराजांची आपल्यावर वक्रदृष्टी झाली आहे. त्यामुळे आता आपलं कायं होणार? यावरच काही उपाय देखील आहेत.
शनिची प्रतिकूल अवस्था आपल्या दिनचर्येलासुद्धा प्रभावित करते. त्यामुळे आपल्या पत्रिकेत शनि दोष आहे किंवा नाही हे पाहणे आवश्यक आहे.🟦

पुण्यकालात शनि महाराजाचा दोष दूर करण्यासाठी उपाय करा:
-तेल, मोहरी, उडदाच्या दाळीचे दान करावे.
-श्री गनपती श्री हनुमान श्री शनि याना श्री रूद्र अभिषेक व
आराधना करावी.
-मांस- मद्य यांचे सेवन करू नये.
-दीन दुबळ्यांना मदत करावी.
-काळे वस्त्र परिधान करू नये. मात्र, काळ्या वस्तूंचे दान जरूर करावे. उदा. काळी तीळ, उडीद.

शनि मंत्र

ॐनीलांजन समाभासं रविपुत्रं यमाग्रजम् I
छायामार्तंड संभूतं तं नमामि शनैश्चरम् II

ध्यानम:-नीलाम्बर: शूलधर: किरीटी गृद्ध्स्थितस्त्रासकरो धनुश्मान.चतुर्भुज: सूर्यसुत: प्रशान्त: सदाअस्तु मह्यं वरदोअल्पगामी..

शनि गायत्री:-ॐ कृष्णांगाय विद्य्महे रविपुत्राय धीमहि तन्न: सौरि: प्रचोदयात.

वेद मंत्र:-ॐ प्राँ प्रीँ प्रौँ स: भूर्भुव: स्व: ॐ शन्नो देवीरभिष्टय आपो भवन्तु पीतये शंय्योरभिस्त्रवन्तु न:. ॐ स्व: भुव: भू: प्रौं प्रीं प्रां ॐ शनिश्चराय नम:

जप मंत्र :- ॐ प्रां प्रीं प्रौं स: शनिश्चराय नम:। 
नित्य २३००० जप प्रतिदिन.

1)शनि ग्रहसाठी उपाय श्री पिपंळ वृक्षाला रोज 21 प्रदक्षिणा करा व शनिवार फक्त फल आहार करवा

2)रोज श्रीगुरु चरित्राचा एक अध्याय वाचा

3)आपल्या श्रीगुरुच्या प्रतिमेची पुजन व
भक्ती करा

4) रोज श्री हनुमान चालीसा पाठ करा

5)रोज संध्याकाळी पिपंळ वृक्ष किवा
शमी वृक्षा खाली दिवा लावावा अथवा या दोन्ही वृक्षाचे पुष्य नक्षत्रावर किंवा श्?

Post a Comment

0 Comments