*🚩 हिंदू संस्कृतीमध्ये कलशाला अनन्यसाधारण महत्व असून ते आपल्या संस्कृतीचे प्रतीक मानले जाते. कलश हे मांगल्य, सौभाग्य, आणि समृद्धीचे प्रतीक आहे*.
*🚩 घरात कोणतेही शुभकार्य असले की या शुभकार्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट लागते ती म्हणजे तांब्याचा कलश (Kalash)*.
*🚩 कोणतीही पूजा, लग्न, साखरपुडा, बारसा अशा सर्व शुभकार्यासाठी कलश हा पूजनीय मानला जातो. हा तांब्याचा कलश पाणी, सुपारी, हळद-कुंकू, आंब्याचे डहाळे, त्यावर नारळ अशा गोष्टींनी हा कलश खरा पूर्णत्वास येतो. तसेच तीर्थ म्हणूनही आपण या कलशातील पाणी वापरतो*.
*🚩 तुम्ही नेहमी पहात असाल आपल्या घरी कोणते मांगलीक कार्य असले कि प्रथम गुरुजी मंगल कलश स्थापना करतात. तसेच बर्याच दुकानात एका कोपर्यात किंवा देवघरात मंगल कलश स्थापन केलेला असतो*.
*🚩 तसेच तुम्ही नविन जागेत राहावयास गेले कि तिथेही प्रथम मंगल कलश स्थापन करावा लागतो*.
*🚩 ‘कलश’ या भांड्याला ‘कळशी’ असंही म्हटलं जातं.*
*🚩 आपल्याकडे मंगल कार्यादी प्रसंगी कलशला फार महत्त्व असतं*.
*🚩 देव आणि दानवांनी समुद्रमंथन करण्यामागचा हेतू असा होती की या मंथनातून अमृत निघावं. पण हे अमृत कोणत्या भांड्यात भरायचं आणि ते भांडं कसं तयार करायचं असा प्रश्न उपस्थित झाला. तेव्हा विश्वकर्मा या महान कलाकारावर ही जबाबदारी सोपवण्यात आली. त्या विश्वकर्माने सर्व देवांमध्ये असलेल्या कलेचं ग्रहण करून एक भांडं तयार केलं. त्यालाच ‘कलश’ म्हणतात.*
*🚩 अशा मंगलकलशाचा आकार व मोजमापं कशी असावीत हेही शास्त्रकारांनी सांगून ठेवलेली आहेत. ५० अंगुले परीघ, १६ अंगुले उंची आणि ८ अंगुले मुख असं त्याचं प्रमाण आहे.*
*🚩 क्षितींद्र, जलसंभव, पवन, अग्नी, यजमान, कोशसंभव, सोम, आदित्य आणि विजय असे कलशाचे एकूण नऊ प्रकार आहेत*.
*🚩 यातला विजयकलश हा फक्त पीठाच्या मध्यभागी स्थापन करतात आणि बाकीचे प्रत्येकी एक यानुसार अष्टदिशांना स्थापन करतात*.
*🚩 कलशाची निर्मिती समुद्रातून प्राप्त होणाऱ्या अमृतासाठी झालेली आहे आणि सागरामध्ये तर सर्व नद्यांचं तीर्थ समाविष्ट झालं आहे. याशिवाय सागर ही भगवंताची विभूती आहे. यामुळे मंगलकलशांमधल्या जलांमध्ये गंगा, यमुना, सिंधू, सरस्वती, कावेरी, नर्मदा, गोदावरी आदी सर्व सरितांच्या तीर्थांचा वास होतो.*
*🚩 कलशाच्या प्रत्येक भागात वेगवेगळ्या देवता येऊन थांबत असतात, असं कालिकापुराणात म्हटलं आहे. कलशाच्या मुखाच्या जागी ब्रह्मा, गळ्याच्या जागी शंकर, मूलगामी विष्णू, मध्यभागी मातृकागण आणि दाही दिशांना वेष्टून दिक्पाल निवास करतात. कलशाच्या पोटात सप्तसागर, सप्तदीप, ग्रह-नक्षत्रं, कुलपर्वत, गंगा, सरिता आणि चार वेद असतात, असं समजून त्याचं चिंतन करावं.*
*🚩 ओल्या कुंकवाने स्वस्तिक काढलेल्या कलशाची स्थापना केल्यावर त्यामध्ये जल घालून सोनं, माणिकमोती, पाचू, प्रवाळ, पुष्कराज ही पंचरत्नं घालतात. दुर्वा, आम्रपल्लवी, नागवेलीची पानं यांच्या पंचपत्रीने त्यांचं मुख सुशोभित करतात. गणपतींच पूजन, दारावर अंबा क्षेत्रपाल, उंबरठ्यात वास्तू, दाराच्या उजव्या बाजूला गंगा नदी, डाव्या बाजूला यमुना नदी आदी पूजा कराव्यात.*
*🚩 यजमानांनी देवपूजा साहित्य घेऊन यजमान पत्नींनी जलपूर्ण कलश घेऊन पुरुषांनी उजवा पाय आणि महिलांनी डावा पाय टाकून मंगलवाद्यं व वेदमंत्रांच्या निनादात गृहप्रवेश करावा. या मंगलकलशावर श्रीफल किंवा धान्याने भरलेलं पूर्णपात्र ठेवतात.*
*🚩 कलशातील पाणी, त्यावरील पंचपल्लवे, त्यावरील श्रीफळ या सर्व गोष्टी, तृप्ती, भरभराट, समृद्धी, उत्कर्ष याचे द्योतक आहेत.*
*🚩 माती हा भूमातेचा अंश आहे आणि भूमी ही सुवर्णाची माता आहे. यामुळे मृत्तिकेचा किंवा सुवर्णाचा कलश धार्मिक कार्यासाठी वापरण्यात येतो. परंतु माती कलश धक्का लागला तर भंगण्याचा संभव असतो.*
*🚩 सुवर्णाचा कलश करणं आर्थिक दृष्टीने अशक्य असतं तेव्हा अशा कार्यासाठी चांदीचा किंवा तांब्याचा कलश वापरतात.*
*🚩 घरात ठेवलेल्या कलशाची अथवा दरवाज्याच्या चौकटीच्या वरती ठेवलेल्या कलशाची रोज पूजा करावी असा कुलाचार आहे. म्हणून रोजची पूजा सुरू करण्यापूर्वी पाण्याने भरून ठेवलेल्या तांब्याला प्रथम गंध, अक्षता, फुलं वाहतात.*
*🚩 कलशामध्ये गंगा नदीचं पाणी वापरता आलं तर उत्तम. यानंतर गंगास्तोत्र, वास्तूस्तोत्र, नवग्रहस्तोत्र म्हटल्यास अतिशय उत्तम. गंगापूजा हेही कलशपूजन आहे. कलशपूजन आपल्या सुख-शांतीसाठी करावं.*
*🚩 आपण रोज घरी पाणी भरण्यासाठी वापरतो त्या घागरी, कळशा, लोटे यासारखी भांडी ही कलशाचीच प्रतीकं असतात. म्हणून आपण एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी घरातून निघताना पाण्याने भरलेलं भांडं घेऊन एखादी सुवासिनी आपल्यासमोर आली तर त्या रूपाने सर्व देवतांचा वास असलेला कलशच सामोरा आला असं मानण्यात येतं आणि त्यामुळे हा एक शुभशकून समजतात.*
*🚩 मंगल कलश हा कुलदेवता चा कलश म्हणून देवघरात नेहमी साठी स्थापन केलेला असतो.*
*🚩 शुक्ल प्रतिपदेला मंगल कलश स्थापन करावा व अमावस्या पर्यंत ठेवावा. नंतर परत प्रतिपदेला तो कलश विसर्जन करुन नव्याने मंगल कलश स्थापन करावा.*
*🚩 अशाने घरात नेहमी मांगलीक कार्य घडत असते. व्यवसायात, नोकरीत नेहमी प्रगतीचे नवनवीन मार्ग मिळत राहतात. घरात नेहमी सकारात्मक वातावरण निर्माण होत राहते*.
*🚩 पूजापाठ, होम हवन, वास्तू, वास्तुप्रवेश, लग्नकार्य, मुंज, ई. धार्मिक कार्याच्या वेळी अशा प्रकारचा कलश तयार करुन त्याचे पूजन करणे ह्यालाच धार्मिक कार्यातील पुण्यवाचन असेही म्हणतात.*
*🚩 सत्यनारायण पूजा – वास्तूबरोबर सत्यनारायणाचं पूजन करतात हे योग्य आहे. परंतु हे पूजन वास्तूच्या पूजनाबरोबरच करावं. नंतर करु नये. प्रधान देवतांबरोबरच अन्य देवांची पूजा करावी आणि त्यानंतर हवन करावं, असंही शास्त्र आहे.*
*🚩 हिंदू धर्मात वास्तूशांती वरीलप्रमाणे करतात. काही धर्मांमध्ये कुराणखानी करतात. घरामध्ये कलाम पाक किताब वाचले जाते. गोड पदार्थांचा नियाज करून शेजाऱ्यांना मिठाई वाटतात. बरकतीसाठी अल्लाकडे प्रार्थना करतात.*
*🚩 तर काही धर्मांमध्ये धर्मगुरू येऊन सुगंधी द्रव्यांची फवारणी करून सामूहिक प्रार्थना करतात आणि घरामध्ये पवित्र मेणबत्तीचा प्रकाश देतात. प्रत्येक धर्मामध्ये घराची शुद्धता करण्याची प्रक्रिया आहे. प्रत्येक धर्माच्या व्यक्ती आपापल्या धर्मानुसार/पद्धतीनुसार आपल्या घराची वास्तू शुद्ध करून घेतात.*
*🚩 वास्तू मुहूर्त – चैत्र महिना गुढीपाडव्यासह, अश्विन महिना दसऱ्यासह, अधिक महिना, क्षय मास हे महिने, अमावस्या, क्षयतिथी, वृद्धितिथी, रिक्ता तिथी या तिथी, रविवार व मंगळवार हे वार, मृत्युप्रद असल्याने वर्ज्य आहे. परंतु हल्ली सोयीसाठी अनेक यजमान त्याचबरोबर पुरोहितदेखील उत्पन्न बुडते म्हणून रविवार, मंगळवार, दसरा, गुढीपाडवा या दिवशी काही वेळा मुहूर्त नसतानादेखील वास्तूशांती करतात. हे अरिष्टदायक आहे. यामुळे वास्तूशांती मुहूर्तावरच करावी जेणेकरून आपल्या शुभ कार्यात सर्व शुभ होऊन आपण केलेल्या कार्याचं समाधान प्राप्त होईल आणि घरामध्ये सुखशांती आणि समृद्धी लाभेल.*
🚩 जर तुमचे हितशत्रू नेहमी तुम्हाला कोणत्या न कोणत्या प्रकारे त्रास देत असतील तर देवघरात एक वेगळा कलश स्थापना करा, पण कलशावरील नारळ आडवा ठेवा. नारळाची शेंडी तुमचे शत्रुच्या घराच्या दिशेने ठेवा. अल्पावधीतच तुमचे शत्रु नामोहरम होतील.
0 Comments