ऊर्जा

सायन्स मध्ये अनेक ऊर्जेचे स्रोत दिले आहेत,अल्फा,गॅमा, बीटा,एक्स रे,कॉसमिक एनर्जीच आहे ही सर्व .
त्या,त्या कंपनसंख्येना शास्त्रज्ञांनी ही वेगवेगळी नावे दिली आहेत, क्ष किरण हे जास्त भेदनशील असतात, त्यासाठी लॅब मध्ये धातूंयुक्त अँप्रण घातले जाते,त्या किरणांच्या प्रतिरोधासाठी,काही इन्फ्रारेड किरण असतात,इंद्रधनुष्यात असणारे किरण,#जातानाहीपानीपी,ह्या सर्वांची कंपन संख्या असते,A,, amstrom ने ती ऊर्जा मोजली जाते,सुर्या कडून अल्ट्रा violet किरण प्रसारित होतात, ती ऊर्जा तर आपले जीवनच आहे,सोलर एनर्जी हा ही विषय आहेच.
शास्त्रात रडार फ्रेक्वेन्सी वापरली जाते,त्यामुळे,टी व्ही,रेडिओ,विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणे चालतात.
काही असे #वृक्ष आहेत,औदुंबर, वड, पिंपळ, शमी,बेल,तुळस ह्यातूनही काही ऊर्जा बाहेर पडते,म्हणून ते दिव्य वृक्ष आहेत,ह्यातून प्राणवायू तसेच अग्नी ही निर्माण होतोच,यज्ञात त्यामुळे तसेच काही औषधी वनस्पती वापरल्या जातात,ह्या वृक्षांना दिव्य वृक्ष त्यामुळेच म्हणतात,जास्तीच्या रेडिओ लहरी हे वृक्ष थोपवतात,अलीकडे मोबाईल टॉवर मुळे ,ह्या जास्तीच्या लहरी वाढल्या आहेत,आपल्या धर्मात,सणांमध्ये ह्या वृक्षाची पूजा त्यासाठीच असते,तो अजून मोठा विषय आहेच,
कॉसमिक एनर्जी चे हे वृक्ष अँटिना आहेत.
मानवाच्या शरीरात #तीन लाख,बेचाळीस हजार,एकशे सोळा,ऊर्जा केंद्रे जन्मतः दिली आहेतच,सर्वात उर्जाशील प्राणी म्हणजेच मानव प्राणी होय.
ह्या सर्व ऊर्जा केंद्रांना सांभाळणारी षट चक्रे,त्यांना सांभाळण्यासाठी आत्मा,ह्या सर्वांवर प्रभाव पुन्हा पंच महाभूते, नवग्रह.
भक्ती,ज्ञान,ध्यान,क्रिया,योग, ह्यांचा ह्या सर्व चक्रांवर प्रभाव होतो,एक जरी चक्र बिघडले तरी मानवाला आजार होतो,प्रत्येक चक्रात बीजमंत्र आहेतच,ते केल्याने,उदा:लं हा बीजमंत्र मूलाधार चक्राचा,आपणांस त्या ठिकाणी स्पंदन येणारचं, प्रत्येक चक्राजवळ शरीरातील महत्वाचा एक अवयव आहे,त्यातील दोष कमी होतात.
आपण आता जास्त शिक्षण घेत आहोत,हवे तर असे म्हणा,आणि ह्या गोष्टी,आमच्या वेद, उपनिषद ह्यातीलच आहेत,आम्हाला विसर पडला आहे.
आपल्याकडे वडिलांना पूर्वी बाबा म्हणत,ब काय आहे,ते बीज स्वाधिष्ठान चक्राला कंट्रोल करते,म्हणजेच लहानपणी,तरुण वयाच्या आधी,लैगिंक भावना आवरते हे बीज,म्हणून कापालिक,शैव,अघोरी पंथात बम बम भोले म्हणतात, त्या मंत्राने शरीरावर ,ठराविक भावनांचा कंट्रोल येतो,
कुठलेही देवीचे नाव घ्या,अनाहत चक्र,कुठलेही भगवान विष्णूचे नावं घ्या,विशुद्धी चक्र,आणि कुठलेही भगवान शंकराचे नाव घ्या,सहस्त्रार चक्र, आपण वैज्ञानिक दृष्टीकोन,आध्यत्मिक संबंध विचारात घेतला पाहिजे,
विशिष्ट स्तोत्राने एक देवता प्रसन्न होते म्हणजे काय,ते चक्र ,अगदी जागृत म्हणणार नाही,मात्र शुद्ध नक्कीच होते,म्हणून ज्योतिष शास्त्रात ही ह्याच संकल्पने नुसार शांती कर्म,अथवा प्रत्येक ग्रहाच्या बीजमंत्राची संख्या सांगितली आहे,
ह्यातही पूर्वकर्म दूषित आहे,भोग आहे,असे आपण म्हणतो,त्याला पितृदोष,कुंडली दोष,आणखी अनेक दोष,असे दिसतात ही,मग ह्या दोषांचा नेमका परिणाम कुठे होतो,तर आपल्या शरीरावर,मानसिकतेवर,सर्वच ठिकाणी,मग आपणांस तंत्र-यंत्र-मंत्र हे मार्ग सांगितले आहेत,म्हणजेच आपण आपल्या शरीरात कमी असलेली ऊर्जा ग्रहण केली पाहिजे,उपासना, साधना,ह्या मार्गातून,मग काय होईल,आपल्या शरीरात जो डी-इन-ए आहे,त्याच्या चोवीस जोड्या आहेत,म्हणजेच आपल्या चोवीस पिढ्या,ती साधनेने शुद्ध होतात,चोवीस दत्त महाराजांचे गुरू,गायत्री मंत्रातील चोवीस अक्षरे,ह्यांचा इथे नक्कीच संबंध आहेच,तो एक switch word आहेच,ह्यात शंका नाही.
विविध उपासना करून ही ऊर्जा पूर्ववत,काही ठिकाणी वाढवून आजार,दोष नष्ट होतात,म्हणजेच उपासना, साधना,नामस्मरण किती महत्वाचे आहे,पहा,
सध्या भीती दायक खूप माहिती सांगितली जाते,म्हणून हा लेखन प्रपंच.
आपल्या धर्मातील सर्व देवता ह्या विशिष्ठ ऊर्जा केंद्रेच आहेत.त्याही विषयावर वेगळे लिहिता येईलच
ही सर्व ऊर्जा केंद्रे निर्माण करणारा ईश्वर,हीच सर्वात मोठी ऊर्जा.
#श्री स्वामी समर्थ
प्रशांत शिंदे
स्वलिखित

Post a Comment

0 Comments