श्री काळभैरव

**श्री काळभैरव हे दहा भैरवाचे आधीपती आहेत*

महादेवाच्या चरणापाशी आदिशक्ती आहे
आदिशक्तीच्या पायापाशी काळभैरव आहेत
काळभैरवांच्या आधीन काळ आणि वेळ आहे.
काळवेळेच्या अधीन नियती आहे
आणि हे सर्व महादेवाच्या अधीन आहे आणि काळभैरव महादेवाचा दास आहे
जगनियंत्या शिवाची ती प्रलायंकारी उजवी बाजू आहे..

हा देवं ज्याची वज्रदाढ निलवार्निंय आहे ज्याची कायां सर्वात विशाल आहे जो प्रत्येक युगाचा अंत करणारा आहे असा हा शामवर्ण ज्याची साधना प्रत्येक साधक करत असतो...

काळभैरव साधनेमुळे प्रकृतीगर्भात मानवाला ग्रासणारे
पितृदोष.नजरबाधा.ग्रहबाधा. भूत प्रेत.पिशाचबाधा.भानामती. करणी.इंद्र. कली इत्यादी मायापासून मुक्तता मिळते मायेची तोड फक्त काळभैरव आहेत
तो महारुद्र असल्यामुळे त्याला आदीतत्वपुरुष म्हणता येईल.
त्याची साधना साधकला सर्व देत्य पिशाच्च शक्तीवर एक हुकमी सत्ता मिळवून देते पण साधकांची ही तशीच पात्रता लागते..

हे दैवत विधिलिखित अडवत असत. श्री काळभैरव हे सेतानी शक्तींना नाचवणारे एक ज्वलंत दैवत आहे हे विवेकशील सय्यमी आणि पारदर्शक चारित्र्य अश्या साधकांना लवकर फलदाई होणारी देवता आहे
त्याउलट खोटेपणा व्यभिचार लबाडी करणाऱ्या साधकांस शिक्षा करणारी देवता आहे अश्या लोकांसाठी
काळभैरव उग्रदेवता आहे मृत्यूपेक्षाही महाभयानक त्यांची शिक्षा आहे
नियतीनुसार चालणाऱ्या दासासाठी ते भक्तवत्सल दैवत आहे.
ते घरातील वास्तुपुरुषापासून ते कुलदेवताच्या दैत्यामुखापर्यंत कोणालाही कोठेही आणी कसेही क्षणात संपवू शकतात...

काळभैरवच्या निर्व्याज साधनेन साधकांचा गमावलेला आत्मविश्वास देखील पुन्हा प्राप्त होतो.मनात भय राहत नाही आंतरिक विचारात बळ येत जीवनाचा दृष्टिकोन विशाल होतो सेतानी शक्तीपासून आत्मरक्षा होते.अंतबाह्य शत्रूच्या पकडीतून मनुष्य दूर जातो. अध्यात्मिक जीवनात रुची निर्माण होते कठीणकार्य सहजपूर्ण होतात आपल्या जीवनावर आपले वर्चस्व निर्माण होते. कालीमातेची साधना योग प्राप्त करून देते तर काळभैरव तत्व शिवाच्या अधीन असल्यामुळे शिव सद्गुरूच्या योगिक हस्तपादुका माळेनी दश भैरवाची जपसाधना केल्यास साधकला सर्व प्रकारची लक्ष्मी प्राप्त होते
पण काळभैरवाच्या लेखी चुकीला माफी नाही....

श्री काळभैरव यांनी मृत्यू. इंद्र.ब्रम्हदेव नरर्सिंहदेवं आणि विष्णू ह्यांचे देखील गर्वहरण केले आहे
लोकांनाच काय तर साधू मुनीजनं ह्यांना देखील त्यांचं गूढ आजवर समजलेलं नाही
त्यांचा मार्ग अत्यंत कठीण. काळीज असलं तरच मार्गक्रमण करणे शक्य होते अन्यथा नाही
शनिदेवं हा काळभैरव ह्यांचा सर्वात मोठा भक्त आहे...

श्री काळभैरव जितका सिद्धयोग्यांचा तितकाच तो महाचांडाळाचा ही आहे म्हणून प्रामाणिक आणि पारदर्शी राहावे.
श्री काळभैरव दैवत हे सूक्ष्म देहातील वासनेची कर्म नष्ट करतात.
श्री काळभैरव ह्याना क्षेत्रपाल असे देखील म्हणतात
क्षेत्र मनजे शरीर आणि पालं मनजे पालन करणारा. तो कर्म आणि अकर्मच्या गोंधळातून सोडवतो
ओम काळभैरवनाथाय नमः हा देवाचा मंत्र आहे

जप माळेसाठी रुद्राक्ष माळ वापरतात सफ्टीक माळ देखील चालते किंवा काळभैरव अष्टक वाचल तरी चालते
महिला देखील मंत्र जपू शकतात किंवा अष्टक वाचू शकतात प्रामाणिक असल्यावर देवापुढे स्त्री पुरुष हा भेद राहत नाही. भैरव प्रहर हा रात्री *बारा ते पहाटे तीन* असा आहे ह्या काळातील भैरवसाधना अधिक प्रभावी आणी परिणामकारक ठरते....

तप जप ध्यान मार्गात अग्रसेर होतं असताना प्रथमदर्शनी बाह्य आवरानात्मक शूद्र शक्ती विविधरूप आणि स्वरूपाद्वारे साधकला भटकवतात हे अतिशय भयानक महाजाळ आहे त्यातून सहज सोपं योग्य तदृप मार्ग शक्ती कधीही सापडू देत नाही. त्याला आंतरिक चकवा असं बोलतात.
 ह्या चकव्यापासून काळभैरवनाथ साधकला दूर ठेवतात. अश्या काळभैरवची साधना केल्यास मृत्यूपश्चात पिशाच योनी कशी काय मिळेल ?

काळभैरवची सेवा हा मृत्यूनंतर मोक्ष प्राप्तीची सुवर्णं संधी देखील आहे.....

पंचमहाभुतापलीकडे शिवतत्व आहे. साधकाला कालभैरव हे योग्य गुरुकृपेने तिथंपर्यंत घेऊन जातात श्री काळभैरवनाथाची सेवा केल्यावर शिवाची साधना करण्याची आवश्यकता नाही ती आपोआप साध्य होते.
काळभैरवाच्या मंदिरात गेल्यावर देवाच्या मूर्तिकडे एकटक पाहावे सात्विकता डोळ्यात भरून येईल.भैरोवोथान केवळ पद्मासन मधेच साध्य होते...

**प्रमुख काळभैरव हे स्वतः आहेत*

1)उपप्रमुख -बटुकभैरव
2)समायोजन -स्वर्णाकर्षणभैरव
3)अष्टभैरव -स्म्शानभैरव
4)नग्नभैरव
5)मार्तंडभैरव(खंडोबा नाही)
6)कपालभैरव
7)चंडभैरव
8)सन्हारभैरव 
9)क्रोधभैरव
10)रुरूभैरव

श्री काळभैरव हे पाताळवासी आहे त्यांना दक्षिणेश्वर असे देखील बोलतात. नक्षत्रे त्यांच्या आज्ञाचीं आतुरतेने वाट पाहत असतात त्यांना प्रसन्न केल्यास नक्षत्र्याची फळ आपोआप तुमच्या खिश्यात.
श्री काळभैरवाच्या आज्ञाशिवाय कोणत्याही सूक्ष्मक्षेत्रात प्रवेश नाही नकरात्मक शक्ती डोक्यात अन शरीरात जाणवत असेल तर सलग सहामहिने काळभैरव साधना करावी.त्याची साधना निर्गुणात सरस बनवते.
अध्यात्मिक प्रगतीसाठी सगुणातून निर्गुणात अनासक्तीने प्रदार्पण आवश्यक आहे
श्री काळभैरवाचा विनाअट ध्यास घेता आला पाहिजेल. त्यांचा ध्यास लावाल तर कर्तवनिष्ठा देखील ठेवावी लागते धरसोड वृत्ती ठेवल्यास नाथ फळ देत नाहीत त्यावर जाऊन जबरदस्ती विनवणी कराल तर उरली सुरली सुखशांती देखील गमावून बसाल. इथे कधीही मानस स्तरीय मोजमस्ती आणि अवहेलना करू नये जितके शक्य तितके काळभैरवनाथाच्या सानिध्यात बसण्याचा प्रयत्न करावा 🙏🏻

Post a Comment

0 Comments